Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नक्की काय विस्कटू? कृती की
नक्की काय विस्कटू? कृती की नीर फणस? >>> कृती.
अन नीर फणस कसा ओळखायचा ते ही सांग
नीर फणसाबद्दल अमितव यांनी
नीर फणसाबद्दल अमितव यांनी सांगितलेय.
मी झाड ओळखू शकते कारण पाने एकदम वेगळी असतात. पण एकदा मार्केटातून नीर फणस म्हणून छोटुस्सा कच्चा फणस आणला होता तेव्हा मी मार्केटात तो कसा ओळखायचा याबद्दल न सांगितलेले बरे.....
कृती मधे बारीक रवा, लाल तिखट आणि मीठ असं आपल्या चवीप्रमाणे एकत्र करून त्यात काप घोळवायचे आणि शॅलो फ्राय करायचे यापलिकडे काहीच नाहीये.
ओक्के!
ओक्के!
अन नीर फणस कसा ओळखायचा ते ही
अन नीर फणस कसा ओळखायचा ते ही सांग>>>.. नेहमीच्या फणसापेक्षा फिक्या हिरव्या रंगाचा,मुख्य म्हणजे त्यावर अजिबात काटे नसतात.
बिर्याणीसोबत मिर्चीका सालन,
बिर्याणीसोबत मिर्चीका सालन, दह्यातली कांदा मिरचीची कोशिंबिर मस्ट.
बिर्याणीसोबत मिर्चीका सालन,
बिर्याणीसोबत मिर्चीका सालन, दह्यातली कांदा मिरचीची कोशिंबिर मस्ट.>>>> ते कान्द्याचे रायते मला जाम आवडते.
योकु, चिवा, नीर फणसाची,
योकु, चिवा, नीर फणसाची, बटाट्याच्या भजीसारखी भजीही छान लागतात. तिखट आम्ही तांदळाच पीठ, मीठ, खसखस किंवा १ टि.स्पून रवा आणि तिखट लावून शॅलो फ्राय करतो, अशाप्रकारे बटाटा, कच्ची केळी ह्यांचे काप ही केले जातात. सुरणाच्या कापांना चिंच किंवा कोकम लावून मग पीठ लावल जात. काहीवेळेस काप जाड काढून थोडी उकडवून मग पीठ लावून फ्राय करतात. तेपण टेस्टी लागत.
नीर फणस माझा फेव्हरेट आहे त्याचे सर्व प्रकार मला आवडतात. हया झाडाबरोबर एक फोटोसुद्धा काढला आहे.
भाजीसुद्धा छान लागते. आईच्या हातच सांबार भात आणि नीर फणसाची भाजी माझा फेव्हरेट मेन्यु.
मी एवढं काहीच खाल्लेलं नाही
मी एवढं काहीच खाल्लेलं नाही नीर फणसाचं. कापच फक्त खाल्लेत आणि मग केलेत.
जाम आवडले होते.
आरती. भाजीची पाकृ कृयोजाटा!
नीधप, हो नक्की.
नीधप, हो नक्की.
धन्स ऑल.
धन्स ऑल.
मला पुढच्या आठवड्यात लंचसाठी
मला पुढच्या आठवड्यात लंचसाठी पोराचे मित्र-मैत्रिणी + त्यांच्या आया यांना बोलवायचं आहे. सुट्टीमध्ये बड्डे होवून गेल्याने पेंडींग राहिलेली पार्टी द्यायचीये. येणारे सगळे जण दिल्लीतले पंजाबी आहेत. व्हेज मेन्यु हवाय.
या ग्रूपबरोबर याआधी एकच पार्टी अटेंड केली होती. त्यात खमण ढोकळा, खांडवी, व्हेज बर्गर, व्हेज नुडल्स, छोले-कुलचे, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, बड्डे केक आणि आइसक्रिम असा मेन्यु होता. एकजात सगळ्या पोरांनी नुडल्स आवडीने खाल्ले होते. २-३ पोरांनी बर्गर आणि छोले-कुलचे पण खाल्ले होते. बाकी पदार्थ फक्त आयांनीच खाल्ले.
एकूण ८ लहान मुलं (वयोगट नर्सरी ते चौथी) + मी धरून ५ आया. दुपारी दोननंतर पोरं शाळेतून आली की लगेच घरी येतिल. संध्याकाळी ६-६.३० पर्यंत असतिल सगळे. वाढदिवसाला महिना होवून गेल्याने केक कापणार नाही आम्ही.
आमच्या पोराच्या नुडल्स, पास्ता, इडली अशा उतरत्या क्रमानेच आवडी आहेत. कदाचीत पावभाजी पण खातिल मंडळी.
मेन्य सुचवा.
गार्लिक टोस्ट / चीझ चिली
गार्लिक टोस्ट / चीझ चिली टोस्ट / चीझ टोस्ट / ग्रिल्ड चीझ सँडविच,
क्रीमी पास्ता किंवा पास्ता सॅलड / मसाला व्हेज नूडल्स,
टोमॅटो सूप,
(हव्या असल्या तरच फिंगर चिप्स)
व्हेज फ्राईड राईस / तवा पुलाव + रायता.
स्वीटसाठी चॉकलेट बेसचे काहीही. (केक, कुकीज्, पुडिंग इ.इ.)
ग्रिल्ड पोटॅटो सँडविच पण भरपेट होणारा व मुलांना आवडणारा प्रकार.
ग्रिल्ड पोटॅटो सँडविच पण
ग्रिल्ड पोटॅटो सँडविच पण भरपेट होणारा व मुलांना आवडणारा प्रकार. >>> माझा मुलगाच खात नाही कसलंही ग्रील्ड सँडवीच.आणि इतक्या जणांसाठी वेळ पण बराच लागेल. बटाटा पण खात नाही अजिबात. सँडवीच मध्ये फक्त काकडी-टॉमॅटो स्लाइसेस घालून खातो.
पास्ता सलाड, फ्राइड राइस किंवा व्हेज बिर्यानी (ही छान जमते मला), रायता, चॉकलेट बेस्ड डेझर्ट यासोबत गार्लिक टोस्ट किंवा तत्सम पदार्थांखेरीज अजून काय स्नॅक्स मध्ये चांगलं वाटेल? (मला आप्पे करायचा मोह होतोय पण या मेन्यु बरोबर खूप विचित्र वाटतिल आप्पे)
सूप नको, उन्हाळा आहे अजूनही.
अल्पना इडल्या हा पर्याय कसा
अल्पना इडल्या हा पर्याय कसा वाटतो? मुलं केचपबरोबर पण खाऊ शकतात.
कॉर्न टिक्की. किंवा इतर
कॉर्न टिक्की. किंवा इतर टिक्की प्रकार.
किंवा मिनी कटलेट्स्. बेबीकॉर्न स्टरफ्राय.
पास्ता सलाड ला मॅक अँड चीज हाही पर्याय आहे.
मुलांना आवडत असतील तर सोया चिप्स (बेक्ड) किंवा ओनियन रिंग्ज, चीझ बॉल्स टाईप प्रकार. सोबत आवडीचे थंड पेय.
केक जरूर कापावा मुलांना
केक जरूर कापावा मुलांना त्यात गंमत असते. हॅपी बिलेटेड बर्धडे असे लिहवून आणा पण केक शि वाय पार्टी नव्हे. त्याच्या आवडत्या कारचा किंवा कार्टूनचा बनवावा.
मिनि पिज्जा आणि मिनी उत्तपम?
एक काउंटर स्वच्छ धुतलेल्या फळांचे ठेवावे. अॅपल बनाना, द्राक्षे संत्री, कापून नाही.
एक कँडल मिळते जी लावल्यावर फुलबाजी सरखी जळते ती पण आणावी.
साधे वेफर्स, ब्रेड बटर/ ब्रेड जँम सँडविच. एका ब्रेडचे चार तुकडे करून. टँग किंवा रसना बनवा कोक मिरिंडा
आणू नका शक्यतो.
बादवे घरी विचारल्यावर केक आणि नूडल्स. हेच उत्तर आले . गम्मत वाटली.
अल्पना, कॉर्न टिक्की?
अल्पना, कॉर्न टिक्की?
अहो सुगरणींनो आणि खवय्यांनो,
अहो सुगरणींनो आणि खवय्यांनो, ह्या बाफवर माझे हे पोस्ट धरून एकूण २६२८ पोस्ट्स झालीयेत
. पुढची चर्चा इथे करा http://www.maayboli.com/node/50024
--
--
मला चिकन गार्लिक टोस्ट ची
मला चिकन गार्लिक टोस्ट ची रेस्पी मिळेल का
प्रिती विराज, तुमचा प्रश्न
प्रिती विराज, तुमचा प्रश्न पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -३ या धाग्यावर विचाराल का कृपया. वर्गीकरणास बरे पडते मग!
कोण करतं वर्गीकरण योकु?
कोण करतं वर्गीकरण योकु?
मंजूडी +१ आणि दुसरं म्हणजे
मंजूडी +१
आणि दुसरं म्हणजे वर्गीकरण जरी करता आलं तरी मसूर खिचडी, मसूराची खिचडी, मसुरीची उसळ तर हे वेगवेगळे प्रत्यय आणि त्यातलं व्याकरण स्वतःला किंवा मदत करू शकेल असं कोणालातरी माहित असल्याशिवाय हवी तेव्हा योग्य रेसिपी सापडणं फार कठीण आहे .. :|
.
.
मी नंतर पाहीलं, सगळीच सरमिसळ
मी नंतर पाहीलं, सगळीच सरमिसळ झालीये या धाग्यांमध्ये. बेत काय करावा; यु सां यु सु...
कोणी मागची किती पानं उलटून
कोणी मागची किती पानं उलटून पाहण्याचे कष्ट घेत असेल असं तुला वाटतं योकु? हे सगळेच बाफ वाहते असायला हवेत.
युसुयुसांचे किती नवीन बाफ तयार केले तरी जुने बाफ अजून बंद केलेले नाहीयेत. आपण उगाचच 'असं करा तसं करा' सांगून लोकांच्या नजरेत वाईट ठरतो.
हम्म्म...
हम्म्म...
हो. माफ करा, माझा जरासा
हो. माफ करा, माझा जरासा गोंधळच झाला. गल्ली चुकली
३५-४० लोकासाठी कट बिन्स ची
३५-४० लोकासाठी कट बिन्स ची भाजी करायला किती एलबी बिन्स लागेल, ओल खोबर २ पाकिट पुरे की ३ ?
मला थोडी मदत करा प्लीज.
मला थोडी मदत करा प्लीज..गणपतीच्या प्रसादासाठी ४० मोठी माणसे आणि १७ मुले बोलवायची आहेत. सोपी म्हणून साबुदाण्याची खिचडी, मलई बर्फीचे मोदक आणि दही असा बेत करायचा आहे. तर खिचडीसाठी लागणार्या सामनाचा अंदाज द्या प्लीज. आणि ह्या मेनूबरोबर ते अॅपल सॉसचे पन्हे चांगले लागेल का? त्याचा पण अंदाज द्या.
धन्यवाद!
Pages