बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९ लहान मुले (वय ६ ते ७) दुपारी जेवायला येणार आहेत. साधारण ११:३० वा. येऊन ५ वाजेपर्यंत आमच्याकडेच असणार आहेत.
आल्या आल्या (१२ वा.) जेवायला घालून पूर्ण दिवस धुडगूस घालू द्यावा असा प्लॅन आहे.

काय मेनु करावा.

१) पास्ता(घरी करणार), गार्लिक ब्रेड (विकतचा), फ्राईज, कोल्ड्रिंक
संध्याकाळी ४ वा. आईस क्रीम किंवा कुल्फी

२) आप्पे, फ्रायम्स, सोलकढी, ??
संध्याकाळी ४ वा. आईस क्रीम किंवा कुल्फी

३) सांज्याच्या पोळ्या, जीरा राईस- दाल फ्राय
संध्याकाळी ४ वा. आईस क्रीम किंवा कुल्फी

मधे अजून काय ठेवावे का आणि काय?

संध्याकाळी आया घ्यायला येतील त्यांनाही आईस क्रीम किंवा कुल्फी.

अजून दुसरा काही मेनु जो आधी करून ठेवता येईल. आयत्या वेळी गरम करून वाढायचा. (ईडली, पावभाजी सोडून)

~साक्षी

१ आणि ३ नं मेन्यू चांगला आहे.
फक्त सांज्याची पोळी सगळ्यांनाच आवडेल का अस वाटतय... (माझ्या मुलिंचे जे मित्र, मैत्रिणी आहेत वय ७-८ त्यापैकी खूप जणांना गोड आवडत नाही)
विचारल नाहीये पण पुरी/पोळी आणि छोले जवळपास सगळ्या मुलांना आवडत. जीरा राईस बरोबर हे हव असल्यास करता येईल.
१ नं तर सगळ्या मुलांना आवडेल अस वाटतय.

साक्षी, ३ नंबरचा मेनू वाचून तोंडाला पाणी सुटले. Happy
एक केळवण करायची आहे, तेव्हा हाच मेनू करावा झालं. सांज्याच्या पोळ्या एक्स्पर्ट मातोश्री आहेतच...

वेगवेगळ्या प्रकारच्या पोळ्या , पराठे ह्यांचा एक कॉमन धागा आहे का ????
जसे वर सांगितलेल्या सांज्याच्या पोळ्या, खव्याच्या ,पुरणाच्या आनि असेच अजुन काही पांरपारीक प्रकार ??

सर्वांना धन्यवाद.
शनिवारी बच्चे कंपनी येतेय. उद्या सुट्टी घ्यायचा प्लॅन होता, पण मिळत नाहीये. बाकी पण खूप कामं रहिली आहेत. (जसे घर आवरणे) त्यामुळे नं. १ किंवा पिझ्झा बाईट्स पैकी एक ठरवतेय.
पण अजून पिझ्झा बाईट्स बरोबर काय ठेऊ कळत नाहीये.

~साक्षी.

पिझ्झा बाईट्स बरोबर सूप, पास्ता सॅलड, फ्रेंच फ्राईझ, मिल्क शेक / कोल्ड्रिंक असे ठेवता येईल.

यस अरुंधती, हेच ठरवलंय,
पिझ्झा बाईट्स, फ्रेंच फ्राईझ, मँगो मिल्क शेक

धन्यवाद.

उद्या २ मैत्रीणीआणी फँमिली जेवायला येणार आहेत..त्यातली एक प्रेग्नट आहे, तीने सधा मेनु कर अस सा.न्गितलय पण अगदिच साध काय करु?व
खालच बेत बरा वाटतोय का?
ब.भा़जि,चवळी उसळ्,कढी,साधा भात, पोळ्या,नारळी भात्,आइसक्रिम
अ‍ॅपेटायझर सुचवा,
(तिच्या डोजेला फ्रुट-सलाड आणी त्याच्या जस्ट आधी पुरण-पोळी असे बेत आधिच झालेत)
वान्गी ९व्या महिन्यात खाऊ नये का? गरम पडतिल का? तिला भरली वान्गी आवडतात)

छोटि छोटि थालिपिठे,..कमि तेलातलि, वाफेवर भाजुन छान लागतिल .बरोबर लोणि वा दहि. भरलि वांगि आवडतात तर खाउदे. बेताने खाल्ल्यास अपाय होत नाहि.

धन्यवाद शुम्पी,सायो,राया,
थालिपीठाची आयडिया छान आहे पण मुलगा लहान असल्याने त्याला सा.न्भाळून नाही जमणार!

कोबी वड्या वाफवून व मग शॅलो फ्राय करून
किसलेले गाजर, कोबी, वाफवलेले स्वीट कॉर्न व इतर आवडीच्या भाज्या, थोडा उकडलेला बटाटा, भाजणी पीठ / तांदळाचे वा मिक्स पिठे घालून टिक्की / कटलेट्स् - सोबत केचप.

लेकीच्या शाळेत इंटरनॅशनल फुड पॉटलक आहे. तुमची साईडची स्पेशल पा़कृ. आणा अस सांगितले आहे.
वर्गात भारतीय म्हणजे फक्त दक्षिणेतले आहेत त्यामुळे तिकडचे भरपुर प्रकार येतिल.
आपल्या मराठी पद्धतीचे काय करुन नेता येईल? एकच आणि हातात घेऊन खायला सोपा असा पदार्थ हवा आहे. बर्‍यापैकी प्रमाणात घेऊन जावे लागेल. २५ मुलांचा वर्ग (२री )आणि सगळ्यांचे पालक .
पदार्थ आणि प्रमाण (किती घेऊन जावे ते) कोणी सांगु शकेल का? नट्स फ्री/चॉकलेट फ्री हव आहे.

मला सुरळीच्या वड्या/कटलेट/छोटे बटाटे वडे/ खोबर्‍याच्या वड्या/लाडू अस सुचत आहे.

कच्छी दाभेली (शेंगदाणे वगळून), वडा-पाव / बटाटेवडे चटणी (सौम्य चवीचे), आलू टिक्की - चटणी / केचप.
दिवाळीतले प्रकार जसे कडबू, चकली, शंकरपाळे इत्यादी. करंज्या, लाडू, वड्या.
भोपळ्याचे घारगे, तिखटमिठाच्या पुर्‍या.

कटलेट ईथे सगळ्यांना खुप आवडतात. चालत असेल तर भरपुर भाज्या घातलेला पुलाव पण हिट होतो. नाहीतर वेगवेगळ्या रंगाचे पापड्/पापड्या पण चालतील.

साऊथ इंडियन शुध्द शाकाहारी कपलला जेवायला बोलवायचे आहे. तर बेत काय करु? रात्री येणार म्हणून जरा प्रश्न आहे की पूर्ण जेवण करायचं की काही लिमिटेड मेन्यू. (सारखी सारखी) पावभाजी करु नको असं नवरोबाने निक्षून सांगितलंय. मी या लोकांना नीट ओळखतही नाही सो आवडीनिवडी माहीत नाहीत.

अनुश्री कॉर्न कटलेट. आवडते सगळ्यांना. Happy विकतचे न्यायचे असल्यास तळलेले बटाट्याचे /तांदळाचे पापड.

वेदिका,
कोफ्ताकरी किंवा पनीर माखनी(सायोची मेथड वापरून लगेच होईल.) आणि चपाती. रायता पाहिजेच. तळलेले पापड, पकोडे. गुलाबजाम आणि जीरा राईस किंवा व्हेज बिर्याणी. अगदी बेसिक मेनु सांगितलाय जो जनरली आवडतो. ह्यात अ‍ॅडीशन/सबट्रॅक्शन करू शकता. Happy

वेदिका, सोबत एखादी ड्राय / कोरडी भाजी (सिमला मिरची - बटाटा / भेंडी फ्राय / फ्लॉवर बटाटा इ.) ठेवा. काही वेळा पनीर किंवा कोफ्ता भाज्या काही लोकांना आवडत नाहीत. मटकी / चवळी / मसूर उसळही ठेवू शकता.
आम्रखंड / फ्रूट सॅलड / शेवयांची ड्राय फ्रूट्स् वगैरे जामानिमा घालून केलेली दाट खीर / मँगो शिरा

धन्यवाद सगळ्यांना. कटलेट किंवा छोट्या कागदी कप (कप केकचा) असतो त्यात आंब्याच्या शिर्‍याची मुद असा विचार करती आहे.

Pages