बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पार्टी साठी काही पदार्थ आयते आणि काही घरी करता येतील असा मेनु हवाय.
स्टार्टर, २ भाज्या (छोले नक्की जमतील घरी करायला), सलाड किंवा तस्तम काहीतरी, नान? /पोळ्या ? , भाताचा काहीतरी प्रकार, रायता वगैरे आणि गोड-गुलाबजाम.

हे कसं वाटतंय?

स्टार्टर - दिपचे समोसे आणि कॉस्कोचे हालापिनो पॉपर्स
भाज्या - छोले आणि एकदम सोपी हवी असल्यास ब ची भा किंवा पनीर भुर्जी/मटर पनीर वगैरे एखादा पनीर प्रकार
सलाड - सध्या उन्हाळा आहे तर सरळ कापलेली काकडी (फु प्रो वर होबास, टमाटो वगैरे ठेवलं तरी बास
दिपचेच नान Wink
दाल फ्राय आणि भात किंवा सरळ तुम्हाला आवडणारा पुलाव.

गुलाबजामही विकतचे घेऊ शकताच.

या धाग्याचा भाग 2 सापडत नाहीये.
लहान बाळाला सांभाळून हा बेत कसा वाटतोय सांगा. लहान मुले फार नाहियेत. रात्रीचा मेनू आहे.
(जमले तर) स्वीट कॉर्न सूप
स्टार्टर्स मध्ये: ब्रेड पकोडा, पालक भजी (चिराचिरी झंझट नाही)
मेन कोर्स: गाजर काकडीची दह्यातली कोशिंबीर,पनीर कढाई, पोळ्या, साधा भात, दाल फ्राय, दुधी हलवा (आधी करता येईल).
नंतर आईस्क्रीम.

आशू, लहान मुलं फार नाहीयेत ठीके... पण मोठी मुलं किती आहेत? Wink
चिराचिरीची झंझट नाहीये, पण तळणाची झंझट आहे ना? त्यापेक्षा, ढोकळा/ कोथिंबीर वडी/ सुरळीच्या वड्या इत्यादी विकत आणता येतील का? अळूवडीचे ऊंडे मिळतील का? ते मिळाले तर तळायला कुठल्या तरी लहानात लहान मुलाला उभं करता येईल Proud
बाकी मेनू सुंदर आहे.

क्सा,ऑफर वॆलिड टिल स्टॉक लास्ट्स Proud
मंजू, पावसाच्या दिवसात थंड सुरळ्या, को,अ वड्या बोअर होतील ना? तेवढं तळणच ऐनवेळी ठेवणार आहे. राहील ना कुणीतरी उभं. मिरगुंडही आधी तळून प्लॆ. पिशवीत फ्रिजमधे ठेवणारे.

पनीर आवडत असेल तर पनीरला कुठलीही चटणी लावून ठेवायची आणि आयत्यावेळेला खरपूस शॅलो फ्राय करायचे. हमखास हिट स्टार्टर होते.

असो..

आषाढी साजरी करायला घरी पाहुणे येणार आहेत. साधारण १२ ते १५ लोक आहेत.
नॉनव्हेज आणि व्हेज मधे १ - २ स्टार्टर सुचवा ना.

मी ठरवलेला मेनु काहीसा असा आहे.

ग्रीन चिकन ( ग्रेवीसह )
मटण रसा
चपाती, रोटी
दम बिर्याणी
जेवणानंतर : पुडिंग ( अंड्याचे )

व्हेजमधे ( दोन जण एगीटेरियन आहेत म्हणुन )
एक पालेभाजी
एक ग्रेवीची भाजी ( यात सुधा पर्याय सुचवा प्लिज, वांगे सोडुन )
चपाती, फुलके
व्हेज दम बिर्याणी

या मधे स्टार्टर काय आसवे?
नॉनव्हेज आणि व्हेज मधे १ - २ स्टार्टर असावेत अस वाततय.

शिवाय एखादे ( व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ला चालेलसे) सुप सुधा सुचवल्यास आवडेल.
अजुनही काही पर्याय सुचवल्यास सुचनांचे स्वागतच... Happy

आषाढी साजरी = आषाढी एकादशी गेली, आता अमावस्या येऊ घातलिये योकु. याला आपल्या पापुलर भाषेत गटारी म्हणतात. त्यासाठी नॉनव्हेजचा मेनू विचारलेला दिसतो आहे.
एकादशीनंतरही अनेक लोक पारणं म्हणून नॉनव्हेज बनवतात घरात.

***

@ मी_चिऊ

>>मी ठरवलेला मेनु काहीसा असा आहे.<<

38.gif पार्टीचं आमंत्रण मिळवायला काय करावं लागेल? Wink

व्हेज स्टार्टर्सः
१. उकडलेले शेंगदाणे / हरभरे / वाटाणे इ. मीठ-चाटमसाला इ. लावून. हवे तर कांदा टमाटा कोथिंबीर वरून घालणे.
२. ग्रीन सॅलड.
३. मसाला खाकरा सोबत कैरी-पुदिन्याची चटणी व शेझ्वान चटणी डीप म्हणून.
४. लहान मुलं असतील तर चीज-चेरी-पायनॅपल.
५. लसूण फ्राय.
६. पापड कचुंबर. किंवा मसाला पापड.

नॉन-व्हेज.

दम बिर्याणी नंतर असेल, तर चिकन अन मटन दोघांचा रस्सा जरा जास्तच वाटतोय. ग्रीन चिकन कोरडं करून स्टार्टरमधे होईल

किंवा बॉइल्ड अंडी नुसती तिखटमीठ पेरून, अथवा डेव्हिल्ड एग्ज
करून.

मासे आवडत असतील, तर प्रॉन्स, अन आवड असेल, वास सगळ्यांना चालणार असेल, तर भाजलेले सुके बोंबिल.

रच्याकने:
मी म्हटलो तशी पार्टी असेल, तर स्टार्टर्स जास्त अन जेवण जरा कमी असे प्रमाण हवे. ऐन वेळी मटनातले पिसेसही चखन्याला चालून जातात Wink

कोथिंबीर वडी, सुरळीच्या वड्या, छोट्या इडल्या , कॉर्न भेळ , कचोरी, कांदा भजी , मिक्स व्हेज कटलेट यातलं काही व्हेज स्टार्टर ,

नॉन व्हेज स्टार्टर्स मधे तळलेली कोलंबी, खिमा कटलेट्स / प्याटीस, खिमा समोसे , बोनलेस फिश पीसेस ग्रीन चटणी लावून शॅलो फ्राय,

ग्रेव्हीच्या भाजीमधे मिरची का सालन, पनीर माखनी, बाळ बटाट्यांची भाजी , वालाचे बिरडे / मुगाचे बिरडे, मिश्र कडधान्यांची उसळ यातील एक करु शकता. मृ च्या रेस्पीने भरली भेंडी एकदम मस्त होतात, फारसा रस्सा नसला तरी पोळीबरोबर एकदम बेस्ट

अर्र. हो की. क्षमस्व. विसरलो होतो ही गोष्ट. मग कसा साग्रसंगीत मेन्यू हवा!

स्टार्टर्स जास्त अन जेवण जरा कमी असे प्रमाण हवे > +१

व्हेज -
- खेकडा भजी चालतील पाऊस असेल तर
- वर नी म्हणाली तसं > पनीर आवडत असेल तर पनीरला कुठलीही चटणी लावून ठेवायची आणि आयत्यावेळेला खरपूस शॅलो फ्राय करायचे. हमखास हिट स्टार्टर होते.
- फारच काही करायचं असेल तर फ्रूट कबाब पण करता येतील. रेसीपी सांजीव कपूर च्या खाना-खजाना या यूट्यूब चॅनल वर मिळेल. (ऑफिसात लिंक चालत नाही, घरी गेल्यावर देता येईल)
- गोल्डन फ्राईड बेबी-कॉर्न करता येईल.
- ते नसेल तर मका वापरून गोल्ड कॉईन कबाब ही जमतील.

नॉन-व्हेज -
- ग्रील्ड ग्रीन चिकन
- चिकन टिक्का
- तंगडी कबाब
- लोला नी दिलेली कृष्ण्करी ही जाईल, जरा झणझणीत!
- जागू ताईंनी दिलेल्या पाकृ पहाल तर माश्यांचे भरप्पूर प्रकार मिळतील.

एगईटर्स करता - ऑम्लेट मध्ये कुठलंही फिलींग भरून रोल्स करता येतील.
अर्थात रोल्स प्रकार केलात बाकि लोकांकरता तर जरा फिलिंगही होईल.

माझ्यामते ईतके स्टार्टर्स असतील तर व्हेज + नॉनव्हेज बिर्याणी अन नंतर स्वीट यात होईल...

... सध्या बास!

2600

देवा!
चीज चेरी पायनॅपल ची रेस्पी??

या तिन्ही वस्तूंचे तुकडे टुथपिकवर ओवायचे. मग अशा १२-१५ काड्या एका प्लेटमधे बर्फाचा चुरा घेऊन त्यावर ठेवायच्या अन सर्व्ह करायच्या. बर्‍यापैकी हॉटेलात २-३०० रुपये लावतात एका प्लेटचे. Wink

पण चव भारी लागते. चेरीज पानवाले वापरतात तश्या साखरेच्या पाकातल्या लालजर्द देखिल चालतात. पिट्टेड वाल्या म्हणतात तश्या.

गार्लिक ब्रेड... ऑलिव्ह ऑइलमधे चक्क हर्ब्ज आणि बारीक क्रशलेली लसूण अशी फोडणी करून घ्यायची. ते तेल वस्तूंसकट स्लाइसांना लावून ठेवायचे. आयत्या वेळेला तव्यावर टोस्ट करायचे.

माझी तडतड मिरचीची रेसिपी हवी तशी मॉडिफाय करून घेणे. (रिक्षेबद्दल माफी)

बटाट्याचे/ नीर फणसाचे काप करून तुकडीला लावावे तसा रवा-मीठ-तिखट लावून शॅलो फ्राय

वांग्याच्या कापांना हळद, मीठ लावून ठेवायचे आणि आयत्यावेळेस शॅलो फ्राय

खाकरा भेळ

नीर फणसाचे काप केलं पाहिजे. <<
करून बघा. भन्नाट लागतात. तुकडीतोड लोक तुकडीसारखेच लागते म्हणतात. तुकडीसारखे लागते की नाही मला माहित नाही.
नेमकं मला करायला वेळ असतो तेव्हा पार्ला मार्केटात नीर फणस मिळत नाही. (आ उ त्या फा! Wink )

नी जरा विस्कटून सांगशील का?
नीर फणस कसा ओळखायचा? ईकडे मार्केटात असतो बहुतेक वेळेला... करून पाहीन!

Pages