खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा २ टीबी चा पेन ड्राईव्ह आला. फक्त ६५० रुपयात मिळाला. कपॅसिटी पण १.९ टीबी आहे.
एकच प्रॉब्लेम म्हणजे स्पीड खुपच कमी आहे.

http://www.aliexpress.com/item/2015-Real-gran-capacidad-giratoria-de-met...

डीस्प्युट टाकलेल्या ऑर्डर चा रीफंड पण जमा झाला.
दुसर्‍या एका पेन ड्राईव्ह ची ऑर्डर अली नेच कॅन्सल केली कारण म्हणे विकणारा संशयास्पद आहे. त्याचा पण रीफंड मिळाला. फसवणुकीच्या जगात जरा बरे वाटले.

टोच्या , तुमची खरेदी आणि खंत वाचून पुढील जोक आठवला

भाडेकरू: अहो काय मालक काय खोली आहे, रात्रंदिवस उंदीर नाचताहेत इथे ::राग:

मालकः मग? पाच रुपये भाड्यात काय गोपीकृष्ण नाचतील काय ?

असू द्या तुमच्या पेड्रा चा स्पीड कमी ! Happy

@ टोचा

तुम्ही पेन द्रीवे कसा टेस्ट केलात ?

त्यावर १०-१२ GB च्या खूप फिलेस सवे करून पहा

काहीतरी गडबड वाटतेय.

http://www.instructables.com/id/Dont-fall-for-the-Flash-Drive-Scam!/

http://www.myce.com/news/fake-and-counterfeit-usb-flash-drives-spreading...

https://www.raymond.cc/blog/test-and-detect-fake-or-counterfeit-usb-flas...

@ हेमंत - धन्यवाद. डोळेच उघडले. तुम्ही दिलेल्या लिंक वर लिहीले आहे त्या प्रमाणे १६ जीबीच्या वरचा डाटा गायब होतोय.

कोणी घेवु नका हे पेनड्राईव्ह अलि एक्प्रेस वरुन

इब्लिस | 19 May, 2015 - 13:36

माझा सायकल साठीचा लाईट आलाच नाही.

त्यांनी डिस्प्युट उघडल्यावर बायर प्रोटेक्शन ३० दिवस वाढवून डिस्प्यूट क्लोज केली. अन नंतर मला पैसे परत केलेत असा ट्रँजॅक्शन मेसेज. बँकेचे ट्रँजॅक्शन तपासले नाहीत, पण आले असतील. ७० की ७२ रुपयांचा रिफंड होता डोळा मारा

दरम्यानच्या काळात मला इथेच डीमार्टला छानसा सायकल लँप मिळाला. १२० रुपयांत पांढरा व लाल ची जोडी.

ऑर्डर केलेला दिवा आपल्या पोष्टात कुठेतरी गहाळ झाला असण्याची शक्यता दाट आहे.

<<

आज अचानक पोस्टमनने एक पार्सल आले आहे म्हणून मला तो दिवा आणून दिला! झक्कास आहे.
पोष्टमन यांनी काहीही पैसे मागितले नाहीत.

मी अली एक्सप्रेसवर खुप म्हणजे खुप प्रॉडक्स्ट्स पाहिले आणि सिलेक्ट केलेत.

माझ्या काही शंका:

१. क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंग वापरुन मागवणे कितपत सेफ आहे कळत नाहीये. 'कॅश ऑन डिलिव्हरी'चा ऑप्शन नाहीये. शिवाय ओटीपीसुद्धा जनरेट होत नाही. Sad

२. फ्री शिपिंग अंतर्गत अगदी ६ रुपयापासुन नेकलेस पाहिला. एवढ्या कमी किंमतीसाठी होम डिलिव्हरी फ्री कशी काय? मिनिमम कितीची खरेदी करावी लागेल असे काही असेल का?

माझ्या काही शंका:

१. क्रेडीट कार्ड/ नेट बँकिंग वापरुन मागवणे कितपत सेफ आहे कळत नाहीये. 'कॅश ऑन डिलिव्हरी'चा ऑप्शन नाहीये. शिवाय ओटीपीसुद्धा जनरेट होत नाही. अरेरे >> पियू मला तर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काहीही वापरताना कोणताच इश्श्यू आला नाही. ओटिपी जनरेट होत नाही. तु मागची काही पानं चाळ, राज ची पोस्ट आहे कार्ड विषयी ती तुझी शंका दूर करेल. उलट मला रिपे करताना सुद्धा ते व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचले आहेत पैसे.

२. फ्री शिपिंग अंतर्गत अगदी ६ रुपयापासुन नेकलेस पाहिला. एवढ्या कमी किंमतीसाठी होम डिलिव्हरी फ्री कशी काय? मिनिमम कितीची खरेदी करावी लागेल असे काही असेल का?
>> प्रत्येक दुकानदार त्या प्रॉडक्टविषयी माहिती देतो त्यात लिहितो मिनिमम ऑर्डर असेल तर. आणि ती किती $ ची हवी ते पण. परंतू काही सेलर तसं कंपल्शन नाही ठेवत. आता त्यांना परवडत असेल तर तुला का प्रश्न पडलाय? Happy

दुसर्‍या एका पेन ड्राईव्ह ची ऑर्डर अलीनेच कॅन्सल केली कारण म्हणे विकणारा संशयास्पद आहे.
>> रिफंड करू असे म्हटले आहे वाट पाहतोय.

२ टीबी चा कॅपॅसिटी असलेला पेन ड्राईव्ह ऑर्डर केला होता पण अलीनेच होल्ड केलीय वरील कारणामुळे Happy Happy

पियू मला तर डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड काहीही वापरताना कोणताच इश्श्यू आला नाही. ओटिपी जनरेट होत नाही. तु मागची काही पानं चाळ, राज ची पोस्ट आहे कार्ड विषयी ती तुझी शंका दूर करेल. उलट मला रिपे करताना सुद्धा ते व्यवस्थित माझ्यापर्यंत पोहोचले आहेत पैसे.

>> अगं मला एक मैत्रीण म्हणाली कि कार्ड/ अकाऊंट हॅक वै. होण्याचे चान्सेस जास्त आहेत असं वाटतं प्रथमदर्शनी.

दक्षे सेट खूप गोड दिसतोय. (तुझ्यासारखाच).

>>>
आता एका कपात ६-६ चमचे साखर घातल्यावर होणारच हे... Wink

<<<@ विशाल : हे तु जे मागवले ते ओन्ली आयफोन साठी का? त्से लिंक बघतेच पण विचारले सहज डोळा मारा>>>

@योगुली : नाही, ते कुठल्याही स्मार्टफोनला वापरता येते. एक्स्टर्नल अटॅचमेंट आहे. ३५ दिवसांनी आल्या लेन्सेस पण वर्थ आहेत. फिशआयसाठी परफेक्ट.

मी मागवलेले २ कानातले अजून आले नाहीतं. सेलर म्हणतो भारतात पोचले आहेत अजून काही दिवस थांबा. २३ एप्रिल ला ऑर्डर केलेतं, मी तर होप्स सोडल्या आहेत Sad Sad

प्राजक्ता मी ऑर्डर केलेले कानातले आलेत घरपोच. मला नक्की आठवत नाहिये पण त्यापैकी एक तू मागवल्यासारखाच आहे.
मला सांगायचय की वस्तू मिळतील.

हो, एक तसेचं आहेत, तुला किती दिवस लागले ? मी डोंबिवलीचा पत्ता दिला आहे, तुला ऑफीसच्या पत्त्यावर आले का ? मी बायर प्रोटेक्शन वाढवलं आहे २० दिवस, बघू काय होतं.

घरीच आले. मी २४ एप्रिलला ऑर्डर केलेले सगळे प्रकार ४ दिवसाच्या फरकाने आले. साधारण मे महिन्याच्या शेवटाच्या आठवड्यात.

हमारे बरोबर भी असच हुआ आहे. मंगायेल २/३ वस्तु पोचल्या एक और बाकी आहे.म्हणे भारत मे पहुचा तुमको मिळेंगा.

Pages