खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरूवात मीच करते Happy

galyatli.jpg

वरच्या फोटोमध्ये दोन गळ्यातली आहेत ती मी ५ मार्च ला ऑर्डर केली होती.
पैकी
हत्तीचं पेंडंट असलेल्या प्रॉडक्टची लिन्क. ( किंमत ५१ रूपये ८९ पैसे)
http://www.aliexpress.com/item/Free-Shipping-European-retro-delicate-ope...

आणि सिल्व्हर पेंडंट ची लिंक (किंमत - रुपये 27 पैसे 89 )
http://www.aliexpress.com/item/x20-Special-ancient-silver-Korean-jewelry...

दोन्ही प्रॉडक्ट्स चांगली आहेत. हत्तीचं जे नेकलेस आहे ते पितळी आहे. त्याची क्वालिटी थोडी लो वाटते पाहिल्यावर. त्या केसमधे आपण फक्त सिल्व्हर नेकलेस पाहू शकतो. सिल्व्हर नेकलेस अप्रतिम आहे.

प्रशू ही साईट फक्त अलिएक्स्प्रेस साठी च्या प्रॉडक्ट साठी आहे. तिथे अनेक वेबसाईटची चर्चा होते. सरमिसळ होऊ नये म्हणून.

अगं हाच बाफ दोनदा चालू झालाय... म्हणून म्हटलं Wink माझी काहीच हरकत नाहीये... अलीसाठी नवा बाफ हवाच होता.

तरिच म्हणलं. मी धागा सेव्ह करताना नेट गेलं होतं.
अ‍ॅडमिनना विपू करून दुसरा धागा डिलिट करते. थॅंक्स लक्षात आणून दिल्याबद्दल. Happy

मय भी तीन गोष्टी आरडर कियेला हय.
वाट बघता हय आनेकी.
१. क्रॉस बॅग - पुरुष
२. बेल्ट
३. स्क्रॅच रिमुव्हर
सगळा माल मिळुन जवळ्पास १५०० रुपये सम्जा.
ही बॅग आहे
http://www.aliexpress.com/item/Awen-hot-sell-famous-brand-Italian-design...

aivaj.jpg

घुबडाचं नेकलेस (किंमत २५ रूपये ९५ पैसे) पितळी आहे. थोडं जुनं वाटतं पण थोडे दिवस वापरायला काहीच हरकत नाही.
http://www.aliexpress.com/item/xs009-Min-order-is-8-mix-order-Free-Shipp...

गॉगल (किंमत १०७ रूपये + १७७ रूपये पोस्टेज) क्वालिटी उत्तम. (फक्त गॉगल, केस मिळत नाही)
http://www.aliexpress.com/item/New-arrival-fashion-Women-Sunglasses-Blac...

जेल आयलायनर ( ५७ रू. ७३ पैसे) क्वालिटी उत्तम. मी डोळ्याच्या आत सुद्धा घालून पाहिलं. मला काही त्रास झाला नाही.
http://www.aliexpress.com/item/Free-Shipping-Cosmetic-Set-Black-Liquid-E...

काजळ पेन्सिल (जवळपास ६०-६२ रूपये) क्वालिटी उत्तम. फोटो उद्या टाकते.
फक्त चित्रात २ दिसतात, मूळात एकच आहे.
http://www.aliexpress.com/snapshot/6491907311.html?orderId=65801833098272

कानातलं (किंमत ७७ रूपये १८ पैसे) मैत्रिणीला आवडलं म्हणून मागवलं आहे. पण क्वालिटी उत्तम आहे.
http://www.aliexpress.com/item/New-Arrival-Fashion-Jewelry-Crystal-Rhine...

हे सगळं चायना मधुन शिप होतं की इंडियामधुन ? जर चायनावरुन शिप होत असेल तर कस्टम्सची काही झंझट नाही ना ? बाकी वेबसाईट मात्र झक्कास आहे.

जेम्स बॉण्ड , तुम्ही दिलेल्या लिन्क वर क्लिक केल तर कुठल्यातरी अगम्य भाषेत मेन्यु दिसत होता .
म्हणून सहज गंमत म्हणून मराठी भाशा निवडली . ( कोपर्यात ऑप्षन आहे - भाशा बदलासाठी)

तर
"
Awen-गरम विक्री प्रसिद्ध ब्रँड रचना लेदर पुरुष पिशवी, प्रासंगिक व्यवसाय लेदर भारतात दूत पिशवी, द्राक्षांचा हंगाम फॅशन क्रॉस शरीर पिशवी भारतात

"
हे वाचण्यात आलं .

आणि हे हिन्दी भाषांतर Rofl

Awen गर्म बेचने के प्रसिद्ध ब्रांड डिजाइन चमड़े पुरुषों बैग, आकस्मिक व्यापार चमड़े Mens दूत बैग, पुराने फैशन पार शरीर बैग mens

एक मस्त बॅग तिचे भाषान्तर

नवीन हॉट विक्री महिला दूत बॅग लेदर handbags महिला पिशव्या शरीर खांदा पिशवी प लेदर पिशव्या bolsas femininas ओलांडू.:हहगलो:

बाय द वे, छान आणी स्वस्त आयटम्स आहेत इथे. दक्षिणा धन्यवाद नीट माहिती दिल्या बद्दल. आता मागवता येईल हवे ते.

उत्पादन नाही वर्णन, विक्रेता परत शिपिंग देते तर परत स्वीकारले; किंवा उत्पादन ठेवू विक्रेता परत सहमत आहे. तपशील पहा

येऊ दे गं मंजू. ऋन्म्यापेक्षा बरी नाही का
>>>

मी दर दोन दिवसांनी माझ्या नावाचा सर्च मारतो, मग एखाद्या धाग्याच्या आतल्या पानावर असे काही गवसते Wink

@ धागा,
कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन शॉपिंगचा माझा अनुभव जाम बेक्कार आहे.
कारण खरेदी ग'फ्रेंडची होते आणि खर्चा माझ्या कार्डने होतो.

आली Happy

Pages