खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ जर्बेरा,
ते केल्यावर ते अलिबाबा वर का लॉगिन करायला सांगत आहेत ?

इथून मी तरी काही खरेदी केली नाहीये पण असल्या वेबसाईट्सचे समान पोहोचवणारे लोकं लोकल कुरियर वाले असतात. काही साईट्स वेबसाईट्स वरच अपडेट देतात कि आपण ऑर्डर केलेली वस्तू कुठे आहे ते आणि काही कोड देतात मग तो त्या कुरियरवाल्याच्या साईट वर टाकून आपली ऑर्डर बघायची. अली बहुतेक त्यांच्याच साईट वर दाखवत असावेत म्हणून लॉगीन Happy

आत्मधुन मी गॉगल खरेदी केला तेव्हा पोस्टेज द्यावं लागलं होतं. रू. १७७/- आणि गॉगल मूळात रू. १०४/- किंमतीचा होता Proud
(चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला)

ट्यूलिप आणी सगळ्यांसाठी,
एकदा डिस्प्युट रेज केल्यावर क्लोज किंवा अ‍ॅक्सेप्ट करू नका जोपर्यंत वस्तु किंवा पैसे परत येत नाहीत तो पर्यंत

टोच्या,
हो पेनड्राईव्ह माझा पण ३ आठ्वड्यात आला होता, ड्युअल (विथ ओटीजी) सपोर्ट मला ९ डॉलर्स लागले होते ६४ जीबी ला, छान चालतोय Happy

टोचा तुम्ही खरेदी केलेल्या pendrive ची लिंक द्याल का?>>>>>

श्वेतु - १६ जीबी चा ४०० रुपयाला मिळाला. तो अँड्रॉइड मोबाइल ला पण लावता येतो म्हणुन कदाचित महाग असेल.

http://www.aliexpress.com/item/New-Smart-Phone-Tablet-PC-USB-Flash-Drive...

ह्या पेनड्राईव्ह चा अनुभव चांगला आल्यामुळे लगेच १ टीबी चा पेन्ड्राईव्ह ऑर्डर केला आहे. फक्त ६०० रुपये. एक टीबी ची हार्डडिस्क ४००० रुपयाच्या खाली मिळत नाही.

http://www.aliexpress.com/item/Pen-drive-1tb-pendrive-1tb-Famous-brand-U...

मी २ टीबीचा पेन ड्राईव्ह खरेदी करण्याचा प्रयत्न करतोय, पण आयसीआयसीआय बँकेचे डेबिट कार्ड वापरुन पेमेंट होत नाहीये.

कुणी मार्गदर्शन करु शकेल काय?

इलेक्ट्रॉनिक वस्तू (नामांकित ब्रँड नसलेले पेन ड्रईव ई.) शक्यतो टाळा.
पेन ड्रइव मधे छुपे सॉफ्ट्वेअर्स असु शकतात. तुमची महिती कॉम्प्र्माईस होउ शकते.
पेन ड्रइव ची पूर्ण कॅपॅसिटी चेक करा. बर्‍याचदा फर्मवेअर मॉडिफाय करुन कॅपॅसिटी सेट करता येते.
उदः ४ जीबी चा पे.ड्रा. मधे ~ ३ जीबी डेटा सेव/डिलिट(४-५ वेळेस) करुन पहा.

माझी चारपैकी तीन पार्सलं पोचली. आत्तापर्यंत एकाही पार्सलावर पोस्टेज इत्यादी जास्तीचा खर्च नाही द्यावा लागला.

अत्मधून चिंता की कोई बात नही. मला पण गॉगल सोडून अनेक वस्तू आल्या त्यावर काहीच पोस्टेज वगैरे द्यावे लागले नाही. ३ चेन नेकलेस, २ कानातली, १ टो रिंग सेट, जेल आय लायनर, काजळ पेन्सिल, यात फक्त गॉगलवर जास्ती पैसे द्यावे लागले. त्यातून एक धडा, मोठ्या वस्तू मागवायच्या नाहित. अर्थात पोस्टेज देऊन सुद्धा उत्तम वस्तू मिळाली शिवाय स्वस्त.

यात फक्त गॉगलवर जास्ती पैसे द्यावे लागले.>>>>>>
@ दक्षीणा - मला ह्या प्रकारात भारतातल्या कुरीयर कंपनीची फसवणुक असावी असे वाटते.
तुम्ही दिलेले १७७ रुपये चीन मधे कसे पोचणार ते कळत नाही.

अली वर जिथे जिथे शिपींग चार्जेस आहेत तिथे ते आधीच घेत आहेत. कॅश ऑन डीलीव्हरी नाहीये.
मला वाटते, त्या कुरीयर वाल्यानी तुम्हाला फसवले असावे.

समजा तुम्ही तो गॉगल घ्यायला नकार दिला असता पैसे भरुन तर, चीन वरुन पाठवणार्‍याचे कीती नुकसान झाले असते. तो सप्लायर असली रीस्क घेणार नाही.

टोचा या सर्व वस्तू पोस्टाने येतात. कुरियर ने नाही. पोस्टाचे चार्जेस घेतले आहेत १७७. ते लोकल असतील कदाचित. चिनच्या सप्लायर चा काहि संबंध नाही.

ट्युलिप पैसे नक्की परत मिळतील. डिस्प्युट फिनिश किंवा अ‍ॅक्सेप्ट झाल्यावरच सेलर पैसे पाठवतो.
मला सुद्धा एक कानातलं आलं नाही मी डिस्प्यूट ओपन केला. मग त्यावर त्यांनी तोडगा सुचवला की आम्ही पैसे परत पाठवतो, मी ते अ‍ॅक्सेप्ट केलं, मला पैसे परत आले.

टोचा या सर्व वस्तू पोस्टाने येतात. कुरियर ने नाही. पोस्टाचे चार्जेस घेतले आहेत १७७. ते लोकल असतील कदाचित. चिनच्या सप्लायर चा काहि संबंध नाही.>>>>> अहो मग त्या पोस्टमन नी फसवले असेल.

तुम्ही मला सांगा, भारतीय पोस्ट खाते आधी पैसे भरल्याशिवाय वस्तू किंवा पत्र स्वीकारते तरी का?
जर तुम्ही तो गॉगल घेत नाही असे म्हणले असते तर पोस्टाचे तो गॉगल तुमच्या पर्यंत पोहचवण्याचे श्रम आणि खर्च वाया नस्ता का गेला?

कुठल्याही कुरीयर कंपनीत किंवा पोस्टात आधीच पैसे भरावे लागतात आणि मगच ते तुमची वस्तू किंवा पत्र घेतात.

भारतीय पोस्ट खाते आधी पैसे भरल्याशिवाय वस्तू किंवा पत्र स्वीकारते तरी का?>>> ते पैसे चायना पोस्टाने भा.पो.ला दिले असतील तर तुमचां काय म्हणणं आहे?

ते पैसे चायना पोस्टाने भा.पो.ला दिले असतील तर तुमचां काय म्हणणं आहे?>>>>>>> तसे असेल तर मग त्यांनी दक्षीणा कडुन पुन्हा १७७ रुपये घ्यायचे काय कारण?

तुम्ही म्हणता तसेच आहे चायना पोस्टानी भारतीय पोस्टाला आधीच पैसे दिलेले असणार म्हणुन तर भारतीय पोस्टानी ती वस्तु दक्षीणा पर्यंत पोचवली. पण त्या पोस्टमन नी चालूगीरी करुन १७७ रुपये हडपले.

त्यावर दक्षिणाची काही हरकत नसेल तर तुम्ही कशाला कीस पाडताय त्या गोष्टीचा? तुम्ही पोस्टमनला पैसे देऊ नका म्हणजे झालं.

त्यावर दक्षिणाची काही हरकत नसेल तर तुम्ही कशाला कीस पाडताय त्या गोष्टीचा? तुम्ही पोस्टमनला पैसे देऊ नका म्हणजे झालं.>>>>>>

त्याच्रे कारण आहे. अली ची उगाच बदनामी होते आहे ह्या प्रकारात. कारण दक्षीणाने हा अनुभव सांगीतल्यामुळे बर्‍याच लोकांनी अली कडुन वस्तु मागवावी की नाही असा विचार केला असेल.

तुमचा पुढचा प्रश्न यायच्या आधीच हे उत्तर. मला अलीबाबा कडुन पैसे मिळत असल्यामुळे मी अलीची उगाच बदनामी होऊ नये ह्या बद्दल काळजी घेतोय ( हे हलके घ्या )

Lol गूडवन!
मग याच काळजीपोटी तुम्ही पुणे पोस्टखात्यात 'का हो? एका मायबोली मेंब्राकडून तुम्ही १७७/- रुपये कश्यासाठी घेतले?' असे विचारू शकता.
त्यावरचे उत्तर इथे लिहा बरं का! म्हणजे मग लोकं धडाधड अलीकडून खरेदी करत सुटतील.

टोच्या माझा गॉगल आला तेव्हा मी घरी नव्हते. पोस्टमन घरी आला होता आणि शेजारणीने तो पैसे देऊन घेतला. मला त्या १७७ रूपयापोटी फार विचार करावा असं वाटलं नाही. पोस्टमन ची आणि माझी भेट झाली असती तर मी त्यांना नक्की 'हे चार्जेस कसले'? असं विचारलं असतं. ऑल द वे त्यासाठी मी पोस्टात गेले नाही. असतील कसले तरी चार्जेस असं म्हणून खरोखरी ती गोष्ट मी सोडून दिली. वर गॉगल ला जर १७७ घेत असतील, उद्या चुकून मी पर्स वगैरे मागवली तर किती पोस्टेज घेतील माहित नाही असा विचार करून पर्सची एक ऑर्डर परस्पर रद्द झाल्याने मी हुश्श सुद्धा केलं होतं. आणि या पुढे पोस्टाच्या पेटीत बसतील अशा छोट्या छोट्या गोष्टीच मागवायच्या असं ठरवलं. भारतीय पोस्ट खात्याचे नियम आपल्याला कुठे माहित आहेत?

मी पर्स च्या आकाराच्या वस्तु (ट्रॅवल पाउच) मागवल्या आहेत. फ्री शिपिंग होते. काहीही जास्तीचे पोस्टेज द्यावे लागले नाही. अर्थात वस्तु इथे मागवल्या होत्या. भारतीय टपाल खात्याचे वेगळे चार्जेस लागत असतील तर माहीत नाही.

Pages