खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आणि हा एक नमुना म्हणून टॉप मागवला होता. क्वालिटी ओके आहे. पण दिसताना पांढरा दिसला पण ओरिजिनल कलर वेगळा आहे आणि कापड पण ग्रेट नाही.

http://www.aliexpress.com/item/1pcs-Hot-Sale-10style-New-fashion-Women-C...

IMG-20160501-WA0016.jpg

दक्षे. मला इथून चायनाच्या अलि एक्स्प्रेस चाच अ‍ॅक्सेस मिळतोय. काही वस्तू मागवल्या होत्या. अजून मिळाल्या नाहीत.
तूझ्या वस्तू कश्याने येतात ? ( म्हणजे पोस्टाने कि कुरीयर ने ) ट्रॅकिंग करतेस का ?

मी करतोय तर त्या अजून चायना च्या एअरपोर्ट पर्यंत पोहोचलेल्या दिसत नाहीत.

दक्ष्, ज्वेलरी मस्त आहे. अलीवर् एकुणातच Bohemian Jewelryचं मस्त कलेक्शन आहे. आणि कपड्यांच्या फॅब्रिकबद्दल माझा अनुभव खुपच चांगला आहे. फॅब्रिक नेहमीच गुड क्वालिटी असतं. मी असंख्य पार्टीवेअर/वन पिसेस घेतले होते ते वॉशिंग मशिनला धुवुनही चांगले आहेत, स्कीनला टच चांगला आहे आणि कलर्स पण शाबुत आहेत अजुनही. मी खरं तर इतके स्वस्त आहेत म्हणुन टोप्स आणि ड्रेसेस २-३ वेळा वापरुन सोडुन द्यायचं ठरवलं होतं, पण आता १-२ वर्षानंतर सुद्धा टाकवत नाहीएत इतके नविन दिसताहेत. KP मधे सिमिलर डिझाइन्स दुप्पट किंमतीला आहेत.

दिनेशदा, डिलिवरीज खुप आरामसे मिळतात. अगदी दीड ते दोन महिने. आपण विसरुन गेल्यावर वस्तु मिळते. Happy

दिनेश,
मनी म्हणाली तसंच, वस्तू आपण विसरून गेलो की येतात. त्या ही पोस्टाने. पत्रपेटी चेक करीत जा. वस्तू ऑर्डर केली की साधारण महिन्याभराने वगैरे चेक करायची पत्रपेटी.
मी ट्रॅक वगैरे नाही करत. येऊन पडतात गोष्टी. माझी अलीची सर्वात पहीली ऑर्डर जेल आय लायनर मि कित्येक महिन्यानी पेटी उघडून हस्तगत केली होती.

मेधे लई दिवस आलेच नव्हते या धाग्यावर. म्हणून एकदम फोटो टाकले.
अजुन एक आहे कानातलं, त्याचा टाकेन नंतर. ते पण छान आहे कानातलं.

दक्षी सही आहे खरेदी. ते शेवटचं पांढरं मला हॅलोविनसाठी घालायला दे. माझ्याकडे एक मास्क आहे त्यावर ते बरोबर जाईल. Happy

मला फसवलं आली वाल्यांनी...

मी टोटल १२ डॉलर ची खरेदी केली. त्यापैकी फक्त ५ डॉलर च्या वस्तु आल्या. बाकीची ऑर्डर कँसल झाली आणि पैसे पण रीफंड आले नाहीत..... खुप मेला-मेली चालली आहे.... आता फॉलोअप चा पण कंटाळा आला....

बोगस..... बोगस...

मोकीमी, वाईट अनुभव! उरलेल्या ऑर्डर्स तू कॅन्सल केल्यास की त्यांनी? फॉलो अप करत रहा तरी! रीफंड नक्की मिळेल...उशिरा मिळाला तरी .

अलिवरुन कुणी मोबाईल ऑर्डर केला आहे का. मी मध्यंतरी एक ट्रायपॉड घेतला कॅमेराचा. उत्तम आहे. इथे १६-१७ हजारला मिळणार्‍या क्वालीटीचा मला ४-५ हजारात मिळाला. डिलीव्हरी सिंगापुरात मित्राकडे घेतली होती. ४-५ दिवसात मिळाली.

मोकिमी नक्की काय झालं नीट सविस्तर लिहाल का?
मला तरी आतापर्यंत अलीचा खूप उत्तम अनुभव आहे.
मध्यंतरी मी माझ्या शेजारणीच्या भाची साठी २ सेट मागवले, वेळेत आले नाहीत म्हणून डिस्प्युट ओपन केले, सेलर ने सांगितलं अजुन १० दिवस प्लिज वाट पाहशिल का? मी डिस्प्युट कॅन्सल केलं पण पुढच्या १० दिवसात पण नाही आलं, मग सेलर ने दोन्ही सेट चे पैसे परत केले,.
आणि अनेक दिवसांनी मला ते दोन्ही सेट मिळाले, मी सेलर ला पैसे परत कसे पाठवू विचारलं तर त्याने नको म्हणून सांगितलं. मला अतिशय वाईट वाटलं Sad

मला तरी असाच अनुभव आहे, फसवा फसवी झाली नाहिये आत्तापर्यंत.

शक्यतो आपण जे प्रॉडक्ट घेतो ते नीट फॉलो करायचं. म्हणजे सेलर बरोबर संवाद कसा झाला, प्रॉडक्ट किती दिवसात आलं? एकूण क्वालिटी कशी वाटली इ. त्याप्रमाणे मग त्याच त्याच सेलर कडून मागवायच्या वस्तू.

मस्तच ग किती स्वस्त. आम्हीच मुर्खपणा करुन एवढे महाग घेतलं.

खरतर घेताना किंमत बघितली नव्हती. कानातलं अस किती महाग असणार म्हणून. बिलींग केल्यावरच लक्षात आलं एवढे महाग आहे ते.

तसं पहायला गेलं तर १०५ रुपये पण महागच आहे. अ‍ॅक्चुअल मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट किती असेल याचा विचार करा. मॉल मध्ये गोष्टी २० पट अधिक भाव लावूनच विकल्या जातात.
अलि वर तर मी ११ रुपयांना जोडवी घेतली आहे. (टो रिंग) ति पण फ्री शिपिंग मध्ये. नफा जोडून पहा की ती बनवणार्‍याला कितीला पडली असेल?

मा मागच्या पानावर एक रिंग सारखं कानातलं टाकलंय पुर्ण काळं, त्याला काळे मणी आहेत. तसं सेम मला तुळशीबागेत नशिबाने दिसलं होतं. त्याची किंमत मला २०० च्या पुढेच सांगितली होती दुकानदाराने.

अलिवर खरेदि करण्याचं अजून एक कारण म्हणजे, काही काही डिझाईन्स अतिशय हटके असतात. मागच्या पानावर मी टाकलेलं नीळं कानातलं मि इथे कधीच पाहिलं नाहिये. बर्‍यापैकी युनिक असतात डिझाईन्स (हेमाझं मत)

बाकी अलीवर जरा प्रॉडक्ट्स सेलर आणि व्कालिटी बद्दल अंदाज यायला किंचित वेळ जातो. काही काही स्वस्त ज्वेलरीची क्वालिटी खराब असते नक्की. शक्यतो सिल्व्हर ज्वेलरी घ्यावी.

हा बीबी गेले काही महिने नुसताच वाचत होते मी. समहाऊ अगदी साईटही उघडून बघायचे कष्ट नव्हते घेतले कारण एकच चायनाची साईट.

दक्षिणा, काल तू टाकलेले कानातल्यांचे फोटो बघून मी साईट उघड्लीच आणि...:फिदी:

आज दिवसभर मी साईटवर डिझाईन्स बघतेय. मला जशी ब्रेसलेट्स आवडतात तशी ब्रेसलेट्स दिसली मला तिथे जी मला इथे मिळालीच नव्हती. सो.... कार्टमध्ये टाकून ठेवलीये खरेदी Proud

थँक्स सो मच

Pages