खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा,
अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. >>>>>
हो मलाही से अनुभव,,,+ बेंकेकडून येणारा transaction मेसेज मोबाईलवर आला नही.....अरेरे
हे मात्र doubtfull आहे....

मझी खरेदी.....
http://www.aliexpress.com/snapshot/6607452666.html?orderId=66782961578216

पेमंट व्हेरिफिकेशन झले आहे....

ब्रेकींग न्यूज : 'अलिएक्सप्रेस' आपली शाखा पुण्यात उघडणार असुन त्याचे नाव '(क्षिणा)ली एक्स्प्रेस' ठेवण्याचे घाटत आहे. Light 1

मी अमि, अ‍ॅपवर बघतायं का साईटवर ? अ‍ॅपवर डॉलरचं दिसतात.

साईट रिफ्रेश करा / नवीन टॅब उघडा. होम पेजवर डॉलरचं दिसतात, एखादं प्रॉडक्ट सर्च केलतं तर रूपये दिसतात का बघा.

माझी पण (खात्री नसलेली) खरेदी Proud

http://www.aliexpress.com/item/Free-shipping-Creative-superman-series-A4...

सही आहे हे!! पण कार्ड ने पैसे भरणं जरा अवघड आहे.

पण वही किती पानांची आहे ते काही दिसत नाहीये Uhoh

जर्बेरा, ७४३ रुपयांना ६ वह्या आहेत त्या Proud
स्क्रोल करत गेलीस तर चिनी लिपीत माहिती आहे, ती कॉपी करून गूगल ट्रान्स्लेटवर टाकलीस तर इंग्रजीतून आहिती मिळेल. आता त्या बॅटमॅनसाठी किती सव्यापसव्य करायचा ते ठरव. Wink

अमि, हा बघ स्क्रिनशॉट

ali.jpg

इकडे पानाच्या उजव्या कोपर्‍यात वरच्या बाजूला पर्याय आहे बघ, लाल चौकटीत हायलाईट केला आहे मी.

आता त्या बॅटमॅनसाठी किती सव्यापसव्य करायचा ते ठरव. डोळा मारा>>
फक्त बॅटमॅन सोबत बाकीचेही (म्हणजे Superman Optimus Prime Wolverine Iron Man) येत असतील तर व्हाय नॉट? Proud

तिथून तरी काही कळले नाही
बाकी मस्त आहे साईट.

सेलरला संपर्क करायची सोय आवडली.

सेलरला १० मिंटनपूर्वी मेल टाकली आणि कळले की ह्या वह्या ४० पानांच्या आहेत Sad

खरच चायनीज कागदाच्या वह्या असतील तर कागदची क्वालिटी मस्त असेल एकदम..>> +१

बाकी हमरा पास कार्ड भी है और बैंक बैलेन्स भी बर्र का. Proud

मी बाबा स्टेशनरी फ्रिक आहे. पेन, पेन्सिलि, वह्या पुस्तकं सगळ्याची विंडो शॉपिंग करणे हा माझा छंद आहे. अगदी मॉल मध्ये गेले तरी पहिली फेरी क्रॉस वर्ड्स लाच असते. तेव्हा ...काही मंडळींनी खरेदीची काळजी करू नये. खरेदी केलीच तरी समस येणार नाहिये Lol Biggrin

मॅडम जर्बेरा, पेमेंट केले काय आपण?? <<<<
लागली वाट!!

तेव्हा ...काही मंडळींनी खरेदीची काळजी करू नये. खरेदी केलीच तरी समस येणार नाहिये <<<
नेहलेपे दहला... Wink

आता बघूया साधनाजींचे यावर काय म्हणणे आहे..
साधनाजी, तुम्हाला कसं वाटतंय मुलगी स्वतःच्या कार्डवर, स्वत:च्या बॅलन्सने खरेदी करणार हे बघून? म्हणजे मुलगी आता मोठी झाली, स्वतःच्या पायावर उभी राहील अशी वेळ आली याचा अभिमान की तुमचा कंट्रोल गेला याचे वाईट वाटते आहे?
सांगा सांगा साधनाजी... 'वाचक ऐकायला' उत्सुक आहेत.... लवकर सांगा साधनाजी!!

बरं एक सांगा येणारे सामान कसे नी कुठे ट्रॅक करायचे.
How do I track my order?
After the supplier has confirmed shipment, sign in to My Alibaba and click 'Transactions' to get the Tracking Number for your Order. Use the Tracking Number to track delivery at any stage on the shipping company's website.

http://escrow.aliexpress.com/escrow-faq/payment/how-do-i-track-my-order....

पण order वर local taxes आणि customs duty नाही लागत का?
http://www.quora.com/How-do-I-get-products-from-AliExpress-in-India?share=1
http://www.quora.com/Query-about-ordering-from-Aliexpress-and-customs-in...

इथे पेमेंट केल्यावर क्रेडीट कार्डच्या माहितीचा दुरुपयोग होवू शकतो का? कुणाला त्याचा अनुभव? Is the site secure?

आत्मधुन यांच्या प्रश्नाचे कुणी उत्तर दिल्यास ते वाचायला आवडेल.

माझ्या 2 ऑर्डर्स चे बायर प्रोटेक्शन एकदा वाढवले, तरी ऑर्डर पोहोचली नाही. मी परत डिस्प्यूट ओपन केला, आता ऑर्डर्स कॅन्सल झाल्या आहेत. अलि एक्सप्रेस बहुतेक माझ्यासाठी नाहीच !!

इथे पेमेंट केल्यावर क्रेडीट कार्डच्या माहितीचा दुरुपयोग होवू शकतो का? कुणाला त्याचा अनुभव? Is the site secure?>>>>>>

अलिबाबा ग्रुप ची साईट आहे, त्यामुळे दुरुपयोग होण्याची शक्यता खूपच कमी.

कस्टम बद्दल >>>>> हा एक खरा प्रॉब्लेम आहे. आपण ह्या गोष्टी चायना मधुन आयात करत असल्यामुळे कस्टम लागणे शक्य आहे. पण छोटे आणि स्वस्त गोष्टी मागवा. काहीतरी कारणाने त्या कस्टम मधुन सुटतात आणि थेट तुमच्या घरी येतात ( कसे ते माहीती नाही ).
आकारानी मोठ्या गोष्टी मागवल्या तर कस्टम चा प्रॉब्लेम येण्याची शक्यता वाटते.

Pages