खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक अ‍ॅडॉप्टर मागवले आहे आणी जीन्स .....अजुन आले नाही.
अ‍ॅडॉप्टर म्हणजे फक्त आणी फक्त कारमधे वापरता येणारा व्हॅक्युम क्लीनर मी घरातही वापरु शकेन.

निसर्गा असं नक्की नाही सांगता येणार. पण साधारण महिना + काही दिवस.
आता मी मागच्या पानावर टाकलेली दोन्ही कानातली ती वरच्या ब्राऊन फिदर कानातल्याच्या नंतर ओर्डर करूनही अगोदर मिळाली होती. आणि ब्राउन फिदरवालं कानातलं खूप उशिरा मिळालं.

मी ५ ब्रेसलेट्स ऑर्डर करून बरोब्बर २ महिने झाले. डिलीवरी पिरीअड १५-६० दिवस होता. ५ पैकी एकच ब्रेसलेट मिळालंय आत्तापर्यंत. एकाचे पैसे परत मिळतील अशी मेल आजच आली आहे आणि बाकीची तीन अजून केव्हा येतील याची वाट बघतेय.

खरेदी केलेली वस्तु इतक्या उशिरा मिळतिय म्हणजे त्यासाठी भरलेली रक्कम बिन्व्याजाने त्याना तितके दिवस वापरायला मिळतीय

मी दोन वर्षांपूर्वी काही पेन ड्राईव्ह मागविले होते. पैसे अर्थात आधी भरावे लागतात त्यामुळे ऑनलाईन पेमेंट केले होते. पेन ड्राईव्ह अजून आलेले नाहीत. (अर्थात आता येणार नाहीतच) आणि त्यांचे स्टेट्स डिलिव्हर्ड म्हणून दाखवत आहेत. तेव्हापासून या साईटला रामराम केला आहे.

व्याजाने पैसे? Uhoh
आपण ऑनलाईन पेमेंट केलं आणि ते व्हेरिफाय झालं की लगेच तिथून आपली वस्तू शिप केली जाते, तसा ईमेल येतो. वस्तू चायनावरून येत असल्याने इतका उशिर लागतो, कधी कधी वस्तू कस्टममध्ये अडकून पडते, त्यामुळे सुद्धा उशिर होतो.
अर्थात एका दिवशी आपल्यासारखे लाखो लोक खरेदी करतात साईटवरून, पण त्याच बरोबर सेलर ला कामही तितकेच पडते की शिपमेंट चे.

असो...

२ वर्षापुर्वी पेन ड्राईव्ह मागवले होते? मग वेळेत मिळाले नाहित तर डिस्प्युट का ओपन केले नाही?
मला आत्तापर्यंत वस्तू मिळाल्या नाहित त्याचे पैसे मिळाले आहेत. आत्तपर्यंत दोन वेळा एक्स्पेक्टेड वेळेत डिलिव्हरी न झाल्याने मी डिस्प्युट ओपन केला, पैसे मिळाले, आणि नंतर वस्तू पण मिळाली.
अगदी लेटेस्ट पण झाले, आय लायनर ब्रश मिळाला पण तरिही रिफंड प्रोसेस झालेला दिसला... मी नविन ऑर्डर प्लेस करून सेलर ला ते पैसे ठेवून घे, वस्तू पाठवू नको असे सांगितले.

दक्षिणा! ऑनलाइन पेमेन्ट केले म्हणजे तु पैसे दिले ते तुझ्या अकाउन्ट मधन इन्स्तटली त्याच्या अकाउन्टला जमा झाले पण ते २ महिने जमा राहतात ना त्याच्या अकाउन्टला , वस्तु तुला मिळतेय तोवर त्याना ते पैसे वापरायला नाही का मिळत . असो डिलिव्हरी इतकी उशिरा असेल आणि कस्तमरला फार फॉलो करावे लागत असेल तर तितकासा प्लेझर अनुभव नसतो/नसेल (निदान माझ्यासाठी तरी)

अर्थात एका दिवशी आपल्यासारखे लाखो लोक खरेदी करतात साईटवरून, पण त्याच बरोबर सेलर ला कामही तितकेच पडते की शिपमेंट चे.>> इथे सायबर मन्डेला लाखो लोक ऑर्डरी देतात पण मॅक्स ८-१० डेज मधे वस्तु मिळते.
वस्तु चायना वरुन येतात ,शिपिम्ग कोणत वापरतेय कपनी हा इश्यु असु शकेल.
तुझ्या सगळ्या खरेदीचे फोटो मात्र खुप आवडले

ऑनलाइन पेमेन्ट केले म्हणजे तु पैसे दिले ते तुझ्या अकाउन्ट मधन इन्स्तटली त्याच्या अकाउन्टला जमा झाले पण ते २ महिने जमा राहतात ना त्याच्या अकाउन्टला , वस्तु तुला मिळतेय तोवर त्याना ते पैसे वापरायला नाही का मिळत .

>> नाही. ते पैसे अलि एक्स्प्रेसकडे राहातात. आणि आपल्याला वस्तु मिळाल्यावर आपण अलि एक्स्प्रेसवर जाऊन "कन्फर्म ऑर्डर" वर क्लिक केले कि मगच ते पैसे त्या सेलर कंपनीला दिले जातात. आपल्याला वेळेत/ मनासारखी वस्तु मिळाली नाही तर आपण लगेच डिस्प्युट ओपन करून ठेवु शकतो. (हा आता आपण रीझनेबल वेळेपर्यंत डिस्प्युट ओपन किंवा कन्फर्म ऑर्डर यातले काहीच केले नाहीत तर मात्र वाट बघून ते पैसे अलि एक्स्प्रेस सेलरला देऊन टाकते. तुम्ही ऑर्डर कन्फर्म करायची तसदी घेतली नाही यासाठी सेलरचातरी किती खोळंबा करायचा).

इथे सायबर मन्डेला लाखो लोक ऑर्डरी देतात पण मॅक्स ८-१० डेज मधे वस्तु मिळते.

>> इथे पण फक्त फ्री शिपिंगवाल्या वस्तुच उशीरा येतात. पेड शिपिंगवाल्या वस्तु २-४ दिवसात मिळाल्याचे चिक्कार फिडबॅक आहेत साईटवर. सो मला तरी हा ऑप्शन ओके वाटला. मला वस्तु उशीरा मिळालेल्या चालणार आहेत पण डॉलर्स मध्ये शिपिंग कॉस्ट नको आहे. किंवा तुम्हाला वस्तु लवकर हवी आहे आणि त्यासाठी शिपिंग चार्जेस मोजण्याची तयारी आहे.. तर अलि एक्स्प्रेस आपल्या दोघांना हवा तो पर्याय निवडू देते.

मी कालच अलि एक्स्प्रेसवर काही किडूक मिडून अश्या ७-८ वस्तू घेतल्या आहेत. फ्री शिपिंग अंतर्गत डिलीव्हरी नोव्हेंबर मध्ये अपेक्षित आहे. बघुयात काय होतेय ते.. वस्तु आल्यावर इथे फोटो नक्की टाकेन. सगळ्यात महागातली महाग वस्तु ४१/- रुपयाची आहे. Lol

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. >>>> माझी हिम्मतचं होत नाहिये डेबिट कार्डने पे करण्याची. हॅक होण्याची चिंता आहे.

अलीवरून मशीनचा एक पार्ट मागवला होता. भयंकर तोडमोड होऊन मला मिळाला. त्यांनी पैसे परत केले हे ठीकच पण महिना वाया घालवून काम काही झाले नाही. पुन्हा लोकल मार्केटमधून दुपटीने आणावा लागला तो पार्ट हे वेगळेच.

अलिच्या खरेदीचा मलाही अगदी वाईट अनुभव आला. परत नकोच ती भानगड असं वाटायला लावणारा. इतकं करून ४ पैकी १ च ब्रेसलेट हातात पडलं आणि ते ही अगदी टुकार.

मला सुद्धा अली चा वाईट अनुभव आला आहे. मी एक मोबाईल कव्हर मागवले होते पण तीन महिने झाले अजुन काही आले नाही ते dispute पण होत नाही शेवटी कंटाळून नाद सोडला व अॅप पण uninstall केला. ....दक्षिणा ह्यांना कशा काय मिळतात हे 'अलीच' च जाणो Uhoh

मी २२ सप्टेंबरला विकत घेतलेल्या वस्तुंपैकी एक नेकलेस (रु. २०.८०/- चा) आज आला.
फोटो टाकायचे प्रयत्न चालू आहेत. Happy

माझी खरेदी:
https://www.aliexpress.com/item/Hot-Marketing-Women-Multilayer-Irregular...

प्रत्यक्षात घरी आलेला नेकलेसः

पियू,
मिळालेल्या वस्तुच्या क्वालिटी मधे तू समाधानी आहेस का?
मलासुद्धा काही वस्तु मागवायच्या होत्या ज्या इथ दुकानात मिळत नाही आणि इतर भारतीय साईट्स वर अव्वाच्या सव्वा किमतीत उपलब्ध आहे Sad

मायबोली संस्थापकांनी पण हे ऑनलाईन च मनावर घ्यायला हवं... मायबोलीवर सर्फींग करणारे बरेच खरेदि करतील....

पियू, मिळालेल्या वस्तुच्या क्वालिटी मधे तू समाधानी आहेस का?
>> हो टिना. अजुनतरी आहे. पण माझ्या ८ ऑर्डर्सपैकी आज पहिली आली आहे घरी. जसजश्या वस्तु येत जातील तसतसे फोटो टाकत जाईन इथे.

सचिन काळे.. होय.. हाच फोटो. थँक्स अ लॉट. प्लीज मला कसे केले ते विपूत समजवाल का? इथे विषयांतर नको.

ह्या वेबसाईट वर आपल्या देशप्रेमी बांधव/भगिनी यांनी अजून बहिष्कार नाही घातला?
>> खरे तर मागवले तेव्हा असे काही डोक्यात नव्हते. आता प्रॉडक्ट आल्यावर येतेय अध्येमध्ये. पण मी ऑलरेडी पे केले आहे सगळ्या प्रॉडक्ट्ससाठी.

बहिष्कार का? >> चायनीज साईट + विक्रेते म्हणून.

माझे अजून ३ नेकलेस आले काल.

१. २३ रुपये

२. २४ रुपये

https://www.aliexpress.com/item/1-PCS-Cute-Kawaii-Women-Lady-Girls-Silve...

३. ४० रुपये

https://www.aliexpress.com/item/Natural-Stone-Pendant-Necklaces-Vintage-...

याचा प्रत्यक्ष फोटो काढणे राहून गेले.

मला पेमेंट करताना बिल डॉलर मधेच दिसतय.. त्यामुळे ऑर्डर दिल्या जात नाहीए..
आणखी कुणाला हा प्रॉब्लेम आला का? आणि तुम्ही तो कसा टॅकल केला ?
मदत करा प्लीज..

Pages