खरेदीची लाट - 'अलि एक्स्प्रेस'

Submitted by दक्षिणा on 17 April, 2015 - 05:56

सध्या जो उठतो तो ऑनलाईन काही ना काही खरेदी करतोच करतो. फ्लिप्कार्ट, स्नॅपडिल सारख्या वेबसाईट्स तर बहुपरिचित आहेत.
त्यातला एक मोठा खजिना म्हणजे 'अलि एक्स्प्रेस' www.aliexpress.com या वेबसाईटवर काय मिळत नाही ते पहावं लागेल. (अर्थात सर्व काही मिळतं.)
ऑनलाईन खरेदी आणि आपण या धाग्यावर या वेबसाईटची ओळख झाली आणि मी बरिच खरेदी केली. थोडी प्रॉडक्ट्स रिसिव्ह झाली, बाकिच्यांच्या प्रतिक्षेत आहे.

एकूण या धाग्यावर आपण अलिवरून केलेली खरेदी, तिथले अनुभव. आपल्याला मिळालेल्या प्रॉडक्टस चे फोटो आणि त्याच्या लिंक्स देऊया. म्हणजे आपण खरेदी केलेलं एखादं प्रॉडक्ट इथे कुणाला आवडलं तर झटकन त्या लिंकवर जाऊन विकत घेता येईल. शिवाय मिळालेलं प्रॉडक्ट नेमकं कसं दिसतं ते ही कळेल.

अलिवर खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरलं तरी ओटिपी जनरेट न होता पैसे कट होतात. आत्तापर्यंत मला तरी अलिचा अनुभव उत्तम आहे. चला मग खरेदी शेअर करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारण खरेदी ग'फ्रेंडची होते आणि खर्चा माझ्या कार्डने होतो.
>>
मागे कुठल्या तरी धाग्यावर तू असं लिहिलेलस की तुम्ही आपल्या आपल्या पैशाने आपला आपला खर्च करता.
माझी आई सांगते की आपण खरं बोलतो तेंव्हा आपल्याला काय बोललो हे लक्षात ठेवावं लागत नाही. तसच खर्‍या आयडीने खरं काय ते लिहिलं की असं काही होत नाही.
सांभाळा!

रच्याकने तू ऋन्मेष सोबत ऋन्म्या नावाने पण सर्च मारतोस की काय? आणखी काय काय शब्दाने सर्च मारतोस ते सांग एकदा म्हणजे ते शब्द नकोत लिहायला Proud

अलि वरून २ सनग्लासेस मागवलेले अजुन आले नाहीयेत.
मी केंव्हाची वेटिंग मोड मधे आहे Uhoh

रीया,
आम्ही आपला आपला खर्चच वाटूनच घ्यायचो जेव्हा आम्ही फक्त ग'फ्रेंड बॉफ्रेंड होतो.. पण जेव्हा एकमेकांशी लग्न करायचे नक्की केले तेव्हापासून परीस्थिती बदललीय.. आता माझे सारे पैसे तिचे आहेत आणि तिचे सारे खर्च माझे Happy

^^ रियाने तुला रेड हँडेड पकडायचा व्यर्थ प्रयत्न केला, बिचारीला काय माहित, तुझी गिरे तो भी... परीस्थिती आहे Wink
by the way, no1 is interested to know your above given details

@दक्षिणा, छान धागा. Happy

याचा अ‍ॅप डाउनलोड केला तर त्यात करन्सी चेंज चा ऑप्शन नाही. तसे स्पष्ट लिहिले आहे. मग तुम्ही डायरेक्ट साईटवरुन खरेदी करता का? साईटवर करन्सी चेंज चा ऑप्शन कुठे दिसतो? स्क्रीन शॉट टाकणार का?

मी 2 महिन्यांपुर्वी काही ज्वेलरी खरेदी केलेली. मला अजुन ऑर्डर मिळाली नाही :-(. हे सगळ बाय पोस्ट येत ना? म्हणजे मग हॅण्ड ओवर करण्या आधी कॉल येत नसेन त्यांचा. मी ऑफीस चा पत्ता दिलाय त्यामुळे तर काही प्रॉब्लेम नसेन ना? ते वस्तू पोस्ट पेटीत टाकतात का? तसे असें तर ऑफीस साठी पोस्ट पेटी नसेन Sad कोणाला याबद्दल काही माहिती?

इथे काय भलत्याच नको त्या गप्पा चालू आहेत? विषयाशी संबंधित बोला ना.. धाग्याचा रोख (आणि प्रकाशझोत) बदलू नका कृपयाच!

अमि, डेस्कटॉपवरून लॉगिन केलेस की पानावर उजव्या कोपर्‍यात वर "ship to " लिहिलेला पर्याय आहे, तिथेच देश सिलेक्ट करून करन्सीही चेंज करता येते.

ट्युलिप, हो! वस्तू पोस्टानेच येतात. कॉल वगैरे येत नाही. तू माय अलिअएक्स्प्रेसला जाऊन बायर प्रोटेक्शन वाढवून घेतलेस का? त्यांनी कबूल केल्याप्रमाणे त्या ठराविक दिवसात वस्तू नाही मिळाली तर भरलेले पैसे परत करतात. मीही ऑफिसच्या पत्त्यावरच वस्तू मागवल्या आहेत.

मी ऑर्डर केलेल्या वस्तू,

केक आयसिंग स्पॅच्युला ($२)
ऑरेंज पिलर ($०.२८)
सुट कव्हर ($२.४१)
घड्याळ ($१.९८)
लेगिंग्ज ($३.७१)

अजुन एक दोन सटरफटर वस्तू. कधी येतय ते बघायचे

ट्युलिप, हो! वस्तू पोस्टानेच येतात. कॉल वगैरे येत नाही. तू माय अलिअएक्स्प्रेसला जाऊन बायर प्रोटेक्शन वाढवून घेतलेस का? त्यांनी कबूल केल्याप्रमाणे त्या ठराविक दिवसात वस्तू नाही मिळाली तर भरलेले पैसे परत करतात. मीही ऑफिसच्या पत्त्यावरच वस्तू मागवल्या आहेत.
>>>
भरलेले पैसे परत करावेत म्हणून काही वेगळं करावं लागतं का?
माझ्या ऑफिसमधे पोस्टाने वस्तू येतील याबाबत मला शंका आहे Sad

धन्यवाद मंजूडी
हो, मी बायर प्रोटेक्शन वाढवून घेतलय. पण आता 2 महिने झाले म्हणून मला शंका येते, की माझी ऑर्डर मिळेन.

साधना ऑफिसमधून डेस्कटॉपवरून लॉगिन करता येतंय का अलिएक्सप्रेसवर?
आझ्याकडे साईट उघडते, वस्तू दिसतात, पण लॉगिन विंडोवर गोल गोल चक्र फिरत राहतंय.

बघते करुन. अजुन फक्त वस्तुच बघत होते. बेकवेअर, कुकी कटरमध्ये काय भन्नाट प्रकार आहेत. किंमती वाचुन डोळे फिरले.. इथे दुकानात कैच्याकै महाग विकतात या वस्तु. आणि इथेही चायनीजच असतात.

जेल आयलायनर ( ५७ रू. ७३ पैसे).
दक्षिणा काय सांगतेस ???जेल आयलायनर ( ५७ रू. ७३ पैसे) ??? कुठल्या कंपनीचं आहे ?
मी ४०० रु चा जेल आयलायनर घेतलंय (मेबलिन ) . भंगार अहे. डोळ्यांना खूप त्रास होतो

री, मी पण ऑफिसच्याच पत्त्यावर मागवल्यात ऑर्डरी. त्यातली ही आज आली. पोस्टमन रीसेप्शनला देउन गेला.

पण.... तुझ्या ऑफिसला मुंबईहुन पाठवलेलं कुरीयर पण पोचत नाही तर चायना हुन पोस्ट पोचेल का शंकाच आहे.
Angry Happy Wink

मंजुडी माझ्याकडेही सेम प्रोब्लेम. ऑफिसमध्ये लॉगिन वर पिंगा घातलेला दिसतो.
घरी मुलगा लॅपटोपला हात लावायला देत नाही. म्हणून अ‍ॅप डाउनलोड केले तर त्यात करंसी चेंज होत नाही. हाय रे दैवा Sad

पण.... तुझ्या ऑफिसला मुंबईहुन पाठवलेलं कुरीयर पण पोचत नाही तर चायना हुन पोस्ट पोचेल का शंकाच आहे.
>>
Sad
स्मिते खरच गं!
म्हणूनच टेन्शन आहे Sad

हे मी मागवलेले कानातले:

ali studds.jpg

अगदी अश्याच ग्लासबीडचं पेंडंट आणि ब्रेसलेट मागवलं आहे. ते बघूयात कधी पोचतंय.

Pages