होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

SHREE: बायको, आपल्या रसिकांनी आपल्या होणारया मुलांसाठी नाव पण ठरवून ठेवलीत..,

JANHVI: काहीही हा श्री,

SHREE: अग खरच...मुलगा झाला तर "श्रीफळ",आणि मुलगी झाली तर जायफळआणि काहीच नाही झाल तर वायफळ

JANHVI: huhuhuhuhuhuhuhhu.. गप्प बस हा श्री

अप्पा..... ___/\___

परफेक्ट... त्या दोघांच्या टोनमध्ये इमॅजिन केलं.
Rofl

लाखो घरांमधे असेच संवाद हरवले आहेत ते ह्या महासोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा सुरु झाल्याचे अनेक मॆसेजेस आणि फोन्स आम्हाला आले.>>
पण यांना काही संवाद साधुन सगळ्या आयांना त्या सोहळ्याला बोलावत आले नाही. उभा महारष्ट्र बघत होता ते. Proud

बेबडी काय पिसाळलीये. आणि श्रीबाळाला बघायल पाहुणे येणार म्हणे नी त्याला सांगतही नाहीत. हाय रे कर्मा. डोकं ताळ्यावर आहे ना बेबडीचं?

काय मूर्खपणा चालवलाय! एक दिवस शिबिरात हरवलेला संवाद वगैरे उदो उदो करायचा आणि दुसर्या दिवशी घरी परतल्यावर आम्हाला काही बोलायचं नाही म्हणून आपापल्या खोलीत जायचं, स्वत: काही स्पष्टीकरण न देता दुसरे असे आणि तसेच का वागले वगैरे राग करायचा. आणि वरती सोशल मिडियामध्ये म्हणायचे "आमच्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठरलेला आहे. आम्ही काय करतो आहोत याचं आम्हाला भान आहे."

शशांक केतकरसारखी लोकं जेव्हा फेसबुकवर अशा पोस्ट्स टाकतात तेव्हा उरलासुरला आदरही घालवून टाकतात खरंतर. शशांकचे एकंदर व्यक्तिमत्त्व, वाचन, लेखन, अभिजात संगीत ऐकण्याची आवड ह्यामुळे दर्जेदार कथा, पटकथा, संवाद म्हणजे काय हे त्याला कळत असेल असे वाटले होते. त्यामुळे अर्थपूर्ण मौन बाळगण्याऐवजी मालिका कशी सर्वोत्तम आहे ह्याची टिमकी वाजवणारी पोस्ट टाकणे अगदीच हास्यास्पद वाटले.

चांगल्या अभिनेत्यांना सदासर्वकाळ सकस, ताकदीच्या, आशयघन वगैरे भूमिका साकारण्याच्या संधी उपलब्ध होत नसतात. त्यामुळे रोहिणी हट्टंगडी, प्रसाद ओकसारखे अभिनेते जेव्हा अशा मालिकांतून दिसतात तेव्हा हमखास उत्पन्नाची खात्री देणार्‍या अशाही काही भूमिका त्यांनी घेणे समजण्यासारखे असते. त्या भूमिकांची वकिली करणे मात्र समजण्यासारखे नाही. त्यापेक्षा 'आवडत नसेल तर बघू नका' असे सुनावणे कधीही चांगले कारण शेवटी हे सग़ळे टीआरपीचे गणित आहे हे आता सुजाण प्रेक्षकांना माहीत आहेच.

इतक्या लवकर कुठे अहो...

त्या आता श्री च्या लग्नाची तयारी करतील आणि अतिउत्साहाच्या भरात त्यांच्या हे लक्षात राहणार नाही की याबाबत आपण श्री ला काहीच सांगितले नाही.

दुसरीकडे जान्हवी इतकी कामात आणि श्री शी लाडे लाडे बोलण्यात इतकी मग्न राहील की तिला आपण प्रेग्नंट आहेत हे सासवांना सांगायचे लक्षात राहणार नाही.

आता क्लॅश - ज्या दिवशी जानुच्या बाळाची डिलीव्हरी त्याच दिवशी आयांनी श्री चे लग्न ठरवले असणार. आणि सगळे जण एकमेकाना गुप्ततेच्या शपथा घालून कुणाला काही कळून देणार नाहीत. मग श्री बाळासमोर आव्हान आपल्याच दुसऱ्या लग्नाला जावे का जान्हवीकडे जावे.

मग आईआज्जी आणि काका म्हणणार तु लग्नाला जा, जान्हवीकडे आम्ही लक्ष देतो. आणि तिकडे जाणार तर सगळ्या सासवा हॉस्पीटलमध्ये. त्याम्हणणार आम्ही जान्हवीला आमंत्रण द्यायला गेलो होतो तेव्हा कळले ती इथे आलीये ती म्हणून आम्ही पण इथेच आलो.

तिकडे लग्न समारंभात श्री चा पुतळा होणार. आणि तिकडच्या मुलींकडच्यांना कसाबसा पटवून घरी येणार तोच जान्हवी, आईआज्जी आणि सासवा बाळांना घेऊन दारात उभ्या असणार. (प्रॅक्टिकली शक्य वाटत नाही पण किमान सहा बाळे तरी व्हायलाच हवीत)

तसेच बाजूला रमाकांत, बेबडीचा नवरा, सरूचा नवरा, आपटे, शशीकला बाई, पिंट्या त्याचे बाबा, अॉफीसमधले लोक आणि विशेष म्हणजे बस स्टॉपही गोकुळात आला असणार.

अशा रितीने २०२७ मध्ये त्यांचा संसार सुखाचा होऊन ते एकत्र नांदू लागतात.

LOL

जान्हवी गरोदर असल्याचे त्या आयांना सांगत का नाहीत? परवा बेबी तुम्ही आम्हाला काही सांगत नाही तर आम्हाला कसं कळणार असं काहीतरी म्हणत आरडाओरडा करत होती ते अगदी पटलं.

मला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला आहे कि श्री जान्हवीने अप्पर पोलिस ठाण्यात तक्रार केल्याने त्यांच्याविषयीच्या जोक्स करणार्‍यांचा पोलिस शोध घेत आहेत इ.इ. व यासंदर्भात ५५ ग्रुप अ‍ॅडमीन्स ना अटक केली आहे.

*मुग्धुटली, तुला मेसेज फॉरवर्ड केलाय. शक्य असेल तर अख्खा मेसेज इथे पोस्ट कर ना प्लीज.

पण मला एक कळत नाही..जान्हवी आणि श्रीची बदनामी ही शशांक केतकर आणि तेजश्रीची कशी काय होऊ शकते. ते एक कॅरेक्टर आहे. या न्यायाने उद्या मोगॅँबो, गब्बर सिंगचे जोक्स पण बंद करायला लावतील.

अर्थात जे काही जोक्स आलेत ते खूपच खालच्या दर्जाचे आणि अभिरूचीहीन आहेत. पण याचा अर्थ त्यांना त्यावर बंदी घालता येईल असे नाही.

पोलिसांना बाकी काय कामे नाहीत का...आधी च्यायला खरे आरोपी, गुन्हेगार मोकाट फिरतायत त्यांना पकडा म्हणाव. ग्रुप अॅडमिनना कसले डोंबलाचे अटक करतायत.

आणि जान्हवी आणि श्री वर काय कॉपीराईट आहे का शशांक किंवा तेजश्रीचा...करायचेच तर झी टीव्ही वाले करू शकतील पण हे दोघे नक्कीच नाही.

आणि जान्हवी आणि श्री वर काय कॉपीराईट आहे का शशांक किंवा तेजश्रीचा...करायचेच तर झी टीव्ही वाले करू शकतील पण हे दोघे नक्कीच नाही>>
सतत चर्चेत राहण्यासाठी अजून काय काय करणार राव हे लोक Sad Sad

आशुचँप +१

मलाही ते कळले नाही.
या न्यायाने आलोकनाथ ने हजारोंना अटक करायला लावली असती एव्हाना.
त्यांचे तर खर्‍या नावाने जोक्स फिरायचे.

Pages