Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धावत - पळवत बघितला एपिसोड
धावत - पळवत बघितला एपिसोड .
टुकार ! फक्त काका आवडले .
तो श्री जानीला मिठी काय मारतो , आई-आजी कौतिकाने काय बघते - काहीही .
ती श्रीच्या मागची मुलगी बघितली .
भयानक माठ चेहरा होता तिचा . डोळे तर इतके झोपाळू
अरे बरं झालं स्वस्ति इथे
अरे बरं झालं स्वस्ति इथे लिहिलंस ते. आता मी नाही बघणार
.
नाहीतर विचार करत होते त्या मुलीला बघू का यु ट्यूबवर.
डी, वंश आणि अंश असं दोन्ही
डी, वंश आणि अंश असं दोन्ही दोन वेगळ्या वाक्यात म्हटलं बहुतेक.
जलोदर
बघ गं अन्जुताई आम्हीच का
बघ गं अन्जुताई

आम्हीच का म्हणून त्रास सहन करायचा
ताई कायकू रे.
ताई कायकू रे.
अगं , प्रेमाने म्हटल तर !
अगं , प्रेमाने म्हटल तर !
म्हण ग प्रेमाने.
म्हण ग प्रेमाने.
घ्या अन्जुताई , तुमच्यासाठी
घ्या अन्जुताई , तुमच्यासाठी काय पन
खरंच शंभर रुपये द्यायचे कबुल
खरंच शंभर रुपये द्यायचे कबुल करुन पन्नासवर भागवल्या सारखा चेहरा आहे. ज्या कुणाला उपमा सुचली _/\_
स्वस्ति धन्यवाद.
स्वस्ति धन्यवाद.
बर एवढा मोठा १ तासाचा महाभाग
बर एवढा मोठा १ तासाचा महाभाग व गंमत म्हणजे बाकीच्या सगळ्या धाकट्या, थोरल्या, मधल्या, लिंबिटींबु आया व बेबुटली घरीच. त्यांना रीतसर बोलावले असते तर असे डुलकणारे प्रेक्षक आणायची वेळ आली नसती.
एक मेसेज फिरतोय Whatapps ला. त्या जानुने ३ महिने रिझल्ट सांगीतला पण नाही तरी प्रेक्षक गुमान मालीका बघत आहे, मोदींकडुन मात्र एका वर्षात रिझल्टची अपेक्षा.:P
पन्नास रूपयांचा चेहरा काल
पन्नास रूपयांचा चेहरा
काल काय झालं पुढे? जानीदेवी अवतरल्या का गोकुळात?
काहीही असो पण मला आज
काहीही असो पण मला आज बेबड्याचा चेहेरा बघायचाय जानु घरी आल्यानन्तर.:फिदी: कारण जानु आल्याशिवाय बेबड्या परत सासरी जाणार नाही.
आशुडी शशिकलाबैंनी आपल काम चोख
आशुडी शशिकलाबैंनी आपल काम चोख बजावलय, जानुच्या विरुद्ध लागलेल्या आगीत सगळे ज्वलनशील पदार्थ ओतुन... काल जानुबै गोकुळच्या दारापर्यंत आल्यात भौतेक.. आज श्री आणि बाकीच्या ५ आयांची खडाजंगी होणार आहे.. काल सौंकडुन आपल्या दुसर्या लग्नाच्या घातलेल्या घाटाबद्दल समजल त्याला.... ते सुद्धा सांगताना शंभरदा आढेवेढे घेतले येडीने.. जौदे, कै नै.. इकडे आईआज्जींना म्हणते मी त्यांना माफ करु शकणार नाही आणि नवर्याला धडाधडा सांगु पण शकत नाही.
रश्मी ते बेबड्या बिबट्या सारख
रश्मी ते बेबड्या बिबट्या सारख वाटतय
काय झाल पुढे प्रेग्नंसी जाहिर झाल्यावर???
शुभान्गी बेबड्याचे डोळे घारे
शुभान्गी
बेबड्याचे डोळे घारे करडे असल्याने बेबड्या बिबट्याच वाटते.
मी आवर्जून पाहिली ती मुलगी!
मी आवर्जून पाहिली ती मुलगी! मस्त मजा आली. पुढे तो श्री प्र चं ड ईमोशनल चेहरा करून बसलाय, आणि मागे ती डुलक्या घेतेय
तिला बक्षिस म्हणून आणखी पन्नास द्यायला हवेत खरंतर!
तिने या नाट्याच्या
तिने या नाट्याच्या खर्याखुर्या प्रेक्षकांची भूमिका अक्षरशः जिवंत साकार केली आहे!
थँक्स मुग्धटली. मिरवणूक अजून वेशीवरच आहे म्हणजे.
आता शशीकला बाईंची मुक्ताफळं
आता शशीकला बाईंची मुक्ताफळं ऐकून झाल्यावर, नको तिथे तोंड उचकटणारी बेबूटली आई आज्जी समोर जानीची आई येऊन काय काय बरळून गेली ते अज्जिबात सांगणार नाही. बाकी आया मुखदुर्बळ आहेत हे मान्य पण बेबीच्या तोंडाला पण कुलूप ठोकतील शिरेलवाले. झालं म्हणजे अजून २-३ एपिसोडचे पाणी पडणार.
आजच्या एपीसोड वर लाईट मारा ना
आजच्या एपीसोड वर लाईट मारा ना कोणीतरी बघता नाही आला आज
Online links आहेत का?
Online links आहेत का? नेहमीच्या चालत नाहीयेत..
माउ ,
माउ , http://www.zeemarathi.com/videos
सारिका , नेटवरून साभार ,
Shri asks Janhavi as to why she didn't reveal the news of her pregnancy earlier. Janhavi apologizes to Shri for her past mistakes. Shri tells Janhavi that her mother should not have infused poison in their relationship. He further asks Janhavi details about his supposed second marriage she was referring to in her speech. On the other hand, Shashikala requests Shri's mothers to let Janhavi come to their house. Baby Aatya furiously replies Shashikala that she won't allow Janhavi to live with Shri. Shashikala informs Shri's mothers that Shri would certainly bring Janhavi home the same day. Shri requests Janhavi to come to his residence
धन्स स्वस्ति..
धन्स स्वस्ति..:)
कालचा भाग छान झाला. आई आजी
कालचा भाग छान झाला. आई आजी आणि श्री ने बेबोला अजीबात भाव दिला नाही, रादर इग्नोर केलं. आणि बेबो चा संताप संताप झाला. मज्जा.
https://www.facebook.com/shas
https://www.facebook.com/shashank.ketkar/posts/10152807480525308?comment...
‘होणार सून मी ह्या घरची’ ह्या मालिकेतील महासोहळा २५ मे ला पार पडला. रसिक मायबाप प्रेक्षकांनी पुन्हा एकदा, ही मालिका सर्वोत्तम का आहे हे अनुभवलं. या क्षणी मला अनेकांचे आभार मानायचे आहेत आणि तसे केले नाही तर ते अयोग्य ठरेल. सर्वप्रथम झी मराठी, ज्या वाहिनीमुळे मी आणि ही मालिका घराघरात पोहोचू शकते. मधुगंदा कुलकर्णी यांचे अप्रतिम लिखाण ज्यामुळे महासोहळ्यातील प्रत्येक वाक्य तुम्ही रिलेट करू शकलात. मंदार देवस्थळी ज्यांच्या व्हिजन मधून ही कथा घडली.. आकार घेऊ शकली. रवी करमरकर आणि इतर दिगदर्शकांची टिम, आमचे कॆमेरा मन मंजय सोनी ज्यांनी आम्हा सर्व कलाकारांना टिपलं, मेकप दादा, स्पॊट दादा, लाईट दादा, साऊंड दादा सेटिंग दादा आणि माझे सर्व सहकलाकार यांच्या मेहनतीतून हा महासोहळा घडला. मधुगंदा कुलकर्णी यांचे विशेष आभार कारण ह्या पद्धतीचे लिखाण एखाद्या मालिकेत फ़ार कमी वेळा पाहायला मिळते. एक लेखिका म्हणून तिला प्रेक्षकांची करेक्ट नस पकडता आली आहे. लाखो घरांमधे असेच संवाद हरवले आहेत ते ह्या महासोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा सुरु झाल्याचे अनेक मॆसेजेस आणि फोन्स आम्हाला आले. हे इतक प्रेम करणार्या प्रेक्षकांना कोटी कोटी प्रणाम आणि त्यांचे आभार.
माझ्यावाट्याला फ़ारशी वाक्य नव्हती पण ती त्या सोहळ्याची गरजही नव्हती. माझ्यावाट्याला जे काम होतं, ते फ़क्त ऎकण्याचं आणि रिऎक्ट होण्याचं. माझ्या देहबोलीतून आणि डोळ्यातून मी खूप काही बोललो अशी प्रतिक्रिया मला मिळाली. आनंद वाटला. एक कलाकार म्हणून माझं काम तुमच्या पर्यंत पोहोचते आहे.... तुम्हाला आवडते आहे, ह्याहून उत्तम पावती कोणतीही नाही.
जे कष्ट घेऊन आम्ही कलाकार मंडळी एक गोष्ट उभी करतो, त्याचं असच कौतुक करत राहा...प्रोत्साहन देत राहा. कामाच्या बाबतीत काही खटकलं तर तेही सांगा. आमच्या गोष्टीची सुरुवात आणि शेवट ठरलेला आहे. आम्ही काय करतो आहोत याचं आम्हाला भान आहे. तेव्हा आता बंद करा, फाल्तूपणा काय चालवलायत, बघतो म्हणून काहीही दाखवू नका वगैरे प्रतिक्रिया देण्या आधी जरा एकदा हा विचार करा कि हा आमचा व्यवसाय आहे आणि ह्यावर आमचं पोट आहे. उद्या तुमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न आम्ही केला... तुमचं काम बंद करा असे उपदेश दिले तर नाही ना आवडणार? असो, हे तुमच्या पुढे मांडताना मी एक कलाकार म्हणून मांडत आहे, तेव्हा केवळ आणि केवळ माझ्या कले विषयी...मालिके विषयी....पात्रां विषयी काही बोलायचे असेल तरच खाली प्रतिक्रिया द्या. वैयक्तिक ओळख नसल्याने, कसलीच माहिती नसल्याने वैयक्तिक विषयांवर चर्चा करू नये ही विनंती.
तुमचा,
शशांक केतकर
एका वाचकाची प्रतिक्रीया

बेबड्या बिबट्या चिडल्यात !!!
बेबड्या बिबट्या चिडल्यात !!! आता अजून मजा येणार....
शशिकलाबाई आणि बिबट्या एकत्र येऊन प्लान करतील... आपटे काका त्यांना सामील होतील....
हा हा हा हा
ही सिरीयल अशक्य भंपक आणि ताळमेळ नसलेली आहे
ही सिरीयल बघणारे आपण सगळे प्रेक्षक धन्य आहोत... आपल्या सहनश्क्तीला सलाम...
पण असे काम करणारे कलाकार कंटाळत नाहीत का?
नुकतीच एक बातमी कानावर आली.
नुकतीच एक बातमी कानावर आली. या वर्षी पासुन झी गौरव पुरस्कार सोहळ्यात खास प्रेक्षकांसाठी 'सहनशीलता पुरस्कार' देण्यात येणार आहे. झी मराठीवरच्या (सगळ्या सर्वोत्तम) मालिका जिद्दीने, चिकाटीने आणि सहनशीलतेने पहाणाऱ्या प्रेक्षकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सारिका
सारिका
सारिका चितळे ++१ बेबि आत्या
सारिका चितळे ++१
बेबि आत्या नुस्तिच चिड चिड कर्ते
तिचा जळ्फळात्ट आणि बघणार्यन्चि मज्जा

क्या बात है! अखेर शशान्क
क्या बात है! अखेर शशान्क केतकरला कुणीतरी जाब विचारलाच.
काल जे दाखवले त्यात बेबड्याने म्हणलेले कुणी नोटिस केले केले का? बेबड्या सगळ्याना म्हणते,'' नाहीतरी आईला बाहेरच्यान्चाच पुळका असतो. वहिनी तुझावेळी आईने रमाकान्तला फटकारले, कान्ताच्या वेळी शराची बाजू घेतली आणी माझ्या वेळी तिला तिचा जावई चान्गला वाटला."" आता यावर श्रीच्या आई सकट कोणाच्याच चेहेर्यावर कसलीच प्रतीक्रिया नव्हती, एकदम बथ्थड चेहेरा. की अगबाई हे तू काय बोलते आहेस? कोणाला बोलते आहेस?
बर एवढे सगळे बघुन बेबडु चा विश्वास शशीकला बाईवरच बसला, जानुची बाजू ऐकाविशी वाटली नाही? काय चावट बाई आहे!
Pages