होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या सोशल मिडिया (चेपू /व्हॉट्सअ‍ॅप इत्यादी) वर कुठलाही शब्द वापरून जोक्स केले जातात. कोणाकोणावर आणि किती लक्ष ठेवणार, बंदी घालणार?
गेल्या काही दिवसांपासुन "काहीही हं श्री" वर खुपच जोक्स फिरत आहेत.

कालच्या भागात श्री जान्हवीच्या पोटाचा पापा घेतो असं दाखवलं आहे. तेव्हा क्लोजअप शॉटमध्ये तिच्या त्या गाऊनची केशरी लेस फाटलेली दिसत होती. क्लोजप शॉटमध्ये अशी फाटकी लोंबणारी लेस दाखवायला नको होती.

असं म्हणावं कि त्यांना अगदी रिअल लाईफ दाखवायचं आहे म्हणून ती फाटकी लेस तशीच ठेवली तर मग कॉटनचा गाऊन दाखवावा ना. मुंबईच्या उकाड्यात कोण सॅटिनचे गाऊन घालतं?
रुममध्ये एसी आहे म्हणावा तर श्रीबाळ पर्यावरणरक्षक आणि "साधी राहाणी, उच्च विचारसरणी" वाला.

कसल्या तपशीलात बघता रे तुम्ही लोक्स ही मालिका...देवा रे...

जानी आणि श्री ने वाचले तर ते जोक्स राहू द्या पहिले या धाग्यावर बंदी आणा म्हणतील....

पियू Lol

बाकी श्रीबाळ काल मुलीबद्दल जे बोलला ते आवडलं.

तश्या श्रीबाळाच्या बर्याच गोष्टी आवडतात - त्याची जानी सोडून Proud

फाटकी लेस? अगागा! भिंगंच बशीवली आहेत जणु डोळ्यांना!! Wink

अरे किती भारम्भार जड्जड बोलतात हे दोघे एकमेकांशी. >> हल्ली बर्‍याच सिरीयलमध्ये असेच अवजड शब्दबंबाळ डायलॉग्ज असतात. खरंच एकमेकांशी असं छापील पुस्तकी भाषेत थोडंच बोलतात? अरे जरा सोप्पे पण अपील करणारे संवाद द्या की! ते समजतात, लक्षात राहतात आणि पटकन भिडतात... इथे एकेका शब्दाचा अर्थ समजून लावेलावेपर्यंत मेंदूला अपचन होते!

तश्या श्रीबाळाच्या बर्याच गोष्टी आवडतात - त्याची जानी सोडून फिदीफिदी >> जान्हवी खूप म्हणजे खूप म्हनजे खूप्पच गोग्गोड बोल्ते बाई! सुमोच्या मोरंब्याच्या बरणीच्या तोंडातूनपण एवढा पाक सांडत नसेल!!

बाकी मालिका कैच्याकै म्हणजे कैच्याकैच पाणचट झालेय!

मोरंब्याच्या बरणीच्या तोंडातूनपण एवढा पाक सांडत नसेल!! >>>>>>>>>>>>> हो. पण त्या मोच्याबचे डोळे भलेमोठ्ठे करुन ओठ अतिशय कानाकडे नेउन हसणं भयंकर आहे.

>>>कालच्या भागात श्री जान्हवीच्या पोटाचा पापा घेतो असं दाखवलं आहे<<<

बरी प्रगती म्हणायची. नाहीतर तो नुसता बसलेला असायचा आणि जान्हवी पुढे जाऊन आपले पोट त्याच्या ओठांवर टेकवायची. काही सांगता येत नाही.

>>>सिरीयलमध्ये काम करायला बाळच मिळत नसेल म्हणून इतकी लांबवताहेत सिरीयल. <<<

असे नव्हे काही.

स्क्रीन टेस्टसाठी आलेल्या प्रत्येक बाळाला श्रीकडे फक्त टुकुटुकु बघण्याची भूमिका दिलेली असली तरी सगळी बाळे त्यांच्यासमोर श्री येताच 'काहीही हं श्री' म्हणत असतील आणि त्यामुळे रिजेक्ट होत असतील.

ते दोघेही इतक्या वघडल्यासारखे रोमँटीक डायलॉग बोलत असतात. Sad त्यापेक्षा आदे-मेदे तर एकदमच पुढचे आहेत. Proud

परवा इतक्या दिवसाने भेटल्यावर बेंचड्यावर असे बसले की परके आहेत. Proud
ती लंबूटांग(म्हणजे त्या बुटक्या श्री समोर लंबू) तिरपी होवून बसते ....

ओढून ताणून , काहींहा श्री....

हे गोखले मुंबईतले दाखवलेत ना? मग ते सॅटीनचे गाउन मुंबईच्या वातावरणात आणि एसी न लावता << +१
मरायचा माणूस उन्हाने.

बापासारखे दाढीवाले आणि आईशीसारखे जन्मत:च फिसकारून वेडसर हसणारे बाळ मिळत नसावे बहुतेक!

बाय द वे,

ही सिरीयल आणखी दहा वर्ष चालली (माझ्या सिरीयल बरीच वर्ष चालतात - रोहिणी हट्टंगडी!) तर मग.... आईपणजी?

ShreeJi mastani : aamchya yethe Sujata peksha chhan mango mastani milte

Sujata mastani : काहीही हा श्री...!☺

स्क्रीन टेस्टसाठी आलेल्या प्रत्येक बाळाला श्रीकडे फक्त टुकुटुकु बघण्याची भूमिका दिलेली असली तरी सगळी बाळे त्यांच्यासमोर श्री येताच 'काहीही हं श्री' म्हणत असतील आणि त्यामुळे रिजेक्ट होत असतील. Lol

बापासारखे दाढीवाले आणि आईशीसारखे जन्मत:च फिसकारून वेडसर हसणारे बाळ मिळत नसावे बहुतेक! Rofl

ते दोघेही इतक्या वघडल्यासारखे रोमँटीक डायलॉग बोलत असतात. त्यापेक्षा आदे-मेदे तर एकदमच पुढचे आहेत>>> होना आदेमेदेचा रोमान्स खरा तरी वाटतो. हे आपले नाही त्या वेळेला पर्यावरण वगेरे घेऊन बसतात.

हे आपले नाही त्या वेळेला पर्यावरण वगेरे घेऊन बसतात.<<<

आज पर्यावरण दिन असल्यामुळे पर्यावरण घेऊन बसलेले दाखवले असतील.

श्री बाळाला त्यांची मुलगी जान्हवी ची ditto कॉपी हवी आहे Uhoh

जानी 'काहीही हा श्री' आणि जानीची मुलगी 'काहीही हा बाबा' 'काहीही हा बाबा ' करून श्री चा जीव नकोसा करून टाकणार आहेत असा दिसतंय काळजी वाटायला लागली आहे आता श्री बाळाची Sad

'मुलगी हवी' वाले डायलॉग खूप खोटे वाटतायत. प्रचारकी वाटतंय ते सगळं. त्याऐवजी मुलगा-मुलगी काहीही चालेल इतपत ठेवायला हवं होतं.

एकदा भारत - विंडीजचा कसोटी सामना सुरु होता. भारताने फक्त ३३ धावा करुन ४ बळी गमावले होते. आता क्रीजवर गावसकरला साथ द्यायला कृष्णम्माचारी श्रीकांत आला. श्रीकांत गावसकरला म्हणाला, "सुनील, तुझ्याकडून आता द्विशतकाची अपेक्षा आहे". गावसकर म्हणाला.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
काहीही हां श्री

Pages