न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या फोटोज...

झक्कींच्या घरातून दिसणारा परिसर...
NJ_GTG_ ghar.jpg

झक्कींच्या शेतातले टोमॅटो.. Happy
NJ_GTG_tomato.jpg

लालू चे रॉकिंग बटाटे वडे..
NJ_GTG_ Batate wade.jpg

सायो चा पाश्ता...
NJ_GTG_ Pasta.jpg

बहूचर्चित सा. खि. आणि सौ. झक्कींनी केलेली कढी...
NJ_GTG_ sakhi.jpg

पन्नानी केलेली भेळ..
NJ_GTG_bhel.jpg

ग्रील वर केलेल कबाब...
NJ_GTG_ Kabab.jpg

काजू घातलेले पोहे.. Happy
NJ_GTG_ pohe.jpg

झक्कींना दिलेले कार्ड..
NJ_GTG_card.jpg

आणि हे उपस्थित लोकं.. Happy
NJ_GTG_ 043_grp.jpg

सही रे अडमा, मस्त आहेत फोटो. Happy

विकु, अडमाबद्दलचं नंबर ३ एकदम बरोबर... Lol
नशीब फोटोतरी नीट काढले, नाहीतर काही खैर नव्हती त्याची.. Proud

अरे व्वा, मस्त फोटू! Happy मस्त पदार्थ Happy
मला फक्त झक्की ओळखू आलेत! अन बहुधा त्यान्च्या उजव्या हाताला शेजारी अ‍ॅडमिन असावेत
बाकी कुणाला ओळखता येत नाही, अन्दाजही लावता येत नाही
फक्त ते सालस, सद्गुणी वगैरे दोघेजण शोधतोय पण सापडत नाहीत, पारच मागे पडले वाटत (पुढल्या सगळ्या साळकायान्ना खाली बसवत अस्त तर दिस्णार ना? Proud )
दाढीवाला चौकडा म्हणजे भाईच ना?
बाकी, सगळे जण ग्रुप फोटोला एकत्र शिस्तीत गावले हेच विशेष! Happy
मजा आली सगळे वृत्तान्त वाचून

तरीच ही आल्या आल्या मला म्हणाली की अजय तूला वजनदार म्हणाले
>>>>म्हणजे पन्ना नाव पुरुष आय डीचे आहे की स्त्री ? ::अओ:

ते मागे आहेत ते बोवाजी. त्यांच्या वामांगाला उभे ते भाई . बोकडासारखी दाढी असलेले. मागे पुण्यात आलेले व स्वतःला अ‍ॅदमिन म्हणवून घेणारे दिसत नाहीत.::अओ:. आरतीच्या चेहर्‍यावरून सि.न्डीच्या चेहर्‍याचा अ.न्दाज येतोय. :). 'लालु-' 'भडक' टीशर्ट लालूचा असावा .

<<ऑरकुटच्या कोणत्या अकाऊन्तवर?>>
आता आणखी ओर्कुट, भुस्कुट, फेसबूक, असले सगळे कशाला पाहिजे? पाहिलेत ना इथे फोटो, बस झाले!
मान्य आहे सरकारी नोकर आहात, पण तरी एव्हढ्या टिवल्याबावल्या करायच्या? त्यापेक्षा टेबलावरच्या दोन चार फायली उघडून बघा, नि त्याचे काय करायचे ते करा. नाहीतरी नुसत्या सह्या करून वर सायबाकडेच पाठवायच्या ना? मग आता काय 'पेपरवेट' साठी थांबला आहात काय? तुम्ही पण? शो. ना. , मु. शो. ना. !

>>आजकाल मायबोलीकर घरी आले तर त्यांना चहा विचारायची चोरी झाली आहे.
सिंडी Rofl
सगळ्यांचे वृत्तांत एकदम मसालेदार .. Happy

सगळ्यांची मुलं मात्र आई-बापाचे नाव रोशन करणार हे लग्गेच कळते. झक्कींच्या शेजार्‍यांची मुले बबल्स खेळत होती. आमची मुलं बघायला म्हणुन गेली. थोड्या वेळाने आमची मुलं बबल्स खेळत होती आणि शेजार्‍यांची बघत होती Proud देसाईंचा उभ्या उभ्या कार्यक्रम सुरु होता तेव्हा अचानक शोनुचा लेक झक्कींच्या बाल्कनीत दिसायला लागला. त्याला खाली आणले तेव्हढ्यात देसाईंच्या मागे एक दार उघडले आणि तिथुन इशान बाहेर आला. मग ह्या दोघांनी तिथले पेबल्स, स्वतः आणि इतर जमेल तो माल एका पाण्याने भरलेल्या बादलीत टाकायला सुरुवात केली. मधेच वैद्य झिंगाट पळताना दिसले. काय झाले म्हणुन बघितले तर त्यांचा लेक झक्कींच्या शेजार्‍यांची ब्याकयार्ड ओलांडुन पलीकडच्यांच्या वॉल कंपाउंडला लटकला होता Proud

Rofl

सिंडे आता कळलं मी बेबीसिटींग का केलं नाही ते????
तसही मी फक्त २ वर्षाच्या आतल्या मुलांना संभाळणार होतो.. त्यात फक्त इशान बसतो... पण तो त्याच्या आईच्या वळणावर गेलेला असल्याने सिटींग वगैरे करण्याचा पलिकडचा होता!! Wink

पण मास्टर शोनू एकदम गुणी आहे हां... मी आणि मिस्टर शोनू ग्रिल करत असताना त्याने आम्हाला उत्साहाने कणसं सोलून दिली.. त्याने ग्रील च्या जवळ येऊ नये म्हणून मग त्याला मी ती मोजायला सांगितली.. त्यावर त्याने माझ्या कडे तु.क. टाकून मी ती ऑलरेडी मोजलियेत असं सांगितलं.. तरी मी त्याला बिझी ठेवण्यासाठी कणसं आणि सालं ह्यांचे वेगवेगळे ढिग रचायला सांगितले.. त्यावर खूप वैतागलेले लुक्स देऊन तो तिकडून गायब झाला तो एकदम बाल्कनीत पोचला.. Proud

कुणाचा एक चेंडू राहिला आहे का? त्यावर एक आगगाडी बोगद्यात शिरते आहे असे चित्र आहे.
adm, तुम्ही एकंदर एकदम मोठे मॅनेजर व्हायच्या लायकीचे आहात. लोकांना कामे सांगण्यात पटाईत. आता माझ्याएव्हढे निर्लज्ज व्हायला शिका. माझ्या घरी येऊन लोक कामे करताहेत, नि मी नुसाताच इकडून तिकडे भटकतो आहे.

Happy

Battle of Wits नावाचे पुस्तक आहे का? माझे वाचून झाले की दोन तीन दिवसानी पाठवून देईन. पत्ता कळवा.

मस्त गटग, धमाल खादाडी आणि वृत्तांत.. Happy
फोटोही मस्त आलेत.. वड्याचा फोटो काय आलाय! वाह!

वड्याचा फोटो काय आलाय! वाह!
>>
हवे तवढे मोदक... की हवे तेवढे वडे म्हणू...?

बाकी वृत्तांत वाचून, फोटो पाहून मी जळून खाक...
--

प्रश्न १. ऑर्कुटवर फोतो कुठे आहेत ?

प्रश्न २. जर्सीतल्या बीबी वर पास्त्याचा फोटो पूर्ण दिसत नाही आहे::राग:

झक्कींचे ब्याकयार्ड
जीटीजीनन्तर..

दशा आणि दुर्दशा......

images[18].jpg

अरे ती फोटोची ओलखपरेड करा रे... वाहून चालए ते आता या पानावरून. नन्तर त्याचे विस्मरणच होईल. बरे ऑर्कुटावर कोठे आहेत फोटो.

Pages