न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हूडा
ऑर्कुटावरचे फोटो अ‍डमने फक्त जीटीजीला हजर सभासदांना बघायची परवानगी दिली असावी, त्यामुळे मनाने झक्कींकडे हजर असलेले पण शरीराने भारतात असलेल्यांना ते बघायला मिळणार नाही बहुदा. Happy
अरे वा हे या बीबीवरचे ११११व पोस्ट.

बापरे!!!!! कित्ती हि पोस्ट्स...किती मज्जा केली सगळ्यांनी. सगळ मिस केल मी. जाउदे Sad लवकरच पुन्हा गटग होइल अशी अशा करते Happy

कालच इंटरनेट सुरु झाल. तेव्हापासुन जुईने ताबा घेतलेला. आज जरा मला चान्स मिळतोय हे सगळ बघायला.

ऑर्कुटावरचे फोटो अ‍डमने फक्त जीटीजीला हजर सभासदांना बघायची परवानगी दिली असावी,
>>>
ह्या:.... याला काय अर्थ आहे? हे म्हनजे अगदी एखाद्या 'विशिष्ठ' शहरातल्यासारखे झाले....

>>>>>> हे म्हनजे अगदी एखाद्या 'विशिष्ठ' शहरातल्यासारखे झाले.... Lol Lol Lol
अगदी अगदी!
पण हुडा, यान्नी निदान एक ग्रुप फोटो तरी टाकला आहे रे भो! Happy त्याच कौतुकच करायला हव ना?
झालच तर खादाडीचे, झक्कीच्या ब्याकयार्डचा फोटो पण टाकलाय!
राजरोस जाहीरपणे लोकान्ना जळवण्यासाठी असे सान्गत नुस्तेच शब्दाचे बुडबुडे नाही काही फोडले त्या "विशिष्ट शहरातल्यासारखे" Wink
आता झक्कीन्च्या घरावर पाऊस पडला अस्ता त्यादिवशी तर त्याचेही फोटो टाकलेच अस्ते त्यान्नी Happy
झक्कीन्च्या इथे डोन्गर दर्‍या धबधबे ढग धुके अस्ते तर त्याचेदेखिल फोटो टाकले अस्ते! बरोबर ना?

लोकहो, 'सी आर. कुळकर्णी ' असे नाव लिहीलेली एक स्टेनलेस स्टीलची वाटी व एक मोठा प्लास्टीकचा, वाढायचा चमचा आमच्या घरी राहिला आहे. कुणाचे आहे हे सामान? त्या वाटीत तळलेले काजू होते, पुलावासाठी.
पत्ते कळवलेत तर पाठवून देईन.
तसेच 'Battle of Wits' नावाचे एक अत्यंत चित्तथरारक, रहस्यमय, रंगित चित्रांनी भरलेले, नि उपदेशकारक असे ३२ पानी पुस्तकपण राहिले आहे. लालू, मैत्रेयि, पन्ना यांच्यासारख्या वाङ्मयप्रेमी मंडळींचे आहे का? की अनिलभाईंचे? की विनय त्यांचे भाषांतर करून प्रसिद्ध करणार आहेत? की सचिन_बी, किंवा अ‍ॅडम यांचे आहे? की सायो त्याचे जपानीत भाषांतर करणार आहेत? की नयनीश यांना झोप लागावी म्हणून त्यांची आई रोज रात्री वाचून दाखवण्यासाठी वापरतात?
ज्याचे असेल त्याने आपला पत्ता कळवल्यास पाठवून देईन (प्रामाणीकपणा अपेक्षित आहे).

प्रामाणीकपणा अपेक्षित आहे>>>>> बाकीचं राहुदेत, पण ही तळटीप मात्र आवडली. कुळकर्णी म्हणजे विकुंच्या घरची असायची शक्यता आहे.

झक्की, ते पुस्तक माझ्या लेकीचं आहे. (खरंच लक्षात रहात नाही हां तुमच्या, वयोमानाप्रमाणे) Wink

विकु, तुम्ही लाकुडतोड्याचा प्रामाणिकपणा दाखवला नाहीत आणि कर्मसे ज्यादा, भाग्यसे अधिकची अपेक्षा केलीत, त्यामुळे आता तुम्हाला वाटी, आणि काजू यातली एकही वस्तू न देता फक्त प्लास्टिकचा चमचा देऊन झक्की अंतर्धान पावतील. Wink

अरे मंडळी, हिवाळी ए वे ए ठी ची काय तारीख ठरवावी? मै, तुझ्या कम्युनिटी चा हॉल उपलब्ध असणार आहे का?

हॉल ची अव्हेलेबिलिटी पहाते मी. नोव्हेंबर - डिसेंबर बहुधा बरेच लोक बुक करतात आधीपासून, त्यामुळे सांगता येत नाही. जानेवारीमधे चान्सेस आहेत, कारण तोवर सगळे हॉलिडेज , पार्टी एव्हेन्ट्स बहुधा संपतात. पण प्रिफर्ड तारखा दोन तीन सांगून ठेवा म्हणजे तसे बघता येईल मला.

हिवाळी तारखांचा असा Problem असतो की ऐनवेळी पडणार्‍या स्नोची टांगती तलवार असते... म्हणजे समजा Buffalo मध्ये स्नो पडला तरी प्लोरिडाहून येणारे पण 'स्नो' चे कारण सांगतील... Lol

मी ३ जानेवारीची पहिली बोली लावु म्हणतो. बाकी मंडळी जरा तारखा पाडा आजुन. आणि आजुन एक, रविवारच्या ऐवेजी शनिवारी ठेवुयात का? म्हणजे लांबुन येणार्‍या मंडळींना एक दिवस मिळतो जरा दम खायला, नाहितर सोमवार सकाळ पासुनच रांधे वाढा सुरु.
असो, २-३ जानेवारी? ९-१० जानेवरी?

डिसेंबर महिना आणि ३ जानेवारीपर्यंत काही करू नये.. मी नाहीये इथे. त्यानंतर कधीही चालेल.

फ्लोरिडाहून येणारे स्वतःबरोबर छान हवामान घेऊन येतात हे कृपया लक्षात घ्यावे! Proud नाहीतर आमच्या आगमनाप्रित्यर्थ झालेलं गेल्या वर्षीसारखं (७-८ फेब्रूवारीकडे ट्रायस्टेट एरियात) ४८-५० डिग्री फॅ. तापमान बघितलं होतं का कुणी? Proud

१० जानेवारीला करा. टिळक पंचांगवाल्यांची (आमची) संक्रांत असते. तिळगूळ देईन. (नमस्कार केलात तर, खाली वाकून)

झक्की माझा आत्ताच तुम्हाला काकडी चोचवु नमस्कार. :p

१० जानेवारी आत्ता तरी चालेल. स्नोची टांगती तलवार आहेच.

कनेक्टीकट वासीयांकडुन बारा करांना १४ नोव्हेंबर चे आग्रहाचे निमंत्रण.... आम्ही येतच असतो तुमच्या गावा, कधीतरी तुम्ही पण तो तप्प्पन झी ब्रिज चा टोल भरा. Happy

http://www.maayboli.com/node/11766

3, 12, 24
(या तारखा नसून वरच्या लिस्टमधील कारणांचे नंबर आहेत.)

बारा की डीसी?? कुठे जाऊ? कुठलं गटग मेगा-गटग आहे? ठरवून सांगा. त्याप्रमाणे तिकिटांची आणि राहण्या-खाण्याची सोय करते.

Pages