Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मलाही ही गोष्ट भारी खटकली
मलाही ही गोष्ट भारी खटकली
लिंबूश्री, तुम्ही इथे जाऊन
लिंबूश्री,
तुम्ही इथे जाऊन तक्रार नोंदवू शकता : http://www.ascionline.org/index.php/lodge-ur-complaints.html
आ.न.,
-गा.पै.
limbutimbu मला हि ती पर्क ची
limbutimbu मला हि ती पर्क ची ad अजिबात आवडत नाही . dairy मिल्क च्या सुधा हल्लीच्या जाहिराती किती किळसवाण्या असतात . एवढ्या मोठ्या लोकांना साधी कॅडबरी खाता येवू नये ?कॅडबरी खाताना तोंड आणि हात खरच एवढे भरतात का ?
कतरिना कैफची लेटेस्ट टायटन
कतरिना कैफची लेटेस्ट टायटन रागाची अॅड अतिशय आवडली- ज्यात ती वधू आहे- मॅरी अ मॅन हू इज वर्थ युअर टाईम!
जाहिरात लिहिलीयेदेखील एकदम मस्त. लेखकाला शाबासकी.
पूनम +१ मलाही फार फार आवडलीये
पूनम +१
मलाही फार फार आवडलीये ती अॅड!
अगदी किमान शब्दात बरचं काही सांगुन जाते ती अॅड
बेस्ट
कतरिना कैफची लेटेस्ट टायटन
कतरिना कैफची लेटेस्ट टायटन रागाची अॅड अतिशय आवडली- ज्यात ती वधू आहे- मॅरी अ मॅन हू इज वर्थ युअर टाईम!>>>> मला पण आवडते.. डोन्ट गेट मॅरिड बिकॉज ची कारनं पण मस्त आहेत..
एवढ्या मोठ्या लोकांना साधी कॅडबरी खाता येवू नये ?कॅडबरी खाताना तोंड आणि हात खरच एवढे भरतात का ?>>>>>>> मला जाम आवडतात त्या गोडमिट्ट जाहिराती
गालाच्या झाडु ची अॅड
गालाच्या झाडु ची अॅड पाहिली.. याआधी कधीच झाडुवर अॅड झालेली आठवत नाहिये.. याआधी कधी झालिय का झाडुवर अॅड????????
Pan ti zaadu kharach chhan
Pan ti zaadu kharach chhan ahe. Varshbhar vapartey mi pan ekahi kadi ikadachi tikade nahi zaliy zaduchi full paisa vasul.
Are wah! mag ha zaadu ghetala
Are wah! mag ha zaadu ghetala pahije
प्रीति रिव्यु करता धन्स..
प्रीति रिव्यु करता धन्स..
गालाच्या झाडु ची अॅड
गालाच्या झाडु ची अॅड पाहिली.>>> मी कित्ती वेळ विचार करत होते की हे काय प्रकरण आहे??

प्रीतिचा प्रतिसाद वाचल्यावर उजेड पडला की ते Gala ब्रँडच्या झाडूबद्दल आहे. तोपर्यंत मला ब्लशरटाईप सौंदर्य उत्पादनाची जाहिरात आहे की काय असं वाटत होतं
पर्कच्या जाहीरातीबद्द्ल सर्व
पर्कच्या जाहीरातीबद्द्ल सर्व प्रतिसादांशी सहमत. सध्या ९०% जाहीरातींमधुन असेच चुकीचे संदेश पसरवले जात आहेत. विशेषतः या जाहीराती जर कार्टुन चॅनल्सवर सुद्धा लागत असतील तर ते तर जास्तच चिंताजनक आहे..
मुलांच्या आगाउपणाला स्मार्टपणा म्हणुन हायलाईट करण चुकीच आहे. टायगर बिस्कीटची जाहीरात ज्यात मुलगा काउंटरवरुन ५ रु नाण स्ट्रायकरसारख भिरकावतो यात तर आगाउपणाबरोबर मुजोरीपणासुद्धा हायलाईट झाल्यासारखा वाटला. अजुन एक वॉल पुट्टीची जाहीरात, गुडनाईट नीम मॉस्किटो कॉईलची जाहीरात आणि अजुन बर्याच जाहीराती आहेत.
मुगु +१
मुगु +१
(No subject)
माधुरी दिक्षित ची अॅक्वा
माधुरी दिक्षित ची अॅक्वा गार्ड की काय ची तिच्या नवर्याबरोबर्ची अॅड भंगार आहे..
काहीतरी ८०% पाणी असत शरिरात म्हणत ती बेले डांस टाईप हालत असते ती ..
बकवास अॅड
_आनंदी_ >> + १००० धोनीची
_आनंदी_ >> + १०००
धोनीची पेप्सीची अॅड पण महाबकवास
लिम्बुकाका , तुमच्यासाठी
लिम्बुकाका , तुमच्यासाठी
http://www.mid-day.com/articles/mumbai-diary-thursday-theme/16208162
एवारा प्लॅटीनमची अॅड कुणाला
एवारा प्लॅटीनमची अॅड कुणाला कळली का?
एवढे सगळे लोक येतात आणि प्रत्येक जण काहीतरी गिफ्ट देतो.
एवढ्या गर्दीत कोण कोणाचा कोण असतो तेच मला कळले नाही.
एवारा प्लॅटीनमची अॅड कुणाला
एवारा प्लॅटीनमची अॅड कुणाला कळली का? >>>> त्यात ऐश्वर्या नारकर आहे ती जाहीरात का?
हो तीच. ब्लॅक अन्ड व्हाईट मधे
हो तीच.
ब्लॅक अन्ड व्हाईट मधे आहे ती जाहिरात.
एवढे सगळे लोक येतात आणि
एवढे सगळे लोक येतात आणि प्रत्येक जण काहीतरी गिफ्ट देतो.
एवढ्या गर्दीत कोण कोणाचा कोण असतो तेच मला कळले नाही >> + १००००००
त्यात दोन घरांना जोडण्याचा
त्यात दोन घरांना जोडण्याचा कन्सेप्ट मांडला गेल्यासारखा वाटतो.. ऐश्वर्या मुलीची किंवा मुलाची आई आहे जी पुढाकार घेते...
एवढे सगळे लोक येतात आणि
एवढे सगळे लोक येतात आणि प्रत्येक जण काहीतरी गिफ्ट देतो.
एवढ्या गर्दीत कोण कोणाचा कोण असतो तेच मला कळले नाही.>>
(मला समजले ते असे) ऐश्वर्या नारकर वधूची आई आहे. लग्न ऑलरेडी झालेलं आहे, आता बहुधा रिसेप्शन असावं. ऐश्वर्या मुलीला जवळ बोलावते आणि तिला दागिना देते. तिला एकटीलाच देत नाही, तर जावयालाही गळ्यात घालायची चेन देते. (दोन्ही दागिने प्लॅटिनमचे (त्यांचं काय जातंय म्हणा!)) नंतर विहिणीचा हात धरते आणि नवीन 'रिश्ता' जोडते. शेवटी वधू सासू-सासर्यांना (न वाकता) नमस्कार करते.
रिश्तोंकी डोरी में एक धागा मेरा एक तुम्हारा- अशी जिंगल आहे ती. खूप सुरेख गाणं आहे ते.
पूनम, मला वाटत ऐश्वर्या वरमाई
पूनम, मला वाटत ऐश्वर्या वरमाई आहे, कारण विहिणीला फ्रेण्डशिप ऑफर करताना ती एकदम कॉन्फिडण्ट आहे, पण दुसरी बाई थोडी गोंधळलेली आहे अस मला वाटत. काही का असेना जिंगल फार सुंदर आहे जाहीरातीची..,आणि नारकर बाई न्हेमीप्रमाणे गोड दिसतायत
मलाही ती वधुमायच वाटते पूनम
मलाही ती वधुमायच वाटते
पूनम +१
कोणी आधी लिहिले आहे का माहीत
कोणी आधी लिहिले आहे का माहीत नाही ती वोडाफोनची जाहीरात मला फार आवडते.
मुलाचा हेअर कट गंडतो. तो भोकाड पसरतो. आई लगेच फोटोकाढून बाबाला पठवते आणि घरी येतात तर बाबा तश्याच हेअर कट मधे लेकाचे स्वागत करतो.
खूपच गोड आहे ती जाहीरात
पूनम, मला वाटत ऐश्वर्या वरमाई
पूनम, मला वाटत ऐश्वर्या वरमाई आहे, कारण विहिणीला फ्रेण्डशिप ऑफर करताना ती एकदम कॉन्फिडण्ट आहे, पण दुसरी बाई थोडी गोंधळलेली आहे >>>> +११
मला वाटत ऐश्वर्या वरमाई आहे
मला वाटत ऐश्वर्या वरमाई आहे --
दुसरी एक जाहिरात आहे एवारा प्लॅटीनमची. त्यात ती वधु, ऐश्वर्या, आणि वडील खरेदी करताना दाखवले आहेत. खरेदी संपते, आई वडील निघतात मुलगी एका ठिकाणी घुटमळत असते. आई निघायची खूण करते आणि ते निघतात. ऐश्वर्या जाता जाता बघते कि मुलगी काय बघत होती. तिथे हा नेकलेस दाखवलाय.
ह्या दुसर्या जाहिरातीत तोच नेकलेस ती मुलीला बहुदा सरप्राईज गिफ्ट देते प्लस मुलाला पण चेन देते.
वरमाय पण असू शकते सुनेच्या मनातल ओळखून तिला हव ते देणारी
( उगाचच शंका अशा सेट ची किमंत काय असते )
ऐश्वर्या नारकर ज्या पद्धतीने
ऐश्वर्या नारकर ज्या पद्धतीने (जराशा हक्काने) वधूला बोलावते आणि त्या पद्धतीने ती वधूही तिला रिअॅक्ट होते त्यावरून मला त्या आई-मुलगी वाटल्या. मुलाला चेन देताना आदरभाव जास्त आहे प्रेमापेक्षा. ती कॉन्फिडन्टली विहिणीचा हात धरते कारण ती एक नविन नातं आपणहोऊन जोडते आहे असं मला वाटलं.
हे सगळं चुकीचं असूच शकतं. नो प्रॉब्लेम
एक आई-बाबा जोडी आपल्या नुकतंच लग्न झालेल्या मुलांना प्लॅटिनमचे दागिने देऊन एक 'अटूट बंधन' निर्माण करते आहे ही बॉटमलाईन आहे एवढं नक्की
जाहिरात प्लॅटिनमच्या दागिन्यांची आहे. ते विकले गेले म्हणजे झालं! 
हुश्श, सुटलो, मला वाटलं ,
हुश्श, सुटलो,
मला वाटलं , प्लॅटिनम वरुन आता खणाखणी सुरु होते की काय .....वरमाय-वधुमाय
Pages