Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हिमानी शिवपुरी ची,चहाची
हिमानी शिवपुरी ची,चहाची अॅड..नक्की काय सुचवायचे यांना? > काही नाही त्या जाहीरातीतील मृणाल ठाकूर हिला तिच्या सासरच्यांनीपण असंच चहाच्या एका कपावर स्वीकारावं
नंदिनीतै.. मला पण असचं वाटलं
नंदिनीतै.. मला पण असचं वाटलं
कोलगेट अॅक्टीव टूथपेस्ट>>>
कोलगेट अॅक्टीव टूथपेस्ट>>> अजून एक कोलगेटचीच जाहिरात...टूथपेस्ट की टूथब्रश नक्की लक्षात नाही. जाहिरातीत ३ माता आपल्या मुलांबरोबर ही पेस्ट की ब्रश (काय असेल ते किती छान) वगैरे सांगताहेत. या तीन मातांपैकी :-
पहिली बंगाली. टीपटाप कपडे-छान छान घरातल्या, ऊंची सोफ्यावर बसून सांगत आहे,
दुसरी (बहुधा) राजस्थानी. परत तेच... छान घर, कपडे वगैरे,
तिसरी माता मराठी! घरी नेसलेल्या साडीवर गच्चीवर कपडे वाळत घालत सांगत आहे... असं का ??? मराठी आईला व्यवस्थित, नीटनेटकं दाखवता येत नाही !
मण्डळी फ्रेन्डशिप डे ची बहुधा
मण्डळी फ्रेन्डशिप डे ची बहुधा कॅडबरी च्या जाहिरातीचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते . १२-१३ (?)वय असणार्या मुली बॉयफ्रेन्ड बरोबर गोवा ट्रिप आणि ब्रेकअप झालेल्या मुलीचा बॉफ्रे दुसरीने पटकवायचा अशा विशयावर गप्पा मारताहेत ? सगळेच खटकले. नवीन पिढी कितीही फास्ट असली तरी असे बघणे पचनी नाही पडले बुवा,,,,
रच्याकने , हेच आजच्या "हुच्चभ्रू" समाजातले वास्तव तर नाही ना? अशी शन्का आली !
माझ्या लेकीला ही जाहीरात खूप
माझ्या लेकीला ही जाहीरात खूप आवडली. वय वर्षे १४ पुर्ण.
त्या मुली आपल्या मैत्रीणीला तिच्या (ब्रेकपच्या) दु:खातुन बाहेर पडायला मदत करत आहेत. आणि सिरिअसली समजूत घालण्यापेक्षा थोड्या खेळकरपणे हे दाखवले आहे.
मला वाटत नाही त्या चारही मुली
मला वाटत नाही त्या चारही मुली १२-१३ वर्षाच्या वयोगटातल्या आहेत.. आणि तसही आजकाल "आय लव्ह यु" म्हणण्याच वय जर ८-९ वर्ष असेल तर ब्रेकपच वय १३-१४ म्हणजे बरोबरच आहे ना..
नताशा, मलाही आवडली ती
नताशा, मलाही आवडली ती अॅड!
झाला ब्रेक. मुर्ख होता तो . विसर त्याला. आयुष्यात आनंदी रहावं अशा अनेक गोष्टी आहेत. हे सगळं म्हणून दिलासा देणारी.
स्टाईल वेगळी वापरलीये पण अर्थ तोच की.
मला पण आवडलीच
ती आय्फोन ची जाहीरात बघितली
ती आय्फोन ची जाहीरात बघितली .
अगदी अगदीअ, तो नवरा "हुं!! " असच केल्यासारखा वाटतो
त्या आयफोनच्या जाहिरातीमध्ये
त्या आयफोनच्या जाहिरातीमध्ये इतका वेळ अजिबात न दिसणारी दुल्हन त्याच्यासमोर आल्यावर एकदम दात विचकटून हसते आणि तेवा तो दूल्हा ओठ मुडपून हसतो. त्याच्या चेहर्यावरचे एक्स्प्रेशन्स "इतकी पण काय ग्रेट दिसत नाहीस. उगाच मघापासून नाटकं चालू आहेत" असे वाटतात.>> +१
खरंच आयफोनमध्ये बरी दिसतेस प्रत्यक्षापेक्षा असेच एक्स्प्रेशन्स वाटताहेत! ते तसंच दाखवायचं असेल का?
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=SGYXJ62378s अतिथी देवो भव ची ही जाहीरात आवडली
ती हुं वाला नवरा ची अॅड
ती हुं वाला नवरा ची अॅड दाखवा बरं कोणी तरी.
अतिथी देवो भव ची एकुण एक अॅड आवडलीये.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=7kxXVnAtnOQ
घे रिया
पुरूषी मानसिकत मध्ये अजून एक
पुरूषी मानसिकत मध्ये अजून एक भर फिलीप्स इस्त्रीची जाहिरात येथेही बायकोच नवऱ्याला शर्ट इस्त्री करूँ देते
मित >तिसरी माता मराठी! घरी
मित >तिसरी माता मराठी! घरी नेसलेल्या साडीवर गच्चीवर कपडे वाळत घालत सांगत आहे... असं का ??? मराठी आईला व्यवस्थित, नीटनेटकं दाखवता येत नाही ! > +१
ती तिसरी माता माझ्या सख्ख्या
ती तिसरी माता माझ्या सख्ख्या पुतण्याची बायको आहे. आणि ती तिची मुलगी. पुतण्याची बायको एवढी सी.ए. झालेली आहे, टकाटक राहते आणि सुंदर आहे की विदाऊट मेक-अपही ती एखाद्या मॉडेलसारखी दिसते. पण तिला कुठलीतरी बेंगरुळ साडी दिली नेसायला आणि अजागळासारखी नेसवलीही त्या लोकांनीच. ती फक्त गणपतीमध्ये आणि कुठल्या लग्नकार्यालाच साडी नेसते पण अतिशय टापटिप असते. तिला मी म्हटलंही की अशी काय गं शूटिंगला उभी राहिलीस? बाकिच्या मुली बघ किती छान तयार झाल्या होत्या (एकतर तिचं आणि तिच्या मुलीचं ते शूटिंग केवळ स्क्रीनटेस्ट म्हणून केलं गेलं होतं आणि तेच फायनल केलं गेलं). तर म्हणाली की तिने नेलेली छानशी साडी रिजेक्ट केली गेली व नुसतीच सुस्नात होवून कपडे वाळत घालणारी तरुण स्त्री हवी म्हणून तसली साडी दिली नेसायला. आम्हाला कुणालाही ती अॅड अज्जिबात आवडली नाहिये. अर्थात, ती तिच्या प्रोफेशनमध्ये वेल एस्टॅब्लिश्ड आहे (A.V.P. in JP Morgan) आणि मॉडेलिंगचा थोडाही ध्यास नसल्याने तिला काहीच फरक पडला नाहिये ते बरं आहे.
"ती विचार बदला.. चॅनल नको" हि
"ती विचार बदला.. चॅनल नको" हि आयोडेक्सची जाहिरात कळलीच नाही.
त्यात ती बाई सँडविच खायला हात पुढे करते. रिमोट तर कुठे दिसत नाही (चॅनेल बदलण्यासाठी).
तिच्या चेहेर्यावर दुखण्याचे काही एक्स्प्रेशन्स पण नाहीत.
आणि विचार बदला कि प्रॉडक्ट?
कोणाला कळली का ती अॅड?? झी मराठीवर बरेचदा लागते.
त्या युनिसेक्स वॉशिंग मशिनची
त्या युनिसेक्स वॉशिंग मशिनची जाहिरात पाहिली का ? मस्त आहे.
सगळयांची अॅक्टिंग मस्त. खास करुन जेव्हा बायको 'युनिसेक्स' मशिन आहे का विचारते तेव्हा नवर्याच्या चेहर्यावरचे 'लाज काढतेय वाटत माझी' असे भाव आणि तरीही संयम ठेऊन तिला समजावणे. त्याउपर तिचा डायलॉग आणि एक्स्प्रेशन मस्त. तिच्या बोलण्यावर सेल्समनचं गालातल्या गालात हसणं. छान जुळुन आलयं सगळं.
हि घ्या
हि घ्या लिंक.
https://www.youtube.com/watch?v=vOX0XrxYqpc
अवांतर - यातला नवरा म्हणजे क्राईम पॅट्रोल मधला सबइन्सपेक्टर मला आवडतो. तो खरच पोलीसच वाटतो.
अग पियु मला वाटत्य ती अॅड
अग पियु मला वाटत्य ती अॅड अजुन मोठी असेल वेळेअभावी अर्धीच दाखवत असतील..
अरे! त्या ओल्ड स्पाईसच्या
अरे! त्या ओल्ड स्पाईसच्या अॅडमध्ये मिलिन्द सोमण आहे?
.
किती विचित्र वाटतोय . म्हणजे रंगेल म्हातारा टाईप्स काहीतरी .
अरे! त्या ओल्ड स्पाईसच्या
अरे! त्या ओल्ड स्पाईसच्या अॅडमध्ये मिलिन्द सोमण आहे?
किती विचित्र वाटतोय . म्हणजे रंगेल म्हातारा टाईप्स काहीतरी . अरेरे .>>> +100
ही तशी जुनी जाहिरात आहे, पण
ही तशी जुनी जाहिरात आहे, पण खूप गोड आहे. व्होडफोनची.
अतिशय आवडते ही अॅड. अजूनही लागते कधीमधी. ही लिंक-
मोठी रांग असते, त्यात एका बाईच्या कडेवर छोटं मूल असतं जे कंटाळून रडत असतं. त्याला रडताना पाहून मागचा दादा एक कार्टूनचा व्हिडियो शीघ्रतेने डाऊनलोड करतो आणि त्याला दाखवतो. व्हिडियो बघून बाळाचे बदलणारे एक्स्प्रेशन्स केवळ लाजवाब आहेत!
https://www.youtube.com/watch?v=ztDH9ufdhgY
मला तो दादा जो व्हिडियो
मला तो दादा जो व्हिडियो दाखवतो तो व्हिडियो पाहिजे
त्यासाठी त्या बाळासारखं रडावं
त्यासाठी त्या बाळासारखं रडावं लागेल. कोणत्यातरी लांबलचक कंटाळवाण्या रांगेत.
रडणार्या बाळासाठी हवा असेल हे कळतंय. पण राहावलं नाही.
नाही हो कुठल्याही बाळासाठी
नाही हो कुठल्याही बाळासाठी नाही, असाच मजा म्हणून हवा आहे. किती मस्त आहे!
मी तयार आहे त्या बाळासारखी रडायला, पण लोक मला नाही दाखवायचे ना असे व्हिडियो! :-o
kolaget chi link dya na
kolaget chi link dya na konitaree
कोलगेट पुन्हा मागे घेउन जातय.
कोलगेट पुन्हा मागे घेउन जातय. पुर्वी मीठ आणि कोळश्याने लोक दात घासायचे ते सोडुन कोलगेट / टुथ्पेस्ट वापरु लागले. तर आता कोलगेट मधे मीठ आणि चारकोल असतं.
राखी सेलिब्रेशन साठी कॅडबरी
राखी सेलिब्रेशन साठी कॅडबरी सेलिब्रेशन्सची ही जाहीरात नेहमीप्रमाणेच आवडली
www.youtube.com/watch?v=u-EMqPJTNOs
आणि ही अज्जिबात नाही https://www.youtube.com/watch?v=WVjXWynV2Gw
रिन उगाच ओढून ताणून इमोशन्स टाकायचा प्रयत्न करते...
१००% बँकरचा आणि पांढर्या कपड्यांचा काय संबंध? आणि ऑटो मधून - ऑटो रिक्षा ड्रायव्हर बाबा उगाच कैच्याकै
ही जाहीरात आवडली पण सिमेंटची असल्यासारखी वाटते https://www.youtube.com/watch?v=SL-YVDq3UqU
नविन नेसकॅफे ची कार्टुनिस्टची
नविन नेसकॅफे ची कार्टुनिस्टची जाहिरात मस्त आहे.:) आवडलीच..
काल रेमंडची जाहिरात पाहिली.
काल रेमंडची जाहिरात पाहिली. लहान मुलांचा शाळेत विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम चालू आहे. सगळे पालक आपापल्या मोबाईल मधे हा सोहळा टिपण्यात गुंग आहेत. मुलं मात्र त्यांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी आतुर आहेत. अश्या वेळी फक्त एकच माणूस जागचा उठतो, आणि कौतुकासाठी टाळ्या वाजवतो. सगळ्या मुलांच्या चेहर्यावर हसू फुलते. तीच प्रसिद्ध रेमंडची युसपी ओळ 'द कंप्लिट मॅन' येते... एकदम अॅप्ट जाहिरात आजच्या घडीला !
Pages