मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

''ताजगीचा चटर मटर धमाका' की असच काहिसं.. कोलगेट मॅक्स फ्रेशची अ‍ॅड.. अतिशय डोक्यात जाते. काय ते भाषांतर आणि काय तो अल्लु अर्जुन Sad

बागुलबुवा, मग एक पिंक कलरच्या बॉक्समधलं जिगसॉ पझल हीरोईन हीरोला पलंगावर देईल. त्याला काही ते सोडवता येणार नाही. मग तो खिशातली मंच काढून खाईल व एका क्षणात सर्व तुकडे जोडून गुलाबी बदाम तयार करेल, अर्थातच मागे गाणे चालू असेल -या बसा मंचकी सुटंल गुलाबी कोडं!
#कल्पनादारिद्र्य कंटिन्यूड.

चनस नुसत ते नाही, तर तो नाचायला लागल्यावर ती नववधु लग्न बाजुला ठेउन त्याच्याबरोबर नाचायला लागते, त्याआधी विधींमध्ये ती पेंगत असलेली दाखवलीय.. मला कळेना हा उठला आणि याने कोलगेट मॅक्सफ्रेशने दात घासल्यावर बाकीच्यांना कस काय फ्रेश वाटायला लागल? बर हे तर हे लग्न मराठी माणसाच आणि बॅक्ग्राउंडला साउथ इंडीयन म्युझिक असा पण घोळ आहे.

आत्मधून +१
त्या अॅड साठीचा आवाज पण किती भयानक वाटतो. ते 'आता मजा, आता मजा, मजा करूया' लागलं कि त्या अल्लूलाच बुकलावासा वाटतो.

आशूडी Lol

वोक्सवैगन ची नवीन जाहिरात आवडली. कारमधून एक माणूस चित्रविचित्र चेहरे-हावभाव करत जाताना रस्त्यावरच्या लोकांना दिसतो. शेवटी दाखावलंय की पाठीमागच्या सीट वर कारसीटमधे बसलेल्या त्याच्या बाळाला हा माणूस नर्सरी राइम्स ऐकवतोय. मस्त जमलीये जाहिरात.

मुग्धा, ते लग्न मराठी मुलगी आणि साउथ इंडिअन मुलगा ह्यात आहे. पहिल्यांदा मलापण वाटलं मराठी लग्न आणि हे काय, मग दुसऱ्यांदा नीट बघितली.

मला नाही आवडली ती add.

ईम्रन खान ची डिओ ची जाहिरात पाहिली .
विमानात , पठ्ठ्या कोटाच्या खिशातून डीओ काढून शेजार्याला देतो .
आम्ही विमानात चढताना किती चेकिंग असतं .
पाण्याची बाटली पण टाकायाला लावतात Sad

फेमस कोब्रा डीओची नविन वाह्यात जाहिरात आली आहे .
पहिल्या ईतकी घाणेरडी नाही पण वाह्यातपणा आहेच .

डाबर लाल ची नवी जाहिरात पहिली का बाळ चालायल सुरुवात कार्नर म्हणून आई बाबा सर्व पसारा आवर तात आणि ते बाळ बाबाने ghatlela चश्मा ख़ाली फेकून देत !!मस्त एकदम

चटर मटर - चटक मटक आहे ते! Proud

अल्पेन्लिबे च्या जस्ट जेलीची जाहीरात पाहीली काल! आजोबांचा पाय त्यांच्याच काठीने खेचतो नातू... वाह्यातपणाला सीमा असावी दाखवताना :रागः
https://www.youtube.com/watch?v=JFWeNEbD8IY&spfreload=10

ड्रीमगर्ल जाहीरातीत स्मार्टपणाच्या नावाखाली मुलांकडुन जे करवुन घेतल जात त्याबद्दल न बोलणच इष्ट... आगाउपणा = स्मार्टपणा अस समीकरण झाल आहे सध्या... जाहीरातीत जो मुलांचा स्मार्टपणा दाखवतात तो पाहुन त्यांच्या दोन ठेउन द्याव्याश्या वाटतात..

अल्पेन्लिबे च्या जस्ट जेलीची जाहीरात. वरच्या पोस्टस शी सहमत.
अत्यंत बेकार जाहिरात आहे. जाहिरातीत गम्मत म्हणून पण आजोबांचा पाय खेचणे त्याला काठी लावणे अशा कल्पना आणू नयेत. जाहिरातीच्या शेवटी तसे का ते एक्स्प्लेन केले असले तरी ८०% मुले ते सोडून आधीच्या कृती कॉपी करणं शक्य असतं.

न आवडणार्‍या जाहिरातींमध्ये फेयर अँड लवली, फेयरअँड हॅंडसम आणि कपडे धुण्याच्या साबण व पावडरींच्या तमाम जाहिराती यांचा अग्रक्रम आहे. जणू काही कुणी गोरं नसेल तर, त्यांचे व्यक्तिमत्व,कर्तृत्व इ.इ. ला काहीच किंमत नाही!!
आणि कपडे कित्तीही मळलेले असतील, अगदी चिखलातले किंवा तेलकट डाग असलेले तरी अमुक अमुक कंपनी चे साबण किंवा पावडर वापरल्यास, एकदम नव्वीन,पांढरे शुभ्र!! जसे काही आत्ताच दुकानातून आणले आहेत.. काही ही.!!
आणखी २ जाहिराती, ज्या खूप खटकल्या.
१.दिपीका आणि इम्रान यांची साबणाची अॅड (बहुतेक लक्स) काय तोलिफ्ट मधला पांचटपणा....!
२.हिमानी शिवपुरी ची,चहाची अॅड.. मुलगा एका मुली सोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये रहातोय,आई वडील अचानक आल्यावर त्यांना ते समजते आणि मग ती मुलगी चहा बनवून आणते.. चहा पिल्यावर आईच्या चेहऱ्यावरील भाव.! नक्की काय सुचवायचे यांना? एक चहाच्या कपने आई कन्हविंस झाली? ! काही च्या काही!
.

सध्या न आवडणार्‍या जाहीराती: आधी लिहील्यात कोणी की नाही माहीत नाही

चॉक्लेअर्स गोल्ड... https://www.youtube.com/watch?v=aN0ebICVSvs ओढून ताणून जोक!!
हा जोक आम्हाला कित्येक वर्षांपूर्वी स्कॉलरशीपला होता... उतार्‍यांवरून प्रश्न मध्ये!

कुठल्या तरी मेन अंडरवेअर्सची जाहीरात... लेडीज अंडरवेअर उडून याच्या बाजूला पडते ते.. विचीत्रच आहे ती अगदी

कोलगेट अ‍ॅक्टीव टूथपेस्ट : प्रियांका अवतारमधल्या सुपरलेडीसारखी मजबूत फांदीवरून झप्पकन जंप करून विचारते, आपके टूथपेस्टमे निंबू की नमक की कायतरी आहे? www.youtube.com/watch?v=LuTJQQU160w

आणि वरच्या अपडेटस मधली ताजगी चा चटक पटक धम्माका आता मजा आता मजा मजा करूया कैच्याकैच

ओडोनील ची जाहीरात. साऊथ बॉम्बे ला घर आहे पण बाथ्रुम मधे ओडोनील नाही. अत्यंत वाहयात जाहिरात . आणि त्या बाईचा जीभ दाबून बोलणे तर डोक्यात जाते. ती जाहिरात पाहिल्यापासून मला ओडोनील च आवडेनासे झालाय.

त्या आयफोनच्या जाहिरातीमध्ये इतका वेळ अजिबात न दिसणारी दुल्हन त्याच्यासमोर आल्यावर एकदम दात विचकटून हसते आणि तेवा तो दूल्हा ओठ मुडपून हसतो. त्याच्या चेहर्‍यावरचे एक्स्प्रेशन्स "इतकी पण काय ग्रेट दिसत नाहीस. उगाच मघापासून नाटकं चालू आहेत" असे वाटतात.

हिमानी शिवपुरी ची,चहाची अॅड..नक्की काय सुचवायचे यांना? > कितीहीं मॉडर्न विचारसरणी असली तरी मुलींच स्वैपाकघर सुटत नाही !;)

Pages