Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57
तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पंकज विष्णू+१ मस्त जाहिरात
पंकज विष्णू+१
मस्त जाहिरात
पंकज विष्णू+१ मस्त जाहिरात
पंकज विष्णू+१
मस्त जाहिरात >>> + १००००००
रेडिओवरील आणखी एक वैताग जाहीरात .
मुलगा : पापा , मम्मा बता रही थी के जब वो प्रेग्नंट थी तो आप केहते थे " मै मेरे बच्चे को दूनियाकी सारी खूशिया दून्गा " क्या सच है ?
पापा : ( हसत हसत . ) हां हां
मुलगा : तो क्या ढोल बजानेवाला बंदर और क्रेझी बॉल ये दूनिया की सारी खूशिया है . अगर आप ऐसा सोचते हो तो आपको अपनी " दूनिया की सारी खूशियोंकी" डेफिनेशन चेन्ज करनी चहिये ..
मग अम्रुत नाहर शक्ती ची जाहिरात . बढाईये अपने बच्चेक एल.एफ.एस - लाईफ स्टाईल फॅक्टर ( म्हणजे नक्की काय ते मला कळल नाही )
शेवटी ,
मुलगा : मेरा एल.एफ.एस अभी बढ गया है .थॅन्क्स टू अम्रित नाहर शक्ती .
( गधड्या , तुझ्या बापाने पैसे खर्च करून तिथे घर घेतलं , त्याला तरी थॅन्क्स म्हणं की )
सकाळी इतके वेळा लागली जाहिरात , कान किटले . :रागः
हल्ली जाहिरातीमधली मुलं
हल्ली जाहिरातीमधली मुलं स्मार्ट न वाटता उध्दटच वाटतात.
वोडाफोन च्या अजुन एका
वोडाफोन च्या अजुन एका जाहिरतीत (दोन जेष्ठ नागरीक असलेली) त्यात कुठली ट्रेन दाखवली आहे कोणी सांगू शेकेल काय?? ती ट्रेन पण सुंदर आहे अन लोकेशन्स ही!!
आयपीएलच्या जाहीराती सुरु
आयपीएलच्या जाहीराती सुरु झाल्यात.
त्यातली त्या सुनेला मॅच बघायला दिवाणखान्यात येऊ देत नाहीत ती जाहिरात अज्जिबात आवडली नाही.
आणि तो छोटा मुलगा दुकानदाराला म्हणतो.. "अंकल आपभी लो.. हमारी टीम जिती हैं" हि जाहीरात खुप आवडली.
त्यातली त्या सुनेला मॅच
त्यातली त्या सुनेला मॅच बघायला दिवाणखान्यात येऊ देत नाहीत ती जाहिरात अज्जिबात आवडली नाही.
आणि तो छोटा मुलगा दुकानदाराला म्हणतो.. "अंकल आपभी लो.. हमारी टीम जिती हैं" हि जाहीरात खुप आवडली. >>> मला पण
एका उच्च पदस्थ केडरसाठी
एका उच्च पदस्थ केडरसाठी मुलाखतीच्या प्यानेलवर होतो . त्यात अनेक डिसिप्लिन मधले उमेदवार होते. त्यात एक जाहिरात क्षेत्रात काम करणारा होता. साधारणतः उमेदवार कम्फरटेबल व्हावा म्हणून त्याच्याच क्षेत्रातल्या
ज्ञानावर म्हण्यापेक्षा अनुभवावर आधारित मत व्यक्त करता येईल असे प्रश्न विचारत असूजाहित्जाहिरातवाल्याला तुझी आवडती अॅड कुठली हे विचारले. त्याने काय उत्तर दिले आता आठवत नाही. मात्र नावडती, इरिटेटिण्ग ,डोक्यात जाणारी अॅड कुठली या प्रश्नाला त्याने पट्कन उत्तर दिले ' क्या आपके टूथ पेष्टमे नमक है?" वाली !
मला तिथेही ह्या बीबीची आठवण झाली !
स्वस्ति अगदी अगदी कालच ऐकली
स्वस्ति अगदी अगदी कालच ऐकली ती अॅड कैच्याकैच!
हल्ली जाहिरातीमधली मुलं स्मार्ट न वाटता उध्दटच वाटतात.>> टायगर क्रंच ची पाहीलेय कोणी हाईडअँड्सीक सारख्या बिस्कीट्सवाली? वो नही अंदरवाला चॉकोलेट... टिचकीने नाणं भिरकावणं, मग्रूर टोन... स्मार्ट म्हणजे उद्धट असा का अर्थ घेतला जातो? अगदीच डोक्यात गेली ती अॅड!
आयपीएल इंडिया का त्यौहार चं गाणं असलेली व तो छोटा मुलगा दुकानदाराला म्हणतो.. "अंकल आपभी लो.. हमारी टीम जिती हैं" >> या दोन्ही अॅड्स आवडल्या.
त्या सुनेला मॅच बघायला दिवाणखान्यात येऊ देत नाहीत ती जाहिरात अज्जिबात आवडली नाही. >> नाही पाहीली. पियू लिंक प्लीज.
अगदीच डोक्यात गेली ती अॅड!>>
अगदीच डोक्यात गेली ती अॅड!>> +१! मुलं अतिशहाणी आहेत ती.
हल्ली जाहिरातीमधली मुलं
हल्ली जाहिरातीमधली मुलं स्मार्ट न वाटता उध्दटच वाटतात.>> टायगर क्रंच ची पाहीलेय कोणी हाईडअँड्सीक सारख्या बिस्कीट्सवाली? वो नही अंदरवाला चॉकोलेट... टिचकीने नाणं भिरकावणं, मग्रूर टोन... स्मार्ट म्हणजे उद्धट असा का अर्थ घेतला जातो? अगदीच डोक्यात गेली ती अॅड! >>>> + १००००००००००००००००००००००००
हल्ली जाहिरातीमधली मुलं
हल्ली जाहिरातीमधली मुलं स्मार्ट न वाटता उध्दटच वाटतात.>> ते एक पोलिस बापाला "तो मच्छर आपसे क्यु नही डरते" वालं पोरगं पण असंच उद्धट आहे. प्रत्येक जाहिरातीत याच उद्धट टोनमध्ये बोलताना दिसतं.
हल्ली जाहिरातीमधली मुलं
हल्ली जाहिरातीमधली मुलं स्मार्ट न वाटता उध्दटच वाटतात.>> ते एक पोलिस बापाला "तो मच्छर आपसे क्यु नही डरते" वालं पोरगं पण असंच उद्धट आहे. प्रत्येक जाहिरातीत याच उद्धट टोनमध्ये बोलताना दिसतं.
>>
+१
"तो मच्छर आपसे क्यु नही डरते"
"तो मच्छर आपसे क्यु नही डरते" वालं पोरगं पण असंच उद्धट आहे. प्रत्येक जाहिरातीत याच उद्धट टोनमध्ये बोलताना दिसतं.
>> +१ सहमत! उद्धट स्मार्टनेस ही जाहीरात करणार्यांची डिमांड की लहान वयातली डोक्यात जाणारी प्रसिद्धी?
दिपीका पदुकोण चा माय चॉईस,
दिपीका पदुकोण चा माय चॉईस, https://www.youtube.com/watch?v=KtPv7IEhWRA
घाईघाईत पाहीलेला, पण यात वुमन एम्पॉवरमेंट पेक्षा चॉईसचा मुद्दा जास्त आहे आणि तो स्त्री/पुरूष कोणाचाही असू शकतो. व्हिडीओ यापेक्षा जास्त परीणामकारक घेता आला असता असं वाटलं. कन्सेप्ट चांगला होता अधिक परीणामकारक करता आला असता. पण आपल्याकडे एखादा मुद्दा मांडला की त्या मुद्द्यापेक्षा आपसूक व्यक्तीगत आयुष्य, आगा-पिछा, कॅरॅक्टर वै. वै. जास्त चर्वण केलं जातं. असो!!
फॉर्च्युन सनफ्लॉवर ऑईलची
फॉर्च्युन सनफ्लॉवर ऑईलची जाहीरात किती गोड आहे! शेफला त्याचा मित्र विचारतो, इतक्या चांगल्या डिशेस बनवतोस तर रोज घरून डबा कशाला आणतोस? शेफ थोडा विचार करून म्हणतो घरी ये जेवायला. मित्र घरी जेवायला गेल्यावर जेवणाचं खूप कौतुक करत म्हणतो, याच्या हाताला खूप चव आहे ना काकू? शेफ म्हणतो, चव आहे पण माझ्या नाही आईच्या हाताला... त्याची आई विचारते, काय मग उद्यापासून दोन डबे द्यायचे ना?
तो छोटा मुलगा दुकानदाराला
तो छोटा मुलगा दुकानदाराला म्हणतो.. "अंकल आपभी लो.. हमारी टीम जिती हैं" खूप आवडली.
या सुनेला मॅच बघायला दिवाणखान्यात येऊ देत नाहीत ती जाहिरात अज्जिबात आवडली नाही. >>> +१
आयपीएल इंडिया का त्यौहार चं गाणं असलेली
वरच्या सगळ्या जाहिराती मस्त
वरच्या सगळ्या जाहिराती मस्त आहेत! ती सुनेला आत जा सांगतात ती पण आवडली! It's fun! आम्ही असं खूप करायचो..तू आत आलीस आणि हा आउट झाला! एकदा तर खूप वेळ सचिन आउट होऊ नये म्हणून मी दारात उभी राहिले होते
तू आत आलीस आणि हा आउट झाला!
तू आत आलीस आणि हा आउट झाला! एकदा तर खूप वेळ सचिन आउट होऊ नये म्हणून मी दारात उभी राहिले होते >> हॉस्टेलचे दिवस जागे झाले... आम्ही बसायच्या जागा, ठरलेले लकी ड्रेसेस, आत येणारीच्या "पायगुणा"ने ४/६ गेली की पुन्हा ये जा करावी लागे / आऊट झाला तर नो एन्ट्री!
एका मैत्रीणीचा हिरवा ड्रेस होता-इंडिया-पाक ची मॅच असेल तर तो ड्रेस ती कधीच घालायची नाही इंडिया हरायची. डेमो ट्रायल घेतलेली
असो! ते दिवसच वेडेपणाचे होते!!
अरे ते वोडाफोन च सांगा की रे
अरे ते वोडाफोन च सांगा की रे कोणीतरी
डिरेक्टर्स स्पेशल च्या
डिरेक्टर्स स्पेशल च्या जाहिराती पण मस्त आहेत एकदम. तो मॉडेल च एकदम मस्त आहे.
हल्ली एक आवडणारी एक जाहिरात :
हल्ली एक आवडणारी एक जाहिरात :
नीना कुल्कर्णींची "सर्फ एक्सेल" (की रिन) .
आजी आणि मुलगा भाजीवाल्याकडे असतात ती .
मस्त वाटते ती आजी . एकदम आजची आजी .
आणि अजिबात न आवडणारी :
ग्लुकोविटा गोल्ड .
त्याच्या तीनही जाहीराती आवडत नाहीत .
१. मुलाला वाटतं पेपर १० मिं अगोदर लिहुन झाला. टीचर येउन पान पलटात आणि कळत की अजून बराच बाकी आहे .
२. मुलगा बागेत थकून बसतो आणि मग बाजूला असलेल्या कुत्र्याला वेडावून दाखवतो आणि कुत्रा मागे लागला की पळतो .
३.मुलगा घराबाहेर रि.कं विमान उडवत असतो . ते जाऊन बाजूच्या बंगल्याच्या काचेवर आदळतं . काच फुटल्यामुळे मालक मागे लागतो आणि मुलगा जीव घेउन पळतो .
आणि तिन्ही जाहिरातींमध्ये आई , लेकाच कौतिक करीत म्हणते - न जाने इसे कब एक्ट्रा एनर्जीकी जरूरत पडेगी.
मेन विल बी मेन च्या सगळ्याच
मेन विल बी मेन च्या सगळ्याच जाहिराती आणि "प्यार की राह मै चलना सीख" भारी वाटतं बघायला आणि ऐकायला ही.
ग्लुकोविटा गोल्ड>> मलाही
ग्लुकोविटा गोल्ड>> मलाही अजिबात आवडत नाहीत त्या अॅड.
आणि तिन्ही जाहिरातींमध्ये आई , लेकाच कौतिक करीत म्हणते - न जाने इसे कब एक्ट्रा एनर्जीकी जरूरत पडेगी.>> अशा गोष्टींसाठी एनर्जी मिळावी म्हणून ते द्यायच हेच पटत नाही.
सध्या फ़ेअर अंड लवली ची एक ad
सध्या फ़ेअर अंड लवली ची एक ad लागतेय . उन्हामध्ये एका बाई च्या फोटू ला क्रीम लावतात आणि मग फ़ेअर अंड लवली लावलेला फोटू चा अर्धा भाग गोरा आणि दुसरा अर्धा काळा होतो . काय हास्यास्पद आहे .:D आपण काय दाखवतोय हे तरी कळतंय का
सारिका३३३ +
सारिका३३३ + १००००००००००००००००० .
कालच आम्ही लंच टाईम मध्ये चर्चा करत होतो .
पहिलि गोष्ट की ती पूजा स्वतः चॅलेन्ज घेत नाही .
फोटो ला घ्यायला लावते .
आणि मग तो फोटो अर्धा काळा पडतो
तसही जर जिवंत माणसावर टेस्ट केली तर चेहरा किती विचित्र दिसेल . अर्धा भाग सावळा आणि अर्धा गोरा .
मुळातच फ़ेअर अंड लवली ची आतापर्यन्तची एकही अॅड आवडली नाही . अगदी शाळेत असल्यापसून बघतेय .
फ्रीचार्ज च्या जाहीराती आवडतात .
फेअर अँड लवली हे प्रॉडक्टच
फेअर अँड लवली हे प्रॉडक्टच मुळात हेट लिस्ट वर असल्यामुळे अॅड्सपण हिट्लिस्टवर! भरीस भर ते फेअर अँड हँड्सम! कैच्च्याकै टुकार्पणा!! शहारुखचा स्ट्रगल काळ काय अन काय
प्रॉडक्ट टु प्रॉडक्ट कंपॅरिझन
प्रॉडक्ट टु प्रॉडक्ट कंपॅरिझन चालतेच.>> हो पण डायरेक्ट त्या ब्रॅन्डचे नाव दाखवत नाहित.>>>>> शक्यतो नाव दाखवु नये.. पण दाखवलं तरी फरक पडत नाही.. अपोझिट पार्टीवाले कधीही केस फाइल करु शकतात.. केस फाइल झाली की आपोआपच अजुन प्रसिद्धी
जोक्स अपार्ट, अॅड हा निव्वळ मनी गेम आहे.. पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसही करुन पब्लिसिटी झाल्याशी मतलब..
कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये
कॅडबरी पर्क्स (किंमत रुपये पाच) ची एक जाहिरात बघण्यात येत आहे.
अतिशय घाणेरडी व घाणेरडे/त्याज्य संस्कार करु पहाणारि ही जाहिरात आहे.
दोन मुली, पर्क्स खात असतात, एक कारवाला येऊन कार पार्क करतो. मुलिंना "काहितरी सुचते", त्या समोरच्या पाणीपुरीवाल्या भैय्याला त्या कारकडे लक्ष ठेवायला सांगतात, व बाजुला होतात. थोड्यावेळाने तो कारवाला येतो आत बसतो, भैय्याला ते दिसताच त्यास तो कारवाला चोर वाटतो व भैय्या त्याला धरतो, तेव्हा मुली येऊन भैयाला म्हणतात, भैय्या हे असे ठीक नाही, आम्ही फक्त कार कडे बघ असे सांगितले होते.
वर वर पहाता ही निरुपद्रवी वाटते. या जाहिरातीचे "टारगेट" प्रेक्षकवर्ग हा अल्पवयीन बालकेच आहेत. मोठ्यांना कदाचित यात "विशेष" वाटणारही नाही, कारण आपले मन व कातडी वाढलेल्या वयपरत्वे बरीचशी गेन्ड्याची झालेली असते.
पण प्रत्यक्षात जाहिरात बघणार्या अल्पवयीन प्रेक्षकांवर खोटे बोलणे, दुसर्याची फजिती करणे, खोटे बोलुनही त्यातुन सुटणे, या संस्कारांबरोबरच, छुपेपणे भैय्याचा चांगुलपणा वाया जाणे/जातो हा संस्कारही होतो आहे. भैय्याचा "लक्ष ठेवण्याचा" चांगुलपणा असा वाया जात असेल, तर एकतर असा चांगुलपणा कुणावर करूच नये हा संस्कार होतो. सर्रास गमती/मजे/करमणुकीखातर खोटे बोलून/दिशाभूल करुन दुसर्याची फजिती करुन परत त्याल्लाच मूर्खात काढण्याचा संस्कारही इथे होतो.
बर हे केल्याने वा करण्याकरता कॅडबरी पर्क्स खावे असा काही संदेश कॅडबरी कंपनीला द्यायचा आहे काय?
ही जाहिरात अजिबात आवडत नाही. मी व लिम्बी दोघे मिळून जाहिरातीच्या लेखकास/दिग्दर्शकास व कॅडबरी कंपनीस शब्दशः "शिव्या" घालतो व ते समोर आले तर मोजुन दहावीस पैजारा माराव्यात याबद्दल आमच्यात एकमत होते.
लिंबुभौ, आलिया भट आहे
लिंबुभौ, आलिया भट आहे त्यात.
मलापण नै आवडली ती अॅड
ओके आबासाहेब, म्हणजे "न
ओके आबासाहेब, म्हणजे "न आवडणार्यात" मी अन लिम्बी असे दोघेच नाही आहोत. धन्यवाद.
(मी हाच विषय याच शब्दात अन्य संस्थळावरही मांडतो आहे, जेणेकरून मला अभ्यास करता येईल त्या त्या संस्थळांवर येणार्या प्रतिक्रियांचा)
Pages