मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती - भाग १

Submitted by दीप्स on 30 September, 2014 - 01:57

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा. पहील्या धाग्यावर २००० च्या पुढे पोस्टस गेल्यामुळे हा पार्ट १ धागा सुरु केला आहे. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

dreamgirl | 28 May, 2015 - 17:53
बोर्नव्हिटाच्या ५रू. वाल्या तसेच ओटसच्या नव्या जाहीरातीतील हस्की वॉईस कोणाचा आहे? अगदीच नाही आवडत तो आवाज!

<<<<<<<<<<

आज काल ती oats च्या जाहिरातीच्या खरखरीत आवाजाच्या बाईला चांगले दिवस आलेत जिकडे तिकडे खरखरत असते. आता आता ती तनिश्क़ च्या जाहिरातीला पण आवाज देते. कोणी सांगेल का यांना का तिचा आवाज सगळ्याच जाहिरातींना नाही सूट होत. त्या oats च्या जाहिरातीलाच ठीक आहे.

इथे दिसणार्‍या सीसीटीव्ही ( चायना सेंट्रल ) वर एक छान जाहीरात लागते. रेकॉर्डींग लाईफ अशी टॅग लाईन आहे. एक ५/६ वर्षाची मुलगी, एक १५/१६ वर्षाची मुलगी आणि एक २५ तली मुलगी, त्या त्या काळातल्या वेषभूषेत आणि त्या त्या काळातल्या वस्तू हाताळताना दिसतात. मग ही सर्व चित्रे एका कॅलिडोस्कोप मधे बघणारी प्रौढ स्त्री दिसते.

त्या चारही मॉडेल्सचा चेहरा मिळता जूळता आहे. मग शेवटी आधीच्या तिघीजणी भासमान होतात. ही त्या चॅनेलचीच जाहीरात आहे. आणि त्यांच्या एकंदर कार्यक्रमांच्या रुपरेषेला साजरी आहे.

आज काल ती oats च्या जाहिरातीच्या खरखरीत आवाजाच्या बाईला चांगले दिवस आलेत जिकडे तिकडे खरखरत असते. आता आता ती तनिश्क़ च्या जाहिरातीला पण आवाज देते. कोणी सांगेल का यांना का तिचा आवाज सगळ्याच जाहिरातींना नाही सूट होत. त्या oats च्या जाहिरातीलाच ठीक आहे.>> +१

कपिल शर्मा आता मुळात बघवतच नाही.>>
अगदी अगदी!

मला किनई दोन जाहिराती फार्फार आवडतात.
१. फेअर अ‍ॅन्ड लव्हली
कित्ती कित्ती नवीन टेक्नॉलॉजी वापरुन आणी डोक्याची प्रगल्भता वापरुन बनवलीय. तो बनवणारा तर माझा आदर्शच झालाय. फोटोसुद्धा काळा पडतो उन्हात तो सुद्धा टॅब मधला आहात कुठे ?

२. कारट्रेड.कॉम
अतिशय जास्तीचा बुध्यांक वापरुन बनवलेली जाहिरात. आपल्या कस्टमर्सना आपण कुत्र्यांबरोबर कंपेअर करत आहोत असा प्राणीमात्रांवर प्रेम करणारा संदेश देणारी जाहिरात.

जेम्स बॉन्ड >> Proud

आज काल ती oats च्या जाहिरातीच्या खरखरीत आवाजाच्या बाईला चांगले दिवस आलेत जिकडे तिकडे खरखरत असते. आता आता ती तनिश्क़ च्या जाहिरातीला पण आवाज देते. कोणी सांगेल का यांना का तिचा आवाज सगळ्याच जाहिरातींना नाही सूट होत. त्या oats च्या जाहिरातीलाच ठीक आहे. >> खरंय! मला नाही ऐकवत तो आवाज फार वेळ! पेपरबोट मुळातच रिफ्रेशिंग जाहीरात असल्याने दुर्लक्ष होतं.

१. फेअर अ‍ॅन्ड लव्हली
कित्ती कित्ती नवीन टेक्नॉलॉजी वापरुन आणी डोक्याची प्रगल्भता वापरुन बनवलीय. तो बनवणारा तर माझा आदर्शच झालाय. फोटोसुद्धा काळा पडतो उन्हात तो सुद्धा टॅब मधला आहात कुठे ?<<<<<<<<<<<

ती' यामि' एका तेलाच्या जाहिरातीत पहिल्यांदा दाखवली तेव्हा वाटले आता तेल लावून सुद्धा लोक गोरे होणार कि काय ???? मग कळले ती हेयर ओयील ची जाहिरात आहे.
बाकी तिला पाहिल्यावर वाटते कि हि इतके वर्ष फेयर & लवली लावते आहे कि आता ती इतकी गोरी झाली असेल इतकी गोरी झाली असेल कि नक्कीच LED बल्ब म्हणून स्वताच्या घरात वापरली जात असेल. Happy

या यमीबद्दल पुलंनी किती वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे....

आठवा व्यक्ती आणि वल्लीमधले हरीतात्या....

कल्याणच्या सुभेदाराची सुन कशी होती..यमी पेक्षा सातपट गोरी.... Happy Happy Happy

त्या यामिला घेवून भांडी घासायच्या साबणाची आणि वालकेयर पुट्टीची जाहिरात मस्त होवू शकते.

Mahindra centura आणि gusto च्या जाहिरात कसल्या मस्त जाली आहे गाणी एकदम बरोबर बसवली आहेत

Mahindra centura आणि gusto च्या जाहिरात कसल्या मस्त जाली आहे गाणी एकदम बरोबर बसवली आहेत>> +१

खुप आवडली ती अॅड.

सुशांत सिंग राजपूतची मंच ची अॅड काही कळली नाही. Uhoh

मंच खाऊन आपल्या मंचावर या. असा उदात्त विचार आहे त्यात.>> Uhoh अरे देवा... Lol
आशूडी, असं असेल तर तु वर म्हणालीयस 'फाकोचा कळस. कल्पनादारिद्र्याचा नीचांक.' यासाठी. +१

मला कळलीच नव्हती अॅड. तो मंच खातो आणि नाचायला काय लागतो लगेच त्याची पोस्टर पण लागतात.

Pages