Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रहस्य बघितला. आवडला. मेनन
रहस्य बघितला. आवडला. मेनन तसाही आवडतोच. ह्यातही छान काम केलय.
वेडसर मनु
वेडसर मनु
रहस्य केकेसाठी बघावा, पण ते
रहस्य केकेसाठी बघावा, पण ते शेवटच्या १० मिनीटात सगळ्यांना समोर बसवून लेक्चरटाईप्स रहस्य उलगडून सांगणे हा प्रकार मात्र मला झेपत नाही.
तनु वेडसर मनु +११११ दुसर्या
तनु वेडसर मनु +११११
दुसर्या भागाचा ट्रेलर बघितला . खरच वेडी दिसतीये ती दोन्ही गेट अप मध्ये
बाकी कधी नव्हे तो यात दुसरा
बाकी कधी नव्हे तो यात दुसरा भाग पहिल्या भागाशी सुसंगत असणार, पहिल्यातली स्टोरी दुस-यात पुढे चालु असे असणाअर असे दिसतेय.
पहिल्या भागातच यांचे लग्न पहिल्या दिवशीच तुटणार असे मला वाटलेले. लग्न कसले मुर्खपणा होता तो. आणि दुस-या भागात ते तुटलेलेच दाखवलेय.. दुस-या भागातल्या प्रोमोमध्ये माधवनच्या जाडेपणावर कंगना जे कमेंट करते ते दुर्दैवाने खरेच आहे. त्यामुळे माधवन कितीही क्युट वाटला तरी मी तरी पाहणार नाही.
मी या आठवड्यात मर्दानी, पुणे
मी या आठवड्यात मर्दानी, पुणे ५२ आणि विटीदांडू बघितला.
(माहितीये मला पाहायला अंमळ उशीरच झाला आहे).
आता या मुव्हिज बद्दल इथेच लिहावे का त्या-त्या चित्रपटाच्या रिस्पेक्टीव्ह धाग्यावर?
हंटर पाहिला. टोटल बोल्ड विषय,
हंटर पाहिला.
टोटल बोल्ड विषय, वेगळाच पेस आणि ट्रीटमेंट सिनेमाची, कमालीचं त्या त्या काळाला ह्यूमरसली रीप्रेझेंट करणारं संगीत, टोटल हटके लिरीक्स...संवाद, काही ठिकाणी टायमिंग पण मस्त ..
सगळ्यांची काम धमाल्... कंप्लीट 'वासूगीरी', पुण्याचे मस्त शॉटस, रिक्षाचा खल्लास वापर !
वेगळा सिनेमा आहे.. आवडला !
रार हंटर मला पहायचा आहे.
रार हंटर मला पहायचा आहे. ऑनलाईन कुठे पहायला मिळेल? यू ट्युब वर नाही आहे, (म्हणजे निदान मला तरी सापडला नाही.)
बॉम्बे वेल्वेट कसा आहे ? सेट
बॉम्बे वेल्वेट कसा आहे ?
सेट श्रीलंकेत होता म्हणे
www.youtube.com/watch?v=j8vo1b1YyLw
बॉम्बे वेलवेट
बॉम्बे वेलवेट पाहिला.
अपेक्षाभंग !!
नका पाहू कुणीही.
लिहा की
लिहा की
उद्याच्या पेपरासाठी लिहून
उद्याच्या पेपरासाठी लिहून दिले आहे. उद्या माबोवरही पोस्टीनच.
पिकू पाहीला. क्वीन नंतर
पिकू पाहीला. क्वीन नंतर आवडलेला दुसरा चित्रपट.... Must watch
कैच्याकै पॉझिटिव्ह रिव्ह्युज
कैच्याकै पॉझिटिव्ह रिव्ह्युज मिळाल्यामुळे मॅड मॅक्स पहिल्याच दिवशी जाऊन पाहिला.
रामायण, महाभारत, (ते होमरचं इलियाडपण वाटतं) सगळी महाकाव्ये कोणाचीतरी बायको कोणीतरी पळवायला गेल्यामुळे घडली. इथे पण तेच. फरक एवढाच की इथे व्हिलनच्याच बायका पळवल्या जातात. आणि पळवणारी पण एक बाईच. बायका चोरीला गेल्यामुळे भयानक चिडलेला व्हिलन आपली संपूर्ण गँग घेऊन त्यांच्या मागे लागतो (साहजिकच आहे, यांच्या जगात तीन गोष्टी अति दुर्मिळ असतात, पाणी, गॅसोलिन आणि जरा बर्या दिसणार्या बायका). त्यानंतर पिक्चर संपेपर्यंत नुसता पाठलाग आणि पाठलाग.
तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सफाईदार आहे. कॅमेरावर्क तर अ..फा..ट.. मी आयमॅक्स थिएइटरमध्ये पाहिला. रोलर-कोस्टरमध्ये बसल्यासारखं वाटत होतं. स्फोटके लावलेले भाले वगैरे ट्रिका चांगल्या आहेत. काही ठिकाणी चीझीपणाची हद्द केली आहे. डॉल्बीची भिंत लावून गाणी वाजवत निघालेले व्हिलन्स पाहून हे हाणामारीला चाललेयत की गणपतीविसर्जनाला, असा प्रश्न पडला. स्त्रियांना पुरुषांपेक्षा आवडेल असा हा एकमेव अॅक्शनपट असावा. शेवटी बायका आणि पुरुष यांच्यामध्ये घमासान हाणामारी होऊन पुरुष हरतात आणि व्हिलनच्या जुन्या अड्ड्यावर स्त्रीराज्य स्थापन होतं! चित्रपटाचं नाव जरी 'मॅड मॅक्स' असलं तरी मॅक्सचा रोलसुद्धा सेकंडरीच आहे. सगळा फोकस 'फ्युरिओसा' या स्त्रीपात्रावर आहे.
एवढं सगळं असून हा भाग 'मॅड मॅक्सः द रोड वॉरियर'च्या जवळपासही पोहोचतो असं मी म्हणणार नाही. पण मॅड मॅक्स सीरिजचे फॅन असतील त्यांना बघायला हरकत नाही. पैसे बर्यापैकी वसूल होतात.
बॉम्बे वेल्वेट आवडला. सगळं
बॉम्बे वेल्वेट आवडला. सगळं जुनं जुनं आहे . तेवढा एक चेंज तीन तास
बॉम्बे व्हेलवेट गाणी अगदी
बॉम्बे व्हेलवेट गाणी अगदी पैसे देवून डाऊनलोड करावी इतकी मस्त आहेत. रविना टंडन गेस्ट रोल पण एकदम मस्त आहे. आता तिसरे पॉसिटीव्ह वाक्य काय लिहावे ह्या विचारात कालपासून आहे!
सी, हाऊ अबाऊट रणबीर
सी, हाऊ अबाऊट रणबीर कपूर?
गाण्यांसाठी +१, मुहब्बत बडी बीमारी ची तिन्ही व्हर्जन्स ऑसम आहेत!
तिसरे पोझिटिव्ह वाक्य
तिसरे पोझिटिव्ह वाक्य !..
गनोरिया पोझिटिव्ह !
तुमने उस रोझी में ऐसा क्या
तुमने उस रोझी में ऐसा क्या देखा जो मुझमे नहीं था ?
..... करण जोहर रणवीरकपुरला विचारतो तेंव्हा थिएटरमधले सगळे लोक हसले होते
रणबीर कपूर इतका खास नाही
रणबीर कपूर इतका खास नाही वाटला. तो फायटर म्हणून इतका पटत नाही. अनुष्का बरोबर इतकी खास जोडी नाही जमत, दिपीका हवी
अवताराची गोष्ट काल पाहिला.
अवताराची गोष्ट काल पाहिला. कोणाच्याही आयुष्यात घडू शकणारी वास्तववादी गोष्ट फार आवडली. कौस्तुभ आणि त्याचे बाबा काही काही ठिकाणी लाउड वाटले. आदिनाथ-सुलभाताई-लीना भागवत मस्त वाटलेत-वावरलेत. विशेष कौतुक कौस्तुभचा मित्र मंग्याची भूमिका करणार्या बालकलाकारचं. कौस्तुभच्या वागण्यातला बदल न समजणारा तरी त्याला तितकाच 'मानणारा' मित्र मस्त साकारलाय.
सुलभाताई ग्रामीण/शहरी, प्रेमळ/खाष्ट, आजी/सासू अश्या कुठल्याही भूमिकांमधे तितक्याच चपखल बसतात. (तश्याच ज्योती सुभाष सुद्धा).
श्रद्धा-चमत्कार यांचं नातं, आजीच्या गोष्टी, त्यावरचा ठाम विश्वास आणि अमोददादाचं कौस्तुभला हळूहळू वास्तवात आणणं हा प्रवास छान दाखवलाय. आमोददादाचं प्रेमप्रकरण दाखवायचा, एकदम भन्नाट/इंधन वाचवणारी वगैरे सुपरबाइक बनलेली दाखवायचा सहज शक्य असलेला मोह दिग्दर्शकाने टाळलाय, हे फार आवडलं. फक्त आणि फक्त पोहेच का बनवतात नाश्त्याला हे नाही समजलं (फारंच क्षुल्लक बाब, पण मला जाणवली)
रच्याकने: गेल्या २-५ वर्षांत जे दर्जेदार मराठी सिनेमे बनलेत, त्यात लहान मुलांचा (मुख्य पात्र) म्हणून असलेला वावर फार कौतुकास्पद आहे. (टिंग्या, बालक पालक, अवताराची गोष्ट, फॅन्ड्री, एलिझाबेथ एकादशी... आता चटकन आठवलेली काही नावं).
'हंटर' छान आहे. चावट आहे
'हंटर' छान आहे. चावट आहे तरीही मस्त आहे.
).
काल चक्क २०१० चा 'तेरे बिन लादेन' बघितला. टिपी मुव्ही.
(नवर्याला झोप आल्याने शेवटची १५ मिनिटं बघायचा राहिलाय
काल एका मित्राकडून हार्डडिस्क भरुन ४० मुव्हीज आणलेत. कधी बघेन कोणजाणे
इथे वाचून युट्युबवर रहस्य
इथे वाचून युट्युबवर रहस्य पाहिला. चांगला आहे, एकदा बघण्यासारखा.
कुणी बघीतला नसेल तर फुकरे
कुणी बघीतला नसेल तर फुकरे नक्की बघा. मस्त आहे. मी दिसेल तेव्हा बघतो.
मलाही पाहायचाय फुक्रे.
मलाही पाहायचाय फुक्रे. युटुबवर पाहते दिसतो का ते.
पिकू चित्रपटात लहान मुलांच्या
पिकू चित्रपटात लहान मुलांच्या दृष्टीने अयोग्य सीन्स आहेत का ? की सात-आठ वर्षाच्या मुलाबरोबर बघता येईल ?
ट्रेलरवरुन आयडिया येत नाहीये.
पिकूत 'माय डॉटर इज नॉट अ
पिकूत 'माय डॉटर इज नॉट अ व्हर्जिन' ह्या तशा एका अॅडल्ट उल्लेखा पलिकडे फारसे काही अॅडल्ट मटेरियल नाही. पण 'मोशन' रिलेटेड जोक्स / ड्राय ह्युमर आहे. आठ वर्षाच्या मुलाला ते गरजेपेक्षा जास्त फनी वाटू शकते (आय मीन नंतर ते जरा हँडल करावे लागेल
)
मग बघायला हरकत नाही. वीकडे
मग बघायला हरकत नाही. वीकडे सत्कारणी लावता येईल. नाहीतर सुट्ट्या संपेपर्यंत चित्रपट राहणार नाही आणि विकेंडला ऑलरेडी त्याला नेता न येण्यासारखा 'तनू वेड्स..' सारखा चित्रपट आणि एक-दोन मराठी नाटकं रांगेत आहेत.

ट्रेलरमधल्या टॉयलेट ह्युमरवर त्याला खूप हसू आले आहे ऑलरेडी
पण हा मुद्दा सांगितलास हे फार बरे केलेस. घरुन थोड्या सूचना देऊन न्यायचे लक्षात राहील. थँक्स
मॅड मॅक्स फ्युरी रोड हा
मॅड मॅक्स फ्युरी रोड हा आयमॅक्स थ्री डी व फोर डी मध्ये उपलब्ध आहे. फोर डी बघताना खुर्च्या हालतात. चित्रपटात बेसुमार अॅक्षन असल्याने सारख्याच व जोरात हालतात. प्रथमच पाहत असल्यास कधी धक्का बसेल ते कळणार नाही. त्यामुळे फोर् डी बघताना खाणे घेउन जाऊ नका. जास्तित जास्त पाण्याचा/ कोकचा घोट घेता येइल. लोकांनी घेतलेले मोठे पॉपकॉर्नचे टब वगिअरे बाजूला ठेवून दिले होते. तसेच फोर डी मध्ये इंटर्वल पण होत नाही. त्यामुळे रेस्ट रूम ब्रेक आधीच घेउन जा. एकंदरीत जास्त टर्ब्युलन्स असलेल्या जागी विमानात बसल्यास काय अवस्था होते तसे वाटते. एक अनुभव म्हणून मस्त आहे मात्र. मी चित्रपट आधी एकदा पाहिला असल्याने कधी धक्के बसणार ते साधारण माहीत होते त्यामुळे मॅनेज करता येते. अनुभव मात्र खरेच इमर्सिव आहे. अगदी फाय्टिंग मध्ये असल्याचे फील येते. व एक फ्लेम थ्रोअर गिटार तुटून अंगावर येते तेव्हा त्यातली तारा, बटने वगैरे अगदी पकडता येतील असे वाटते. ह्या चित्रपटा बद्दल लिहायचे आहे.
फोर डी मध्ये लहान मुले व वयस्कर लोकांना उलटी होण्याचा चान्स नक्की आहे. तेव्हा काळजी घ्या. सीट्बेल्ट का नाहीत असे वाटून गेले. अर्थात तरूण वयाची मुलेमुली अनुभव घेण्यासाठीच आली होती. ह्याचे तिकीट ३५० प्रत्येकी आहे.
आयमॅक्स मध्ये अति भव्य व सुरेख दिसते. तर फोर डी मध्ये आतच घुसल्या सारखे वाट्ते. खरे थीडी आहे.
एबीसीडी टू नावाचा सिनेमा ह्या फॉर्मेट मध्ये बघायला फार मजा येइल. आधीच सांगत्ये.
मित, सहमत. अवताराची गोष्ट
मित, सहमत.
अवताराची गोष्ट आवडला आणि मंगेशचं कामही!!
Pages