चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सस्मित, तुम्ही पूर्वीही अशी विनाकारण माझ्याबद्दल आगपाखड केलेली आहेत. यावरून मी तिला सांगतेय.

हु आर यू? <<< सेम टु यू... तुम्ही एवढ्या काय अजिबातच महत्वाच्या नाहीत माझ्यासाठी त्यामुळे तेव्हाची किंवा आत्ताचीही आगपाखड मी अनुल्लेखाने मारली होती. तेच साधनाने करावे असे तिला सांगतेय.

दुसर्‍याला आपल्यबद्दल काही प्रोब्लेम आहे असं सतत वाटतय का ते तपासुन बघा. << असं काही मला वाटतच नाही. तुमचा आगपाखडीचा पॅटर्न माहीतीये तेवढेच लिहिलेय. सल्ला विचारला असेल तर द्या. तुमच्या सल्ल्याची माझ्यालेखी काहीही किंमत नाही.

आता तुमच्या यापुढच्या थयथयाटासाठी हुडुत्त एवढे एकच उत्तर. तुमच्या सारख्या व्यक्तीवर याहून कोण एनर्जी खर्च करणार.

बाकी या धाग्यावर येणारे किंवा इतर धाग्यांवर पिरपिर करणार्‍या सर्व स्कोर सेटलर्सनाही हुडुत्त हे एकमेव उत्तर.

तुमच्या सारख्या व्यक्तीवर?????????? हे खुपच पर्सनल आहे. पण तुमच्या सारखी मी अ‍ॅडमीनकडे गळे काढत नाही.
आणि तुमचे हुडुत्त का हाडहाड ते तुम्हालाच साभार.

तुम्ही जेवढा थयथयाट करत असता तेवढा मी कधी केलेला नाही. तुमच्याशी कधी बोलण्याएवढीही मी तुम्हाला किंमत देत नाही. पण अगदीच मुर्ख भाषेत लिहिलत म्हणुन हा प्रतिसाद दिला.
तसंही शिकवणीचा प्रद्तिसाद हा तुम्हाला पर्सनलि नव्हताच. सगळेच जण कधीना कधी दुसर्‍याच्या भाषेबद्दल बोलत असतात म्हणुन मी ते लिहिलं होत. पण साढनाच्या एका कमेंटवरुन तुमचा नसता फालतुचा इगो उफाळुन आला आणि तुम्ही पचक्लात.

मिलिन्द सोमण चा वावर खूप कॉन्फिडन्ट वाटला. तो पत्रकाराच्या भुमिकेत हवा होता. बरेचदा केके मेनन चा भास होतो त्याला पहाताना.>>>>>

ही मिलिंद सोमण वर टीका आहे की केके मेनन चे कौतुक?

टोचा, मिलिंद सोमण चा वावर खूप कॉन्फिडन्ट वाटला म्हणून तोच पत्रकाराच्या भुमिकेत हवा होता असे मला वाट्ले हे त्याचेच कौतूक.

त्याला स्क्रीन वर बघताना खूप वेळा केके मेनन ची आठवण येते, विशेषतः साईड फेसिन्ग पहाताना मला खूप वेळा असे वाटले. यात कुणाचेही कौतूक नाही.

होम नावाचा अ‍ॅनिमेटेड मुव्ही येउन गेलामहिन्याभरापूर्वी ..
बुव्ह नावाचे एलियन्स त्यांचा शत्रु असणार्‍या गॉर्ग एलियन्स पासुन लपून वेगवेगळ्या ग्रहांवर पळत असतात .. ते पृथ्वीवर ( त्यांच्या नव्या घरी ) आल्यावर काय होत अशी एकंदर कथा आहे..

मला स्वता:ला हे चित्रपट खुप आवडतात .. निखळ मनोरंजन..
चित्रपटाची कथा पण शक्यतो चांगलीच असते.. असे भरपूर अ‍ॅनिमेटेड चित्रपट मी माझ्या हार्ड डिस्क मधे साठवून ठेवलेले आहे.. इथे कुणाला त्यांचे कार्टून असणार त्यांना दाखवा.. नक्की आवडणार सर्वांना.. खरतर सर्वांनीच बघण्यासारखा आहे अ‍ॅनिमेशन आवडत असणार तर ..

निःशब्दता किती प्रभावी असू शकते याची उत्तम जाणीव नागरिक पाहताना जाली.... तंत्र। मंत्र... कथा... सदरिकरण ... अपेक्षेहुन चांगल.....

शेवटी नागरिक नावाचे वृत्तपत्र शाम काढतो.....
दै नागरिक..... पाने 16.... किंमत 3 रुपये.....

वास्तवात असे घडले तर पांच सहा महिन्यात शाम संपूण जाईल... उध्वस्त..
..( 3 वृत्तपत्रातील ्माज़ा अनुभव..... त्यापैकी एकाने आपण 1 कोटि जनतेची मते जाणून घेत वृत्तपत्राचे स्वरुप ठरवले होते....मते मांडणाऱ्या 1 लाख जनतेने जरी वृत्तपत्र घेतले असते तरी चालल।असत...अखेर तीन महीना जेमतेम चालल...)

बाकी परिणाम मनाला भीड़नारा...

सामी | 20 June, 2015 - 12:20 नवीन
रसप, तुम्ही नागरीक बघीतलात का? तुमचे परिक्षण वाचायची वाट बघत होते.

>> मराठी चित्रपट पाहता येत नाहीत. कारण मला त्या त्या आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांवर लेख द्यायचा असतो पेपरात ! Sad

जुरासिक वर्ल्ड पाहिला . स्टोरी तीच घीसीपीटी.
३डी बघितला नसता तरी चालला असता.

आवडले:

  • जुरासिक वर्ल्ड ची कल्पना.तिथल्या निरनिराळ्या राईड्स
  • लोक आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाचा आणि तंत्र ज्ञानाचा कसा दुरुपयोग करतात त्याची कहाणी .
  • हिरो आणि हिरॉईन Happy
  • शेवटी जाउन आपल्या लहानपणाच्या 'जुरासिक पार्क" ला कनेक्ट होणं.
  • काही विनोदी पंचेस मस्त जमले आहेत.
  • अपुनका " इरफान खान"
  • तो मोठा दायनोसॉर Happy

वैतागः

  • ईतक्या जीवावरच्या संकटात ही हिरवीण लटकी भांडणं करू शकते.
  • आपंण सामान्य माणसं - व्यवस्तिथ चूरीदार पंजाबी आणि फ्लॅट सॅण्ड्ल्स घालून ट्रेन पकडण्यासाठी ब्रीज वरून धावणं दिव्य वाटतं. ही बया फॉरमल स्कर्ट आणि पेन्सिल हील्स घालून खाच खळग्यातून धावते.
  • आपली भाचवंड किती वर्शाची आहेत ते तीला आठवत नाही पण एक्दाच भेटलेल्या भाच्याचा बंद मोबाईल ती बरोब्बर ओळखते.
  • हीरो फक्त आपल्या लोकांचेच जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करतो , बाकीच्या २० हजार लोकांकडे जवळजवळ दूर्लक्श होत .
  • स्पेशल ईफेक्ट्स चांगले आहेत , पण ज्युरासिक वर्ल्ड चा होटेल रूम मधून घेतलेला लॉन्ग शॉट , खेळण्यांचा वाटतो. तसच हेलिकॉप्टर चे शॉट्स ही अगदीच कच्चे वाटतात.

ओव्हरऑल , जुना जुरासिक पार्क आवडला असेल तर नक्की बघा . Happy

हीरो फक्त आपल्या लोकांचेच जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करतो >>> हिरो मधे एक सामान्य माणूस दडलेला असतो हे दाखवायचं असेल Proud

हीरो फक्त आपल्या लोकांचेच जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करतो , बाकीच्या २० हजार लोकांकडे जवळजवळ दूर्लक्श होत .
स्पेशल ईफेक्ट्स चांगले आहेत , पण ज्युरासिक वर्ल्ड चा होटेल रूम मधून घेतलेला लॉन्ग शॉट , खेळण्यांचा वाटतो. तसच हेलिकॉप्टर चे शॉट्स ही अगदीच कच्चे वाटतात.
>>>>> याच्याशी सहमत. नंतर ते पार्कमधले सगळे २०,००० लोक कसे हलवले गेले ते अनुत्तरितच राहिले.
बाकी मला ते टी रेक्स ला मदतीला आणणे हे आवडलं Happy त्याला व्हिलनऐवजी हिरोचा रोल मिळाला Happy
त्यांनी पार्क ची आणि मसरानी ग्लोबल ची वेबसाइट एकदम रिअ‍ॅलिस्टिक केली आहे. जरुर बघा. www.jurassicworld.com/

हीरो फक्त आपल्या लोकांचेच जीव वाचवण्यासाठी जीवाचे रान करतो >>> हिरो मधे एक सामान्य माणूस दडलेला असतो हे दाखवायचं असेल >>>

काहीही हं डी Wink

नंतर ते पार्कमधले सगळे २०,००० लोक कसे हलवले गेले ते अनुत्तरितच राहिले.
बाकी मला ते टी रेक्स ला मदतीला आणणे हे आवडलं स्मित त्याला व्हिलनऐवजी हिरोचा रोल मिळाला स्मित
त्यांनी पार्क ची आणि मसरानी ग्लोबल ची वेबसाइट एकदम रिअ‍ॅलिस्टिक केली आहे. जरुर बघा. www.jurassicworld.com/>> एक्दम मस्त साईट Happy

मलाही तो टी-रेक्स आवडला शेवटी Happy
नंतर ते पार्कमधले सगळे २०,००० लोक कसे हलवले गेले ते अनुत्तरितच राहिले. >> शेवटी सगळे मोठ्या हॉलमध्ये वाट बघत असतात , बहुतेक लॉन्च ची वाट बघत असतात.
पण त्याअगोदर ते रॅप्टर्स हला करतात तेन्व्हा ही बघा ना , तो फक्त आपल्या लोकांची काळजी करतो .

जुरासिक वर्ल्ड खुप आवडला.

स्वस्ती, मैत्रेयीचे मुद्दे बरोबर. पण मुलींनो, तो हीरो तसाही २० हजार जणांना कसा वाचवणार होता सांगा बरे? Happy

घरातला छोटा मेंबर 'मला डायनासोर चे सिनेमे आवडत नाही' म्हणत असताना त्याला खेचुन नेले आणि 'सिनेमा खुप आवडला' असे मेंबरकडुन गंभीरपणे (नाईलाजाने कबुल करत) कानावर आले म्हणुन बरे वाटले. Happy

प्रतीक्षा 'किल्ला 'ची... प्रोमो तरी चांगला वाततोय...पुन्हा एकदा शाळेत .....

कुणी 'डब्बा ऐस पैस' पाहिला का...नाही पाहिलात तर सांगतो....

नावाच्या सुरवाति पासूनच डब्बा आहे ... काही कलाकारनि चांगल काम केलय...

पण कोळी कुटुंब चक्क कोल्हापुरी भाषेत बोलत अस दाखवलय...
तांत्रिक चुका म्हणजे काय हे अनुभवन्यासाठी नक्की पहावा...

अगदी थोडे काम आहे व त्याच्या प्रतिभेला साजेसे सीन नव्हते. अगदी बोगस सीन पण नव्हते पण कोणीही सोम्यागोम्या पण चालला असता असे वै. मत. शेवटी नामफलकात मात्र 'AND Irffan Khan' असे येते ते पाहुन छान वाटले. आजवर १०० टक्के हॉलीवुड सिनेमामधे कोणाही भारतीय अभिनेत्याला अत्यंत महत्वाची भुमिका आजवर मिळाल्याचे आठवत नाही. किंवा मीच ते पाहिले नसतील.

'मिस तनकपूर हाजिर हो' पाहिला.

उत्कृष्ट सटायर. अ मस्ट वॉच.

(मी सकाळी १० च्या शोला गेलो होतो. संपूर्ण चित्रपट, अख्ख्या थेटरात मी एकटाच होतो !)

किल्ला पाहिला काल.. केवळ अप्रतिम... सुंदर चित्रपट. प्रत्येक फ्रेम रेखीव आहे. आणि शेवट एकदम मस्त. भारावून टाकणारा अनुभव वाटला मलातरी. जरूर थेटरातच पहा.

Pages