Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पेइंग घोस्ट भंपक शिनेमा
पेइंग घोस्ट भंपक शिनेमा आहे.
वपुंच्या स्टोरीचा एक टक्काही त्यात नाही. भुताचे आडनाव एकबोटे आहे. पण उरलेली नावे बदलली आहेत.
स्टोरीत ढीगभर बदल आहेत.
गाणी कोंबली आहेत.
त्या भुताचे मूल मरते तो प्रसंग धड विनोदी नाही धड करुण नाही असल्या कात्रीत अडकवुन ठेवलाय.
वपुंचे सगळे हुकमी डायलॉग काढुन टाकलेत. त्यांचे पंचेस त्यानी एकपात्री माध्यमातुन सादर केले ते आता पडद्यावर बघायला मिळावेत ही अपेक्षा होती. पण निराशा आहे.
घरात माळ्यावरुन मुलगा पडतो हा प्रसंग त्यात तो गोविंदा दहीहंडीतुन पडतो असा का बदलला हे समजत नाही. उंच थराची दहीहंडी करु नका हा सामाजिक संदेश दिला आहे ! पैलवान , लिंबुटिंबु , सनातनवाले .... अरे धावा !
गोविंदाची वर्गणी मागणारे गुंड भगवा टिळा लआवलेले दाखवले आहेत.
वपुंचे भुत फक्त घरगुती कामे करत होते. पण हे भूत गोविंदा गुंड , गोविंदा वर्गणी वगैरेशी लढते. सामाजिक लढा लढणारी अदृश्य शक्ती असा विषय घुसडुन मी शि म बोलतोय , मी लोकमान्य बोलतोय , मी बाळकडु ठाकरे बोलतोय .... त्याच चालीत मी एकबोटेंचं भूत बोलतोय .... असे करुन ठेवले आहे.
'वेलकम टू कराची' पाहिला. ठीक
'वेलकम टू कराची' पाहिला.
ठीक ठाक आहे. जॅकी भगनानी असह्य प्राणी आहे. त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करता आल्यास काही वेळाचं, डोकं बाजूला ठेवून पाहण्याचं ग्यारंटीड मनोरंजन.
(सविस्तर लेख उद्या.)
सविस्तर लेख
सविस्तर लेख उद्या.)>>>>

आपल्याला विनंती आहे की लेख देउ नका. वेलकम टू कराची सारख्या चित्रपटावर एक लेख देता येईल ही कल्पनाच फारच असह्य आहे.
, डोकं बाजूला ठेवून पाहण्याचं ग्यारंटीड मनोरंजन. >> चित्रपटाचा एक भाग ही मनोरंजनात्मक आहे असे दाव्यासहीत पुराव्या सहीत सांगून दाखवावे माझ्या तर्फे हॉटेल ताज मधे फुल्ल फॅमली पार्टी देईन
संपुर्ण चित्रपटात कुठे हसू येईल हेच शोधने बहुदा प्रेक्षकांचे मुख्य काम होते. जे तीन तास वाया घालवून देखील अयशस्वी ठरते
त्या भुताचे मूल मरते तो
त्या भुताचे मूल मरते तो प्रसंग धड विनोदी नाही धड करुण नाही असल्या कात्रीत अडकवुन ठेवलाय.>> भुताचे मूल मरते?? बरोबर वाचलंय ना मी?
वेलकम टू कराची चा ट्रेलर तर इंटरेस्टिंग वाटला होता. रसप, परिक्षणाच्या प्रतिक्षेत! (त्यावरून ठरवता येइल, विकतची डोकेदुखी घ्यावी/फुकटची/घेऊच नये)
अगं, दोन भुते लग्न करतात आणि
अगं, दोन भुते लग्न करतात आणि मग मुल-भुते दत्तक घेतात.
भुताचे मूल मरते म्हणजे
भुताचे मूल मरते म्हणजे त्याच्या पुनर्जन्माची ऑर्डर येते.
हंटर भन्नाट आहे. नक्की पाहा.
हंटर भन्नाट आहे. नक्की पाहा. विषय तर धमाल आहेच, पण मराठी/पुण्यामुंबईचे वातावरण, त्यांचे खेड्यातील लहानपण जबरी आहे. राधिका आपटे यात एकदम चार्मिंग आहे. सईचे कामही मस्त.
अ पेइंग घोस्ट खरंच गंडलेला
अ पेइंग घोस्ट खरंच गंडलेला सिनेमा आहे. तिकिटासाठी मुळीच पे करू नका. टीव्हीवर येईल तेव्हा पहा.
वपुंची अत्यंत लोकप्रिय कथा आणि उमेश-स्पृहाच्या एकतिगोमुळे सिनेमाची चिकार हवा आहे. पण सिनेमा अगदी काही मोमेट्समध्येच चांगला आहे. सामाजिक संदेश तर अगदीच बळंच. त्या ऐवजी आणखी कितीतरी धमाल करता आली असती कथा. संजय मोनेंचे संवाद, सुश्रुत भाग्वतचं दिग्दर्शन आणि व्हीएफएक्सची कमाल की काही मिनिटांपुरतीच छाप पाडते. बाकी चित्रपट लिटरली ड्रॅग आहे. सर्वात छान काय आहे तर वेशभूषा! सर्व कलाकारांचे कपडे मस्त आहेत. बाकी चित्रपट सोडूनच द्या. पैसे वाचवा, आम्हाला दुवा द्या!
अगंबाई अरेच्चा २ पाहिला.
अगंबाई अरेच्चा २ पाहिला. नाही आवडला. (केदार शिंदे चा केधार कधीपासून झाला? टायटल मधे पाहिलं चित्रपटाच्या.)
मेरे जिनी अंकल कसा आहे. पुढचा
मेरे जिनी अंकल कसा आहे.
पुढचा शुक्र... जुरासिक वर्ल्ड
सिद्धांत पहिला आणि मलातरी खूप
सिद्धांत पहिला आणि मलातरी खूप आवडला
काल "रोअर"
काल "रोअर" पाहिला.
सिनेमॅटोग्राफी आणी व्हिएफक्स भारी आहेत. सुंदरबनची पहिल्या हाफ मधील दृष्ये (लॅन्ड्स्केप्स) अफाट भारी आहेत.
बाकी कथा, पटकथा, लॉजिक, अभिनय शोधु नये.
शेवटी वाघांचे शुटिन्ग कसे केले त्याची क्लिप दाखवतात ती पण मस्त.
'दिल धडकने दो' पाहिला. अनिल
'दिल धडकने दो' पाहिला.
अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियांका, अनुष्का, फरहान, राहुल बोस सगळेच मस्त. चक्क रणवीर सिंगसुद्धा ! जाम मजा आली.. पुन्हा एकदा पाहू शकतो, इतका आवडला आहे !
सविस्तर लेख उद्या टाकीन.
----------------------------
@उद्देश,
बरं का ? उद्या सविस्तर लेख टाकीन !!
'दिल धडकने दो' एकदा
'दिल धडकने दो' एकदा पहाण्यासारखा आहे, पण थेटरात पहायला नाही जमला तर फार वाईट वाटून घेऊ नका!
प्रेक्षकाच्या अगदी बोटाला धरुन सग्गळ्सग्गळ सविस्तर समजावून सांगण्याची बाधा झोया अख्तरलाही झाली ह्याचे वाईट वाटले. तिच्या आधीच्या सिनेमातील रिडींग बिटवीन द लाईन्स इथे पार हरवले आहे.
अनिल कपूर एकदम बेश्ट, सो इज शेफाली. पण मला सगळ्यात प्रियांकाचे काम आवडले, अजिबात 'अॅक्टींग'चा सोस नाही, स्वतःच्या क्राफ्टद्दल सेल्फ अॅशुअर्ड अभिनेता किती सहजतेने काम करतो याचे उत्तम उदाहरण.
अर्थात झोयाचा प्रत्येक सिनेमा आत्यंतिक मते तयार करतो (उदा. इथलीच जिंनामिदो वरील घमासान चर्चा!) त्यामुळे एकदा बघाच आणि ठरवा.
मी काल "संदुक" पाहिला. वेळ
मी काल "संदुक" पाहिला. वेळ मिळाला तर सविस्तर परीक्षण लिहायचा विचार आहे.
पण मला वेळ मिळेपर्यंत इथली किमान ५० माणसे पाहुन येतील चित्रपट.
बराचसा प्रेडिक्टेबल आहे नि थोडा बोर सुद्धा.
थेटरमध्ये जाऊन नाही पाहिलात तरी चालेल. एकही गाणे लक्षात ठेवावे असे नाही.
सुमित-भार्गवीचा अभिनय नेहेमीप्रमाणे उत्तम.
अधलेमधले पंचेस छान.
नुकताच 'विटी-दांडू' बघितला असल्याने पुनरावृत्तीचा फील मला अंमळ जास्तच आला.
एका ठिकाणी तर नेपथ्य पण रिपीट आहे विटीदांडूचे. कुठे ते एक वेगळा धागा काढून लिहेन.
जुरासिक पार्क ...... जरा सिक
जुरासिक पार्क ...... जरा सिक पार्क आहे !
जुने भाग बरे होते.
नुकताच 'विटी-दांडू' बघितला
नुकताच 'विटी-दांडू' बघितला असल्याने पुनरावृत्तीचा फील मला अंमळ जास्तच आला. >>> हे नवर्याच्या बाबत झाल.. स्पेशली भोसल्यांचा वाडा...
मी तवेमरी पाहीला.परत एकदा
मी तवेमरी पाहीला.परत एकदा माधवन चया परेशान.......
मी तवेमरी पाहीला.परत एकदा
मी तवेमरी पाहीला.परत एकदा माधवन चया परेशान.......
Sorry, Premaat aahe asa aahe
Sorry,
Premaat aahe asa aahe te .........
हमारी अधुरी कहाणी पाहीला
हमारी अधुरी कहाणी पाहीला बकवास वाटला. .....विद्या बालन,राजकुमार राव सारखे तगडी कास्टिंग कशी वाया घालवता येत त्याच उत्तम उदाहरण हा चित्रपट...थिएटरमध्ये जाउन पाहण्यासारखा नाही.
बघू नये असा चित्रपट बघितला -
बघू नये असा चित्रपट बघितला - Dolly Ki Doli
तद्दन बकवास .
रडियल अ'सुरी' कहानी
रडियल अ'सुरी' कहानी पाहिला.
आणि का पाहिला...................!!

दिल धडकने दो फक्त अनिल
दिल धडकने दो फक्त अनिल कपूरसाठी बघावा.
संदूक फक्त सुमीतसाठी बघावा..
संदूक फक्त सुमीतसाठी बघावा..
संदूक फक्त सुमीतसाठी बघावा.. +१०००
हमारी अधूरी कहानी खरच
हमारी अधूरी कहानी खरच बक्वास्स आहे. विद्याला वाया घालवलय. का केला असेल हा पिक्चर तिनी ? पण तरीही मला विद्या आणि इम्रानची केमिस्ट्री आवडली.
ज्युरॅसिक वर्ल्ड कसा आहे
ज्युरॅसिक वर्ल्ड कसा आहे ?
ज्युरॅसिक सिरीजमध्ये दुसरा भाग अजिबात आवडला नव्हता. पहिला आणि तिसरा मस्त. हा नवीन भाग ट्रेलरवरुन तरी खूप इंटरेस्टिंग वाटतो. आमच्या घराच्या आसपास टूडी व्हर्जन नाही. मुलगा एकंदरितच हा चित्रपट आणि थ्रीडीमध्ये बघायला तर अजूनच घाबरतोय त्यामुळे जाता आले नाही ह्या विकेंडला.
ज्युरॅसिक वर्ल्ड कसा आहे ?
ज्युरॅसिक वर्ल्ड कसा आहे ? >>> मैत्रिणीने मला सांन्गितल , पहिला भाग आवडला असेल तर हा नक्की आवडेल .
मजा येइल . तेच पार्क २० वर्शानंतर सुधारणा करून समोर येतं . आणि काळानुसार संदभ बदलतात .
माझ्याही लेकाला एक्दम थ्री-डी ला न्यायला भीती वाटते , पण त्याला फार हौस आहे हा चित्रपट बघायची .
ऑनलाईन मिळेपर्यन्त वाट बघेन .
इथं कुणी The Dictator मुव्ही
इथं कुणी The Dictator मुव्ही बघीतलाय का?
मी काल परत बघीतला .. स्टारिंग Sacha Baron Cohen ..

त्याला यापुर्वी Johnny Depp च्या Sweeny Todd म्धे बघीतल होतं ..
अशक्य आहे तो अॅक्टर आणि मुव्ही सुद्धा .. हसुन हसुन मेली मी परत एकदा .. काय ते कॅरेक्टर .. त्याचं वागणं, त्याच बोलणं, त्याचे विचार ..
ज्यांना कॉमेडी मुव्ही आवडतात आणि हसायला पन आवडत त्यांनी बघाच एकदा ..
त्याचा बोरात / बोराट मुव्ही पण राहिलाय बघायचा.. लावला आज डाउनलोडींग ला
फारच विनोदी चित्रपट आहे.
फारच विनोदी चित्रपट आहे. अल्लादिन नावाचा उच्चार तो आलादिन प्रमाणे अरेबिक स्टाईल मधे करतो. त्याने ते बेरींग उत्तम पकडले आहे. एका टॉकशॉ मधे देखील त्याच वेशभुषेत त्याने मुलाखत दिली होती. ती देखील मस्त आहे
धन्यवाद
Pages