चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

द १०० फुट जर्नी, गेल्या वर्षी पाहिलेला म्हणुन एव्हढे डिटेल्स आता लक्षात नाहित पण अगदिच अचाट आणि अतर्क्य नाहि.एस्पेशियली, ओम पुरीचं कॅरेक्टर, त्याचा पर्स्वरंस चांगला उभा केलेला आहे. कुकिंग ज्यांचं पॅशन आहे त्यांना नक्कि आवडेल... Happy

'दम लगा के हैशा' >> काल बघितला... खूप खूप आवडला>>
याचे अनेकांनी कौतुक केले आहे पण असाच मराठीत अगडबेम आधी आला होता ना. त्याच्याशी तुलनात्मक यात काय वेगळे आहे. काहीत नविन नसेल तर अगडबेम चांगला होता म्हणायला हरकत नाही.

त्याच्याशी तुलनात्मक यात काय वेगळे आहे. >> म्युझिक! अगडबम चे एक पण गाणे ऐकले नाही.
(अगडबम अजून पाहिला नाही. त्यामुळे त्याबद्द्ल लिहू शकणार नाही.)

बेबी बघितला. आवडला.
शमिताभ बघितला. अमिताभचाच मुव्ही वाटला. पिडली गाणं पिक्चर मधे आवडलं नव्हतं पण काल रेडीओ वर आवडलं.

त्याच्याशी तुलनात्मक यात काय वेगळे आहे. >> म्युझिक! अगडबम चे एक पण गाणे ऐकले नाही.
(अगडबम अजून पाहिला नाही. त्यामुळे त्याबद्द्ल लिहू शकणार नाही.) >>>> + १०००

तरीही , जे काही ट्रेलर पाहिलं होतं , त्यावरून तरी फार चीप कॉमेडी टाईप्स वाटला.
आणि मकरंद अनासपुरे अंगविक्षेप आणि डोळे आणि तोंड वेडवाकडे करत विनोद करण्याचा कण्टाळा येतो .
मूळात उमदा , लग्नाळू तरूण या चित्रालाच तडा जातो Happy .

द.ल.है. मधली संध्या खूप आवडली . शी इज नॉट सॉरी फॉर व्हॉट शी इज. Happy

अगडबम अजून पाहिला नाही. त्यामुळे त्याबद्द्ल लिहू शकणार नाही.) >>
मराठी चित्रपटांची शोकांतीका म्हणतात ती हीच का. Proud असो. अनासपुरेंच तोचतोचपणा कंटाळवाणा आहे खरच. हिंदी व्हर्जन बनवताना मे बी पॉलीश केला असेल हा चित्रपट.

अनेकांनी कौतुक केले आहे पण असाच मराठीत अगडबेम आधी आला होता ना. त्याच्याशी तुलनात्मक यात काय वेगळे आहे. काहीत नविन नसेल तर अगडबेम चांगला होता म्हणायला हरक<<<<<<
Uhoh अगडबम त्या मकरंद अनासपुरे आणि तृप्ती भोईर यांचाच म्हणतो आहेस ना? भीषण आहे तो सिनेमा! त्यात त्या नायिकेला प्रोस्थेटिक मेकप वापरून जाड केल्यावर फुगलेल्या गालांनी नीट तोंड उघडून संवाद पण म्हणता आलेले नाहीत. तसंच, तिच्या जाड असण्याची दाखवलेली एक दोन दृश्यं फार विचित्र आहेत. 'दम लगा के हैशा'चा निव्वळ ट्रेलरसुद्धा अगडबमपेक्षा शतपटीने बरा आहे.

हो मी अगडबम पाहिलाय थोडासा... बेक्कार आहे. त्या नायिकेला मेकअप मुळे सहज हालचाली जमत नव्हत्या. तिने या मुव्हीत कसलासा गिनिज की लिम्का रेकॉर्ड केला होता

दम लगा के हैशा आणि अगड़बम यांची तुलना होऊ शकत नाही . दोन्ही चित्रपट मी पाहिलेले आहेत. दम लगाके अगडबम पेक्षा कितीतरी पटीने सरस आहे.

जाड नायिका इतकाच काय तो समान दुवाअआहे. पणअगडबममम्दध्ये नायिका अतिजाडतेहेी प्रॉस्थेटिक मेकपने दाखवलीआहे. (आणि एकूणच सिनेमा यथातथा आहे) दम लगा के मध्ये नायिका मुळातच तितकी जाड आहे, आणि सिनेमा "तिच्या जाड असण्यापेक्षा" काहीतरी जास्त आहे.

दम लगा के हैशा आणि अगड़बम यांची तुलना होऊ शकत नाही . दोन्ही चित्रपट मी पाहिलेले आहेत. दम लगाके अगडबम पेक्षा कितीतरी पटीने सरस आहे.>>
ठिक आहे.

जाड नायिका इतकाच काय तो समान दुवाअआहे>> ओक्के.. बघायला हवा मग. अगडबेमची जाहीरात बघुनच नको वाटला होता तो. Happy

राज, त्या कूकिंग पॅशनमूळेच बघितला ना मी.
त्यातही घोळ आहेच. हसन पिजन विथ ट्रफल्स बनवतो, त्याला ट्रफल्स कुठून मिळतात ? ( बाजारातून हेलन सगळे गायब नाही का करत ? ) तो तिला ऑम्लेट करायला लावतो, ते पण फ्रेंच स्टॅडर्ड पेक्षा जास्तच ब्राऊन केलेय.

द जॅपनीज वाईफ..बघितला का ?
अगदी वेगळीच प्रेमकथा. एक बंगाली तरुण आणि त्याची जपानी पत्रमैत्रिण एकमेकांच्या प्रेमात पडतात. लग्नही करतात पण कधी एकमेकांना भेटू शकत नाहीत.

पण एकमेकांसाठी खुप झुरतात. या बंगाली तरुणाला ( राहुल बोस ) त्याच्या मावशीने ( मौशुमी चटर्जी ) ने वाढवलेले असते. पुढे त्यांच्याकडे एक विधवा नातलग ( रायमा ) तिच्या मूलासोबत आश्रयाला येते. त्यांच्यातही एक नाते निर्माण होते.. शेवटी त्या जपानी मुलीची भेट होते का..

मौशुमीला मी खुप वर्षानंतर बघितले. तिचा वावर सहज आहे. सर्वच कलाकारांचा अभिनय उत्तम आहे. चित्रीकरण अप्रतिम आहे.

दम लगाके मधली नायिका खूप आवडली... अगडबमच्या तुलनेत कित्येक पटीने सरस चित्रपट!! जाड नायिका इतकाच काय तो समान दुवा आहे. >> सहमत!

'दम लगा के हैशा' काल बघितला... खूप आवडला. अगदी सरळ, साधा आहे.
सिनेमा "तिच्या जाड असण्यापेक्षा" काहीतरी जास्त आहे.>>> ++१११११

दिनेशदा .. राहुल बोस आवडता अभिनेता आहे.. त्याच्या चित्रपटांची चॉईस पन छान असते .. शोधावा लागेल आता पाहण्यासाठी .

हंटर बघितला, मला तरी आवडला. एकदा बघणेबल. सई चे काम जरा बोल्ड आहे. सगळ्यांची अक्टिंग चांगली आहे. वासु (मुख्य भुमिका) च्या भावाचे 'क्षितिज़ चे करक्टर जास्तच भावते.

दिनेश, तुमच्या कलिनरी स्किल्स आणि पॅशन्सबद्दल शंका नाहिच, परंतु तुमच्या पोस्टनंतर आलेल्या काहि कमेंट्स वाचुन एखादा दर्दि खवय्या (खाणारा आणि खाऊ घालणारा) या चित्रपटाला मुकला जाउ नये म्हणुन ती पोस्ट... Happy

दिनेश, एकंदरीत तुम्ही तो चित्रपट चुका काढायचा हेतू ठेऊन / आपल्याला आवडणार नाहीच आहे किंवा 'आवडून घ्यायचा' नाही आहे. असं ठरवून पाहिल्यासारखा वाटलं. Happy चित्रपट खूप ग्रेट आहे अश्यातला भाग नाही. पण एकदा बघायला छान आहे. कथा काही काही वेळा भरकटते पण कीसच पाडायचं ठरवलं तर तुमच्या काही मुद्द्यांचाही विरूद्ध बाजूने पाडता येईलच. काही उदाहरणं..

मग ती उकळती करी तशीच आपल्या लेकाच्या हातावर देते. तो लेक ती तशीच खातो. पदार्थ चाखायची हि पद्धत भारतातली कुठली स्त्री वापरते म्हणे ? >>>> ही पद्धत असते की.. स्वयंपाक करणार्‍या बायकांना वगैरे अश्यापद्धतीने चव घेऊन बघताना पाहिलेलं आहे. आपण आता लहान चमच्याने वगैरे चव बघतो. पण हे अगदी होतच नाही असं अजिबात नाही.

मग एका निवडणुकीच्या निकालात जुही बाई, तिचा नवरा ओम पुरी , ५ लेकरे मिळवून चालवत असलेल्या एका हॉटेलला आग लावली जाते. त्यात जुहीचा अंत होतो. तिचे नाव अखिया (?) असते ते आपल्याला ती गेल्यावरच
कळते. >>>>> मग ? म्हणजे नक्की मुद्दा काय ?

हो कदम >>> हे आडनाव मुस्लिमांमध्ये असू शकतं. माझ्या माहितीत रिझवान बडेकर, मुबारिझ खरबे, सय्यद मोडक ही मुस्लिम मंडळी आहे. (आपले माजी मुख्यमंत्री ए.आर. अंतुले म्हणजे अब्दुल रेहेमान हे माहीत असेलच.) त्यामुळे कदम आडनावाचं एव्हडं काही आश्चर्य वाटण्याचं काही नाही.

आता त्या विमानतळावर महिन्यातून एखाद दुसरेच विमान उतरत असेल नै. >>>> मला नक्की संदर्भ आठवत नाही आता. पण दरवेळा कोलमडाकोलमडी झाल्यामुळेच तर ते वैतागतात ना? (महिने, दोन महिनेचा संदर्भ कळला नाही.)

तिला चक्क इंग्रजी येत असते. >>>> ही शक्यताही असू शकते की.

ती त्यांना घरचेच पदार्थ खाऊ घालते. >>>> ह्यात आक्षेप घेण्यासारखं नक्की काय ?

ते हसनला हॉटेलमधे घेतले तरच मिळणार असतात. >>>> ते मिळवण्यासाठी ती पंधरा वीस वर्ष प्रयत्न करत असते. हसन आल्यावरच चुटकीसरशी ते मिळणार असं काही आहे असं मला वाटलं नाही.

ते पण फ्रेंच स्टॅडर्ड पेक्षा जास्तच ब्राऊन केलेय. >>>> कारण ते फ्रेंच ऑमलेट नाहीच आहे! हसन स्वत:च्या पद्धतीचं ऑमलेट तिला करायला लावतो, त्याच्या हाताला लागलेलं असतं म्हणून.

अरे पराग हीथ्रो जवळ जर विमानाने कोलमडत असेल तर एक मिनीट तरी उभे राहू शकेल का अशा अर्थाने आहे ते. कधीतरी विमान जाणार व दुकान कोलमडणार असेल तर निदान लॉजिकल आहे. आणि ती हातावर चव उकळत्या करी ची म्हणून आश्चर्य.

दिनेश., Japanese wife माझ्याही यादीत आहे. बघायचा राहून गेलाय

हिथ्रो वर बर्‍याच दिशेने विमान उडु शकते किंवा लँड होउ शकते ना ? त्या कदमचा स्टॉल नेहमी विमान लॅण्ड होत नाही अशा ठिकाणी असेल असे समजा.

हो कदम >>> हे आडनाव मुस्लिमांमध्ये असू शकतं. माझ्या माहितीत रिझवान बडेकर, मुबारिझ खरबे, सय्यद मोडक ही मुस्लिम मंडळी आहे. << देसाई, देशमुख, सुर्वे, उपाध्ये, पाटणकर मुकादम हे माझ्याच मित्रमंडळात आहेत.

बाकि, सिनेमा पाहिल अनाही. त्यामुळे नो कमेंट्स.

अरे डायरेक्ट हातावर कशी घेता येइल म्ह्णून >>>> करतात रे तसं.. तिने काही अगदी डावभर करी हातावर ओतली नव्हती. पातेल्यातून एक थेंब थेट हातावर टेकवून पटकन त्याची चव बघणं हे केलं जातं..

अरे पराग हीथ्रो जवळ जर विमानाने कोलमडत असेल तर एक मिनीट तरी उभे राहू शकेल का अशा अर्थाने आहे ते. >>>> ओह ओके. मग हिर्थोवर दोन रनवे आहेत आणि त्यांची वहातुकीची दिशा एक आहे. ह्यांचं हॉटेल उलट बाजूला आहे. कधीकाळी उलट दिशेने विमान उतरलं आणि त्यामुळे हॉटेल पडलं असं काहीतरी समजून घ्या Happy
ह्या सगळ्या तपशीलांकडे दुर्लक्ष करून चालवून घ्या किंवा 'चलता है' म्हणून सोडून द्या मी सांगत नाहीये. पण म्हणून त्यावरून लगेच चित्रपटावर काट मारून टाकू नका इतकच.

Pages