Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल रात्री Citylights बघायला
काल रात्री Citylights बघायला बसली. थोड्या वेळानंतर उगाच खुप उदास उदास वाटायला लागल. अर्ध्यात बंद करुन दिला.. यापेक्षाही चित्रविचित्र चित्रपट पाहिलेय..नाही अस नाही पण कालचा अनुभव जरा जास्तच वेगळा होता..
परत तो बघायची हिम्मतच होत नाही आहे पण गोष्ट अर्ध्यात सोडण जमत नाही मला.. कुठलीही असो कशीही असो.. आता पुर्ण कराव म्हणते.. परत NH10 आहेच लाईन मधे हा संपल्यावर.. हुश्श.. पहिल्यांदा पिच्चर बघायच टेन्शन येतय
सरतेशेवटी पाहिला पुर्ण.. मस्त
सरतेशेवटी पाहिला पुर्ण..
मस्त आहे.. शेवट जरासा टिपीकल वाटला का कोण जाणे आणि मुव्ही पन बराचसा प्रेडिक्टेबल आहे..
त्यांना मुंबई आल्या आल्या ठगवणं, पोलीस स्टेशन ला रिपोर्ट लिहायला गेल्यावर बारबाला भेटल्यावर हिरोईन त्याच व्यवसायात जाणं वगैरे वगैरे.. पण मस्त होता तरी..
मला पडलेले साधे प्रश्न म्हणजे होरो एकदम तडकाफडकी लेकराबाळांना घेऊन सरळ शहरात येतो म्हणजे काय ?
असले नसले सगळे पैसे घरासाठी देउन बसतो म्हणजे काय ? एवढ सगळ घडत असताना बायको पोरीला गावाला का पाठवत नाही ?
कुणी शंकानिरसन करा प्लीज _/\_
NH10 बघीतला. मस्त काम केलय..
NH10 बघीतला.
मस्त काम केलय.. अनुष्का सुसह्य आहे.. तो त्या काळ्या स्कॉर्पिओ ला पाहुन गाडी वळवतो हा मुर्खपणा निस्तरण्यात उरलेला मुव्ही तयार केलाय.. मस्त आहे पण खरच.. काटे येतात अंगावर खरोखर..
Honor killing..लोक इतक्या थराला जाऊ शकतात हे बघुनच काटा येतो..बाप रे.. लोकांचे मुडदे पाडनं खरच का इतक सोप्प आहे ? बापरे झालं बरेचदा बघताना ..
एन एच १० मला पण आव्डला. ती
एन एच १० मला पण आव्डला. ती कुठे ही हिरॉइनचा अभिनिवेश दाखवत नाही. रेग्युलर घाबरलेली मुलगी दाखवली आहे. त्यात तो नवरा वारतो व ती रेल्वे ब ब्रिज खाली त्यासोबत बसलेली आही ती फ्रेम फारच परिणाम कारक आहे. सर्व गमावल्यावर तिच्या अंगात दुर्गावतार संचारतो. कश्याचे काही वाटेनसे होते ते बरोबर घेतले आहे.
ऑनर किलिंग परिस्थिती खरेच अशी आहे.
'किल्ला' अप्रतिम आहे. जरूर
'किल्ला' अप्रतिम आहे. जरूर बघा.
मात्र हा 'लहान मुलांसाठीचा' चित्रपट नाही. त्यामुळे अगदी तीनचारपाच वर्षांच्या मुलांना नेऊ नका.
अमा, हो ना.. ज्या केस वरुन हा
अमा, हो ना.. ज्या केस वरुन हा चित्रपट तयार केलाय ती केस वाचल्यावर खरच धन्य झाली मी.,
चित्रपट बघत असताना माझी रुमी म्हणत होती काय मुर्खपणा चाल्लाय .. अस कधी घडत का.. इतक एक्स्र्टीम.. त्यावरुन तिला जेव्हा खरी घडलेली घटना ऐकवली तर शांतच झाली .. म्हणे आपण खुप जास्त सेफ आहोत ..
वर यामधे आरोपींना शिक्षा झाल्यावर इतर खाप पंचायत च त्यांच्या समर्थनार्थ उभ राहणं म्हणाजे खुपच जास्त शॉकींग होत.. असले क्रुर प्रकार करण्यासाठी उद्युक्त करणार्या लोकांना आणि ते घडवुन आणणार्या लोकांना इतक्या लोकांचा पाठींबा असण म्हणाजे काय..कुठल्या दुनियेत जगतात हे अजुन..आता जर युएस सारख आपल्या कडेही समलैंगिक विवाहाला भारताने दुजोरा देऊन कायद्यात आणल तर कातच होईल..
रच्याकने, कुणाला वाटल का कि सिटीलाईट्स मधली त्याची बायको, अभिनेत्री पत्रलेखा दिव्या दत्ता सारखी दिसते जराशी..मला तर तिचाच भास होत होता तिच्यात..
जोर लगा के.. आज बघितला. खुप
जोर लगा के.. आज बघितला. खुप आवडला!
ऋषिकेश मधल्या गल्ल्या अगदी जुन्या नाशकाची आठवण करून देत होत्या. सिनेमातला ९५ चा काळ खुप nostalgic करतो. सगळे चित्रीकरण तंतोतन्त त्या काळातले वाटते फक्त कुमार शानू आत्ताचा आहे पण त्याला पर्याय नाही!
किल्ला बघितला आज.
किल्ला बघितला आज. आवडला.
सर्वांची कामे छानच. पार्थ तर अतिसुंदर आणि अतिसहज.
अमृता सुभाष, अर्चित देवधर, युवराजंच काम केलं तो आणि अजून दोघेजण आले होते. पार्थ नव्हता आला.
अर्चितशी बोलले मी चार शब्द. छान बोलला माझ्याशी.
टीना, त्या कथेत बरेच फ्लॉ
टीना, त्या कथेत बरेच फ्लॉ आहेत. केवळ उत्तम अभिनयामूळे सुसह्य आहे तो. शहरात येणारी प्रत्येक असहाय्य स्त्री बारबालाच होते का ? घरपर्यात, गवंडीकामाचे पर्याय आहेतच कि. मुंबई कुणाला उपाशी मारत नाही.
एवढ्या हायफाय कुरीयर बॉक्स्ची चावी फक्त मेणावरच्या ठश्यावरून कॉपी करता येते ? बायकोला कसे कळते, ठसा कुठे उमटवलाय ते ? आणि ते लोक तिच्यावर तिच्या घरावर पाळत ठेवणार नाहीत का ?
तो जखमी होऊन पळतो त्यावेळी त्याचे रक्त गळायचेही मधेच थांबते.
पोष्टर बाॅईज मध्ये दिलीप
पोष्टर बाॅईज मध्ये दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचे काम कोणी केलय? त्याने अजुन कशात काम केलय?
सीटीलाईट्स पुर्ण अभिनया साठी
सीटीलाईट्स पुर्ण अभिनया साठी चांगला आहे, नाहितर घरकाम, धुणीभांडी करु शकली असती.
पण जर तिला भेटलेल्या मैत्रीणीचा असर झाला व हेच काम करून जगू शकतो असा समज असेल तर थिक आहे.
टीना | 28 June, 2015 -
टीना | 28 June, 2015 - 12:07
अमा, हो ना.. ज्या केस वरुन हा चित्रपट तयार केलाय ती केस वाचल्यावर खरच धन्य झाली मी.,
>> कोणती केस ? कुठे वाचायला मिळेल ?
रसप, हि घ्या लिंक ..
रसप, हि घ्या लिंक .. https://en.wikipedia.org/wiki/Manoj-Babli_honour_killing_case
हे NH10 बघीतलेल्यांसाठी.. नवर्याला रेल्वे ब्रीज खाली ठेवल्यावर पोलीसांच्या शोधात निघालेल्या तिला जेव्हा स्टेशन मधला पोलिस हॉनर किलींग ची केस आहे अस म्हटल्या म्हटल्या फोन काटून निघुन जा असे म्हणतो तेव्हा त्याचा पवित्रा तिला दुसर्या पोलीसांपासुन वाचवायचा असतो का ?
टीना, त्या कथेत बरेच फ्लॉ
टीना, त्या कथेत बरेच फ्लॉ आहेत. केवळ उत्तम अभिनयामूळे सुसह्य आहे तो. शहरात येणारी प्रत्येक असहाय्य स्त्री बारबालाच होते का ? घरपर्यात, गवंडीकामाचे पर्याय आहेतच कि. मुंबई कुणाला उपाशी मारत नाही. >> +१ आम्ही बघत असताना सुद्धा हाच विचार केला दिनेशदा .. तरी बर रेप वगैरे प्रकार दाखवले नाही.. तशानं तर आणखीनच जिवावर आला असता तो बघणं.. 90s मधले चित्रपट बघण म्हणुनच जास्त कंटाळवाण व्हायच.. हिरो ची बहिण तर त्यासाठीच ठेवलेली असायची..शी..तरास निसता..
पोष्टर बाॅईज मध्ये दिलीप
पोष्टर बाॅईज मध्ये दिलीप प्रभावळकरांच्या मुलाचे काम पियुष रानडे ने केलाय. सध्या तो "अस्मिता" मालिकेत अस्मिताच्या नवर्याच काम करतोय
डिस्नी पिक्सारचा नवीन चित्रपट
डिस्नी पिक्सारचा नवीन चित्रपट 'इनसाईड आऊट' चुकवू नये ह्या कॅटेगरीतला आहे. मोठ्यांसाठीही अत्यंत सुंदर अनुभव. नक्की बघा. ३डी त नसता तरी काही फरक पडला नसता असे मात्र वाटले. ३डी इफेक्ट्स असे वेगळे जाणवलेच नाहीत.
आपल्या प्रत्येकाच्याच मेंदूत आनंद, दु:ख, भिती, राग आणि किळस ह्या भावना ठाण मांडून बसलेल्या असतात. वेगवेगळ्या क्षणी वेगवेगळ्या भावना प्रबळ होतात. कधी त्या एकमेकींच्या साथीने काम करतात तर कधी एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्न करतात. त्यानुसार आपल्या आठवणी आणि एकंदर व्यक्तिमत्त्व घडत किंवा बिघडत असते.
रायली ह्या अकरा-बारा वर्षाच्या मुलीच्या मेंदूत म्हणजेच तिच्या स्मरणशक्तीच्या अफाट साम्राज्यात वावरणार्या ह्या पाच भावना रायलीच्या आयुष्यात घडणार्या एका महत्त्वाच्या प्रसंगाला कशा प्रकारे सामोरं जातात ह्याचे अप्रतिम चित्रण म्हणजे 'इनसाईड आऊट'. स्मरणशक्तीबद्दलची शास्त्रीय माहिती ज्या ब्रिलियंट पद्धतीने सादर केली गेलीय त्याबद्दल हॅट्स ऑफ !
आज झी मराठीवर 'पोस्टर बॉईज'
आज झी मराठीवर 'पोस्टर बॉईज' आहे अर्ध्या तासाने.
कालच इनसाईड आउट बघितला.
कालच इनसाईड आउट बघितला. केवळ अप्रतीम! सगळ्यांनी आवर्जून बघण्यासारखा आहे. २डी मधे बघितला. मूळ कल्पनाच भन्नाट आहे. आणि सादरीकरण तर जबरी अफाट आहे.
इथे इनसाईड आउटच्या आधी एक
इथे इनसाईड आउटच्या आधी एक लाव्हा नावाची पिक्सारने बनवलेली छोटी फिल्म दाखवली थिएटरमधे. volcano ची प्रेमकहाणी अशी थीम होती. ती सुध्धा मस्त होती!
हो चीकू, त्याबद्दल लिहायचे
हो चीकू, त्याबद्दल लिहायचे राहिलेच. त्या फिल्ममध्ये थ्रीडी इफेक्ट्सची मजाही होती
'बाहुबली - द बिगिनिंग'
'बाहुबली - द बिगिनिंग' पाहिला.
ग्रॅण्ड आहे. भव्य !
एकदा पाहावाच.
(रच्याकने, त्या तमन्नाला तर आत्ता जाऊन प्रपोज करावं, असं वाटतं..!!)
बंगलोर मधे भव्य पोस्टर्स
बंगलोर मधे भव्य पोस्टर्स होते. प्रचंड जाहिरात. इतर रीलीजेस ना थिएटर्स मिळत नाहीत अशी तक्रार ऐकली. द बिगिनिंग, म्हणजे दोन तीन पिक्चर्स ची सिरीज आहे का?
आज मॅक्स वर 'जोर लगाके' आहे
आज मॅक्स वर 'जोर लगाके' आहे रात्री ८ वाजता.
दम लगाके हईशा
दम लगाके हईशा
बाजीराव-मस्तानीच पोस्टर रिलिज
बाजीराव-मस्तानीच पोस्टर रिलिज झालं
रणवीर सिन्ग भारी दिसतोय !
बजरंगी भाईजान पाहिला. मस्त
बजरंगी भाईजान पाहिला.
मस्त वाटला. पाहण्यासारखा आहे.
विश्वास बसणार नाही कुणाचा, पण तरी सांगतो - 'सलमानने अॅक्टिंग-बिक्टिंग केलीय !'
बजरंगी भाईजान पाहिला. मस्त
बजरंगी भाईजान पाहिला.
मस्त वाटला. पाहण्यासारखा आहे.
विश्वास बसणार नाही कुणाचा, पण तरी सांगतो - 'सलमानने अॅक्टिंग-बिक्टिंग केलीय !'>> रसप मग जबरदस्त Review लिहाच....
रसप परिक्षण लिहाच मला
रसप परिक्षण लिहाच
मला बघायचाय .. ती छोटूशी कार्टून खुपच आवडली.. आणि सोबतीला नवाजुद्दिन पन आहेच.
बजरंगी भाईजान आजच पाहिला.मस्त
बजरंगी भाईजान आजच पाहिला.मस्त पिक्चर आहे. ती लहान मुलगी इतकी गोड इतकी गोड. आयुष्यात इतकी गोड मुलगी बघितलीच नाही मी. नवाजुद्दिन क्या कहेने
बजरंगी पाहून आलो. भाईजान
बजरंगी पाहून आलो. भाईजान रॉक्स अगेन. एकदा पहावाच असा.
बाकी सुजा+१
Pages