चित्रपट कसा वाटला - २

Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44

या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?

हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केकेचा रहस्य मलाही आवडला... केके मला मनापासून आवडतो, कॅमेरॅशी तो निव्वळ चेहर्‍याने जे खेळतो, त्यासाठी मी त्याच्यावर अशक्य फिदा आहे. रहस्य मधेही त्याने अपेक्षाभंग केला नाहीये .. मला आवडला सिनेमा.. शिवाय ती सगळी केसच खूपच इंटरेस्टींग आहे (सिनेमात काही रेफरन्ससेस बदलले असले तरी)

केके फॅन्सनी त्याची भेंडीबाजार पाहिला नसेल तर पहा.. अतिशय थोडा रोल आहे, केके त्यात फक्त बुद्धीबळ खेळतानाच्या एक-दोन शॉट्स मधे कमाल करुन जातो.

केकेचा रहस्य मलाही आवडला... केके मला मनापासून आवडतो, कॅमेरॅशी तो निव्वळ चेहर्‍याने जे खेळतो, त्यासाठी मी त्याच्यावर अशक्य फिदा आहे. रहस्य मधेही त्याने अपेक्षाभंग केला नाहीये .. मला आवडला सिनेमा.. शिवाय ती सगळी केसच खूपच इंटरेस्टींग आहे (सिनेमात काही रेफरन्ससेस बदलले असले तरी) >> +१ मराठी बोलणारे सगळे जण अतिशय नीट मराठी बोलतात हे कौतुकास्पद आहे. दिग्दर्शन एकदम स्नॅपी वाटले.

'डर्टी पॉलीटीक्स'.... सिनेमाची स्टारकास्ट पाहिल्यावर, हा सिनेमा न पाहणं मला शक्यच नव्हतं. एक से एक नावं..ओम पुरी, नसीरुद्दीन शहा, अनुपम खेर, राजपाल यादव, गोविंद नामदेव, आशुतोष राणा.. शिवाय सुशांत सिंग, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी .. आणि मल्ल्लीकाताई शेरावत.
सिनेमा नावाप्रमाणेच डर्टी पॉलीटीक्सवर आहे, आणि अतिशय सरळ सरळ एकानंतर एक घटनेतून उलगडत जाणारा प्लॉट.
तरीही शेवटपर्यंत नीट पाहिला, कारण काम करणारे सगळ्यांनी भारी कामं केली आहेत. म्हणजे अत्जिबातच वेगळं काही 'अ‍ॅक्टींग' केलंय असं नाही (जॅकी श्रॉफ आणि मल्लिकाताई मात्र अ‍ॅक्टींग करायला गेलेत )पण सगळेच आपापल्या भूमीकेत इतके मस्त आणि करेक्ट बेअरींग घेऊन वावरलेत, की त्यांची काम पहायला सिनेमा पाहिला नीट लक्ष देऊन.
आशुतोष राणामधे एक जबरी एक्स-फॅक्टर मला कायमच वाटत आलाय, मला आवडतोच तो आणि त्याची पर्सनॅलिटी.
नसीरूद्दीन शहा कोणताही रोल मधे फिट होतोच, तसाच इथे पण. ओम पुरीचा रोल खूप ठरकी आहे, पण मस्त इझी काम केलंय त्यानी... अनुपम खेरचं रोलचं बेयरींग जबरी ! राजपाल यादवचं टायमिंग आणि बारीक बारीक रीअ‍ॅक्शन्स !
म्हणजे मल्लिकाताई असल्याने सिनेमा बोल्ड आणी डर्टी आहेच .. पण अतिशय सरळ कथेच्या सिनेमातही, ह्या लोकांची काम पहायची इच्छा असेल तर (आणि तरच) पहाण्यासारखा सिनेमा Lol
आणि एक लिहायचं राहिलंच, 'अदालत' मधला मट्ठ इनस्पेक्टर दवे देखील या सिनेमात आहे, तसाच मट्ठ !

धन्यवाद. आमच्या डीवीडी वाल्याकडे (डीवीडीच्या पोस्टरवर) कार वर बसलेली मल्लिका वगैरे दिसते कायम. याचा रिव्यू रीडिफ वर खास नव्ह्ता त्यामुळे आणला नव्हता. आता आणतो.

म्हणजे मी रिव्हू मधे 'अतिशय चांगला आहे' असं लिहिलंय असं वाटलं का तुला फा? Lol
सिनेमा यथातथाच आहे, पण 'असल्या' सिनेमात देखील 'ह्या' लोकांना मनापासून कामं केली आहेत हेच भारी वाटलं मला Happy

एकदम मान्य, तु पहायला हवाच Happy
आणि डीव्हीडीवाल्याकडे डीव्हीडी अशी शेल्फवर (आणि मल्लीका अशी गाडीवर) बसून राहिलेली बरी नाही ना वाटत Happy

केके जेव्हा टिस्का चोप्राला खुनासंदर्भात विचारत असतो तुमच्या शेजारच्यांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे (मीता वसिष्ठ आणि तिचा नवरा) त्यावेळी जे काय कमाल मिश्कील भाव येतात एका सेकंदासाठी>>>> सगळेच बाप आहेत.

लोक्स , आयुष्यमान खुरानाचा ' दम लगाके हैशा ' मस्त एंटरटेनिंग आहे. आयुष्यमान आणि भुमी पेडणेकर साठी नक्की बघाच.. भुमी पेडणेकरचं नाव आधी ऐकलं नव्हतं पण तीने काम मात्र मस्त केलयं.

भुमी पेडणेकरचं नाव आधी ऐकलं नव्हतं पण तीने काम मात्र मस्त केलयं.>> ती यशराज ची कास्टिन्ग डायरेक्टर आहे, पहिलाच मुव्ही आहे आणी कमालिचा सहज वावर आहे तिचा.

बॉबी जासूस आवडला. त्याचे रिव्यू विशेष नव्हते म्हणून इतके दिवस बघितला नव्हता. कदाचित थिएटर मधे बघताना कंटाळा येइल पण घरी डीव्हीडी वर नक्कीच बघण्यासारखा आहे. विद्या बालन ने जबरी काम केले आहे. हैदराबाद चा माहौल मस्त आहे. भाषा किती अचूक आहे माहीत नाही - तेथील जाणकारांनी सांगावे- पण ऐकायला मस्त वाटते. बाकी सहकालारांनीही धमाल आणली आहे - सुप्रिया पाठक, तन्वी आजमी ई.

टाईम्पास २ ठिक वाटला.

प्रिया बापट ला उगीच घेतले. एक्दम दाताडी हसते. प्राजु म्हणून ती पटत नाही.
प्रियदर्शन दगडू म्हणून पहिल्या जुन्या दगडूला मॅच आहे.

बाकी, पहिला भाग खूप छानच होता.

पिकू - खूप आवडला, शेवट खूप रियलिस्टीक आहे. अनुक्रमे मौशमी, अमिताभ, इर्फान मस्त! दीपीका मन लावून काम करते. थोडा टॉयलेट ह्यूमर जास्त आहे, गाणी उगीच आहेत. पण एकूण सिनेमा आवडला.

हॉट पर्स्युटः रीस विदरस्पून व सोफीया वर्गारा. धमाल विनोदी पट आहे. टाइमपास मूव्ही. उगीचच ए रेटिन्ग दिले आहे भारतात, तसे आक्षेपार्ह काहीच नाही. सोफी टोटली रॉक्स. ती आली की नजर तिच्या वरून हलत नाही. आणि तिचा अ‍ॅक्सेंट कहर आहे. बाकी नेहमीचाच माल मसाला.

मी पण रहस्य पाहिला काल. सुरेख काम केलंय केके ने. आणि टिस्का चोप्रा पण. सर्वात शेवटी तिच्या चेहर्‍यावरचे थंड भाव शहारा आणतात अंगावर.
शिवाय चेतनचं प्रेत सापडतं तो सिन तर भयंकर आहे.

'कॉफी आणि बरंच काही' पाहिला. चित्रपटाच्या सेन्सॉर सर्टीफीकेटमधे (अस्सल सिनेमाबाज - त्यामुळे रीळांची संख्या किती, सेन्सॉर सर्टीफिकेटवर सही कोणाची, साल काय इ.इ. सर्व पाहण्यात येते... फा, वाचतो आहेस ना रे हे !) चित्रपटाचे नाव " बरेच काही आणि कॉफी' लिहिले आहे, तेच योग्य वाटते... सिनेमात बरंच काही बळंच आहे, पण कॉफी मात्र कुठे जाणवलीच नाही.
'कॉफी.. ' चा नावात खास करून उल्लेख असलेल्या चित्रपटात एक संपूर्ण चित्रपटभर 'कॉफीची' शेड ( संवादात, चित्रीकरणात, नात्यात, माणसांच्या मनात्/परसनॅलीटीत) रेंगाळणं अपेक्षित होतं. इथे कॉफी दिसतच नाही, आणि चित्रपट नुसताच रेंगाळत राहतो... Lol
बाकी पुणं बघायला मजा आली . शिवाय पुण्यातलं पर्सिस्टंट्चं ऑफीस बघून ' आपण आयटीत आणि पुण्यासारख्या ठिकाणी अश्या भारी कँपस असलेल्या कंपनीत का नाही !' अशी हळहळ वाटली.
रंग हे नवे नवे दुनिया है नयी नयी
मॉर्नींग आर जस्ट मॅजीकल
शामे भी है सुरमई
ह्यातलं 'गाठ जाई बांधली तरी कुठे दिसे ना तो" हे वाक्य /शब्द कळायला सॉलीडच डीफीकल्टच गेलं यार !
काही म्हणा निदान माझ्यासाठी तरी मंगेश पाडगावकरांचे संजीव अभ्यंकरने गायलेले 'तू असतीस तर झाले असते' ह्या गाण्याचे शब्द आणी हे गाणे भाव खाऊन गेले Happy

रहस्य मीही पाहिला आत्ताच... अप्रतिम कामे आहेत सगळ्यांचीच. टिस्काचा शेवटचा सीन खुप छान. निदान तेवढे तरी समाधान लाभते तिला.

खुप इंटरेस्टींग केस. शेवटपर्यंत एकेक जण संशयाच्या जाळ्यात सापडत जातो पण तरीही खरा गुन्हेगार कोण हे अजिबात लक्षात येत नाही.

अस्सल सिनेमाबाज - त्यामुळे रीळांची संख्या किती, सेन्सॉर सर्टीफिकेटवर सही कोणाची, साल काय इ.इ. सर्व पाहण्यात येते... फा, वाचतो आहेस ना रे हे ! >>> वाचतोय :). "कथावस्तू पुणे, इंदूर व... शहरांत घडते, पृष्ठसंख्या..." वगैरे आठवले Happy

'पिकु' काल पाहिला....... सर्वांचीच कामे मस्त. 'असा' विषय असूनही कुठेही चित्रपट 'vulgar' होत नाही हेसुद्धा दिग्दर्शनाचे मोठे यश म्हणायला हवे. अमिताभ, इरफान आणि दीपिका- तिघांनीही कथा छान रंगवली आहे. अमिताभ आता वयाच्या या वळणावर असे रोल्स कमालीचा एन्जॉय करतोय असे वाटते. इरफानइतका सहज अभिनय फारसा पाहायला मिळतच नाही.

स्पॉयलर अ‍ॅलर्ट
खुप इंटरेस्टींग केस. शेवटपर्यंत एकेक जण संशयाच्या जाळ्यात सापडत जातो पण तरीही खरा गुन्हेगार कोण हे अजिबात लक्षात येत नाही.
<<
मला सुरवात होताच लगेच आरुषी हत्याकांडावर बेतल्यासारखा वाटला , त्यामुळे कलप्रिट कोण , नोकराचे काय होणार सगळेच प्रेडिक्टेबल वाटत होते आणि तसेच आहे बर्यापैकी !
पण तो प्लॉट -रजस्य ज्या प्रकारे सादर केलय ते आवडलंलाय, सगळ्यांची कामं मस्तं झालीयेत !

मला सुरवात होताच लगेच आरुषी हत्याकांडावर बेतल्यासारखा वाटला >> सुरूवातीला त्याचा उल्लेख आहे ना नामावलीमधे ?

सुरवातीला लगेच लक्षात येते. पण नंतर मी कथेत खुप गुंतुन गेले. कान्हेरी गुंफेत झालेला हल्ला अनावश्यक होता. त्यात दोघेजण गुंतले असल्याने थोडा गोंधळ झाला.. चेतन नंतर सापडतो.

चित्रपट पाहिल्यानंतर नेटवर त्यासंबंधी वाचले तेव्हा आरुषी कनेक्षनबद्दल अजुन कळले. त्यांच्या वकिलाने चित्रपट आधी पाहुन त्यात खुप ऑब्जेक्षन्स काढलेली.

बाकी त्यांचे नव्या मुंबईतले घर अतिशय गॉर्जस........ मला तर पोलिस सतत त्या घरात जावेत म्हणजे घर परत परत पाहता येइल असे वाटत होते. Happy

Pages