Submitted by नंद्या on 16 March, 2014 - 21:44
या आधीचा धागा : चित्रपट कसा वाटला?
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पराग मी कुठे लिहीलेय बघू नका
पराग मी कुठे लिहीलेय बघू नका म्हणून ? तूम्हाला आवडला तर आवडू द्या कि, मला कसा वाटला ते लिहीलेय मी, आवडणारच नाहीत, असेचित्रपट मी बघतच नाहि मुळी, आता फोनवरुन लिहितोय, मग ( मला ) वाटले तर सविस्तर लिहीन
डायरेक्ट हातावर कशी घेता येइल
डायरेक्ट हातावर कशी घेता येइल >> अमृततुल्यांत ती चहा बनवणारी स्पेशालिस्ट मंडळी करतात की असं. पळीने उकळता चहा हातावर ओतताना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा धस्स झालं होतं. मग ते तसं करताना बघायचा नाद लागला. नंतर चहाची वाट बघत नसताना त्याने ते तसं केलं, की आता चहा तयार - असं समीकरणही तयार झालं..
रस्स / करी जमली आहे की नाही ते बघण्यासाठी अनेकदा बायका असं करताना पाहिलं आहे. त्यांनाही स्पेशालिस्टच म्ह्णलं पाहिजे.
--
मराठी चित्रपटांच्या राष्ट्रीय पुरस्कारांबद्दल यावेळी फारसं कुठे (इथं, सोशल मेडिया / वर्तमानपत्रांत) लिहून आलं नाही याबद्दल मलाही विशेष वाटलं. पिफमध्ये 'कोर्ट' आणि 'ख्वाडा' चं स्क्रीनींग झालं तेव्हा थोडक्यात http://www.maayboli.com/node/52370 इथं लिहिलं आहे.
द जॅपनिज वाईफ कादंबरी छान
द जॅपनिज वाईफ कादंबरी छान आहे.सिनेमा पाहूनही आता बहुतेक दोन-तीन वर्षं झाली. आवडला होता.
सिनेमातलं सुंदरबनातल्या बेटांवरच्या दिनक्रमाचं, वादळांचं चित्रिकरण सुरेख. राहूल बोस छान फिट झाला आहे साध्या शाळामास्तराच्या भूमिकेत. सुरुवातीला त्याची मैत्रिण जपानवरुन भलामोठा पतंग पाठवते तो नदी, होडी असा प्रवास करत बेटावर आणला जातो, गावकरी कौतुकाने तो घरी पोचवतात वगैरे सीन एकदमच क्यूट आहे.
दम लगाके हैशा पाहिला. आवडला.
पराग, माझ्या फोनमधे देवनागरी
पराग, माझ्या फोनमधे देवनागरी लिहिताना पूर्णविराम देताच येत नाही. म्हणून वरची पोस्ट अर्धवट राहिली.
या बीबी चे शीर्षक, चित्रपट कसा वाटला ? असे आहे ना ? मग इथली सर्व पोस्ट्स मला असा वाटला, अशीच वाचावीत नाही का ? पण निदान जे लिहिलंय तरी वाचा हो.
त्यांचे आडनाव कदम असल्याबद्दल मी कुठे आक्षेप घेतलाय. उलट ठासून सांगितलेय. ( आता माझ्या ओळखीची किती पटेल, इनामदार, दळवी मंडळी मुसलमान आहेत, ते कुठे लिहित बसू ? )
घरचेच पदार्थ खाऊ घालते, या वाक्यात काय वावगे दिसले तूम्हाला ? खरं तर त्यात बरेच वावगे आहे. ती म्हणते सर्व पदार्थ तिनेच केलेत. अचानक आलेल्या सहा जणांना पुरतील एवढे पदार्थ ती घरीच का ठेवते ? मूळात जिथे ती काम करते तिथे जेवण मिळत असावे ( कारण हसनला तशी ऑफर दिली जाते ) मग घरी का करते ? त्तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात ? ती म्हणते चीज पण घरचेच आहे. तो व्याप ती एकटीने कधी करते ? ती एकटी रहात असावी असे मला वाटले कारण पोर्क वरून बाबांची आठवण येते, असे वाक्य नंतर येते.
अखिया नाव किती कॉमन आहे ना ! ती मरण्यापुर्वी त्यांच्या एकत्र कुटूंबाचा किमान ओम आणि जुहीचा एकही सीन नाही. त्यामूळे आधी नाव कळत नाही.
हिथ्रो ला जर आठ दहा धावपट्ट्या असतील तर एखादी धावपट्टी महिन्यातून एखाद्या विमानासाठीच वापरली जात असेल नाही ? तो जो विमान उतरायचा शॉट आहे त्यात विमानाचे डीटेल्स दिसतच नाहीत केवळ काळी आकृती दिसते. तरी पण उतरणार्या विमानाचा वारा लागून जर स्टॉल कोलमडणार असेल, तर तो विमान उतरण्याच्या जागेपासून फारच जवळ असेल नाही. म्हणजे अश्या जागी जे सिग्नल लाईट्स असतात त्यापेक्षाही आत म्हणजे अगदी कुंपणाच्या आतही. अश्या ठिकाणी लंडनची म्यूनिशिपालिटी अशा तकलादू स्टॉलला परवानगी देतच असेल नाही. तिथे लागणार्या तंदूरी चे वगैरे काय ते विशेष ? शिवाय अश्या जागी चोखंदळ ब्रिटीश खवय्ये येतच असतील.
( जिद्नासूंनी कुर्ला अंधेरी रोडवरच्या बैल बाजारा समोरच्या रोडवर विमाने उतरताना उभे रहावे आणि तिथे उतरत्या विमानांचा वारा कितपत जाणवतो ते पहावे. )
ऑमलेट करताना त्याच्या हाताला लागलेले नसते, भाजलेले असते. जरी तो तिला जास्त मिरची आणि कोथिंबीर
घालायला लावतो, तरी ते फ्लीप मात्र तिचे तिच करते. स्वतः नवीन शेफची नेमणूक करण्यापुर्वी त्याला ऑमलेट
करायला लावणारी ती, फ्लीप करताना स्वतःचे कौशल्य वापरेल, असे आपले मला वाटले हो.
फ्रेंच कूक ( मी स्वतः त्यांच्याबरोबर दोन वर्षे काढली आहेत ) ते शिजवत असलेल्या, सूपमधे चमचा घालून तो तोंडात घालतात आणि परत तोच चमचा सूपमधे घालतात. भारतातली स्त्री, आपल्या मूलाला एखादा पदार्थ चाखायला देईल तेव्हा तो एखाद्या बशीत वा वाटीत देईल. मूलाचा हात भाजू नये एवढी काळजी आई घेईलच, ( असे आपले मला वाटले हो. )
बाकी चित्रीकरणाबद्दल, अभिनेत्रींच्या अभिनयाबद्दल मी लिहिले आहेच.
पण एक बाब माझ्या पोस्टमधे राहिली बघा. या चित्रपटाला रहमानचे संगीत आहे. ते नेमके कुठे आहे. ओम पुरी हॉटेलमधे मोठ्याने जे गाणे लावतो त्यात कि चित्रपट संपल्यावर काहीतरी वाजते त्यात. आणि ते कसे ग्रेट आहे, वगैरे पण कुणीतरी लिहा .. प्लीजच.
ऋन्मेषला सांगून खास वेगळा बीबी काढाच्चा का ?
भारतातली स्त्री, आपल्या
भारतातली स्त्री, आपल्या मूलाला एखादा पदार्थ चाखायला देईल तेव्हा तो एखाद्या बशीत वा वाटीत देईल. मूलाचा हात भाजू नये एवढी काळजी आई घेईलच,>> सहमत !आया गरम पदार्थ आपल्या हातावर बिनधास्त घेतात पण पटकन गरम्/उकळती आमटी मुला.न्च्या हातावर देतच नाहित.
किती तो किस की
किती तो किस की कीस?
प्रत्येकाला चित्रपट आपल्याला वाट्ला तसाच वाटावा इतका आग्रह कशाला?
चित्रपट पहायचा की नाही हे प्रत्येक जण ठरवतील्च आपल्या इच्छेने.
पराग, अहो मूवी रीलेज होवून जुना झाला की, आता मार्केटींग तुम्ही करून काय अर्थय?
मला ओके वाटला. बघण्यासारखं
मला ओके वाटला.
बघण्यासारखं काहीच नाही.
सी आर्चीन चा सीन इतका गंडलेला आहे. मुंबईच्या मार्केटात कोणाही मुंबईकर मित्रांकडून जे पट्टीचे मासे खातात एकले नाही की
असे रस्त्याबर विकले जातात.
ज्या करीवरून इतक्या पोस्टी
ज्या करीवरून इतक्या पोस्टी आल्या आहेत ती करी उकळताना कुठे दाखवली आहे? मसाले-बिसाले टाकून हलवतेच आहे आणि डाव जरासा हलवून (निवण्यासाठी करतो तसा) मुलाच्या हातावर टेस्टसाठी थोडी करी देताना दाखवली आहे. बरं तो मुलगा सुद्धा आईच्या हाताखाली रेस्टॉरंटमध्ये कुकगिरी करण्याइतका मोठा आहे. इथला गहजब वाचून मला वाटलं की बारक्या पोराच्या हातावर उकळती आमटी-बिमटी दिली की काय. असो. एकदा बघण्यासारखा आहे सिनेमा. हसन पॅरिसला जातो तोपर्यंत टु द पॉइंट आहे. नंतर जरा रेंगाळला आहे. शेवट जरा आटोपता घ्यायला हवा होता.
व्योमकेश बक्षी पाहण्यात येणार
व्योमकेश बक्षी पाहण्यात येणार आहे. कसा आहे हे पाहण्या आधी कळवावे.
मला पण बघायचाय व्योमकेश
मला पण बघायचाय व्योमकेश बक्षी. ७ वर्षाच्या मुलाला नेण्याजोगा आहे का? जर तसा असेल तर आजच बघण्यात येईल.
७ वर्षाच्या मुलाला नेण्याजोगा
७ वर्षाच्या मुलाला नेण्याजोगा आहे का >> नाही. म्हणजे 'अॅडल्ट' असं काही नाही. पण जुनं कलकत्ता आणि व्योमकेश बक्षी आणि त्याची रहस्यसोडवणुकीची स्टाईल या गोष्टी 'आपण' चवीने बघायच्या आहेत. लहान मुलांची भुणभुण चालू होईल कदाचित हे सारं बघून.
७ वर्षाच्या मुलाला नेण्याजोगा
७ वर्षाच्या मुलाला नेण्याजोगा आहे का? >>> माझा पण सेम प्रॉब्लेम आहे. पण संथ हाताळणी आहे. स्टंट्स आहेत पण ते मसाला सिनेमा प्रमाणे नाही. रहस्य म्हणजे मारधाड नाही असं अभिजित कुंटे म्हणालेत. तर मुलांना दुस-या सिनेमाला बसवावं आणि हा छोटा सिनेमा चटकन पाहून पटकन त्या स्क्रीन बाहेर थांबावं असा विचार आहे.
हम्म. घराजवळच्या सिनेमागृहात
हम्म. घराजवळच्या सिनेमागृहात हा आणि फास्ट अँड फ्युरिअस असे दोनच ऑप्शन्स आहेत. त्यामूळे आज न जाता २-३ दिवसांनी मुलाला घरी सांभाळायला कोणी असेल त्यावेळी गेलेलं बरं.
>>>आणि हा छोटा सिनेमा चटकन
>>>आणि हा छोटा सिनेमा चटकन पाहून पटकन त्या स्क्रीन बाहेर थांबावं >>> duration 150 mins.
>>>>>> https://in.movies.yahoo.com/blogs/movie-reviews/yahoo-movies-review--det...
While for the most part the film manages to keep us hooked, there are others where the plot takes such circuitous turns that keeping up becomes an arduous task.
Detective Byomkesh Bakshy is definitely worth a watch but is it brilliant? Not really. >>>>>
True.
मलापण पहायचा आहे व्यो.ब. ,
मलापण पहायचा आहे व्यो.ब. , मानवसाठी.
बेबी येतोय टीव्हीवर. केव्हापासुन पहायचा होता
सारे जहां से मेहेंगा पाहिला.
सारे जहां से मेहेंगा पाहिला. छान वाटला.
जीवनावश्यक वस्तूंचे वाढते भाव आणि त्यामुळे वाढत जाणारा घरखर्च यावर उपाय म्हणून एका माणसाला एक शक्कल सुचते आणि त्यातून होणारे मजेदार गोंधळ असा कथाभाग आहे . संजय मिश्रा आणि इतर काही 'फस गये रे ओबामा' च्या टिम मधले कलाकार आहेत. सगळ्या कलाकारांचा सहज अभिनय आणि छोट्या छोट्या प्रसंगातून घडणारी विनोदी कथा छान वाटली.
फ्युरिअस ७ आवडला. आधीच्या
फ्युरिअस ७ आवडला. आधीच्या सिनेमांपेक्षा उगीच जास्त हाय टेक केला आहे पण तरी ती फास्ट फ्युरिअस सिरीज आवडते म्हणून आवडला.
अली फझल उगीच एका रोल मध्ये आला आहे पण चांगला वाटला.
ती म्हणते सर्व पदार्थ तिनेच
ती म्हणते सर्व पदार्थ तिनेच केलेत. अचानक आलेल्या सहा जणांना पुरतील एवढे पदार्थ ती घरीच का ठेवते ? मूळात जिथे ती काम करते तिथे जेवण मिळत असावे ( कारण हसनला तशी ऑफर दिली जाते ) मग घरी का करते ? त्तेही एवढ्या मोठ्या प्रमाणात ? ती म्हणते चीज पण घरचेच आहे. तो व्याप ती एकटीने कधी करते ? >>>>>
ती मरण्यापुर्वी त्यांच्या एकत्र कुटूंबाचा किमान ओम आणि जुहीचा एकही सीन नाही. त्यामूळे आधी नाव कळत नाही. >>>
कदम >>>
हिथ्रो >>>
हे सगळे मुद्दे चित्रपटाच्या मुळ विषयाशी फारच irrelevant आहेत असं नाही का वाटत?
मूलाचा हात भाजू नये एवढी काळजी आई घेईलच, ( असे आपले मला वाटले हो. ) >>>> बरोबर आहे ना.. पण किती आमटी दिली आहे ? अगदी भाजण्याइतकी आहे का? ह्याबद्दल सगळ्यांनी वर लिहिलच आहे, पुन्हा तेच लिहित नाही.
स्वतः नवीन शेफची नेमणूक करण्यापुर्वी त्याला ऑमलेट करायला लावणारी ती, फ्लीप करताना स्वतःचे कौशल्य वापरेल, >>>> इथे मुद्दा चवीचा आहे. नवीन शेफची नेमणूक करण्यापूर्वी ती ऑमलेट बनवायला सांगते आणि त्याची *चव घेऊन* पहाते. फ्लीप करतानाचं कौशल्याचं महत्त्व वगैरे आधीही कुठे आलेलं नाही! आधी तुम्ही लिहिलत फ्रेंच ऑमलेट एव्हडं ब्राऊन नसतं. इथे परिक्षा त्याच्या ऑमलेटची आहे त्यामुळे त्याला हवं तसं ऑमलेट तो बनवतो, फ्रेंच ऑमलेट नाही. आता वेगळाच मुद्दा लिहिलात.
या चित्रपटाला रहमानचे संगीत आहे. ते नेमके कुठे आहे. >>>>
https://www.youtube.com/watch?v=UzUT6U-XIHU
ही लिंक ए.आर. रेहेमानने ऑफिशीयली शेअर केलेली लिंक आहे.
चित्रपट तुम्हांला आवडलाच पाहीजे असा आग्रह अजिबात नाही आणि वर लिहिलं तसं ह्या सगळ्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून चित्रपटाचं फक्त कौतूक करावं असही म्हणणं नाही. फक्त तुमच्या सारख्या स्वैपाकाची पॅशन असणार्याने ह्या विषयावरच्या चित्रपटाबद्दल वर लिहिलेले (बर्यापैकी लेम) आक्षेप पाहून आणि आता, इतके इंग्रजी चित्रपट पहात असूनही 'रेहेमानचे संगीत नेमके कुठे आहे?' हा प्रश्न विचारलेला पाहून फार आश्चर्य वाटले म्हणून इतका पोस्टप्रपंच! असो.
पीअर्स ब्रॉस्नन चा स्पाय
पीअर्स ब्रॉस्नन चा स्पाय थ्रिलर पाहिला - नोव्हेंबर मॅन. मस्त आहे, फार नावीन्य नाही, पण खिळवून ठेवतो. पी.ब्रॉ. थोडा म्हातारा दिसतो, पण चार्म आहे अजूनही.
(अमेरिकेत नेट्फ्लिक्स वर स्ट्रीमिंग वर आहे)
नोव्हेंबर मॅन जर्नीपेक्षा
नोव्हेंबर मॅन जर्नीपेक्षा अधिक अतर्क्य आहे राव. आत्ताशा अशा स्पाय थ्रिलर्समधे फारसे नाविन्य उरलेले वाटत नाही. ब्रॉस्नन मात्र नक्कीच चार्मिंग वाटतो अजूनही.
"कॉफी आणि बरेच काही" कुणी
"कॉफी आणि बरेच काही" कुणी पाहिला का?.... पेपरमध्ये तरी बरे आलेय परीक्षण पण त्यावर माझा फारसा विश्वास नाहीये (पेपरमध्ये "मितवा" बद्दल पण चांगले लिहुन आले होते )
कात टाकल्यानंतर मराठी
कात टाकल्यानंतर मराठी सिनेमाचं कौतुक होत होतं . आताशा वेगळा विषय म्हणून पोकळ कथानकाचे सिनेमे केवळ फ्रेश हाताळणीसाठी पहावेसे वाटत नाहीत. शीर्षकावरून आडाखे बांधले जातातच..
ब्योमकेश बक्षी एक नंबर आहे.
ब्योमकेश बक्षी एक नंबर आहे. लहान मुलांना नेऊ नका. हिंसा जरा जास्त आहे मुलांसाठी.
क्वीन नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर
क्वीन नेटफ्लिक्स स्ट्रीमिंगवर आला आहे. अजूनही बघायचा राहिला असल्यास.
'दम लगा के हईशा' पाहिला. छान,
'दम लगा के हईशा' पाहिला. छान, साधासुधा सिनेमा. दोघांची कामं सुंदर झाली आहेत. आयुषमान खुरानाचा यातला गेट-अप, हेअरस्टाईल वगैरे त्याच्या आधीच्या सिनेमांपेक्षा जरा वेगळं होतं, ते आवडलं. भूमी पेडणेकरचा पहिलाच सिनेमा आहे असं अजिबात वाटत नाही. तिनं यूपी बोलीभाषेचा सूर, उच्चार किती मस्त पकडलाय. बाकीचे कसे मूळचे तिथले किंवा अभिनयात मुरलेले आहेत, त्या पार्श्वभूमीवर.

संवाद मस्त. हरिद्वारमधली लोकेशन्सही भारी आहेत. त्यांचं घर तर मला फारच आवडलं. छज्ज्यातून बाहेर भरून वाहणारं नदीचं पात्र, किंवा ते चिंचोळ्या गल्लीतले गाडीत बसून जाण्याचे, लग्नाच्या वरातीचे सीन्स. त्याचं कॅसेटसचं दुकान, मित्राचं कपड्यांचं दुकान..सगळंच एकदम अस्सल.
मॅटॅडोरचा एकच लाँग-शॉट आहे; पण कुठून शोधून काढली आहे ती!
सगळे त्याला लग्नाला होकार दे म्हणून मागे लागलेले असतात तेव्हा त्याच्या मागे लोंबणारी कॅसेटमधली टेप
सगळं अगदी जुळून आलेलं आहे. फक्त शेवटच्या शर्यतीत तो शेवटपर्यंत एकदाही दमलेला, हाश्श-हुश्श करताना, घामानं निथळताना दाखवलेला नाही. ते जरा विचित्र वाटलं.
Baby was U/A & Fast & Furious
Baby was U/A & Fast & Furious 7 is A why ? Indian Censor really sucks.
ललिता-प्रिती >> +१००००
ललिता-प्रिती >> +१०००० अनुमोदन ..
काल मी ३ चित्रपट पाहिलेत ..
ब्योमकेश बक्षी .. छाने.. मला त्यातला तो अनुकुल शहा / यांग वांग आवडला .. काय खतरनाक खुनशीपणा दाखवतो तो बेक्कार.. त्याच ते हसणं ..मज्जा आली ..
मग बघीतला दम लगा के हईशा .. माझ्या मित्रान माझ्यासाठी परत एकदा बघीतला
.. तो पन मुव्ही मस्तच.. भुमी पेडणेकर ने खरच खुप छान काम केलय आयुषमान खुराणा तर तसाहि लाजवाबच आहे म्हणा..
.. ती भुमी कधी कधी कसली गोड दिसते .. आणि तिच्या मम्मीचे सजेशन .. धन्य _/\_ .. शारीरिक विवशता
आणि ललिता-प्रिती ने मेन्शन केलेल्या सर्वच गोष्टी
.. त्यांचे गाण्यामधून केलेले भांडणं आणि सासु सासरे आणि भुवा ने ते बघण
.. परत ते आल्या आल्या भुवाचा सुनेबद्दलचा सुर .. भुमी चा भाऊ .. आणि रात्री उठून ती त्याच्यासाठी पाणी आणते तेव्हा सासु आणि भुवा ने तिला टोकणं आणि मग हसणं
.. एक से बढकर एक किस्से आहेत 
मी मक्या चा अगडबम सुद्धा बघीतलाय पण त्यात मक्या ची होणारी चीडचीड आपलच डोक किर्र करुन जाते.. सदानकदा घनघन आणि ती त्याची बया .. खरच ते प्रॉस्थेटीक मेकअप होत का तरी मी विचार करतेय हिच्या आवाजाला काय झाल.. तिचा सदानकदा तिच्या मोटेपणाबद्दल दाखवलेला कॉप्लेक्स पन जीवावर येतो . मुळात स्वतःलाच जर आपण स्वतः आवडत नसु तर इतरांना आपण आवडन हि अपेक्षा ठेवण चुके .. गलत मॅसेज दिलाय त्यात ..
त्यामानाने दम लगाके हईशा मस्त .. त्यात आणखी एक आवडता अॅक्टर म्हणजे संजय मिश्रा. प्रेम चे पप्पा .. अरे काय माणूस आहे .. भयंकर .. त्याचे निव्वळ एक्स्प्रेशन बघण म्हणजे एक काम आहे
शेवटी रात्री बघीतला तो मराठी मुव्ही ..कॉफी आणि बरच काही . . मला बोर झाला . लक्षात ठेवण्याजोगे संवाद वाटले नै .. वैभव तत्ववादी च काम फक्त आवडलं .. बाकी ती हिरोईन बोर करते .. दिलीप प्रभावळकरला उगा आणायची कै गरज नव्हती .. त्याची बायको म्हणून जी अॅक्ट्रेस दाखवलेली आहे ना तिचे एक्स्प्रेशन मला आजतागायत कळलेले नै कुठच
.. थोडक्यात खुप्पच रिकामे असेल तर जा .. विषेश आवर्जुन पाहण्यासारख कै एक नै आहे पिक्चर मधे .. 
कॉफी आणि... पाहिला विशेष असं
कॉफी आणि... पाहिला विशेष असं नाहीये ह्यात फार, पण किस न काढता पाहू शकलो तर भारी आहे.
तू असतीस तर झाले असते... लक्षात राहण्याजोगं आहे.
दोन्ही ऐका -
पं. संजीव अभ्यंकर - https://www.youtube.com/watch?v=elHAJ4_ZyxU
सुरेश वाडकर - https://www.youtube.com/watch?v=qnjFM1SPDOE
गाण्याबाबत आयडूला
गाण्याबाबत आयडूला अनुमोदन....
टिपीकल टिनेजरवाल्यांचा सिनेमा आहे...
इथल्या 98% जनतेला पकायलाच होईल. आय गॅरेंटी इट
लीला एक पहेली पाहिला का ?
लीला एक पहेली पाहिला का ?
Pages