अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमितव ओ-२ म्हणजे प्राणवायू .. जर तोच नसेल तर प्राणीजीव आपण सगळे असू का? नाही ना.. म्हणून सुर्य आहे तोवर आपण आहोत.
----- आपण नसल्यावरही सुर्य असणार आहे... विश्वात सुर्यासारखे अब्जावधी तारे अस्तित्वात आहेत त्यामुळे आपल्या सुर्याला केन्द्र मानणे याला अजुन ठोस पुरावा नाही आहे.

Earth formed approximately 4.6 billion years ago; Life on earth began approximately 1.6 billion years later. Since the emergence of life, many kinds of organisms have evolved, flourished, and died – leaving their fossils to record their place in history.

Several million years ago, there were evolutionary beginnings for the eventual dominance of humans on Earth. Eventually we too will dis-appear.

From biological and geological point of view – we know that the ultimate fate of every species is extinction. However, the humans have accelerated this fate for many species. However, to those living now and to future generations, how we affect our environment is important.

Reference: Living in the Environment, Tyler Miller and Dave Hackett.

we know that the ultimate fate of every species is extinction. However, the humans have accelerated this fate for many species.
<<
देवी नावाचा रोग उत्पन्न करणारा एक विषाणू होता.
याला संपूर्ण मानवजातीने मिळून भयंकर प्रयत्नांनी एक्स्टिंक्ट केले.
सध्या पोलिओच्या विषाणूबद्दल तेच प्रयत्न सुरू आहेत.
डांस, ढेकूण इ. विरुद्ध असलीच कारस्थानं सुरू आहेत.

सो अंशतः सहमत. Wink humans HAVE accelerated extinction of many species.

बी, मी सध्या खूप चांगल्या मूड मध्ये आहे म्हणून तुमच्या पोस्ट ला सविस्तर उत्तर देते आहे.

जो पर्यंत सुर्य आहे तो पर्यंत पृथ्वी आहे. >> असे नाहीये. क्ष वर्षांपूर्वी सूर्य होता आणि पृथ्वी नावाचा ग्रह तयार झाला नव्हता आणि क्ष वर्षानंतर देखील सूर्य नावाचा तारा जेव्हा मरून त्याचा white dwarf होईल तेव्हा देखील पृथ्वी नावाचा ग्रह अस्तित्वात नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे विधान सपशेल चुकीचे आहे.

सुर्य हा ह्या विश्वाचा केन्द्रबिंदु आहे.>> आजिबातच नाही. ह्या विश्वाच्या अस्तित्वाचा संपूर्ण थांग अजून आपल्याला लागलेला नाही. सूर्य आणि आपली ग्रहमाला ही milky way ह्या आकाशगंगेचा हिस्सा आहेत. सूर्यासारखे कोट्यावधी तारे ह्या आकाशगंगेत आहेत आणि अशा लाखो आकाशगंगा ह्या विश्वात आहेत.

डायनासोर हे सगळीकडे नव्हते. त्यामुळे ते नष्ट झालेत. त्यांची संख्या फार नव्हती.>> पृथ्वीच्या अनेक भूभागावर त्यांचे अवशेष सापडले आहेत आणि पुढची दोन्ही वाक्ये फारच हास्यास्पद आणि चुकीची आहेत.

मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. जसे की वाघ, सिंह, साप ह्यांची संख्या खूप कमी आहे. >> Really? जेवढी लोकं वाघ/सिंह मारून खातात त्यापेक्षा अनेकपट लोकं विविध विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराने मरतात. आणि हे विषाणू न मोजता येणाऱ्या प्रमाणात सगळीकडे असतात.

साप स्वतःची अंडी मागे फिरुन खात जातो. नाहीतर सांपाची संख्या केवढी तरी असती. >> सगळ्या सापांच्या जातीत हे आढळून येत नाही. आणि साप स्वतःची संख्या वाढू नये म्हणून पिल्ले मारून खातात हे विधान देखील हास्यास्पद आहे.

मी काही संशोधन केलेले नाही आणि मला वाटत इथे ह्या विषयावर इतर कुणीही संशोधन केलेले नाही. >> इतकी बेजबाबदार विधाने कृपया करू नका.

सगळे जण आपल्या मतीप्रमाणे लिहित आहेत.>> हे तुम्ही लिहिलेले एकच वाक्य खरं आणि योग्य आहे!

बी, अजून एक, तुम्ही ह्या धाग्यावर विषयाच्या अनुषंगाने एकही पोस्ट लिहिलेली नाही. उलट मागच्या काही पानांवर शाकाहार वि. मांसाहार असा बऱ्यापैकी धाग्याच्या विषयाशी अवांतर वाद घातला आहे. माझी तुम्हाला अशी नम्र विनंती आहे की जर धाग्याच्या अनुषंगाने (पर्यावरणस्नेही जीवनशैली कशी अनुसरता येईल ह्याबद्दल च्या कल्पना, तुम्ही करत असलेले उपाय ई.) काही लिहू शकलात तर आनंद आहे. नाहीतर ह्या धाग्यावर तुम्ही नाही लिहिलेत तरी माझी काही हरकत नाही.
मागे कधीतरी माझ्या विपूत तुम्ही मला ह्यापुढे माझ्या धाग्यावर येऊन लिहू नकोस असे बजावल्यापासून मी तुमच्या धाग्यांवर लिहिणे बंद केले आहे. I thought that was a mutual gesture!

जेवढी लोकं वाघ/सिंह मारून खातात त्यापेक्षा अनेकपट लोकं विविध विषाणूंमुळे होणाऱ्या आजाराने मरतात. आणि हे विषाणू न मोजता येणाऱ्या प्रमाणात सगळीकडे असतात.>> विषाणू डोळ्यानी दिसत नाहीत त्यामुळे त्यांना मारता येत नाही.

बादवे, हा धागा सार्वजनिक आहे. आणि मी मागे शाकाहाराबद्दल बोललो तो विषय ह्या विषयाची निगडीत आहे असे मला वाटते. वर एक दोन जणांनी हे मान्य देखील केले आहे की कार्बन फुटप्रिन्ट मासाहार निर्मितीमधे जास्त अस्ते. असो. मला इथे कलह निर्माण करायचा नाहीये. पण कुणी दांभिक असल की ते आवडत नाही आणि कुणाला बीलिटील केलेल रुचत नाही.

शंभर एक पोस्टी वाचायच्या बाकी आहेत. पण एक सुचलं म्हणून विचारते, ऑईल गळती किंवा ऑइल स्लज मुळे होण्यार्‍या पर्यावरण हानीवरील एक उपाय म्हणून 'OiliVorous Technology' बद्दल लिहिलं आहे का कुणी?

विषाणू डोळ्यानी दिसत नाहीत त्यामुळे त्यांना मारता येत नाही.>>

तुमच्या अंगावर एखादी चावरी लाल मुंगी चढली आणि ती तुमचा चावा घेत असेल तर ती तुम्ही पाहू शकता, तिला मारु शकता, तिला अंगावरुन ढकलू शकता!!! पण एखादा विषाणू तुम्हाला आजारी बनवत असेल तर तो तुम्ही मारु शकत नाही. तो नक्की कुठे आहे हे तुम्हाला कळणार नाही कारण विषाणू हे उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही. शिवाय विषाणू हे बहुतेकदा थेट शरिराच्या आत प्रवेश करतात. त्याअर्थाने मी वरील वाक्य लिहिले आहे.

मृणाला, मग काय फक्त पाणी, शिळे अन्न, मेणकापडी बॅग ह्यावरच चर्चा करायची का? एखादा विषय चर्चा करताना त्याला अनेक फाटे फुटु शकतात. त्या अनुषंगाने मग लिहावेच लागते. तुम्ही तुमचे मुद्दे मांडा की.. चुकलात तर फार फार लोक हसतील. त्याची इतकी भिती कशाला.

ण एखादा विषाणू तुम्हाला आजारी बनवत असेल तर तो तुम्ही मारु शकत नाही. तो नक्की कुठे आहे हे तुम्हाला कळणार नाही कारण विषाणू हे उघड्या डोळ्यांनी आपण बघू शकत नाही >>
धन्य आहेस बी. डोळ्यांना न दिसणार्‍या जिवाणूंचा प्रतिकार करणार्‍या पेनिसिलिनचा शोध लागून कित्येक दशके लोटली, एडवर्ड जेनर ने स्मॉलपॉक्स विरोधात लस कशी वापरता येते ते सिद्ध केलं, त्याला जवळपास २०० वर्षे झाली अन तू अजून विषाणू उघड्या डोळ्यांना दिसत नाही म्हणून मारता येत नाही अशी विधानं करतोस ? अन वरुन माझा या विषयाचा अभ्यास आहे म्हणतोस !

तुझे शाकाहारी असणे हे सुद्धा फक्त किंवा लार्जली पर्यावरण स्नेही जीवन शैली म्हणून अंगिकारलेले आहस् का ?
की लहानपाणापासून काही कारणाने शाकाहारी आहेस अन इथे तिथे वाचून त्या पद्धतीच्या आहारचे कार्बन फूट प्रिंट काही देशातील प्रा़णिज अन्न उत्पादना पेक्षा कमी आहे हे तुला कळले अन तु त्याचे क्रेडिट घेतो आहेस ?

इ काकांनी दिलेल्या आरशाची तुला नितांत गरज आहे ...

साप स्वतःची अंडी मागे फिरुन खात जातो. नाहीतर सांपाची संख्या केवढी तरी असती. >>> कोणत्याही प्राण्यांध्ये जेनेटिक प्रोग्रॅम असतो ज्यायोगे आपला वंश पुढे कसा जाईल हे प्रत्येक प्रजाती पहात असते त्यामुले साप स्वतःची अंडी खातो, मांजर स्वतःचे पिल्लू मारून खाते किंवा अशा प्रकारच्या कोणत्याही विधानात काही तथ्य नाही.

पण मुळात बी चे विधान आहे की हानी (?) करणारे जीव/ प्रजाती संख्येने कमी असतात. त्याचे काय झाले ? विषाणु दिसत नसण्याचा काय संबंध त्याच्याशी ?

पेनिसिलीनने विषाणू मरतात? कुठले?
Wink
(मेधा यांनी पोस्ट संपादन केल्याने आता माझे हे वाक्य आणि स्माईली निरर्थक ठरतायत. म्हणून ही भर. 'पेनिसीलीनने जीवाणू मरतात.' बरोबर आहे.)
बी यांना असे म्हणायचे आहे की 'चला आता चारपाच हज्जार विषाणूंची शिकार करूया' असे म्हणत शक्यतो कुणी विषाणू मारायला निघत नाही.
फार्फार तर लसीकरणामुळे देवी, पोलिओ असे विषाणू बर्‍यापैकी नष्टं करण्यात आपल्याला यश आलेय. (असे आपल्याला वाटते, कुठे डॉर्मंट्/चेंज्ड कॉन्फिगरेशनमध्ये हे विषाणू शिल्लक नसतील असे नाही, पोलिओचे तर आहेतच)

पण वाघ त्रासदायक आहे म्हणून त्याची शिकार होते.
इथे माबोवरच नरभक्षक/ त्रासदायक वाघांच्या शिकारीवर स्पार्टाकस यांची सिरीज होती.

असो.

वाघ त्रासदायक आहे म्हणून त्याची शिकार होते. >> सिरियसली???? मला वाटले त्याच्या सुंदर (!)कातडीसाठी शिकार होते! कातडीसाठी अन खेळ म्हणून किती शिकार होते अन नरभक्षक झाले म्हणून शिकार होण्याचे तुलनात्मक प्रमाण किती आहे?
अन तसेही मुद्दा तो नाहीच आहे. बीचे स्टेटमेन्ट, ज्याबद्दल त्याला विचारलेय , ते वेगळेच आहे.

हानी (?) करणारे जीव/ प्रजाती संख्येने कमी असतात. >>> माणूस सोडला तर निसर्गाची आणि त्यायोगे स्वतःच्या आणि इतरही प्रजातींची एवढी हानी कोण करत असेल???? पण माणसांची संख्या तर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे Happy

बी यांना असे म्हणायचे आहे की 'चला आता चारपाच हज्जार विषाणूंची शिकार करूया' असे म्हणत शक्यतो कुणी विषाणू मारायला निघत नाही. .... पण वाघ त्रासदायक आहे म्हणून त्याची शिकार होते. >> वाघ त्रासदायक म्हणजे नेमके काय ? लोकांनी त्यांच्या परीसरात अतिक्रमण केले म्हणून त्यांच्यावर हल्ले चढवले हे ? बी चे मूळ विधान "मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. जसे की वाघ, सिंह, साप ह्यांची संख्या खूप कमी आहे." हे आहे. ह्यातले कोणते नक्की माणसाला त्रास देण्यासाठी स्वतःहून येतात नक्की ? ह्यातले कोणते प्राणी 'चला आज माणसांची शिकार करू या' असे म्हणत निघतात ? नि ते नक्की कशामूळे त्रासदायक आहेत ?

त्रासदायक म्हणजे इतरांना मारून खाणारे/हल्ला करणारे असे बी यांना म्हणायचे असावे.
म्हणजे अमुक इतक्या हर्बिओरससाठी अमुक इतके कार्निओरस असे प्रमाण (माणूस सोडून)
वाघ, वाघाचे परिक्षेत्र, अमुक इतक्या वन्यपरिक्षेत्रासाठी वाघांची संख्या असे एक प्रमाण ठरलेले असते.
चितमपल्ली वगैरेंच्या लेखात किंवा वाघांबद्दल माहिती दे णार्‍या कुठल्याही वाईल्ड लाईफविअह्हयक पुस्तकात सापडेल.
माणसाचे तसे नाही.
माणसे (सध्यातरी) अनियंत्रित वाढतायत.
Wink

>>लाडिक पिपाणी ब्यांड Lol

इब्लिस लिवा. तुमच्या नाही तर बुवांच्या अक्कानं विनंती केलीय म्हणून लिवा! Proud

Pages