अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आधी मी माझे अनुभव लिहीतो व त्या अनुभवांवरून बोध घेत मी माझ्या वाहनविषयक सवयी कशा बनविल्या आहेत ते इथे मांडतो.

अनुभव क्रमांक १ / वर्ष २००३ :- माझ्यापाशी देवू कंपनीचे सिएलो हे वाहन होते. यात एसी + पॉवर स्टीअरिंग + पॉवर विण्डोज् आदी वैशिष्ट्ये होती. एकदा चिंचवड येथील रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनाला रस्त्यावरील दगडाचा धक्का बसून पॉवर स्टीअरिंगचे ऑईल वाहून नेणारा एक इंग्रजी झेड आकारासारखा पाईप फुटला. पॉवर स्टीअरिंगकरिता लागणारे ऑईल सांडून गेले. वाहन रस्त्यावरच थांबून राहिले. स्टीअरिंग अजिबात हलविता येत नव्हते. त्यानंतर वाहन दुसर्‍या वाहनाच्या साहाय्याने खेचून आणावे लागले. दोन आठवडे शोधाशोध करूनही तो पाईपचा तसा झेड आकाराचा तुकडा कुठेच मिळाला नाही. शेवटी त्याच पाईपच्या तुकड्याला विशिष्ट रसायन वापरून चिटकवून ठीक केले आणि वाहन दुरुस्त केले. तरीही दोन लिटर पॉवर स्टीअरिंग ऑईल वाया गेल्याचे दु:ख झालेच. त्यानंतर वाहनाच्या एसी व पॉवर विण्डोज् नी देखील वेळोवेळी असाच त्रास दिला.

अनुभव क्रमांक २ / वर्ष २००७ :- मी मरापच्या बसने पुणे ते अहमदनगर असा प्रवास करीत होतो. बस थेट यावल पर्यंत जाणारी होती. मला दुसर्‍या कोणाच्या वाहन चालवण्यावर फारसा भरोसा नसल्याने मी सहसा वाहनचालकाच्या शेजारील आसनावरच बसतो. तेव्हाही तसाच वाहनचालकाच्या शेजारील आसनावर मी होतो. मी स्वतःहून चालकाशी बोलणे टाळतो. परंतु तो स्वतःच माझ्याशी बोलत असल्याने त्याच्याशी संवाद चालला होता. त्याचप्रमाणे रस्त्यावर आणि त्याच्या वाहन चालविण्यावरदेखील लक्ष ठेवून होतो. अचानक रांजणगावपाशी कसलातरी मोठा आवाज आला आणि हलकासा धक्काही बसला. त्यानंतर स्टीअरिंग फिरवायला वाहनचालकाला त्रास होत असल्याचे मला जाणवला. माझ्या वाहनाचा मला अनुभव असल्याने मी त्याला वाहन थांबवून तपासणी करण्यास सुचविले. त्याप्रमाणे त्याने तसे केले असता माझी शंका खरी ठरली. टाटा बनावटीच्या त्या बसचा पॉवर स्टीअरिंगचे ऑईल वाहून नेणारा एक पाईपचा तुकडा फुटला होता आणि त्यातून ऑईल गळत होते. वाहनचालकाने माझ्या सूचनेप्रमाणे लगेचच तिथे एक जाडजुड कापड बांधले. त्यामुळे ऑईल जरी गळत असले तरी गळतीचे प्रमाण बरेच मंदावले होते. पुढे बस तशीच शिरूर आगारात शिरली. तिथल्या कार्यशाळेत तो पाईपचा तुकडा उपलब्ध नव्हता. मग शिरूर गावात असलेल्या बाफना मोटर्स या टाटा सेवा केंद्रातही विचारणा करण्यात आली. तिथेही तो तुकडा नव्हता. या सगळ्यात तासभर उशीर झाला. प्रवासी संतप्त होऊ लागले होते. मग शेवटी वाहनचालकाने पाच लिटरचा कॅन भरून कार्यशाळेतून पॉवर स्टीअरिंग ऑईल घेतले आणि बसच्या पॉवर स्टीअरिंग ऑईल टाकीलादेखील टॉप-अप करून घेतले. पुढे बस अहमदनगरला पोचली. तेव्हा त्याने पुन्हा कॅनमधून पॉवर स्टीअरिंग ऑईल टँक टॉप अप केला तेव्हा साधारण पाऊण लिटर ऑईल त्यात अजून टाकावे लागले. या हिशेबाने यावलला पोचेपर्यंत पाच लिटरचा कॅन आरामात पुरेल असे गणित त्याने मांडले. ही सरळ सरळ पर्यावरणाची हानी असली तरी प्रवाशांच्या वेळेचा खोळंबा करून दुरुस्ती करण्यापेक्षा अधिक व्यवहार्य पर्याय असल्याचे त्याचे मत होते. मी अहमदनगरलाच उतरल्याने पुढे बस यावलपर्यंत व्यवस्थित पोचली की नाही हे मला कळू शकले नाही.

या दोन अनुभवांवरून बोध घेत मी २०१० साली वाहन खरेदी करताना कटाक्षाने पॉवर स्टीअरिंग नसलेले वाहन खरेदी करण्यावर भर दिला. त्याचप्रमाणे पॉवर विण्डोज करिता ऊर्जा खर्च होते, शिवाय कधी दुरुस्तीचा प्रसंग आलाच तर किमान दोनहजार रुपयांचा भुर्दंड असा विचार करून शंभर रुपयात दुरुस्त होणारी मॅन्युअल ऑपरेशन वाली साधी खिडकीची काच असेल हेदेखील आवर्जून पाहिले. एसी गॅस लिकेज च्या प्रकरणात आधी सिएलोला बराच खर्च झाल्याने वाहन मुद्दामच नॉनए/सी निवडले आणि वाहनाची चार वर्षांची वॉरंटी संपल्यावर आता तर २०१४ मध्ये त्यात सीएनजी किट देखील बसवून घेतले. शिवाय ३५ अश्वशक्ती / ८०० सीसी व ८ आसन क्षमता असल्याने अनावश्यक उर्जा अपव्यय देखील या वाहनात होत नाही.

वर जीवजातींचा र्‍हास या विषयावर चर्चा चालू आहे त्या अनुषंगाने याच विषयावरचे एक पुस्तक मागल्याच आठवड्यात वाचले. ज्यांना उत्सुकता आहे त्यांच्यासाठी: http://www.amazon.com/The-Sixth-Extinction-Unnatural-History/dp/0805092994

माबोवरच्या कुप्रसिद्धीमुळे म्हणा किंवा ख्यातीमुळे, बी चे काहि मुद्दे, आर गेटिंग ब्लोन आउट ऑफ प्रपोर्शन; असं माझं प्रामाणिक मत आहे... Happy

माझे त्याच्या उलट मत आहे. हेच मुद्दे काउ किंवा तत्सम आयडीने, इव्हन ऋन्मेष ने लिहिले असते तर ? एव्हाना धुवाधार झोडपलं असतं पब्लिक ने!

पॉवर स्टिअरिंग अन ऑइल गळण्याचा अनुभव. लै भारी.

मला एक समजत नाही, मुळातच पर्यावरणाचा र्‍हास करणारे, पेट्रोल जाळणारे वाहन का विकत घेतले? सायकल, किंवा गेला बाजार घोडागाडी, बैलगाडीचा पर्याय विचारात घेण्यास काय हरकत होती.

सायकलच्या चेन ला ऑईल लागतेच ना! बैल्गाडीच्या चाकांनाही वंगण म्हणून ग्रीस लागतेच की. बैलांनाही खायला चारा लागतोच. गवत कापून पर्यावरणाचा र्‍हास नाही का होणार? Wink

वाघ त्रासदायक म्हणजे नेमके काय ? लोकांनी त्यांच्या परीसरात अतिक्रमण केले म्हणून त्यांच्यावर हल्ले चढवले हे ? बी चे मूळ विधान "मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. जसे की वाघ, सिंह, साप ह्यांची संख्या खूप कमी आहे." हे आहे. ह्यातले कोणते नक्की माणसाला त्रास देण्यासाठी स्वतःहून येतात नक्की ? ह्यातले कोणते प्राणी 'चला आज माणसांची शिकार करू या' असे म्हणत निघतात ? नि ते नक्की कशामूळे त्रासदायक आहेत ?

>>

असामी, हे प्राणी माणसाला त्रास देतात असे नाही म्हणालो मी. जगंलात इतर प्राण्यांना ह्या प्राण्यांपासून स्वत:चा बचाव करावा लागतो. जर वाघांची संख्या खूप जास्त झाली तर फक्त वाघच वाघ दिसतील जंगलात. त्यामुळे माझ्या ज्ञानानुसार वाघांची संख्या इतर बहुतेक प्राण्यांपेक्षा मुळातच कमी होती. ती शिकार आणि अजून काही कारणांमुळे अजून घटली.

साति, तुझे बरोबर आहे. लस देऊन जिवाणू/विषाणू मरतात पण आपण स्वतः आपल्यामधे जिवाणू / विषाणू शोधून त्यांना मारु शकत नाही हा अर्थ मला अभिप्रेत होता. खरे तर अटकाव .. प्रतिबंध करु शकतो. नियमित स्नान करणे, प्राणायाम करणे, ताजे अन्न खाणे, स्वच्छता पाळणे हे इतके केले की बर्‍यापैकी आपण ह्या न दिसणार्‍या हानीकारण विषाणू/जिवाणू पासून दुर राहू शकतो. धन्यवाद.

>>हेच मुद्दे काउ किंवा तत्सम आयडीने, इव्हन ऋन्मेष ने लिहिले असते तर ? एव्हाना धुवाधार झोडपलं असतं पब्लिक ने<<

हा हा. ऋन्मेषचं माहित नाहि, परंतु काऊ आणि त्यांच्यासारखे आय्डीज (यु नो हु) हॅव वॉलंटरीली टर्न्ड देमसेल्व्ह्स इंटु ए पंचिंग बॅग, मग धुलाई होणारच.

अ‍ॅज फार अ‍ॅज आय नो, अन्लाइक काऊ, बी डजंट कॅरी एनी हिडन अजेंडा... Happy

इब्लिस, तुमच्या सारखा मी डॉ नाही पण जे काही चुकीचे वा बरोबर माहिती आहे ती न कचरता लिहायची क्षमता आहे माझ्यात. हे असे इतरांचे वाक्य कॉपी करुन अवाक होण्यात तुम्हाला फार फार रस आहे. खूपदा तुम्ही कट पेस्टच करत राहता Happy

बी,

तुम्ही मजा म्हणून लिहिता की सिरियसली हे समजत नाही (मला) , पण येथील कमेंट्स ग्राह्य नाही आहेत.

क्षमा करा.

ईब्लिस मस्त लिहिलय
हे मी २ पान आधीच्या पोस्ट ला लिहिलेले. प्रतिसाद वाचुन लिहेपर्यंत बरच काही घडल होत :))

न कचारता चुकीचे लिहू नये , लिहिलेच तर त्याबद्दल थोडी वरम दाखवावी, पुरावे दिले तरी तीच चुक करत राहू नये ही अपेक्षा असते.

धगकर्तिला विपु करून सांगायचे की माझ्या धाग्यावर लिहू नकोस. मग माबो पब्लिक फोरम आहे असे म्हणायचे व इथे वाट्टेल ते लिहित सुटायचे. नवखे आहात का तुम्ही?

I am amazed @ how many times you get away with pretending to be naive and simple.

कुणी हास्यास्पद लिहिले तर मी हसून दाखवतो. बाकी चालू दया.

लस देऊन जिवाणू/विषाणू मरतात पण आपण स्वतः आपल्यामधे जिवाणू / विषाणू शोधून त्यांना मारु शकत नाही हा अर्थ मला अभिप्रेत होता. खरे तर अटकाव .. प्रतिबंध करु शकतो. >>> मुळात आपल्यामधले सगळेच जिवाणू/विषाणू मारायची गरज नसते. किंबहुना काहींच काम 'डीफेन्स' किंवा ' इम्युनिटी बिल्ड' करणं हेच असतं. किंबहुना ते तसे 'आवश्यकता नसताना ओव्हरप्रोटेक्शनच्या 'हव्यासापायी' मारलेत माणसाने... ज्याचे परिणाम तेच ऑरगॅनिझम्स फॉर्म बदलून, नव्या नव्या स्वरुपात येतात... आणि इम्यूनीटीच्या ऐवजी आपण रेसिस्टन्स बिल्ड केल्याने, रोगांचे प्रकार आणि स्प्रेड वाढतो/वाढतोय !
ह्या 'मायक्रोऑरगॅनिझम्स' च्या लेव्हलला पर्यावरणाचा 'ऑफ बॅलन्स' आता करेक्शनच्या पलीकडे गेला आहे... त्यामुळे पाणी, वीज संपायच्या भीती इतकीच 'कॉलनी वाईप आऊट करण्याची किंवा रोगट बनवण्याची कपॅसिटी असलेले ' (आपणच ओढवून घेतलेले ) आजार ह्याची भीती न दिसणारी/जाणवणारी असली तरी खूप जास्त आहे.

खुप चांगल्या विषयावर चाललेला धागा भरकटतो का आहे?
मी सुरवातिपासुन हा धागा वाचते आहे व माझ्या दैनंदिन जिवनातिल बर्‍याच गोष्टित मी बदल केलेला आहे.

सुरेख, हा धागा वाचून तू कुठल्या गोष्टीत बदल केला हे थोडक्यात लिहि वेळ असल्यास निदान मला तरी प्रेरणा मिळेल.

रार, छान पोष्ट. हो सगळेच बॅक्टेरिया हानीकारक नसतात.

Admin, धन्यवाद!
वेका, तुझे आभार! तुझ्या गिफ्ट्स देण्याच्या कल्पनांवरून मी आता लहान मुलांना शक्यतोवर खेळणी/कपडे न देता काहीतरी खाण्याच्या गोष्टी द्यायचे ठरवले आहे. अनेक वेळा अति-खेळणी/कपडे घरी असतात त्यात एकाने भर पडण्याखेरीज त्या गिफ्टचा उपयोग होत नाही. आत्ताच माझ्या मैत्रिणीच्या मुलीला मनुका खूप आवडतात म्हणून तिच्यासाठी मनुकांचे पाकीट घेऊन गेले होते. तिने खूप आवडीने खाल्ले! मला छान वाटलं Happy

मला अजून एक गोष्ट लक्षात आली की वैयक्तिक पातळीवरून एका ग्रुपच्या पातळीवर प्रयत्न कसे नेता येतील ह्या बद्दलच्या कल्पना पण इथे लिहूया. बरेचदा ज्या गोष्टी आपल्याला पटतात त्या सगळ्यांना करायला प्रवृत्त करणे हे कौशल्याचे काम आहे. जरी तत्वतः आपण म्हणतोय ते योग्य असेल तरी convenient नसेल तर ग्रुपला convince कसे करायचे? जितक्या जास्त प्रमाणात ही पर्यावरणस्नेही जीवनशैली आचरणात येईल तितक्या जास्त प्रमाणात त्याचे फायदे होतील!

काहीतरी खाण्याच्या गोष्टी द्यायचे ठरवले आहे.
---- आम्ही फळे नेतो (कुणी आणले तर आवडते असेही सुचवतो - चॉकलेट पेक्षा चान्गले), लहान मुल्लाना गिफ्ट कार्डस किव्वा खेळण्यासोबत गिफ्टची पावती (परत करुन आवडीचे दुसरे आणणे हा पर्याय रहातो).

मुलान्चे रोजचे वापरात नसणारे, खास समारम्भासाठीन्चे अत्यन्त महागडे कपडे वर्षामधुन केवळ २-३ वेळा वापरले जातात - असे कपडे आवर्जुन रिसायकल करतो. कपडे देताना स्वच्छ धुतलेले, आणि शक्य असल्यास प्रेस करुन देणे असा पयत्न असतो - घेणार्‍याला पण प्रसन्न वाटायला हवे.

वरदा, OiliVorous Technology बद्दल थोडे...

(बरेच इंग्लिश शब्द वापरावे लागत आहेत त्याबद्दल क्षमस्व) ------

तेल उद्योगात रिफायनरीज, पाईपलाईन्स आणि इन्स्टॉलेशन्समध्ये स्लज खूप प्रमाणात निर्माण होतो. तो जाळून टाकणे ही पारंपारिक पद्धत काही स्लज जनरेटर्स वापरतात. पण स्लजमध्ये हेवी रेसिड्यू आणि सल्फर असल्याने हझार्डस गॅसेस तयार होतात व हा ऑप्शन पर्यावरणाशी संबंधित संस्थांच्या नजरे खाली होता. पण ह्या प्रश्नावर OiliVorous Technology ही एक बायोटेक रेमेडी आहे. स्लज (historical sludge accumulation in both upstream and downstream sectors of Oil industry), Oil spill on land, contaminated soil ह्यावर bio-remediation म्हणून ही टेक्नॉलॉजी उपयुक्त आहे.

Bio-remediation is an enzyme mediated oxidation process like chemical oxidation, conducted by microbes. This capability of microbes can be harnessed by introducing the selected biological agents i.e. bacteria and fungi, into the contaminants and when their growth conditions are suitably optimised, the eat-up mostly organic compounds.

ही पद्धत खालील ठिकाणी वापरली जाते ---

१) ऑइल रिफायनरीज मध्ये क्रूड ऑइलच्या टाक्यांच्या तळाशी जमणार्‍या गाळावर
२) इन्स्टॉलेशन्सच्या ठिकाणी इंधन साठवणीच्या मोठ्या टाक्यांमध्ये
३) पाईपलाईन्स इन्स्टॉलेशन्समध्ये
४) तेल उत्खनन करताना ड्रिल कटिंग्स आणि ऑइल स्पिल्स होतात त्या ठिकाणी
५) अपघाती तेल गळती झाली असेल तर प्रदुषित मातीत

हजारो मेट्रिक टनचा स्लज ट्रिट केला जातो.

OiliVorous products मध्ये नैसर्गिक isolates वापरले जातात. जेनेटिकली मॉडिफाईड काही वापरले जात नाही. वापरायला सोपे आणि पॅथोजन्स नसलेले ऑर्गॅनिझम्स वापरले जातात. त्यांची खूप विस्तृत रेंजचे हायड्रोकार्बन कंटॅमिनंट्स (including organosulfur compounds) डिग्रेड करायची उत्तम क्षमता असते. हे मायक्रोब्स एखाद्या इनर्ट, बायोडिग्रेडेबल आणि स्वस्त अश्या कॅरियर मटेरियलवर सहज अ‍ॅड्सोर्ब होऊ शकतात.

Bio-remediation.... छान माहिती अश्विनी.

याच धर्तीवर Bio-leaching प्रक्रिया आहे. खाणीतुन बाहेर काढलेल्या Ore (माती) material मधुन खनिजे, धातू वेगळे करताना मोठ्या प्रमाणावर रसायनान्चा वापर होतो. या घातक रसायनान्ना पर्याय म्हणुन बॅक्टेरियाचा वापर करता येतो का यावर सन्शोधन सुरु आहे.

चांगली माहीती अश्वीनी.
यावरुन आठवले, य वर्षांपूर्वी माझ्या नवर्‍याचे संशोधन बॅक्टेरीया लिचिंगमधे होते.

Pages