अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे दोन आणे

वह्या/ कागद वाचवण्यासाठी.

मी पहिल्या वर्षात जाताना जे रिपीट होणारे आणि मोठे विषय आहेत (फाऊनडेशन सोडून) त्यांच्यासाठी केस बाउंडच्या २५० पेक्षा जास्त असलेल्या वह्या घेतल्या, प्रत्येक विषयासाठी एक. मग त्याच वह्या पुढे पुढे सेमीस्टर्सला वापरत राहिले. याचा एक फायदा होतो कि मागच्या सेमचं काही बघायचं झालं कि नुसती पानं पालटली तरी काम झाले, परत ती दुसरी वही बघा, एकच वही असेल सगळ्याला तर अजूनच गोंधळ!

टार्गेट तिसर्या वर्षाचं होतं कारण टीवायला एकाच विषयाचे ६ पेपर द्यायचे आधीच ठरलेले. तर या वाह्यांपैकी २ विषयांच्या वह्या चार सेमीस्टर्स मध्ये संपल्या. उरलेली एक अर्धवट होती, दुसरीची थोडीच पानं वापरलेली आणि तशीच पानं असलेल्या अजून दोन वह्या पडून होत्या.

मग या सगळ्या उरलेल्या वह्यांची पानं वेगळी करून दोन जम्बो स्पायरल बनवून घेतल्या. (अली एक्प्रेस वरच्या वह्यांवर जरा लट्टू झालेले पण कंट्रोल केलं कसबसं तेवढीच कागद आणि पैश्यांची बचत Wink )

वापरली गेलेली पानं तशीच ठेवलेत कारण त्यातही काही नोट्स आहेत.

तिसऱ्या सेमनंतर थोडे थोडे डॉक मध्ये पण नोट्स काढायला सुरवात केली.
पण तरी हाताखालून खरडायची सवय सुटल्या सुटत नाही आणि सोडवतही नाही.

पर्यावरण प्रेमी मित्रांनो,
आपण करीत असलेल्या सर्व उपयुक्त गोष्टी जरूर करीत रहा. आपल्या सर्वांसाठी एडमंड बर्क यांचे पुढील वाक्य प्रेरणादायी आहे :
मी एकट्याने केल्याने काय होणार आहे असे म्हणून जो काहीच करीत नाही तो ती सर्वात मोठी चूक करतो.

मी आता कोणतीही भेटवस्तू गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळून द्यायची नाही असं ठरवलंय. देणारे व घेणारे दोघांचाही वेळ तर वाचतोच शिवाय घरात उगीच साठवला जाणारा कचरा कमी. Happy

यावरून सुचलं.

रीयुजेबल गिफ्ट रॅपिंग करता येणार नाही का? काहीवेळा मला अशा सुंदर जाळीच्या कापडी बटव्यांसारख्या पिशव्यांत गिफ्ट्स मिळतात. त्या लाल-सोनेरी पिशव्या नुसत्याच वापरायला वा इतर कुणाला गिफ्ट देताना पुन्हा वापरायला छान असतात.

माझ्यामते तर गिफ्ट रॅपींग नाही, तर गिफ्ट देखील रीयुस करायला हरकत नाही. (ती गोष्ट तुमच्याकडे असेल, तरी केवळ गिप्ट मिळाली आहे म्हणून ठेवली जाते अनेकदा. त्यामागचं कारण नीट सांगीतलं की गिफ्ट देणाराही हर्ट होत नाही.. )

एक अतीशय छोटीशी गोष्ट - (आधीच येउन गेली असल्यास कल्पना नाही.)

कारचा एसी बंद केल्यानंतरही ब्लोवरमधून पुढची २-३ मिनीटं तरी थंड हवा येत रहाते. त्यामुळे मी उतरायची वेळ जवळ आली की साधारण २-३ मिनीट आधीच एसी बंद करतो, फक्त ब्लोवर चालू ठेवतो. त्यामुळे काँप्रेसरने काँप्रेस केलेलं रेफ्रीजरंट पूर्ण वापरलं जातं.

इब्लिस, हो ते बटवे फारच सुंदर असतात. पण काही गोष्टी बॉक्समध्ये असतात उदा. खेळणी, क्रोकरी, फ्रेम त्याला आणखी गिफ्ट पेपरने गुंडाळत बसणे गरजेचे नाही असे मला वाटते.
रार, म्हणजे तू ते गिफ्ट सौम्यपणे नाकारायचे म्हणतेस का? जनरली मी ते ठेवून देते आणि वेळप्रसंगी दुसर्या कुणाला तरी देते. यात कुणी हर्ट व्हायची शक्यता कमी शिवाय आपला गिफ्ट आणण्याचा वेळ, शक्ती वाचते. अर्थात, तोवर ते सांभाळून ठेवायची व्यवस्था बघावी लागते.

मस्त आयडिया मंदार.

१) गिफ्ट वर्तमानपत्रातही नीट रॅप करता येते. व सुतळीने बांधायची आणि क्रेयॉन ने रंगीत फुले काढायची.
२) वर्तमान पत्र पायपुसणे किंवा पाणी टिपायला वापरता येतात. घरी एसी लावल्यास कधी कधी पाणी टिप्टिप गळत लीक होते ते सोक करायला वर्तमान पत्र उपयोगी पडते.
३) पाले भाज्या वर्तमानपत्रात रॅप करून फ्रिजात ठेवता येतात.
४) माझ्याकडे घराला पडदे लावायला ओनरची परवानगी नाही. पण मोठ्या ग्लास विंडोज व एक भिंत पूर्ण काचेचीच असल्याने भरपूर तापते. ते कमी करयला मी वर्तमान पत्रे टेपने लावली आहेत. खूप फरक पडतो. व मुंबईचा पाउस सुरू झाला की पेपर काढून टाकले की काम झाले. हे दिसायला खास दिसत नाही पण इट वर्क्स.

मंदार
तुम्ही सांगितलंय त्यात एसी पॉवर एफिशियंटली वापरली जाण्यापेक्षा अजून एक चांगली गोष्ट होते, ती म्हणजे सडन टेंपरेचर व्हेरिएशनला सामोरे जावे लागत नाही. अती थंड खोलीतून अचानक उन्हात वा उलट प्रकारे गेल्यास चक्कर येणे व सर्दी/नाक चोंदणे हे दोन प्रकार उद्भवू शकतात.
गाडीच नव्हे, कन्सल्टिंग रूममधूनही बाहेर जाण्याआधी काही वेळ मी एसी बंद करतो, व बाहेरच्या उन्हात अचानक जाणे टाळतो.

गाडीच नव्हे, कन्सल्टिंग रूममधूनही बाहेर जाण्याआधी काही वेळ मी एसी बंद करतो, व बाहेरच्या उन्हात अचानक जाणे टाळतो.>>>
हे खरं करायला हवंच. मी गाडीमध्ये हे करतोच. पण मला ऑफिसमध्ये हे कसं जमवावं हा प्रश्नच आहे. ऑफिसमध्ये सगळीकडेच एसी आहे. कसं टाळता येऊ शकेल सडन चेंज?

इथे सिंगापुरमधे, मलेशियामधे, कंबोडियामधे पाण्यात अडकलेल्या वस्तू अशा बाहेर काढल्या जातात आणि पाण्यासाठी वाट मोकळी केली जाते:

हे दोन फोटो कंबोडियासारख्या भारतापेक्षाही गरीब देशातील आहे. आपल्याकडे हा प्रकार अजून आलेला नाही/नसावा:

दारू नेहमी उच्च प्रतीची प्या. भारतात स्कॉच परवडत नाही तर मी कोणी जवळचे विदेशातून येत असतील तर मागवतो . ३० % किमतीत मिळते

१) बर्याच दारू ८ ते १५ वर्षे बनत असतात , त्यामुळे कंपन्या आसपासचे पर्यावरण , पाण्याचे उगम यांची फार काळजी घेतात.
२) हि दारू तशीच प्यावी. पाणी वाचते आणि बर्फ आणि बर्फ बनवायला लागणारी उर्जा वाचते.
३) काचेच्या ग्लासातून प्या - परत परत वापरता येतात.
४) बाटल्या show पीस म्हणून साठवतात येतात.
५) वेष्टण पण कापून साठवायला वापरात येते .
६) घरी पिल्याने बाहेर जाने होत नाही . इंधन वाचते.
७) कधी कधी खास मित्रांना बोलवून प्या ( मी मुंबईचा आहे , इथे हे सतत चालते . पुण्यात हे शक्य नाही हे माहित आहे ) . समंध सुधारतात.
८) झोप चांगली लागते , सो दिवे बंद केल्याने उर्जा वाचते.
९) कधी कधी Duty फ्री त ऑफर पण अआस्तात त्यामुळे पैसे वाचतात.
१०) मन चांगले आणि आनंदी राहते . जगाविषयी प्रेमळ भावना वाढीस लागते.

ऑफिसमध्ये सगळीकडेच एसी आहे. कसं टाळता येऊ शकेल सडन चेंज?
<<
फॉयर्/पोर्चमधे काही मिनिट घालवणे. वाटल्यास व्हॉट्सॅप चेक करून घ्या तितक्यात. Wink

मध्यंतरी मी कुठेतरी प्लॅस्टीकचे विघटन करू शकणारे बॅक्टेरिया सापडलेत असे वाचले. त्यानंतर काही वाचले नाही कुठे ? ( गूगल केल्यावर जुनेच रिपोर्ट्स दिसताहेत. )

मला तर वाटते की गिफ्ट ह्या प्रकाराकडे एकदा सगळ्यांनीच नवेपणाने पाहायला पाहिजे आहे. कदाचित गिफ्ट्सच्या नावाखाली प्रचंड वेस्टेजही होत असेल अनेक गोष्टींचे! अर्थात, रोजगार निर्मीती मात्र होत असेल.

गिफ्ट्सचे स्वरूप व गिफ्ट्सच्या पॅकिंगचे स्वरूप ह्याने कदाचित पर्यावरणाची बर्‍यापैकी हानि होत असेल.

गाडी चालवताना: बहुतेक गाड्याना RPM meter असतो. तो कोणत्याही वेळी २००० च्या वरती जाऊ न देणे (महारस्त्यावर २५०० वरती जाऊ न देणे)..
१. पेट्रोल/ गॅसची बचत होऊन गाडीचे Average आणि आयुष्य वाढते.
२. तिकीट मिळण्याची श्क्यता कमी होते.
३. समोरच्या गाडीला ठोकून अपघात होण्याची शक्यता कमी होते.
४. गाडी चालवणार्‍यावरचा ताण कमी होतो..

जिज्ञासा:
टेस्लाच्या या नव्या ब्याटरी + सोलर पॅनेल कंट्रोल प्रॉडक्टमुळे उर्जेची समीकरणे काही फार बदलणार नाहीत. अगदी मार्जिनल बदल घडून येतील असे माझे मत. कारण सौर उर्जेची इतकी विखुरलेली (डिस्ट्रिब्युटेड) निर्मिती आणि ब्याटरीद्वारे तिचं ब्यालंसिंग हि केंद्रीय (सेंट्रलाईज्ड) निर्मितीपेक्षा नेहमीच अधिक अकार्यक्षम असते (अमेरिकेसारख्या देशात तर अगदीच). असो. पण तो एक वेगळ्या धाग्याचाच विषय होईल.

जि , लिंकसाठी थँक्स. कल्पना आवडली पण...
बॅटरीची माहिती बरीचशी कळली नाही - १) ती एकदा बसवल्यावर किती वर्षे चालते? २) ती लिथियम आयन असते का? मग एवढ २ बिलियन बॅटरीज साठी लिथियम आहे का?? ३) ही बॅटरी अकार्यक्षम झाल्यावर डिस्पोज कशी होणार? ४) सेफ्टी कन्सर्न : लॅपटॉपच्या लिथीयम बॅटरीजला आग लागली तर पाणी टाकू नका सांगतात. जर अख्ख्या घराला आग लागली तर सध्याचे अग्निशमन सुविधा पुरे पडतील का??

सीमंतिनी:
तुमच्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे:
१. साधारण ५ ते ७ वर्षे.
२. हो आणि हो.
३. Standard रिसायकलिंग प्रोसेस असते.
४. हीट सोर्स ब्याटरीजवळ नसल्याने आगीची शक्यता नगण्य.

ओके थँक्यू. टेस्लाच्या गाड्या आपोआप जळाल्याच्या केसेस झाल्या होत्या. त्यावरून असले ताक फुंकून छाप प्रश्न डोक्यात येतात.

सी, चांगले प्रश्न! गाड्या जळल्याची गोष्ट मला माहिती नव्हती.
निकीत, हे माझं विशफुल थिंकिंग आहे! प्रत्यक्षात किती येईल काय माहिती!

मित्रहो, वाहनजन्य प्रदूषण हा खरेच गम्भीर विषय आहे. आज पृथ्वीवर २०० कोटी मोटारी धावत आहेत ! चिंतेचा विषय आहे हा. सर्व चारचाकी मालकांना माझे आवाहन :
अपवादात्मक परिस्तीथी वगळता कृपा करून एकट्यासाठी चारचाकी चालवू नका. ३ अथवा अधिक माणसे असतानाच हे वाहन चालवावे. आपल्या प्रतिष्ठेपेक्षा प्रदूषणाचा प्रश्न अधिक महत्वाचा आहे. निदान भारतात तरी हे पाळू या. ( अपवादात्मक प. म्हणजे उदा. गाडी देखभालीसाठी नेणे, कुटुंबीयांना स्थानकावर सोडून परतताना इ.). तसेच एकट्यासाठी 'शोफर सह कार' या चैनीचाही त्याग करावा.
सर्व वाहन चालकांनी आठवड्यातून एक दिवस ' वाहन उपवास' पाळावा व त्या दिवशी स्वताचे वाहन रस्त्यावर आणू नये. आतापर्यंत अनेकदा कंपनीतील लोकांपासून अगदी खासदारांपर्य् त असे प्रयोग होतात, त्याचे फोटो पेपरात झळकतात... आणि मग काही दिवसांनी जैसे थे होते. तेव्हा असा 'उपवास' मनापासून व कायमचा हवा! देशातले अनेक लोक आठवड्यातून एकदा 'साबूदाण्याची खिचडी खाण्याचा' उपवास नित्यनेमाने करीत असतात. पण असल्या उपवासाचा आरोग्याला शून्य फायदा असतो. उलट काही कोटी लोकांनी एक दिवस वाहन रस्त्यावर आणले नाही तर त्याचा आरोग्याला फायदा खूप आहे. जरूर विचार व कृती करा. ( मी हे कित्येक वर्षे करीत आहे.).

हा धागा मस्त आहे पण वेळ होत नाहिये सर्व एकदम वाचायला. ६ पाने झालीत.

पण त्या आधी, जिज्ञासा एक विनंती आहे. हेडर खुप मोठे होत चालले आहे. प्रत्येक पानावर पुढे गेले की खाली यायला खुप scroll वाढतो आहे. यावर सोपा उपाय म्हणजे, आलेले उपाय एका प्रतिसादात लिहुन त्या प्रतिसदाची केवळ लिंक हेडरम्धे द्यायची व त्याच प्रतिसादात भर घालत जाणे. तसे करता आले तर प्लिज पहाशील.

सुनिधी, ही छान कल्पना आहे! मला पण असंच वाटत होतं परवा की फार स्क्रोल डाऊन करायला लागतंय. मी हेडरमध्ये प्रतिसादाची लिंक कशी द्यायची ते शोधते (ह्याआधी केलं नाहीये)!

असामी ह्यांनी संकलीत केलेल्या सूचना
* फर्नेस आणि AC चा thermostat प्रोग्रॅम करून आपण ज्यावेळी घरी असू तेंव्हाच ते चालू होतील ते बघतो.
* गरम पाण्याचा हिटरचं तापमान अगदी कमी (लोअर साईड) ठेवतो.
* इनक्यांडेसंट दिवे वापरण्या विवाजी CFL/ लेड वापरतो.
* प्रींट करताना जिथे जिथे शक्य आहे तिथे डबल साईड प्रींट करणे
* घरात लिहायला, यादी करायला, निरोप लिहायला वगैरे आणि कामाच्या ठिकाणी रफ वर्क करता 'पाठकोरे' कागद वापरणे.
* junk paper mail recycle bin मधेच टाकते. घरात येणारे सगळे कागद - काचा- प्लास्टिक वेगळं करून रिसायकल करतो. गारबेज कमीतकमी टाकण्याकडे कल ठेवणे
* जाऊ तिथे कचऱ्यासाठी स्वतासोबत एक पिशवी ठेवायची.
* भांडी घासताना, दात घासताना वगैरे पाण्याचा नळ तसाच वाहता न ठेवणे.
* जुन्या शर्टांचा, टीशर्टचा वापर ओटा , फर्निचर, कार , सायकली पुसायला करणे. कार, सायकलीच्या बाबतीत २-३ वेळा घुवून अनेकदा टाकून द्यावे लागतात, पण शक्य तितका पेपर टॉवेलचा वापर कमी.
* * अति shopping (कपड़े, चपला, cosmetics) करत नाही! गरज नसताना शॉपिंग करत नाही. कमीत कमी आवश्यक तितक्याच गोष्टी विकत घेणे. घरात प्रत्येक वस्तू नवी-कोरीच आली पाहिजे, असं न करता काही प्रकारच्या वस्तू उत्तम स्थितीत कोणी विकत असेल तर ती आणतो. (किजीजी वापरतो, नको त्यावास्तु डोनेट करतो, गुडविलला चक्कर मारतो)
* डिशवाशर आणि वाशिंग मशीन पूर्ण भरल्याशिवाय वापरत नाही. ड्रायर मध्ये कपडे अर्धवट वाळवून बाहेर कपडे वाळत घालते.
* माझ्याजवळ माझी एक पाण्याची बाटली कायम असते. मी त्यात रिफील करून पाणी पिते, प्रवासात देखील शक्यतो. जेणेकरून पाण्याच्या प्लॅस्टीकच्या बाटल्यांचा वापर कमी
* ग्रोसरीला पिशव्या घेऊन जाणे. गरज असेल त्याप्रमाणे ग्रोसरी करणे ( पालेभाज्या, सॅलड, फळे लगेच संपली नाहीत तर खराब होतात). दूधाचा कॅन संपल्यावर तसाच टाकून न देता, विसळून ( rinse करून) त्यातले पाणी झाडांना घालणे (भारी वाढतात मनी प्लांट वगैरे) माझ्याकडे कडधान्य साठवायला जूस च्या काचेच्या बाटल्या आहेत. इंडियन ग्रो मधून आणलेल्या दहयाच्या डब्यांचा वापरही मी ग्रोसरी साथवायला करते
* शाळेत मुलांना सोडताना किंवा आणताना गाड़ी एक ब्लाक अलीकडे लावते.
* कार ट्रंक व कार साफ ठेवते - दर २५ किलोला १% इंधन अधिक लागते सांगतात. पब्लिक ट्रान्स्पोर्ट वापरणे. शक्य असेल तर कार पूल करणे
* स्टायरोफोमचा वापर टाळते ("टू गो" बॉक्स विशेषतः!). कॅन्ड फूड टाळते.
* सिंगल सर्विंग गोष्टी विशेषतः प्लास्टिकच्या कंटेरनमधून विकत घेतल्या जाणार्^या जमेल तेवढं टाळते.
* रेस्टरूममधे हात धुतल्यावर कमीत कमी पेपर टॉवेल वापरते.
* पार्टीत प्रत्येकाच्या ग्लास वर मार्कर ने नाव लिहिलं होतं. म्हणजे disposable cup असला तरी एकच ग्लास पूर्णवेळ वापरला जाईल. pot luck च्या वेळी किंवा इतर वेळी सुद्धा plastic cutlery शक्यतोवर वापरत नाही. त्या ऐवजी येणारी मंडळी स्वतः ताटे-वाट्या-भांडी घेऊन येतात. दोन-तीन कुटुंब असतील तर घरचीच ताटं वापरणे.
* मुलांच्या वाढदिवस्/कुठल्याही पार्ट्यांसाठी डॉलर शॉप किंवा तत्सम दुकानातल्या प्लास्टिकच्या छोट्या छोट्या वस्तु भेट म्हणून न देणे. माझ्याकडून रिटर्न गिफ्ट्स वगैरे द्यायची वेळ असेल तर बरेचदा मी ग्रोसरी बॅग दिली आहे
* ऑफिसमध्ये चहा/कॉफीसाठी स्वतःचा कप वापरणं आणि पाण्यासाठी स्वतःचा ग्लास. कुणाला ऑफिसमध्ये गिफ्ट द्यायचं असेल तर हेच कॉफी कप वगैरे सजेस्ट करते .
* कामवाल्या बाईला मोठ्ठा वाहता नळ सोडून भांडी घासायची नाहीत असे शिकवले आहे. तसेच बाल्कनीत बादल्याच्या बादल्या पाणी ओतून धुण्यापेक्षा ओल्या फडक्याने पुसून घ्यायला सांगते. मी स्वतःही भांडी घासताना पाण्याची धार शक्य तितकी कमी ठेवते.
* अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी खूप जागरुक राहते.
* लिफ्टचा वापर जागरुकपणे करते. उतरताना लिफ्ट कधीच वापरत नाही
* बिलं, रिसीट्स शक्य तेवढ्या ऑनलाईन असतील असं पाहते
* चहा/ कॉफी ढवळायला स्टरर न वापरता चमचा वापरतो. काहीही पिताना स्ट्रो न वापरता तोंडाला ग्लास लावतो.
* कामासाठी air travel बऱ्यापैकी होतो. दर वर्षी tax deadline ला सर्व एमिशन्स ऑफसेट करतो.
* Buy local, eat local
* झाडांना पाणी घालताना नळीला स्प्रे टाईप स्प्रिंकलर लावून हाताने घालतो. अगदीच स्प्रिंकलर लावायची वेळ आली तर न विसरता तो हलवतो आणि वेळेत बंद करायचा प्रयत्न करतो. स्प्रिंकलर असतील तर रेन मीटर असलेले घ्यावेत, त्यामूळे पाउस पडला तर तेही धरले जाते. नाहितरभर पावसामधे सुरू असणारे स्प्रिंकलर दिसतात. तसेच झाडांना वेगळे पाणी देण्यापेक्षा, ड्रिप ईरिगेशन असलेले पाईप वापरले तर पाण्याचा वापर अधिक कमी होतो.
* * बागेत (backyard) लॉन नाही. फक्त नेटीव झाडेच लावली आहेत. त्यामुळे त्याना पाणी घालावे लागत नाही. थोड्या भाज्या लावल्या आहेत. त्याना स्वयंपाकघरातले वापरलेले पाणी घालतो. लॉन मधे गवत हवे असल्यास शक्यतोवर native grass species वापरणे. They are not only drought tolerant but also resistant to common insects. This will reduce usage of water or any insecticides etc.
* घरात एका खोलीतून दुसरीकडे जाता-येताना दिवे, पंखे वगैरे त्या त्या वेळी बंद करणे. लाईट बंद करणे मी विसरतो, ते सुधारायला activity सेन्सर वाले स्वीच आणायचा विचार आहे. >> बाथ्रुमसारख्या जागी जिथे आपण मोजका वेळ घालवतो तिथे मोशन अ‍ॅ़टीविटीवाले वापरण्यापेक्षा टायमरवाले स्विच अधिक उपयोगी पडतात.
* जिथे शक्य होईल तिथे Advanced Power Strip वापरणे ज्या घोस्ट कंसम्प्शन थांबवू शकतात.
* आणखी एक आपण जे काही रिसायकलिंग/गो ग्रीन गोष्टी करतो ते आपल्या मुलांना आवर्जून सांगा, मोठ्यांपेक्षा ती लवकर शिकतात. ज्यांना अजीबात अवेअरनेस नसतो त्यांना रिसायकलिंगसाठी सांगणे. जिथे जिथे फीडबॅक देता येईल तिथे तिथे तो देणे.

* http://www.maayboli.com/node/17189

२२ एप्रिल २०१५ अपडेट्स
 थंडीच्या दिवसात नळाला / शावर्ला गरम पाणी येइपर्यंत वाया जाणार्‍या पाण्याबद्द्ल :
रिसर्क्युलेटिंग पंप मिळतो जो वॉटर हिटरला जोडता येतो. त्यामुळे इंस्टंटली गरम पाणे मिलतं आणि पाण्याची बचत होते.
 रियुजबेल वॉटर बॉटल शक्य तितक्या वेळा वापरतो, भान्डे घासताना सिन्क मधे नळ चालु ठेवत नाही, अगदीच चालु ठेवावा लागणार असेल तर बारिक चालु ठेवते.
 मेसीज वगैरे दुकानात इमेल रिसिट्स इन्सेड ऑफ प्रिंट हा पण एक खारीचा वाटा आहे कागद कमी वापरण्यासाठी.
 फोन, आयपॅडचे चार्जर वापरात नसताना सॉकेटमधून काढून ठेवणे. There is latent power draw in the charger, even if it isn’t plugged into a phone, or even if the phone is fully charged.
Not a lot of draw, but if you multiply it by 5-6+ chargers per home, multiplied by millions of home, it adds up. ghost/vampire/leaking/phantom power consumption म्हणतात त्याला. दर वेळी चार्जर्स काढणे तापदायक वाटत असेल तर advanced power strips मिळतात त्या वापरा. एका प्रकारात एक बटन असते ते दाबले कि नि दुसर्‍यामधे तुमचे जे मुख्य primary device (say PC) असेल ते बंद झाले कि आपोआप सगळी त्यावर अवलंबून अ॑सलेली सॉकेट्स पूर्ण बंद होतात.
 मी गेले ६- वर्ष स्टेशनरी विकत घेणं पूर्णतः थांबवलं आहे. इथे पेन, पेन्सिलींची १२-१५ चे पॅक्स मिळतात, आणि ते वर्षानुवर्ष टिकतात.
 टुथपेस्टसंपूर्णपणे वापरणे. कोल्ड क्रीम वगैरेचे कंटेनर्स मी चक्क कापते, त्यातील कोल्ड क्रीम ची लेव्हल डीस्पेंन्सर्च्या खाली गेली की. टोटल कोल्डक्रीमच्या ५-७% क्रीम तळाच्या डीस्पेन्स न होऊ शकणार्‍या भागात असतं (क्लासीक फार्मा/ कॉसमेटीक्स इंडस्ट्री गिमिक फॉर व्हॉल्यूम अ‍ॅडजस्टमेंटस). ते कोल्ड क्रीम ट्रान्फर करायला छोट्या डब्या ठेवल्या आहेत. ते संपल्याशिवाय नवीन कंटेनर ओपन करायचाच नाही. आता न सांगता घरच्यांनाही आपोआप सवय लागली आहे.
 खास करुन अमेरीकेत घरं मोठी असतात, आणि माणसं कमी. अश्यावेळी 'माणसांची जागा फर्निचरनी भरायला मला आवडत नाही'. जर गरज नसेल तर एखादी खोली पूर्णतः रिकामी राहिली तरी चालेल. उगाच खोली आहे म्हणून बेड, ड्रेसिंग टेबल, बुककेस ठेवून भरायच्या मी विरोधात आहे.
 कदाचित मेडीटेशन, विपश्यना वगैरेचा परिणाम असावा, पण फार कमी गोष्टींची गरज असते रोजच्या आयुष्यात. ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण एंजॉय करा अशी हळूहळू विचारसरणी होत गेली आहे. शिवाय एकूणच 'गरजांचा, सामानाचा पसारा' कमी केल्याने, आवरण्याचा वेळ वाचतो, एनर्जी वाचते आवराआवरीतली आणि त्या वेळात खूप इतर अ‍ॅक्टीव्हीटीज करता येतात. हे थोडसं ऑरगनायझेनशी पण निगडीत आहे. गोष्टी कमी असल्या की नीट ठेवल्या जातात, मग अचानक हव्या असल्या की नेमक्या जागी सापडतात, आणि आपोआपच लगेच दुकानात जाऊन ती गोष्ट घरात असतानाही रीपीट आणली जात नाही.
 शक्यतो ऑनलाईन/पेपरलेस बिल्सला साईन अप केले आहे. पण तरीही मेल मधे येतचं काही काही. त्यांची इन्व्हलप्स जर कोरी (अ‍ॅड्रेस, काही इनफॉर्मेशन न लिहिलेली) असतील तर साठवून ठेवते. परत एन्व्हलप वापरायची वेळ आली की ती वापरता येतात.
 शॉवर ने अघोळ करणे. बादलीत ने किंवा टब मध्ये अंघोळ केली तर पाणी भरपुर जात.
 बेसिन मध्ये एक पेला ठेवला होता आणि दात घासतना , चुळ भरतना तो पेला वाप्रयाचा. दात घासुन झाल्यावर बेसिनचा नळ सोडुन बेसिन साफ करायचे. दात घासताना नळ बंद ठेवावा.
 WC मध्ये फ्लस जर हळुच सोडला तर २.५ लिटर पाणी आणि जोरात दाबला तर ५ लिटर पाणी जायची सुविधा होती. १ नंबर ला २.५ लिटर तर दोन नंबर ला ५ लिटर पाणी वापरले जायचे.
 शक्यतो डिश वॅशर वापरला. १ दिवसाची भांडी. १४ लिटर पण्यात धुतली जातात.
 कपड्याचा ड्रायर फक्त ह्युमिड दिवसांकरताच वापरता येईल. ड्राय वेदर असेल तेव्हा गरजेचे नाहीये.
 तसेच खुप ड्राय वेदर मधे ह्युमिडीफायर वापरावा लागतो, त्याऐवजी रात्री टॉवेल वगैरे भिजवुन बेडरुममधेच एका खुर्चीवर पसरवुन वाळत घातला तर रुमची ह्युमिडीटी वाढायला मदत होते.
 डाळ तांदुळ भाज्या इत्यादी धुतलेले पाणी एका भांड्यात साठवुन स्वयंपाक झाल्यावर ते झाडांसाठी वापरता येईल.
 उन्हाळ्यात झोपताना एसी हवाच असेल तर एखाद तासाचा टायमर लावुन झोपावे. झोप लागल्यावर रुम थोडी गरम झाली तरी चालतं. रात्री मधेच गरमीने जाग आलीच तर पुन्हा एकदा एक तासाचा टायमर लावावा.
 अमेरिकेत बहुधा सोलार पॉवर एसी उपलब्ध आहेत. किंमत माहित नाही पण त्याचा विचार करता येईल.
 जिथे प्यायच्या पाण्याची टंचाई आहे पण वेदर ह्युमिड आहे तिथे वॉटर जनरेटर ( फ्रॉम एअर) वापरता येईल.
 जपानमधे असताना उन्हाळ्यात एसीचे टेंपरेचर २८ ठेवा असा सतत प्रचार केला जायचा आणि ऑफिसेसमधे तसेच तापमान राखले जायचे. एरवी आपण २२/२३/२५ असे तापमान ठेवत असु ते केवळ २८ केल्याने किती ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल याचे काहीतरी कॅलक्युलेशन होते. आणि ही गरमी सहन करण्यासाठी नेहेमीचे फुलशर्ट + टाय ला डच्चु देऊन उन्हाळ्यात कुलबिझ स्टाईल सुरु केली होती. इथे वाचा.
अशाच प्रकारचे इथेही वाचता येईल.
 एनर्जी स्टार अ‍ॅप्लायन्सेस घेणे.
 भांडी हाताने धुण्यापेक्षा डिशवॉशर वापरणे, हाताने रिन्स केली तरी बरचं पाणी लागतं त्यामुळे नुसतं खरकटं काढुन धुवायला टाकणे. प्रिरीन्स करावी जर भांडी कोरडी झाली असतील तर.
हाफ रॅक लोड ऑप्शन असलेलं नवीन डिशवॉशर घेतलयं, रोजची भांडी रोज धुतली जातात.
 डिश वॉशर रोज वापरत असाल तर हीटेड ड्राय बटन बंद करून ठेवायचं कारण ते तासभर तरी फुंकर घालत बसतं भांड्यांवर. बरीच एनर्जी वाचते.
 ड्रायिंग रॅक वापरणे जास्तीत जास्त कपडे वाळवायला. स्वेटर, फ्लिसचे कपडे आरामात बाहेर मस्त वाळतात.
 पेपर टॉवेल वापर ५-६% अगदीच जिथे गरज तिथे. २ महिने झाले घरातले पेपर टॉवेल संपुन, अजुन आणले नाहीत. डिसपोजबल खुपच कमी वापरत होतो, २५च्या वर माणसं झाली तर.
ऑफिसमधे ४-५ वर्षांपुर्वी अर्थ डे ला अ‍ॅडमिनला सांगुन डिसपोजेबल ग्लास बंद करवले, तिने सगळ्यांसाठी कॉफी मग मागविले.
 प्रत्येक रिसायकलेबल गोष्ट रिसायकल करतोच, कचर्‍याचा डबा १/४ पण भरत नाही पण रिसायकल बिन वहात असते.
 पाण्याची बाटली मागच्या वेळी कधी विकत घेतली आठवत नाही.
https://www.catalogchoice.org/
अन्वॉन्टेड मेल्स साठी इथे साईन-अप करावे लागते. मग ते लोक्स बंद करतात.
 माझ्या ऑफिसात बॅटरी अन प्रिंटर कार्त्रिज कलेक्ट करतात. मी नित्यनेमाने त्याच्यात टाकते. वीचे, एक्स बॉक्सचे रिमोट भस्म्या झाल्यागत बॅटर्या खातात . बर्‍याच लायब्ररीमधून पण अशी सोय आहे. स्टेपल्स, ऑफिस डेपो वगैरे सुद्धा रिसायकल सर्व्हिस देतात.
 हिवाळ्यात जवळपास सगळ्याच भाज्या बाहेर ठेवते. फ्रिजमधे नाही. एकतर समोर असल्याने वापरल्या जातात. शिवाय फ्रिजची उर्जा वाचते. सगळी फळे, कांदे, बटाटे, टॉमेटो, ढो. मिरची, गाजरे इत्यादी कायमच बाहेर असतात.
 नळाला सुरूवातीला येणारे गार पाणी एका जगात साठवते. ते लागेल तसे वापरता येते.
 जमेल ते सगळे रिसायकल, अपसायकल. काही १०/१५ वर्षे जुने कपडे अजुनही वापरात आहेत.
 Impulsive buying टाळण्यासाठी- यादी केल्याशिवाय खरेदीला बाहेर पडू नये! बिल करण्यापुर्वी यादीत नसलेल्या वस्तू का घेतल्या ह्याचा आढावा घ्यावा! हे मी करते!
 अजून एक भयंकर महत्वाची टीप - ग्रोसरी करायला जाताना कधीही भुकेल्या पोटी जाऊ नये! हमखास जास्ती वस्तू खरेदी केल्या जातात. भरल्या पोटी शतपावली म्हणून ग्रोसरीज कराव्यात
 इथल्या एका प्रोफेसरांनी आपल्या घरी सोलर पॅनेल्स बसवून घेतली. किती खर्च आला ते माहिती नाही पण १२ वर्षांत break even होईल असं सांगितलं आहे त्यांना. शिवाय जर त्यांनी गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण केली तर ती ग्रीड मध्ये जाऊन त्याचे क्रेडीट मिळेल. टेक्सास मध्ये दणदणीत उन्हाळा असतो! इथे घर असणाऱ्या लोकांनी ह्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही!
 अमेरिकेमधील सिझनल फळे आणि भाज्या यांची सरकारी लिस्ट इथे मिळेल. (http://snap.nal.usda.gov/nutrition-through-seasons/seasonal-produce)
 पोळ्या करून झाल्यावर तवा तापलेला असतानाच दूधाचे पातेले त्यावर ठेवणे.
 उन्हाळ्यात गार पाण्यासाठी माठ वापरणे.
 हेअर ड्रायर, वॉ. मशीन इ चा वापर अगदीच गरज असेल तेव्हा करणे.
 दुध पिशव्या धुवून किंवा रीन्स करून वाळल्या की जमवून रद्दीवाल्याला देते. त्याच बरोबर इतर अनेक प्लास्टीक रॅपर्सही देते.
 हा रिसायकलेबल कचरा ( ग्रोसरी बॅग्ज, अ‍ॅल्युमिनीयम फॉइल आणि पॅकिंग, विविध वस्तुंचे पॅकिंग - यात कार्डबोर्ड आणि प्लास्टीक मिक्स असेल तर हाताने वेगळे करुन घेते, चहाच्या कागदी डब्याच्या आत अ‍ॅल्यु. चे रॅपर असते ते काढुन रिसायकलेबल मध), सगळे कॅन्स, असलेच तर दह्याचे डबे इ. ) वेगळा ठेवला की कळत आपण किती प्लास्टीक वापरतो ते.
 माझ्याकडे मी पाला गोळा करुन ठेवतो व रोज सकाळी तोच पाला चुलीत जाळून घरातील साताठ लोकांचे आंघोळीचे पाणी तापवितो. पाला उपलब्ध असेस्तोवर हा उद्योग चालतो. पाल्याचे खड्यात पुरून खत करावे इतकी जागा माझ्याकडे नाही, तेवढे श्रम करण्यासाठी ताकद व वेळही नाही.
 घरच्या कार्यक्रमात जास्त लोक येणार असल्यास, थर्माकोल/प्लॅस्टिक/कागदी डिशेस न वापरता शक्यतो झाडाच्या पानांच्या पत्रावळीच वापरतो.
 मी वर्षातून केवळ दोन किंवा तिन वेळेसच शर्ट/प्यान्टीला इस्त्री करतो. बाकी सर्व दिवस, दोरीवर झटकून वाळत घातलेले शर्ट प्यान्ट तसेच्या तसे घेऊन वापरतो. वाळत टाकताना नीट टाकले की इस्त्रीची गरज पडत नसते.
 पाहुण्याला पाणी देखिल विचारूनच देतो. उगाच आला पाहुणा, की कर पुढे ग्लासभर पाणी असे नै करीत, कारण बरेचदा पाहुणा बाहेरुन काहि खाऊनपिऊन आलेला असतो व ग्लासभर पाण्यातील एखाद घोट घेतो वा घेतही नाही, अन तो गेला की ग्लासातील उरलेले पाणी फेकुन दिले जाते, ते वाया जाते. तेव्हा शक्यतो द्यायचि वेळ आली, तर ग्लास भरुन पुढे करण्यापेक्षा तांब्याभांडे पुढे करतो, व हवे तेवढे ओतून घ्या हे सांगतो.
 जुन्या ड्रेस पासून थोड्या मोठ्या हॅन्ड बॅग्ज शिवल्या आहेत त्या ग्रोसरीसाठी वापरते.
 स्वतःची गाडी नाही आहे त्यामूळे पूर्णतः पब्लिक ट्रान्सपोर्टवर अवलंबून आहे. शक्यतो बसचाच वापर करते. जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हाच रीक्षा, टॅक्सी वापरते.
 डीटर्जन्ट वापरत नाही. मी जेव्हा एकटा असतो तेव्हा हे साध्य होते. 'कुटुंबास' पटवणे अवघड आहे.
 अगदी साधा जुन्या जमान्यातला मोबाईल वापरतो. बराच काळ तो 'स्वीच ओफ' ही ठेवतो. आधुनिक फोन नसल्याचा न्युनगंड अजिबात नाही.
 महिन्यातील १५ दिवस स्वताचे वाहन रस्त्यावर आणत नाही. दुपारच्या वेळातील कामे बसने करतो.
 यंदापासून 'हापूस' आम्बा सोडला आहे. आ ता फक्त गावरान खाणार. ते तब्बेतीलाही चान्गले असतात.
 शाकाहारी. अंडे मात्र खातो- गावरान. अंडे सर्वांनीच खावे असे माझे मत.
 समुचित ब्लॉग चा पत्ता: http://samuchitenvirotech.blogspot.in/2015/04/samuchits-answer-to-waste-...
 या विषयाशी संबधित अकुनं लिहिलेली ब्लॉगपोस्टः ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकताhttp://iravatik.blogspot.com/2013/10/blog-post_25.html
 लडाख मधे डिझेल वर वीज पिकवली जात होती. त्या पैकी एका गावात आम्ही तीन विंड टर्बाईन्स उभारून दिले आहेत. एका इमारतीच्या भिंतींमधून पाणी खेळवलं आहे. ते एका टाकीत जमा होतं ज्यामधून विशिष्ट प्रकारच्या ऑइलच्या ट्यूब्ज फिरवल्यात. ऑईलचं तापमान सोलर पॅराबोलिक मिरर्सच्या सहाय्याने ३५० डिग्रीज प्ल्स ठेवलेलं असतं. माझे एक मित्र श्री दीपक गधिया यांनी भारतात माउंट अबू, शिर्डी आणि आता तिरुपती देवस्थानात त्याचा वापर केला आहे. शिर्डी संस्थानांत दहा हजार लोकांचा स्वयंपाक या तंत्रज्ञाने निर्माण केलेल्या वाफेवर दहा मिनिटात होतो. त्याच स्टीमवर पुढे जेवणाची भांडी काही मिनिटात स्वच्छ धुतली जातात. गरम पाण्यासाठी वीज वापरली जात नाही.
 पाण्याचे सोर्सेस शुद्ध ठेवणे, भारतातल्या पर्यावरणाला हानीकारक रूढी आणि सवयी बदलवणे यासाठी प्रयत्न करणे हे मोठे काम आहे. माझ्या मित्राने स्वखर्चाने असे काही प्रयत्न सुरू केले आहेत. नगर जिल्ह्यात आणि शिरूर तालुक्यात लोकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पुढच्या काळात जमीनीतून पाणीउपसा करणा-या बॉटलिंग प्रकल्पांविरुद्ध जनजागृती करणे, नद्यांमधे सांडपाणी सोडण्याविरुद्ध जागृती करणे ही उद्दीष्टं आहेत. इटीएफ, बायोडायजेस्टर यांच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांशी संपर्क साधून केलेल्या हालचालींना यश येत आहे. जलदूत या योजनेला सरकारी पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
 थंडीत नळातून सुरुवातीला येणारे अतिथंड पाणी हिवाळ्यात वाया जाते >> मी या मधे रुमाल, पायमोजे, अंर्तवस्त्रे वगैरे धुवुन घेतो. अगदी ५-८ सेल्सिय्स पर्यंत हा उपाय वापरता येतो. त्याखाली तापमान असेल तर ते बादलीमधेच ठेउन कमोडचा वापर झाल्यावर ओतावे. अथवा बाहेरुन आल्यावर हात पाय आणि चेहरा धुण्यास वापरावे
 मी नोकरी निमित्त बर्‍याच वेळेस फर्नि श्ड अपार्टमेंट मधे किंवा हॉटेल मधे राहतो. अशा वेळेस हातातला कचरा समोर दिसेल त्या ड्स्ट बिन मधे न टाकता प्रत्येक वेळेस नेउन टॉयलेट मधल्या डस्ट बिन मधे टाकतो ट्रॅश बॅग चा वापर कमी होतो.
 विमानप्रवासात ३०० मिली ची रिकामी बाटली सोबत बाळगतो. चेक ईन झाल्यावर भरुन घेतो. प्लॅस्तिक बाटल्या, पैसे, कागद सगळेच वाचते
 रिसायकलिंग:
ही एक लिंक सापडली. http://www.slate.com/articles/health_and_science/the_green_lantern/2009/...
ही अजून एकः http://www.care2.com/greenliving/10067.html
 लोकल गोष्टी खाणे
 पर्यावरणाला सस्टेनेबल पद्धतीने बनवलेले भाज्या, फळे, मांसाहार विकत घेणे
 Earth Hour साजरा करते. मिडीया सांगते एक तास नॉन-इसेंशियल लाईट्स बंद ठेवा. आम्ही मित्रमंडळी पूर्ण वीज वापर एक तास बंद करतो.

९ मे २०१५ अपडेट्स
मुलान्चे रोजचे वापरात नसणारे, खास समारम्भासाठीन्चे अत्यन्त महागडे कपडे वर्षामधुन केवळ २-३ वेळा वापरले जातात - असे कपडे आवर्जुन रिसायकल करतो. कपडे देताना स्वच्छ धुतलेले, आणि शक्य असल्यास प्रेस करुन देणे असा पयत्न असतो - घेणार्‍याला पण प्रसन्न वाटायला हवे.

कॉलेजमध्ये जे रिपीट होणारे आणि मोठे विषय आहेत (फाऊनडेशन सोडून) त्यांच्यासाठी केस बाउंडच्या२५० पेक्षा जास्त असलेल्या वह्या घेतल्या, प्रत्येक विषयासाठी एक. मग त्याच वह्या पुढे पुढे सेमीस्टर्सला वापरत राहिले. याचा एक फायदा होतो कि मागच्या सेमचं काही बघायचं झालं कि नुसती पानं पालटली तरी काम झाले, परत ती दुसरी वही बघा, एकच वही असेल सगळ्याला तर अजूनच गोंधळ!

आता कोणतीही भेटवस्तू गिफ्ट पेपरमध्ये गुंडाळून द्यायची नाही असं ठरवलंय. देणारे व घेणारे दोघांचाही वेळ तर वाचतोच शिवाय घरात उगीच साठवला जाणारा कचरा कमी. रीयुजेबल गिफ्ट रॅपिंग करता येईल.

कारचा एसी बंद केल्यानंतरही ब्लोवरमधून पुढची २-३ मिनीटं तरी थंड हवा येत रहाते. त्यामुळे मी उतरायची वेळ जवळ आली की साधारण २-३ मिनीट आधीच एसी बंद करतो, फक्त ब्लोवर चालू ठेवतो. त्यामुळे काँप्रेसरने काँप्रेस केलेलं रेफ्रीजरंट पूर्ण वापरलं जातं. एसी पॉवर एफिशियंटली वापरली जाण्यापेक्षा अजून एक चांगली गोष्ट होते, ती म्हणजे सडन टेंपरेचर व्हेरिएशनला सामोरे जावे लागत नाही. अती थंड खोलीतून अचानक उन्हात वा उलट प्रकारे गेल्यास चक्कर येणे व सर्दी/नाक चोंदणे हे दोन प्रकार उद्भवू शकतात.

माझ्याकडे घराला पडदे लावायला ओनरची परवानगी नाही. पण मोठ्या ग्लास विंडोज व एक भिंत पूर्ण काचेचीच असल्याने भरपूर तापते. ते कमी करयला मी वर्तमान पत्रे टेपने लावली आहेत. खूप फरक पडतो. व मुंबईचा पाउस सुरू झाला की पेपर काढून टाकले की काम झाले. हे दिसायला खास दिसत नाही पण इट वर्क्स.

गाडी चालवताना: बहुतेक गाड्याना RPM meter असतो. तो कोणत्याही वेळी २००० च्या वरती जाऊ न देणे (महारस्त्यावर २५०० वरती जाऊ न देणे)..
१. पेट्रोल/ गॅसची बचत होऊन गाडीचे Average आणि आयुष्य वाढते. २. तिकीट मिळण्याची श्क्यता कमी होते. ३. समोरच्या गाडीला ठोकून अपघात होण्याची शक्यता कमी होते. ४. गाडी चालवणार्‍यावरचा ताण कमी होतो.

अपवादात्मक परिस्तीथी वगळता कृपा करून एकट्यासाठी चारचाकी चालवू नका. ३ अथवा अधिक माणसे असतानाच हे वाहन चालवावे. सर्व वाहन चालकांनी आठवड्यातून एक दिवस ' वाहन उपवास' पाळावा व त्या दिवशी स्वताचे वाहन रस्त्यावर आणू नये. आतापर्यंत अनेकदा कंपनीतील लोकांपासून अगदी खासदारांपर्य् त असे प्रयोग होतात, त्याचे फोटो पेपरात झळकतात... आणि मग काही दिवसांनी जैसे थे होते. तेव्हा असा 'उपवास' मनापासून व कायमचा हवा! देशातले अनेक लोक आठवड्यातून एकदा 'साबूदाण्याची खिचडी खाण्याचा' उपवास नित्यनेमाने करीत असतात. पण असल्या उपवासाचा आरोग्याला शून्य फायदा असतो. उलट काही कोटी लोकांनी एक दिवस वाहन रस्त्यावर आणले नाही तर त्याचा आरोग्याला फायदा खूप आहे. जरूर विचार व कृती करा. ( मी हे कित्येक वर्षे करीत आहे.).

झाडे लावताना प्रयत्नपुर्वक त्या त्या भागासाठी पारंपारीक/स्थानिक/ नेटिव असलेली झाडे लावावीत. जैविक वैविध्य राखण्यासाठी हे फार आवश्यक आहे. त्या त्या भागात आढळणाते किटक, पक्षी, इतर प्राणी हे या झाडांवर अवलंबून असतात. तसेच परागीकरणासाठी मदत करणारे किटक , पिकावर येणारे हानीकारक किटक खाणारे इतर किटक आणि पक्षी यांच्यासाठी ही झाडे खूप महत्वाची आहेत. एक्झॉटिक वाटणारी झाडे बर्‍याचदा नव्या भागात वेगाने वाढून नेटिव झाडांचे वाढणे कठीण करतात. त्यामुळे झाडे लावताना आपण नकळत इन्वेझिव झाडे लावून पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही ना हे पहावे.

काहींनी एसी पुर्ण बंद करावा व गरज लागेल तसा चालु करावा असे लिहिले आहे, त्यावर जरा वेगळे मत आहे. आमच्याकडे भयंकर उन्हाळा, त्यामुळे पुर्ण बंद करुन चालु करायचे तर फार लोड येईल म्हणून आम्ही बाहेर जाताना temp. बरेच जास्त करुन जातो, ९० (F) वगैरे म्हणजे साधारण घरी परत येतो तेव्हा घर अती तापत नाही. व एसी पण फार चालवला जात नाही. बरे पडते.

water heater बद्दल -हीटरच्या तळाला जे पाणी असते त्यात खुप गाळ जमतो जो वर्षातुन एकदा काढायला हवाच. हीटरला एक नळ असतो त्याला पाईप लावुन नळ चालु करायचा व स्वच्छ पाणी येईपर्यंत पाणी वाहु द्यायचे. त्याने हीटरचं आयुष्य व काम दोन्ही चांगले होते. तसेच खुप जूना असेल तर बदलायला झालाय का तेही पहावे.

१.best buy वाले जुन्या, न चालणार्‍या electronic वस्तु रीसायकल करतात. मी सर्व जुने DVD players, remotes, music players, VCRs, DVDs, cables, mouse, TV, computer screens, phones, wires असे सर्व एकदा गाडीत काठोकाठ भरले व त्यांना देऊन आले. इतके बरे वाटले केवढेतरी सामान कमी झाले घरातुन. vacuum cleaner पण घेतात का हे फोन करुन विचारणार आहे.

२. एक कंपनी जुन्या video cassettes पण रीसायकल करते पण त्यांना त्या आपण पोस्टाने पाठवायला हव्यात. त्याला काहीतरी १० डॉलर पडतील. त्यांना बॉक्समधे घालुन आता पाठवणार आहे कारण घरी १००-१५० कॅसेट्स आहेत. कचर्‍यात टाकवणार नाहीत.

बाकी.. आय अ‍ॅम अ रीसायकल फ्रीक. २ मीमी कागद पण जातो रीसायकल बॅगमधे. एका ब्राऊन बॅगमधे सर्व कागद भरुन, बॅग भरली की सरळ त्या बॅगला हँडलला दोरी लावुन बांधुन मोठ्या बीनमधे टाकतो म्हणजे सर्व कागद एकत्र जातात.

ग्रोसरी प्लास्टिक बॅगमधे आणली तरी सर्व बॅग्स पुन्हा दुकानात रीसायकलला नेऊन देतो. कचरा त्यातच भरुन टाकतो, नवे काही आणत नाही. शंका असेल तर county ला फोन करतो की हे रीसायकल करु शकतो का?

स्वयंपाकघरातला नळ नेहमी sprinkler mode मधेच वापरतो म्हणजे खुपच कमी पाणी लागते. मैत्रिणींना सांगितले जोरात नळ सोडण्याऐवजी असे करा.. पण उपयोग झाला नाही.

कपडे थंडीतही दोरीवर वाळवतो. अर्थात जिथे प्रचंड थंडी आहे तिथे हे करणे अवघड आहे. आम्हाला मात्र १२ महिने करता येते.

कागद रिसायकल >>
१) अपार्ट्मेंट्सचे निळे डब्बे असतात.
२) आपल्या अपार्टमेंटला नसेल तर लोकल पिकअप डे कधी ते शोधून कर्ब साईड रिसायकलिंग होते त्यात टाकायचे ( थोडक्यात दुसर्‍या अपार्टमेंटच्या डब्ब्यात!!)
३) क्वचित बिल्स इ "कॉन्फिडेंशियल" ठेवावे असे वाटेल असे पेपर रिसायकलिंग करायचे असेल तर सरळ ऑफीसच्या कॉन्फिडेंशियल लॉक्ड श्रेडर मध्ये घेवून जायचे. (बहुतेक ऑफिसात असतो. सेक्रेटरी बाया प्रेमळ असतात, करू देतात)

त्यावरून सिटीच्या साईटवर जाऊन शोध घेतला तर कळलं की कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, कर्ब साईड पिकप्ला टाकायच्या नाहीत (जे मी करत होतो). त्या गोळाकरायला डेसिग्नेटेड ठिकाणी (लोकल walmart इ.) सोय आहे. नसेल तर गारबेज. रिसायकल होत नाहीतच, automated सिस्टीम मध्ये अडकून ती खराब होऊ शकते.

सगळं रिसायकलच सामान लूज टाका, पिशवीत भरून टाकलं आणि ऑटोमेटेड सिस्टिमला झेपलं नाही तर रिसायकल न होता गारबेज मध्ये पडेल. मी बरेचदा वाऱ्यावर उडू नये म्हणून गुंडाळून एका पिशवीत बांधलेलं आहे, (सिटीकडून मिळणाऱ्या रीसायकच्या खोक्यांना झाकण नाहीये.) जे आता करणार नाही. स्वच्छ कागद रिसायकल करा, तेल लागलेला (पिझ्झा खोका) टाकला तर इतर कागद खराब होतो.
सिरीयस रिसायकलिंग इज प्रोजेक्ट इन इट सेल्फ.

मी एटीएमचा वापर केल्यावर किंवा क्रेडीट कार्ड वापरल्यावर शक्यतो रिसीट घेत नाही. तेव्हडाच कागद वाचतो. भारतात तसंही लगेच एसेमेस येतोच त्यामुळं तिथं तर हे सहज शक्य आहे.

बेल्जियम मधे वेस्ट मॅनेजमेंट फारच जबरदस्त आहे. पीएमडी (प्लास्टिक, मेटल, ड्रि़ंक कार्टन्स) साठी वेगळ्या बॅग्स असतात त्यातूनच त्या वस्तू टाकाव्या लागतात. पेपर आणि कार्डबोर्डपण वेगळे ठेवावे लागतात. काचेच्या बाटल्यांसाठी वेगळी सोय असती.. त्यातसुद्धा रंगीत काचा आणि बाकिच्या वेगळ्या असा प्रकार असतो. ऑफिसमधे सुद्धा कोकचे वगैरे टिन्स टाकण्यासाठी वेगळे कंटेनर्स ठेवलेत. वाइन बॉटल्सचे कॉर्कसुद्धा गोळा करून एका संस्थेला दिले जातात..प्लॅस्टिकच्या बाटल्यांची टोपणं पण अशीच एका संस्थेला दिली जातात.

झाडे लावताना प्रयत्नपुर्वक त्या त्या भागासाठी पारंपारीक/स्थानिक/ नेटिव असलेली झाडे लावावीत. जैविक वैविध्य राखण्यासाठी हे फार आवश्यक आहे. त्या त्या भागात आढळणाते किटक, पक्षी, इतर प्राणी हे या झाडांवर अवलंबून असतात. तसेच परागीकरणासाठी मदत करणारे किटक , पिकावर येणारे हानीकारक किटक खाणारे इतर किटक आणि पक्षी यांच्यासाठी ही झाडे खूप महत्वाची आहेत. एक्झॉटिक वाटणारी झाडे बर्‍याचदा नव्या भागात वेगाने वाढून नेटिव झाडांचे वाढणे कठीण करतात. त्यामुळे झाडे लावताना आपण नकळत इन्वेझिव झाडे लावून पर्यावरणाला हानी पोहोचवत नाही ना हे पहावे.

मुख्य पान आता छान सुटसुटीत झालय जिज्ञासा.

बरेच नवीन मुद्दे मिळाले वरच्या यादीतुन. अंमलात आणत जाईन आता.

काहींनी एसी पुर्ण बंद करावा व गरज लागेल तसा चालु करावा असे लिहिले आहे, त्यावर जरा वेगळे मत आहे. आमच्याकडे भयंकर उन्हाळा, त्यामुळे पुर्ण बंद करुन चालु करायचे तर फार लोड येईल म्हणून आम्ही बाहेर जाताना temp. बरेच जास्त करुन जातो, ९० वगैरे म्हणजे साधारण घरी परत येतो तेव्हा घर अती तापत नाही. व एसी पण फार चालवला जात नाही. बरे पडते.

बहुतेक वत्सलाने water heater बद्दल लिहिले होते. वत्सला, तुला माहिती नसेल तर हे पहा उपयोगी पडतय का. आमचा हीटर पण असेच करायचा व एक दिवस बंद पडला. जुना झाला होता. काही करता येणे अशक्य होते म्हणुन नवीनच लावला. आता पाणी फारच लवकर गरम होते. तेव्हा कळले दरवर्षी हीटरच्या तळाला जे पाणी असते त्यात खुप गाळ जमतो जो वर्षातुन एकदा काढायला हवाच. हीटरला एक नळ असतो त्याला पाईप लावुन नळ चालु करायचा व स्वच्छ पाणी येईपर्यंत पाणी वाहु द्यायचे. त्याने हीटरचं आयुष्य व काम दोन्ही चांगले होते. तसेच खुप जूना असेल तर बदलायला झालाय का तेही पहावे.

वर यादीत न आलेले २ मुद्दे,
१.best buy वाले जुन्या, न चालणार्‍या electronic वस्तु रीसायकल करतात. मी सर्व जुने DVD players, remotes, music players, VCRs, DVDs, cables, mouse, TV, computer screens, phones, wires असे सर्व एकदा गाडीत काठोकाठ भरले व त्यांना देऊन आले. इतके बरे वाटले केवढेतरी सामान कमी झाले घरातुन. vacuum cleaner पण घेतात का हे फोन करुन विचारणार आहे.

२. एक कंपनी जुन्या video cassettes पण रीसायकल करते पण त्यांना त्या आपण पोस्टाने पाठवायला हव्यात. त्याला काहीतरी १० डॉलर पडतील. त्यांना बॉक्समधे घालुन आता पाठवणार आहे कारण घरी १००-१५० कॅसेट्स आहेत. कचर्‍यात टाकवणार नाहीत.

बाकी.. आय अ‍ॅम अ रीसायकल फ्रीक. Happy २ मीमी कागद पण जातो रीसायकल बॅगमधे. एका ब्राऊन बॅगमधे सर्व कागद भरुन, बॅग भरली की सरळ त्या बॅगला हँडलला दोरी लावुन बांधुन मोठ्या बीनमधे टाकतो म्हणजे सर्व कागद एकत्र जातात.

ग्रोसरी प्लास्टिक बॅगमधे आणली तरी सर्व बॅग्स पुन्हा दुकानात रीसायकलला नेऊन देतो. कचरा त्यातच भरुन टाकतो, नवे काही आणत नाही.

शंका असेल तर county ला फोन करतो की हे रीसायकल करु शकतो का?

स्वयंपाकघरातला नळ नेहमी sprinkler mode मधेच वापरतो म्हणजे खुपच कमी पाणी लागते. मैत्रिणींना सांगितले जोरात नळ सोडण्याऐवजी असे करा.. पण उपयोग झाला नाही. Sad

कपडे थंडीतही दोरीवर वाळवतो. अर्थात जिथे प्रचंड थंडी आहे तिथे हे करणे अवघड आहे. आम्हाला मात्र १२ महिने करता येते.

सध्या इतकेच.

Pages