अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवेअरनेसमुळे फरक पडतो. एका व्यक्तिला पाणी जपून वापरायचे सांगितले आणि त्याला जर पटले तर तो पाणी जपून वापरतो आणि इतर चार लोकांना देखील पाण्याचे महत्त्व समजवून सांगतो. पाणी कमी वापरणार्‍यांची ही संख्या वाढत जावून भरपुर पाणी वाचवायला परिणामी बरीच मोठी मदत होते. त्यामुळे आपले प्रयत्न तोकडे जरी असले तरी आपला त्यात वाटा असतो.

हेच मी शाकाहारी असण्याबद्दलही म्हणेल. मी जर शाकाहारी असेल तर कदाचित .. बहुतेक माझे मुले पण शाकाहारीच असतील. मग त्यांची पण मुले शाकाहारीच असतील. ही परंपरा सतत सुरु राहीन. परिणामी प्राण्यांची हत्या होणार नाही.

सोप आहे गणित.

मांसाहारामुळे पर्यावरणाची हानी होते या दाव्यामधे काहीही तथ्य नाही. >> हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता आहात? कारण अनेक शास्त्रीय अभ्यासांनी (फक्त पेटा, ग्रीनपीस यांनी नाही) शेतीपेक्षा अनेक पटिने हानी होते हे दाखवून दिले आहे. इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग (विशेषतह बीफ) ची कार्बन फूटप्रिंट शेतीपेक्षा साधारण ५ ते १० पट असते. बाकिचे ecological इंपॅक्टस सुद्धा बरेच जास्त आहेत. भारतामध्ये हे आकडे थोडेफार कमी आहेत. पण दाव्यात तथ्य आहेच.

अनेक शास्त्रीय अभ्यासांनी (फक्त पेटा, ग्रीनपीस यांनी नाही) शेतीपेक्षा अनेक पटिने हानी होते हे दाखवून दिले आहे. इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग (विशेषतह बीफ) ची कार्बन फूटप्रिंट शेतीपेक्षा साधारण ५ ते १० पट असते. बाकिचे ecological इंपॅक्टस सुद्धा बरेच जास्त आहेत. भारतामध्ये हे आकडे थोडेफार कमी आहेत. पण दाव्यात तथ्य आहेच.>>> +१ नेटवर ह्याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. आमच्या संस्थेच्या डिझास्टर स्टडीज प्रोजेक्टसाठी काम करताना नेटवर ऑफिशिअल रिपोर्ट्सपण दिसले होते.

हे तुम्ही कशाच्या आधारावर म्हणता आहात? कारण अनेक शास्त्रीय अभ्यासांनी (फक्त पेटा, ग्रीनपीस यांनी नाही) शेतीपेक्षा अनेक पटिने हानी होते हे दाखवून दिले आहे. इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग (विशेषतह बीफ) ची कार्बन फूटप्रिंट शेतीपेक्षा साधारण ५ ते १० पट असते. बाकिचे ecological इंपॅक्टस सुद्धा बरेच जास्त आहेत. >> ईम्पॅक्ट भयानक आहेतच! पेशी नष्ट होत चालल्या आहेत ह्यापेक्षा अजून भयानक ईम्पॅक्ट तो काय. आपल्या पुढील पिढीला वाघ म्हणजे काय हे फक्त चित्रातून कळेल.

ईम्पॅक्ट भयानक आहेतच! पेशी नष्ट होत चालल्या आहेत>> बहुतांश मांसाहार करणारे लोक फार्म्ड प्राणी खातात. त्यामुळे पेशी नष्ट होण्याचे कारण मांसाहार नसावे असे मला वाटते. मांसाहार environment friendly नक्कीच नाही. त्याचे कारण म्हणजे फार्मिंगसाठी वापरली जाणारी संसाधने आणि निर्माण झालेला कचरा!!!

आपल्या पुढील पिढीला वाघ म्हणजे काय हे फक्त चित्रातून कळेल.>> वाघांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे मांसाहार नव्हे तर औषधी बनविणे आणि वाघाच्या कातडीमधून पैसा कमावणे हे आहे.

अनेक शास्त्रीय अभ्यासांनी (फक्त पेटा, ग्रीनपीस यांनी नाही) शेतीपेक्षा अनेक पटिने हानी होते हे दाखवून दिले आहे. इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग (विशेषतह बीफ) ची कार्बन फूटप्रिंट शेतीपेक्षा साधारण ५ ते १० पट असते. बाकिचे ecological इंपॅक्टस सुद्धा बरेच जास्त आहेत. भारतामध्ये हे आकडे थोडेफार कमी आहेत. पण दाव्यात तथ्य आहेच.>>> +१

वाढती लोकसंख्या आणि त्यांना पुरवायला लागणारे अन्न हे मुळ कारण आहे त्यामुळे मांसाहार Vs शाकाहार असा वाद घालणे बरोबर नाही. दोन्ही लोकांनी आपल्या food habits चे enviornmental impacts लक्षात घ्यायला हवेत.

निकित,

मांसाहारामुळे हानी होणे, व प्रगत देशांतले 'अ‍ॅनिमल फार्मिंग' हे 'ग्रेन फार्मिंग'पेक्षा जास्त रिसोर्स हंग्री असल्याचे दाखवून देणे यात फरक आहे का? तिथे ग्रेन फार्मिंगही अत्यंत विचित्रप्रकारे रिसोर्सेसची नासाडी करून केले जाते. पण तो विषय वेगळा आहे. "इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग" हा कळीचा शब्द तुम्हीच वापरला आहेत. त्यामुळे यावरून मांसाहार वाईट हे कसे काय सिद्ध होते?

एक एकक जमीनीवर जर पिके व जनावरे, दोघांचे पारंपारिक पद्धतीने संवर्धन केले, तर कुणाचीही कोणतीही हानी न होता, कोंबड्या, बकर्‍या, गाईगुरे इ. लाईव्हस्टॉक उत्तमरित्या वाढविला जाऊ शकतो. यात काही दुमत आहे का?

शेतीतून तयार होणार्‍या माणसासाठी 'अखाद्य' असलेल्या कचर्‍याचे काय करतो आपण? उदा. मक्याच्या/ज्वारीच्या झाडाला १ कणीस येते. त्याचे दाणे काढले, की उरलेल्या झाडाचे काय करतात भारतात?

मांसाहारामुळे पर्यावरणाचे नुकसान होत नाहिये. प्रगत देशांत मांसाहारासाठी घाऊकपणे व जलदपणे गुरे/कोबड्या वाढविण्याच्या हव्यासापायी रिसोर्सेस ओरबाडले जात आहेत. पटकन वजन वाढवायचंय तर मक्याचा पाला खाऊ घालण्याऐवजी डायरेक्ट ग्रेन खाऊ घातला जातो. 'प्राईम' पार्ट सोडून इतर अ‍ॅनिमल पार्ट्सच नव्हेत तर इतरही अनेक अन्नपदार्थ 'यूज्बाय डेट' संपली की डायरेक्ट पेटीपॅक लँडफिलमधे. शाब्बास. याउलट इकडे पाया सूप काय असते ते जरा पहा. Happy

*

सर्वात महत्वाचे म्हणजे, कापून खाण्यासाठी गुरे वाढवायला जे रिसोर्सेस ओरबाडले जातात, ते तितकेच दुधासाठीच्या जनावरांसाठी ओरबाडले जात नाहीत का? दूध-तूप-मध खाणार्‍या आपल्याकडच्या दांभिक स्युडो-शाकाहारींनी अजिब्बात शाकाहाराचा पुळका दाखवू नये हे माझे स्पष्ट मत आहे.

ईंग्रजी भाषेत एक फ्रेज आहे : to go the way of the dodo. डोडो हा पक्षी आता अस्तित्त्वात नाही इतक्या प्रमाणात माणसानी त्याची शिकार केली आहे. वर मी वाघ हे एक उदाहरण दिले आहे. वाघ मारुन कुणी मानव आपली भुक शमवत नसेल पण इतर अनेक कारणासाठी आजही वाघाची शिकार केली जाते.

Sad

बी,

माणूस व प्राणी दोघेही निसर्गाने बनवलेले आहेत. दोघेही एकमेकांना खाऊ शकतील अशी रचनाही निसर्गाने बनवलेली आहे. दोघेही एकमेकांना नुसतेच मारून टाकू शकतील अशीही रचना निसर्गाने बनवलेली आहे. आरंभीच्या काळात माणूस प्राणीच खात असण्याची शक्यता अधिक आहे. जगातील अनेक प्रदेशांमध्ये बहुधा मांसाहारी पदार्थ शाकाहारी पदार्थांच्या तुलनेत अधिक सहजपणे मिळत असतील, जसे मासे!

चांगला मुद्दा इब्लिस.
एकंदरीत शाकाहार, मांसाहार व पर्यावरणाचे रक्षण यावरची चर्चा वाचून पुढील ओळी जागतिक पर्यावरण गीत म्हणून सर्वांनी पाठ करून त्यांचा अंगीकार करायला हवा असे वाटते -
लेऊ लेणं गरीबीचं चणं खाऊ लोखंडाचं
जीणं व्हावं आबरूचं, धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...
* वाघ आणि वाघावानी यांचा वाघ नामशेष होण्याशी संबंध नाही.

स्ट्रिप मायानिंग हा प्रॉब्लेम आहे. लोखंडाचे खाणकाम नव्हे.>> एकतर वरील ताईंनी जोक केला त्याला ते उत्तर होते.

दुसरे म्हणजे तो काय प्रोब्लेम आहे तो लिहा. त्यात अमेरिकेतील व देशाबाहेरील लोकांनी काय करता येइल ते लिहा म्हणजे आम्हाला पण माहिती मिळेल. आय आय एन!!

मी आजच पहाटे रेअर अर्थ मायनिन्ग चा चीन मध्ये काय भयानक वाइट परिणाम झाला आहे ते वाचून काढले. थोड्क्यात म्हणजे सेरीअम ऑ क्साइड जे टच स्क्रीन टॅब / मोबाइल च्या स्क्रीनला पॉलिश करायला वापरले जाते त्याची प्रॉडक्षन प्रोसेस मुळे घातक परिणाम होत आहेत चीन मधील पर्यावरणावर. आता बीबीसी.कॉमची काय लिंक द्यायची. सर्वांना सर्च करता येइल

इब्लिस एट अ‍ॅल:

"इंडस्ट्रियल अ‍ॅनिमल हार्वेस्टिंग" हा कळीचा शब्द तुम्हीच वापरला आहेत. >> आणि तो अतिशय महत्वाचा आहे. खाद्यपदार्थांची (इथल्या अनुषंगाने मांसाहाराची) प्रचंड मागणी पारंपारिक अ‍ॅनिमल हार्वेस्टिंगने पूर्ण होणे शक्य नाही. म्हणूनच आपल्याकडेही पोल्ट्री फार्म्स आहेतच, मोठमोठाले "इंडस्ट्रीयल स्केल" गोठे आहेतच (बीफसाठी नाहीत, अर्थातच :)) आणि त्यानाही सिरियल आणि ग्रेनयुक्त पशुखाद्य दिले जातेच (अमेरिकेइतक रिच नाही, पण दिले जातेच); त्यांचा पाण्याचा वापर हा प्रचंड आहेच. दुसरा महत्वाचा घटक म्हणजे मांसाहाराच्या (दूध-अंड्यांसकट) प्रोसेसिंग, डिस्ट्रिब्युशन आणि प्रिपरेशनसाठीचा उर्जावापर हा शेतीमालापेक्षा बराच जास्त आहे. मांसाहाराची (पर कॅलरी) कार्बन फ़ुटप्रिंट भारतात प्रगत देशांपेक्षा कमी आहे. पण ती भारतातल्या शेतीपेक्षा जास्तच आहे. भारतातही याचे शास्त्रीय अभ्यास (पिअर रिव्ह्यूड वगैरे) झाले आहेत आणि त्यांचे हेच त्यांचे निष्कर्ष आहेत. याचा अर्थ रिसोर्स इंटेन्सिव्ह शेती फार पर्यावरण पूरक आहे असा होत नाही. तुलना चालू आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, कापून खाण्यासाठी गुरे वाढवायला जे रिसोर्सेस ओरबाडले जातात, ते तितकेच दुधासाठीच्या जनावरांसाठी ओरबाडले जात नाहीत का? >> जातात. पण एका जनावराच दुधाचं उत्पादन त्याच्या मांसाच्या यील्ड पेक्षा बरच जास्त आहे. त्यामुळे एक कॅलरी दुधासाठी लागणारे रिसोर्सेस हे एक कॅलरी मांसापेक्षा कमी आहेत (assuming mutually exclusive cattle).

मांसाहार वाईट हे कसे काय सिद्ध होते?>> मांसाहाराच्या dietary benefits किंवा चवीबद्दल चर्चा चालू नाही. गिव्हन द युटिलिटि, मांसाहार जरूर करावा. फक्त त्याची पर्यावरणीय किंमत मोजून करावा. हेच विधान रिसोर्स इटेन्सिव्ह शेती बाबतीतही खरे आहे.

छान लेख, चर्चा. लिंक्स वगैरे , विषय आणि विषयांतरही वाचनीय Happy
एतद्देशियांनी पर्यावरणावर काय बोलावं ? डोळ्यांदेखत हिरवे प्रदेश नाहीसे होताहेत, डोंगर सर्रास खणून काढले जात आहेत , नद्यांचे झपाट्याने नाले होताहेत आणि तेही प्लास्टिक आणि शेवाळाच्या उकिरड्यात लुप्त होणारे . ही अगदी रोज प्रत्ययास येणारी गोष्ट. अर्थात झाडे लावणाऱ्या एनजीओजना सलाम. त्यांचंही काम अथक चालूच असतं.
मांसाहाराबद्द्ल चर्चा चालू आहे . कालच कॅलीफोर्नियन दुष्काळाबद्दल भावाशी बोलताना बीफ, रेड मीट इंडस्ट्रीमध्ये पाणीही खूप वापरलं जातं/ वाया जातं एका अर्थी हे ऐकलं .
आणि वेदना ! मोठ्या प्राण्याचा जीव पटकन जात नाही, खूप करूण ओरडत राहतात. जशी वांद्र्यात पूर्वी पाळीव घरडुकरे मारताना त्यांच्या किंकाळ्या ऐकवत नसत. तेच गायीबैलांचं असावं हे वरील पोस्टवरून आणि आपल्याही सामान्यबुद्धीला समजणारं.
खा, त्यासाठी जीवही घ्या, हिंसा अपरिहार्य आहे एकूण सृष्टीचक्रात , शक्य असेल तर जात्या जिवाच्या वेदनेचा विचार करा..

उपयुक्त धागा!

यामधील बर्‍याच गोष्टी करण्यासारख्या आहेत. मी स्वता: काही करतो आणि काही अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन -
* CFL/ एल ई डी वापरतो.
* प्रींट करताना जिथे जिथे शक्य आहे तिथे डबल साईड प्रींट करणे
* माझ्याजवळ माझी एक रियुजेबल पाण्याची बाटली कायम असते. हे मी बाकीच्या लोकांना पण सांगतो. फारगावातला माझा रूममेट आधी बाटल्या घेऊन यायचा, मग नळाचे पाणी प्यायला लागला.
* ग्रोसरीला पिशव्या घेऊन जाणे.
* अन्न वाया जाऊ नये ह्यासाठी खूप जागरुक राहतो.
* लिफ्टचा वापर जागरुकपणे करतो.
* बिलं, रिसीट्स शक्य तेवढ्या ऑनलाईन असतील असं पाहतो
* लोकल गोष्टी खाणे
* पर्यावरणाला सस्टेनेबल पद्धतीने बनवलेले भाज्या, फळे, मांसाहार विकत घेणे
* बरेचसे कागद प्रिंट काढलेले मिळाले तर ते पाठकोरे असतील तर लिहिण्यासाठी वापरतो.

चांगले मुद्दे मांडले जाताहेत, पण मधूनच मला वाटलं ' हेच करावं किंवा हेच करू नये' अश्या वळणावर चर्चा गेली.
आज निदान आपल्याला ' जितकं शक्य आहे तितकं वाचवायचा' ऑप्शन तरी आहे. त्यामुळे आज 'हे खावं, ते प्यावं' अशी निवड करण्याच्या फेज मधे आहोत आपण. म्हणजेच निदान 'गरजा' भागवल्यानंतर काय करावं हा चॉईस आहे आज आपल्याला. पण नैसर्गीक साधनसंपत्तीची अशीच उधळण (ह्यात गरजा भागवल्यानंतर च्या ज्या फेजेस आहेत त्यांचा समावेश होतो) होत राहिली, नासाडी होत राहीली, तर पुढच्या पीढ्यांना कदाचित 'हे का ते' हा चॉईसच उरणार नाहीये. म्हणून आत्तापासून शक्य तितक्या प्रमाणात उधळपट्टी कमी करण्याची गरज आहे, आणी काही प्रमाणात गरजाही !

Earth Hour साजरा करते. मिडीया सांगते एक तास नॉन-इसेंशियल लाईट्स बंद ठेवा. आम्ही मित्रमंडळी पूर्ण वीज वापर एक तास बंद करतो.

वरती बाळू यांनी जे मुद्दे लिहिले आहेत तिकडे लक्ष द्यायची जास्त गरज आहे. वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न हे स्वागतार्ह किंवा गरजेचे असले तरी पर्यावरण हानी थांबवायला अत्यंत तोकडे आहेत. >

नेमक्या शब्दात मांडल्याब्द्दल धन्यवाद.

I appriciate personal sincerity ,पण अमेरीकेच्या सरकारने धोरणात्मक बदल केले नाहीत तर ह्या उपायांनी विशेशेष फरक पडणार नाहीत.

वरती बाळू यांनी जे मुद्दे लिहिले आहेत तिकडे लक्ष द्यायची जास्त गरज आहे. वैयक्तिक पातळीवरचे प्रयत्न हे स्वागतार्ह किंवा गरजेचे असले तरी पर्यावरण हानी थांबवायला अत्यंत तोकडे आहेत. >

हे काही प्रमाणात खरेही असले तरी

१. मथळा "पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना" असा आहे.

२. अनेकानेक व्यक्ती जर अशी जीवनशैली आत्मसात करतील तर सरकारी धोरणांवर त्याचा प्रभाव पडल्याशिवाय राहणार नाही अशी आशा बाळगण्यास काय हरकत आहे.

३. लहानपणी एक खूलभर दुधाची कहाणी वाचली होती. गाभारा दुधाने भरून काढायचा असतो (राजाज्ञे नुसार) पण सगळेच जण म्हणतात इतक्या दुधामधे मी एकट्याने पाणी टाकले तर कोणाला कळणार आहे आणि सगळा गाभारा पाण्यानेच भरला जातो. ह्या कहाणीतला बोध इथे दुहेरी लागू पडतो.

त्यामुळे जे कोण पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगू बघताहेत / जगताहेत त्यांना हतोत्साहित करण्यापेक्षा त्यांच्या थेंबांना अधिक थेंब जोडले जाऊन त्यातून अगदी सागर जरी नाही तरी तळे निर्माण कसे होईल हे बघावे ही विनंती.

आपण सर्वांनी आपापली ताकद, सरकारी धोरण अधिक पर्यावरणस्नेही कसे बनेल हे बघण्याकडे खर्ची घालण्यासाठी एकत्रित करायला हवी. सरकारी धोरण बदलवण्यासाठी एकत्रित प्रयत्न कसा करता येईल ह्या करता एक नवीन धागा उघडला तरी चालावा.

भारतामधे कचर्‍याशी निगडीत काही प्रोजेक्ट्स आहेत का? रोज घराघरातून निघणार्‍या कचर्‍याचे योग्य ती काळजी घेतली जाते का? इथे सिंगापुरमधे रात्री १२ वाजता मजदुर लोक कचरा गोळा करायला सुरवात करतात तर पहाटे सगळे सिंगापुर स्वच्छ झालेले असते. पहाटे पहाटे कचरा भरायला गाड्या येतात. ठिकठिकाणी डस्टबीन्स ठेववेल्या असतात. दुपारी सुद्धा एकदा झाडलोट होतेच. दर आठवड्याला गवत कापणी होते. झाडांचे ट्रीमींग नियमितपणे होते. त्यामुळे सिंगापुर इतके नीट्नेटके आणि आखीव रेखीव वाटते ना इतर कुठल्याही देशात गेलो की कळते सिंगापुरची जी स्वच्छता आहे ती इतर कुठेच सापडणार नाही.

ज्यांना ज्यांना कार्बन फुट्प्रिन्ट म्हणजे काय हे माहिती नाही त्यांनी त्यांनी विकीवर जी एक चित्रफित दिली आहे ती पहावी. खूप छान आहे ती क्लिपः http://en.wikipedia.org/wiki/Carbon_footprint उजव्या बाजूला दिली आहे क्लिप.

निकित, कार्बन फुटप्रिन्टबद्दल आणि ग्रीन हाऊस गॅसेस बद्दल थोडे लिहाल का? वेळ असल्यास!

https://www.yahoo.com/food/how-much-food-the-world-eats-in-a-day-did-you...

आज याहू वर हे आहे !

Did you know that the average person, worldwide, consumes around 1,860 grams of food per day? And did you know that Americans consume about 50 percent more than the global average?

It’s true. The typical plate around the world — if you want to look at what you chowed down on today and compare your own diet — comprises nine percent meat, 22 percent grains, 39 percent produce, 15 percent dairy and eggs, and a 15 percent block of sugar, fat, alcohol, and pulses.

As this video points out, stateside we eat twice as much meat as the average global citizen, and less grain. And — maybe no surprise, here — U.S. citizens take in proportionally more dairy, eggs, sugar, and fat.

How do other countries compare? Well, folks in the U.K. eat less sugar and fat, and more produce. Brazilians eat less food, generally. Chinese people eat the most produce, and Indian citizens eat a diet that is only 2 percent meat.

खूप प्रयत्नपूर्वक ह्या धाग्यापासून स्वतःला दूर ठेवलं होतं! इथली चर्चा वाचून छान वाटलं! आत्तापर्यंत आलेल्या पोस्ट्स मधले मुद्दे हेडरमध्ये अपडेट केले आहेत.
जीवनशैलीतला बदल हा सगळ्यात शाश्वत बदल असतो! आणि जेव्हा हजारो/लाखो जण हा बदल स्विकारतात तेव्हा समाजात बदल घडतोच! त्याचाच परिणाम म्हणून विकासाच्या धोरणात देखिल बदल घडून येतो. त्यामुळे आपले सगळ्यांचे वैयक्तिक पातळीवरचे सर्व प्रयत्न महत्वाचे आहेत.
Titanic सारखी मोठी बोट बुडायला दोन तास लागले होते म्हणतात. मग पृथ्वी सारखा ग्रह ज्यावर जीवन निर्माण व्हायला लाखो वर्ष लागली ते जीवन काहीशे वर्षांत नष्ट होणार नाहीये.
Unfortunately we are travelling on a sinking ship and we are partly responsible for it too. It may take another 100 years or 1000 years to sink but we are accelerating towards it rapidly. But let's not give up! काय माहिती आपल्या प्रयत्नाने आपण हा ऱ्हास थांबवू शकू! आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नाने पृथ्वीचे आयुष्य एका सेकंदाने जरी वाढले तरी हे सर्व प्रयत्न सार्थकी लागतील! सर्वांना पृथ्वी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Unfortunately we are traveling on a sinking ship and we are partly responsible for it too. It may take another 100 years or 1000 years to sink but we are accelerating towards it rapidly. But let's not give up!
<<
There's another side to this story.

In the history of this planet, and in the history of LIFE on this planet, existence of humanity is like seconds in a time-span of a week.

This planet has seen rise and fall of species. It has seen ice ages come and go.

If at all the ship sinks, it will be the ship of humans. They get destroyed, taking a few other species along. But, LIFE on this planet will go on. Some other species shall surely emerge.

So, instead of trying to save "Earth" let us get our perspective and priorities clear..

We need to save humans. US.

Not Earth.

She is perfectly capable of taking care of herself. If we become too troublesome for her, She will swat us away and create something better. Happy

इब्लिस, can not agree more! हे मी आधी देखिल लिहिलं होतं! It is our own species that we need to save rather than earth! ह्यापूर्वी देखिल ५ वेळा पृथ्वीवरील जीवन नष्ट होऊन पुन्हा सुरु झाले आहे..त्यापैकी एका वेळी डायनासोर नष्ट झाले. ह्यावेळी आपला नंबर असेल...तो किती लवकर येणार हे देखिल आपल्याच हातात आहे आणि आपण एकटे नष्ट होणार नाही आपल्याबरोबर अनेक इतर प्रजाती देखिल नष्ट होतील.

Pages