अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कागद रिसायकल >>
१) अपार्ट्मेंट्सचे निळे डब्बे असतात.
२) आपल्या अपार्टमेंटला नसेल तर लोकल पिकअप डे कधी ते शोधून कर्ब साईड रिसायकलिंग होते त्यात टाकायचे ( थोडक्यात दुसर्‍या अपार्टमेंटच्या डब्ब्यात!!)
३) क्वचित बिल्स इ "कॉन्फिडेंशियल" ठेवावे असे वाटेल असे पेपर रिसायकलिंग करायचे असेल तर सरळ ऑफीसच्या कॉन्फिडेंशियल लॉक्ड श्रेडर मध्ये घेवून जायचे. (बहुतेक ऑफिसात असतो. सेक्रेटरी बाया प्रेमळ असतात, करू देतात)

र्म्ड, रंग बघून त्यावरचं लेबल पण वाचशील. आमच्याकडे ब्लू == ग्लास/ प्लास्टिक/ मेटल. काळा = पेपर/ कार्डबोर्ड म्हणून म्हणतोय.
त्यावरून सिटीच्या साईटवर जाऊन शोध घेतला तर कळलं की कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या, कर्ब साईड पिकप्ला टाकायच्या नाहीत (जे मी करत होतो). त्या गोळाकरायला डेसिग्नेटेड ठिकाणी (लोकल walmart इ.) सोय आहे. नसेल तर गारबेज. रिसायकल होत नाहीतच, automated सिस्टीम मध्ये अडकून ती खराब होऊ शकते.

सगळं रिसायकलच सामान लूज टाका, पिशवीत भरून टाकलं आणि ऑटोमेटेड सिस्टिमला झेपलं नाही तर रिसायकल न होता गारबेज मध्ये पडेल. मी बरेचदा वाऱ्यावर उडू नये म्हणून गुंडाळून एका पिशवीत बांधलेलं आहे, (सिटीकडून मिळणाऱ्या रीसायकच्या खोक्यांना झाकण नाहीये.) जे आता करणार नाही. स्वच्छ कागद रिसायकल करा, तेल लागलेला (पिझ्झा खोका) टाकला तर इतर कागद खराब होतो.
सिरीयस रिसायकलिंग इज प्रोजेक्ट इन इट सेल्फ.

अमितव +१. तेच प्लास्टीकच्या पिशव्यांबद्दल लिहायला आले होते. अगदीच घेऊ नये पण काही अनिवार्य आल्या तर ते सिटीच्या रिसायकलमध्ये मोस्टली जात नाही. कोह्ल्स पण त्या बॅग्ज घेतं. इतर स्टोअर्समध्येही सोय असेल.

धन्यवाद, अमितव! लेबल पण वाचीन आता. नाहीतर बहुतेक मी खरंच न वाचता टाकून आले असते Happy मला वाटलं रिसायकलिंग डबे कलर कोडेड असणार.

वेका, प्लॅपि नाहीत आता. कॅलिमधे बंद झाला वापर.

मी एटीएमचा वापर केल्यावर किंवा क्रेडीट कार्ड वापरल्यावर शक्यतो रिसीट घेत नाही. तेव्हडाच कागद वाचतो. भारतात तसंही लगेच एसेमेस येतोच त्यामुळं तिथं तर हे सहज शक्य आहे.

इथं बेल्जियम मधे वेस्ट मॅनेजमेंट फारच जबरदस्त आहे. पीएमडी (प्लास्टिक, मेटल, ड्रि़ंक कार्टन्स) साठी वेगळ्या बॅग्स असतात त्यातूनच त्या वस्तू टाकाव्या लागतात. पेपर आणि कार्डबोर्डपण वेगळे ठेवावे लागतात. काचेच्या बाटल्यांसाठी वेगळी सोय असती.. त्यातसुद्धा रंगीत काचा आणि बाकिच्या वेगळ्या असा प्रकार असतो. ऑफिसमधे सुद्धा कोकचे वगैरे टिन्स टाकण्यासाठी वेगळे कंटेनर्स ठेवलेत. वाइन बॉटल्सचे कॉर्कसुद्धा गोळा करून एका संस्थेला दिले जातात..प्लॅस्टिकच्या बाटल्यांची टोपणं पण अशीच एका संस्थेला दिली जातात.

Garbology - लेखक Edward Humes , एकंदरीत अमेरिकेतलं कचरा न त्यअचे ंअ‍ॅनेज्मेंट बाबत रोचक माहिती आहे.

याच पुस्तकात
Bea Johnson 's zero waste home
www.zerowastehome.com

बद्दल कळले.

चार चाकी वाहन सुरू केल्यावर काही काळ (साधारण दोन मिनीटे) न्यूट्रलमध्येच ठेवून हळूहळू अ‍ॅक्सिलिरेटर पेडलवरील दाब वाढवित न्या आणि पेडल थेटपर्यंत दाबा. त्यानंतर पुन्हा अ‍ॅक्सिलिरेटर पेडलवरील दाब हळूहळू कमी करीत शेवटी पाय बाजूला काढा. दोन फायदे होतील

  1. ऑईल सर्क्युलेशन व्यवस्थित होऊन वाहन चालविताना झीज कमी होईल.
  2. वाहनाखाली विश्रांती घेत असलेले सजीव प्राणी आवाज व कंपनांनी सावध होऊन वाहनाखालून बाहेर पडतील आणि त्यांचा जीव वाचेल.

जिज्ञासा, लिंकबद्दल धन्यवाद Happy
आम्ही बसवली आहेत आमच्याकडच्या नळांना ही फिटिंग्ज. युकेत अशा फिटिंग्जची माहिती पाणी पुरवणार्‍या वेबसाईटवर दिली होती आणि तुम्ही मागवल्यास ती पोस्टाने तुमच्या घरी येतात.
तसेच फ्लशटँक अर्धाच भरेल असे सेटिंग आपले आपण करणे सोपे असते. तसे केल्यास भरपूर पाणी वाचते.

नाही ना. इथे बिल्डींगमधे किंवा आसपास कुठेही पेपर रिसायकलचा डब्बा नाहीये. मॅनेजरने सांगितलं ट्रॅश कंटेनरच्या इथे वेगळ्या बॅगमधे घालुन ठेवायला. ते ट्रॅश नेतात ते करतील म्हणे रिसायकल Sad

इथे वाचून दुधाचे कॅन विसळून ते पाणी झाडांना घालायला सुरूवात केली. झाडांच्या तब्येती सुधारलेल्या दिसत आहेत. ज्यांनी कुणी ही युक्ती सांगितली त्यांना धन्यवाद Happy

हेच ज्ञानकण हापिसात सांडले असता पास्ता शिजवलेले, अंडी उकडलेले, इ. पाणी फेकून न देता गार झाल्यावर झाडांना घालायचे अशी बदली टिप मिळाली.

हो का? मुंग्या वगैरे धरत नाहीत का? करून बघेन. धन्यवाद.

(मग दह्याचंही पाणी चालेल की सिंडे. :P)

दह्याचं पाणी मागे एकदा कडिलिंबाला घातलं होतं त्याला भयंकर किडे लागले होते. *ड्या भडकलाच Biggrin

Lol

अमेरिकेत गेलेल्या भारतीयांबद्दल माझे निरीक्षण आहे कि त्यांना दोन मुले असतात.. असे का? एकाच मूळ असणे म्हणजे अधिक पर्यावरणस्नेही होईल कि नाही ?/

नै ओ, काहीतरीच काय! त्यामुळे अमेरिकेतले मोजून २ च मुले असणारे काही पर्यावरण स्नेही नाहीतच मुळी. निसर्ग देईल तितकी मुले होऊ देणे हेच जास्त नैसर्गिक ना Happy

. निसर्ग देईल तितकी मुले होऊ देणे हेच जास्त नैसर्गिक ना >>>>>>>>

शिवाय पहिल्या मुलाची खेळणी, कपडे सगळे रियुज व्हायला नको का? एका पेक्शा जास्त अपत्ये असणे हे पर्यावरणवादी आहे. Proud Proud Proud

अमेरिका आणि कॅनडा ह्या दोन्ही देशांनी microbeads असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात अजून अशाप्रकारची कायद्याने बंदी नसली तरी आपण सर्वजण microbeads असलेली उत्पादनं वापरणं टाळू शकतो आणि जनजागृती नक्की करू शकतो. त्याविषयी अधिक माहिती देणारी बातमी आणि व्हिडिओ इथे

http://www.mindbodygreen.com/0-23210/heres-why-the-us-just-banned-microb...

Upworthy वर नुकताच ह्या मुलीचा व्हिडिओ पाहीला. तिने गेली दोन वर्षे कमीत कमी कचरा निर्माण केला आहे. त्याविषयी तिची छोटीशी मुलाखत.

https://www.facebook.com/Upworthy/videos/1161010843939772/?fref=nf

छान बातमी जिज्ञासा...

मायक्रोबिडस आणि दुष्परिणाम यावर विविध माध्यमात चर्चा सुरु होती पण बन्दीचा निर्णय झालेला आहे हे माहित नव्हते.

खूप छान धागा अन माहिती
4/5 वर्षानंतर अजून नवीन विचार, सजेशन या विषयावर वाचायला आवडतील माबोकरांचे ..

आपण विकत घेतलेल्या वस्तू दुरुस्त करण्यायोग्य असल्या पाहिजेत. पण त्या तशा नसतात आणि त्यामागे उत्पादक कंपन्यांचाच हात असतो.
उत्पादक कंपन्या अगदी जाणीवपूर्वक त्यांची उत्पादने अशा प्रकारे डिझाइन करतात की वस्तू लवकर खराब व्हावी आणि दुरुस्त करता येण्याजोगी नसावी जेणेकरून आपल्याला त्यांची उत्पादने परत परत विकत घ्यावी लागतील.
ह्याला विरोध म्हणून अमेरिकेत आणि युरोपात दुरुस्ती हक्क चळवळ मूळ धरू पहात आहे.
https://www.nytimes.com/2020/10/23/climate/right-to-repair.html

Pages