अमेरिकेत/इतरत्र अधिक पर्यावरणस्नेही जीवनशैलीने जगताना

Submitted by जिज्ञासा on 8 April, 2015 - 19:09

नुकतीच अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात गेली ४ वर्षे सलग पडलेल्या दुष्काळामुळे जी पाणीकपात लागू झाली त्याबद्दलच्या निकित ह्यांच्या धाग्यावरील (http://www.maayboli.com/node/53421) चर्चेचे फलीत म्हणजे हा धागा. शीर्षकात जरी अमेरिकेचे नाव असले तरी भारतात वा भारताबाहेर इतर देशांत राहणाऱ्या मायबोलीकरांनी देखिल इथे आपले अनुभव/सूचना जरूर लिहाव्यात! ह्या धाग्यावर साधारणतः खालील प्रश्नांच्या अनुषंगाने विचार, चर्चा, उपाय इ. अपेक्षित आहे.
> एका भरपूर सुबत्ता असलेल्या देशात राहताना तुम्ही नैसर्गिक व इतर संसाधनांची (म्हणजे पाणी, अन्न, कागद, वीज, इंधन इ.) उधळपट्टी होऊ नये म्हणून कोणते उपाय करता? कशी बचत करता?
> तुमच्या गावात/राज्यात पर्यावरणस्नेही असे कोणते उपक्रम राबवले जातात (उदा. recycling, farmers markets etc). ह्या जागा/उपक्रमाची नावे दिली तर त्या गावात राहणाऱ्या इतर मायबोलीकरांना आणि इतर मायबोली वाचकांना देखिल त्याचा उपयोग होईल. जर तुम्ही त्यात सहभागी होत असाल तर तुमचे अनुभव.
> असे उपाय जे तुम्ही स्वतः करत नाही (ऐकीव माहिती किंवा ओळखीचे लोकं करतात) पण जे करता येऊ शकतील.
> अमेरिकेतील/सर्व देशांतील नागरिकांमध्ये पर्यावरणविषयक जाणीव वाढावी ह्यासाठी काय उपाय करता येतील ह्याबद्दलच्या कल्पना

ह्याच विषयावर असलेला हर्पेन यांचा धागा : http://www.maayboli.com/node/51270

गरज , हौस आणि हव्यास ह्या मधल्या सीमारेषा फार धूसर असतात आणि सुबत्तेच्या भांडवलावर अनेक उच्चशिक्षित लोकंही त्या फार नकळत ओलांडताना दिसतात (वाक्यश्रेय- रार)! त्या आपल्याकडून नकळत ओलांडल्या जाऊ नयेत ह्यासाठी हा धागा! आपल्या सर्वांकडे पृथ्वी नावाचा एकच वसतीयोग्य आणि सुंदर ग्रह आहे! तो तसाच राहावा ह्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करुया!
There is always enough for everybody's need but not for everybody's greed - Mahatma Gandhi

ह्या धाग्यावरील प्रतिसादांत आलेल्या सूचना इथे (http://www.maayboli.com/node/53442?page=10#comment-3528458)एकत्र डकवल्या आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जो पर्यंत सुर्य आहे तो पर्यंत पृथ्वी आहे. सुर्य हा ह्या विश्वाचा केन्द्रबिंदु आहे.

डायनासोर हे सगळीकडे नव्हते. त्यामुळे ते नष्ट झालेत. त्यांची संख्या फार नव्हती. मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. जसे की वाघ, सिंह, साप ह्यांची संख्या खूप कमी आहे. साप स्वतःची अंडी मागे फिरुन खात जातो. नाहीतर सांपाची संख्या केवढी तरी असती.

Bee, please check the facts before writing at least! None of your statements above are correct. How can you write something wrong with so much confidence!

कुठले वाक्य चुकीचे आहे?!!! सुर्य आहे म्हणून जीवसृष्टी आहे. एखाद्या पेशीची संख्या जर कमी असेल तर ती नष्ट होऊ शकते.

मी काही संशोधन केलेले नाही आणि मला वाटत इथे ह्या विषयावर इतर कुणीही संशोधन केलेले नाही. सगळे जण आपल्या मतीप्रमाणे लिहित आहेत.

'फ्रेंड्स'च्या एका एपिसोडमध्ये डॉ. रेमोरेला ब्रेन ट्रान्सप्लान्ट करून कोमातून उठवणार असतात. रॉस हे ऐकून एकदमच सटपटतो तेव्हा जोइ त्याला म्हणतो, Why is this so hard for you to get? I thought you were a scientist!

Proud

इब्लिस, चांगली पोस्ट सहमत.
अहो बी, जिज्ञासा या (सारख्या) विषयातील संशोधक आहेत. तरीही संशोधक असो किंवा नसो, प्रत्येक जण आपल्या मती प्रमाणे लिहीतोशी सहमतच. Happy

मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. >>> कुणाला हानी पोहोचवाणार्‍यांची संख्या कमी असते म्हणे? कारण माझी माहितीप्रमाणे माणूस हा प्राणी वाघांना सातत्याने हानी पोहोचवत आहे तरी माणसांची संख्या वाढतच आहे!!!

डायनासोर हे सगळीकडे नव्हते. त्यामुळे ते नष्ट झालेत.
<<
"सगळी"कडे नसतात ते नष्ट होतात? सगळीकडे म्हणजे नक्की कुठे?

अंटार्क्टिकावर माकडे नाहीत. म्हणजे माकडे "सगळीकडे" नाहीत. महाराष्ट्रात गोरिला नाहीत. भारतात जिराफ नाहीत. झेब्रेही नाहीत. म्हणजे हे सगळे प्राणी "सगळीकडे" नाहीत.

मग ते नष्ट होणार का आता? बाप्रे!

श्रीमान बी, आपण महान आहात. प्रणाम स्वीकारावा! 77.gif

कुणाला हानी पोहोचवाणार्‍यांची संख्या कमी असते म्हणे? कारण माझी माहितीप्रमाणे माणूस हा प्राणी वाघांना सातत्याने हानी पोहोचवत आहे तरी माणसांची संख्या वाढतच आहे!!!>>

हो कारण माणसांची संख्या वाघांच्या संख्येपेक्षा कैक पटीने जास्त आहे पण वाघ हा माणसापेक्षा कैक पटीने बलवान आहे. मनुष्य शस्त्र न वापरता वाघाला हानी पोहचवूच शकत नाही. जर वाघांची संख्या मनुष्यसंख्ये इतकी असती तर आपल्या बाजूला वाघ शेजारी असते Happy खरे वाघ Happy सरनेम नाही Happy

इब्लिस: वेल.. मी डायनासोरबद्दल लिहिलेल्या वाक्यावर काट मारत आहे. पण माझे एक अत्यंत ढोबळ अनुमान आहे की एखाद्या पेशींची संख्या जर कमी असेल आणि जर ती पेशी इतर पेशींना खूप हानीकारक असेल तर ती पेशी नामशेष होऊ शकते. उदा: वाघ!!!!!

अमितव, ती संशोधन करते आहे हे माहिती आहे. त्याबद्दल आदर आणि आनंद व्यक्त करतो मी. पण सुर्य उगवलाच नाही तर पृथ्वी किती दिवस तग धरणार आहे? फोटोसिन्थेसिस कसे घडेल? झाडे जिवंत राहतील का? मग ओ-२ मिळेल का? She is denying the fact that if Sun goes off nothing wrong would happen to Earth.

She is denying the fact that if Sun goes off nothing wrong would happen to Earth.
>> असं तिने कुठे म्हटलंय?

योकु,
माझे वाक्य असे होते: जो पर्यंत सुर्य आहे तो पर्यंत पृथ्वी आहे. सुर्य हा ह्या विश्वाचा केन्द्रबिंदु आहे.

डायनासोर हे सगळीकडे नव्हते. त्यामुळे ते नष्ट झालेत. त्यांची संख्या फार नव्हती. मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. जसे की वाघ, सिंह, साप ह्यांची संख्या खूप कमी आहे. साप स्वतःची अंडी मागे फिरुन खात जातो. नाहीतर सांपाची संख्या केवढी तरी असती.
===

आणि तिचे उत्तर असे आहे: Bee, please check the facts before writing at least! None of your statements above are correct. How can you write something wrong with so much confidence!

इथे मी असे गृहीत धरत आहे की तिला माझे एकही वाक्य मान्य आहे. कारण None of your statements above are correct. हे तिचे वाक्य आहे.

आले का लक्षात मी हे वाक्य का लिहिले : She is denying the fact that if Sun goes off nothing wrong would happen to Earth.?????

बेफी, जसे तुम्हाला वाटते की सुर्य उगवल्याशिवाय राहणार नाही तसे इथे अनेकांना वाटते की पृथ्वी नष्ट होणार नाही. मनुष्य पेशी नष्ट होणार नाही.

सुर्य हा ह्या विश्वाचा केन्द्रबिंदु आहे. >> नाही. सूर्य हा फक्त आपल्या सोलर सिस्टम्चा ( बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, शनी, गुरु इत्यादी) केंद्रबिंदू आहे . आपली सोलर सिस्टम मिल्की वे गॅलक्सीचा एक छोटा भाग आहे. अशा अनेक गॅलक्सीज या विश्वात आहेत .

( आता विदर्भात सोलर सिस्टम = विश्व असे शिकवले जाते वगैरे सुरु करु नकोस )

मुळात हानी पोचवणार्‍या जीवप्राण्यांची संख्या खूप कमी प्रमाणात असते. >> हे कशावरुन ? मच्छर, टोळ, स्लग्स, ढेकूण, संसर्गजन्य रोगांना कारण असणारे बॅक्टेरिअया / व्हायरसेस यांची संख्या कमी प्रमाणात असते
? कशाच्या तुलनेत कमी ?

जो पर्यंत सुर्य आहे तो पर्यंत पृथ्वी आहे >> हे ही चूकच आहे. पृथ्वी म्हणजे फक्त ओटू आणि जीवन आणि फोटोसिंथेसिस आणि वाघ नाही.

इब्लिस छान पोस्ट ..

सिंडरेला, एकदा फिबी ही रॉस ला इव्हॉल्युशन वरून अशीच गप्प करते .. Happy

बी ने मांडलेल्या मुद्द्यात थोडेफार तथ्य आहे ना?

मिल्की वे गॅलक्सी - हा विषय खूप भन्नाट आहे.

मी इथे फक्त आपल्या सोलर सिस्टम ... आपल्या विश्वाबद्दल बद्दल बोलत आहे.

पृथ्वी म्हणजे फक्त ओटू आणि जीवन आणि फोटोसिंथेसिस आणि वाघ नाही.>> अमितव ओ-२ म्हणजे प्राणवायू .. जर तोच नसेल तर प्राणीजीव आपण सगळे असू का? नाही ना.. म्हणून सुर्य आहे तोवर आपण आहोत.

चुभुदेघे! शेवटी ही माझी काही मते आहेत.. आणि थोडासा अभ्यास आहे!

जो पर्यंत सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वी आहे हे विधान 'सजीवांचे जीवन' ह्या अर्थाने बरोबर आहे. सूर्याच्या शेवटच्या अवस्थेत तो एक्स्पान्ड होईल व त्याचा फुगवटा बुध ग्रहाच्याही पुढे येईल. त्यावेळी उष्णतेमुळे पृथ्वीवरील सजीव जीवन कायमसाठी नष्ट होईल व पुन्हा निर्माण होऊ शकणार नाही. अडीच अब्ज वर्षे आहेत पण हे व्हायला! तोपर्यंत पर्यावरणाचा अनेकवेळा र्‍हास होऊन निसर्ग आपल्या अंगभूत नियमांनुसार पुन्हा संतुलन स्थापन करेल.

(वाचलेली माहिती, तपशील चुकीचा असल्यास कृपया कळवावे)

आणि थोडासा अभ्यास आहे! >> बरोबर. थोडासाच अभ्यास आहे!! Wink (हलके घ्या!!)
बी , वाघ मुद्दा अजिबातच पटला नाही. पुन्हा स्पष्ट करू शकाल का??

Pages