हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

__/\__

फक्त शेवटचं पान वाचुन क्लायमॅक्स मला सांगितलेला.. >> बेक्कार. मी त कव्हर पेज, प्रस्तावना अगदी केव्हा पब्लीश झाली प्रकाशकाचा पत्ता इथुन सगळ वाचत जाते. कितीही कंटाळवाण पुस्तक असल तरी उड्या मारत मारत जाण पटतच नै मला अशावेळी कुणी माझ्या म्हणजे मी वाचत असलेल्या गोष्टींचा विचका केला नं तर :रागः त्या व्यक्तीशी बोलणचं सोडून देते काही दिवस.. विघ्नसंतोषी लेकाचे.. त्यामुळे आजकाल पुस्तक हाती घेते तेव्हा सांगतच नै कुणाला काय वाचतेय ते.. Lol

दुसरी लिंक ओपनच नै होतेय>>
तुमच्याकडे ब्लॉक असेल बहुतेक लिंक..
नाहितर marauders map jennifer gibson हे गुगलुन बघा "Surreal Confections: Harry Potter Invitation" हे जिथे दिसेल त्या लिंक वर टिचकी मारा

भेटली..मस्त मस्त आयडिया आहेत.. बर्थडे पार्टी म्हणजे तर मज्जाच मजा .. पुढे मागे भाचा भाचीच्या ब्र्थडे ला अस काही तरी करायला हरकत नै..

फायनली हॅरी पॉटर चा पुर्ण सेट नुकताच हातात पडलाय, "जगी सर्व सुखी असा कोण आहे ??" ह्याचं उत्तर सध्या तरी माझ्याकडे आहे.
मस्त सेट आहे, १ ते ७ पुस्तकं एका प्लॅस्टीक खोक्यात आहेत, आणि त्यावर हॉगवर्टस्चं मस्त चित्र आहे.
अ‍ॅमेझॉन वर लायट्निंग डील मध्ये २२००/- ला मिळाला सेट.
पुस्तकांची क्वॉलिटी छान आहे. (ब्रिटन ची कॉपी असल्या मुळे असेल कदाचित, किंमत पाउंडस मध्ये छापलिये)
आता शेवटचे दोन भाग नव्या कोर्‍या पुस्तकासोबत.

अग्निपंख मस्त
मी पण तोच सेट मागवला आहे.
पहिले तीन भाग अधाश्यासारखे वाचून काढले.
चौथ्या भागापासून कोणी न कोणी जाते सो वाचू की नको असे झालेय. चौथा भाग चालू केलाय पण वेग नाही पकडला अजून.
वाचायचे तर आहेच तरीपण.....
पण पुस्तकातून खूप डिटेल्स कळतात.

मी पण तोच सेट मागवला आहे.>>ही पुस्तकं लै भारी आहेत, गोल्डन एंबोसिंग केलेले स्टार्स मस्त वाटतात. आणि टायटल पण.
काल घरी गेल्यानंतर पहिले ४ भाग चाळुन पाहिले, त्यात सुरुवातिला हॉगवर्ट्सचा नकाशा दिलाय मस्त आहे तो. आणि शेवटच्या पानांवर काही 'pottermore' मधले फन फॅक्टस दिलेत मस्त आहेत ते.!
पण एक निराशा झाली, ईपब पुस्तकात प्रत्येक चॅप्टर च्या सुरुवातिला एक छोटसं चित्र दिलं आहे, मी ते ह्या छापिल एडिशन मध्येपण असतिल असं समजतं होतो पण तस नाही निघालं. Uhoh

गोल्डन एंबोसिंग केलेले स्टार्स मस्त वाटतात. आणि टायटल पण.>>>>>>>>>> इतकी जळतेय ना हे वाचुन... स्वतःच स्वतःला गिफ्ट करावा लागणार बहुदा हा सेट... जेव्हा सलग वाचण्याइतपत वेळ असेल तेव्हाच मागवणार

गोल्डन एंबोसिंग केलेले स्टार्स मस्त वाटतात. आणि टायटल पण >> यिप्प्प्प्प्प्पीई.. माझ्याकडे ७ पैकी दोन आहेत तसे.. मी रॅन्डम घेतलेत ना बुक्स म्हणून पण सर्वांमधे ते बुक्स जास्त क्युट दिसतात.. Happy

स्वतःच स्वतःला गिफ्ट करावा लागणार बहुदा हा सेट...>>
चिमुरी अ‍ॅमेझोनवर लक्ष ठेव आणि विश लिस्ट मध्ये टाकुन ठेव, आणि लाइट्निंग डील मिळते का ते बघ, मला २६०/- रु नेकमी करुन मिळाला ह्याच डील मध्ये Proud
आणि हो COD मध्ये मागवला उगाच रिस्क नको म्हटलं Wink

माझ्याकडे हॅपॉचे मराठी आणि इंग्लिश असे दोन्ही भाग आहेत. एका मित्राने वाढदिवसाला भेट म्हणून इंग्लिशमधला पूर्ण सेटच दिला. एवढी खूश झाले होते ना मी त्याच्यावर. या पुस्तकाची जादू काही औरच आहे. मराठी भाषांतर बरंचच गंडलं असलं तरी तिस-या भागानंतर थोडंतरी वाचनीय होतं... पण पुस्तकचं एवढं भारी आहे ना की कोणत्या भाषेत वाचतोय त्याने एवढा काही फरक पडत नाही असं मला वाटत... ( तरीही मी पहिल्यांडा इंग्लिशमधूनच वाचले आहेत सगळे भाग Happy नंतर tp म्हणून मराठीतूनही वाचले)

हॅरी ला Thestrals पाचव्या भागापसुन दिसतात ना, कारण त्याने सेड्रिकला मरताना पाहिलेलं असतं म्हणुन (गॉब्लेट ऑफ फायर मध्ये).
पण त्याने तर क्विरेलला पहिल्या भागातच मरताना पहिलेलं असतं मग त्यानंतर पण त्याला thestrals का दिसत नाही. कि क्विरेल हॅरी समोर मरत नाही ???

भरत मयेकर >> बरोबर..
अग्निपंख; हॅरी ने क्विरल चे मरण पूर्णपणे पाहिले / क्विरल ला मारून मग तो बेशुद्ध पडला असे रोलींग यांनी पुस्तकात लिहिलेले नै.. त्यात तो क्विरलला धरुन ठेवतो पण त्याच्या स्कार मधे होत असलेल्या वेदनेमूळे त्याला काही दिसतच नै.. बस क्विरलच्या किंकाळ्या आणि वोल्डी चा आवाज तेवढा ऐकुन तो बेशुद्ध होतो. मग त्याला हॉस्पिटल मधे जाग येते अस चित्रण केलय लेखिकनं..

जेम्स-लिली मारले गेल्यानंतर- सिरियस सिक्रेट कीपर होता आणि त्याने वॉल्डीला सांगितलं ठिकाणं म्हणून ते मारले गेले, असा समज होऊन सिरियसला अटक करतात.

पण मग तो खूप डेंजर आहे, मगल्स ना मारलं आहे अशी अफवा का ? तिसर्‍या भागात / ५ व्या सिरियस वॉल्डी ला जाऊन मिळेल म्हणून त्याला पकडा असं का आहे ?

डंबलडोरला तर माहीत असतं की सिरियस - जेम्स मित्र होते आणि आधीही सिरियस डार्क साईडला आहे असं कुठे उल्लेख पण नाहीये.

सिरियसला माहिती होतं की तो जर सिक्रेट किपर असला तर ते लगेच माहिती होउ शकतं (कारण तो जेम्सचा मित्र आहे म्हणुन) मग ते Pettigrew ला सिक्रेट किपर बनवतात (Pettigrew हा रॉन कडे असलेला उंदिर आहे). पण Pettigrew वोल्डेमार्टला सिक्रेट सांगुन टाकतो. जेम्स आणि लिली मेल्यावर सिरियस Pettigrew ला मारायला गेलेला असतो पण तेंव्हा Pettigrew सिरियस वर प्रतिहल्ला करतो त्यात आजुबाजुचे मगल्स पण मारले जातात, Pettigrew च बोट तुटतं (की तो पुरावा म्हणुन मागे ठवतो ?) आणि तो उंदिर बनुन पळुन जातो, इथे सिरियस सापडतो आणि त्याच्यावरच Pettigrew ने केलेल्या murders चा आरोप येतो.

अग्निपंख सिरियस हा जेम्स चा सर्वात जवळचा म्हणून वोल्डी त्यालाच सिक्रेट कीपर समजून त्याच्या मागे लागणार हे सर्वांना समजलेल असत म्हणून सिरियस जेम्स ठरवतात कि पेटिग्र्यु जो कुणाला माहिती नसतो रादर कुणाच्या खिजगिणतीतही नसतो त्याला कीपर करायचं जेणेकरुन सिरियस वोल्डी ला हुल देउ शकेल..

जेम्स लिली ला मारल्यानंतर जेव्हा सिरियस ला पेटिग्र्यु बद्दल कळत आणि तो त्याला जाब विचारायला जातो तेव्हा पेटिग्र्यु स्वतःच मगल्स ला मारुन ते काम सिरियस ने घडवून आणल्याचा बनाव करुन गायब होतो ( उंदीर च्या रुपात कन्व्हर्ट होऊन )..

तिसर्‍या भागात / ५ व्या सिरियस वॉल्डी ला जाऊन मिळेल म्हणून त्याला पकडा असं का आहे ? >> प्राजक्ता_शिरीन >>> तिसर्‍या भागात सिरियस निर्दोष आहे हे सिद्ध होण्यापूर्वीच पेटिग्र्यु तिथुन पळून जातो म्हणून तो आधीच मेलाय हा समज जसाच्या तसाच राहतो.. ४थ्या भागात शेवटी जेव्हा हॅरी सर्वांना वोल्डी परत आलाय असं सांगतो तेव्हा जादू मंत्रालयाबरोबर इतरही भितीने तो परतुच शकत नाही आणि हॅरी सर्व खोट बोलतोय असच धरून चालतात (म्हणूनच वोल्डी पेटिग्र्युच्या सहाय्याने परतला हे पण लोक मानत नाही कारण तो जीवंत आहे हे हॅरी आणि फ्रेंडस व्यतिरिक्त कुणी बघीतलचं नसत ) .

हुश्श.. झाली एकदाची सगळी पुस्तकं वाचुन Happy
थोडी खुशी थोडी हळहळ..मला शेवटच्या भागापर्यंत वाटत राहिलं की हर्मायनी आणि हॅरी यांचच जमेल म्हणुन (स्पेशली जेंव्हा रॉन निघुन जातो आणि हॅरी-हर्मायनी एकत्र राहत असतात तेंव्हा) पण जेंव्हा हॅरी रॉनला सांगतो की शी इज लाइक अ सिस्टर मग कळालं की हे होणार नाही.
आणि काही अंदाज बरोबर आले जसं की स्नेपने डंबल्डोरला मारणे ते वाचतानाच वाटत होतं की डंबलडोरच्याच प्लानचा तो भाग असेल म्हणुन..
सिरियस, डंबलडोर यांच मरणं खुप चटका लाउन जातं, जेकेला बहुतेक ह्या गोष्टींचा अनुभव आलेला असावा, म्हणुनच ती हे एव्हढ ताकतीने लिहु शकली.

सगळे आपापल्या जागी आणि स्नेप त्याच्या जागी .. मला अजुनही स्नेपच आठ्वतो.. त्यानंतर सिरियस आणि डम्बलडोर .. हे सर्व त्यांच्या मरणानंतर म्हणतेय मी.. पण स्नेप ची दया..सहानुभुती अस कदी वाटल नै.. तो खरच एक हटके कॅरॅक्टर वाटल त्यातलं ..

आणि हो सिरीज पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन Happy

धन्स टीना..
हॅपॉ नंतर बिडल बार्ड टेल्स पण वाचलं. ठीक आहे पण एव्हढी मजा नाही आली.. (क्विडीच थ्रु एजेस पण वाचण्याच्या लिस्टीमध्ये आहे बघुया मुड आणि वेळ दोन्ही जमेल तेंव्हा)
हॅरीपॉटर वाचुन झाल्यावर दुसरं पुस्तक हाती घ्यावसं वाटत नाहिये सध्या तरी.. Uhoh
आता हॅपॉ मुव्हीज बघन चालु आहे.. सुरुवातिचे २ बघुन झालेत आणि तिसरा निम्मा बघितलाय.. एक जाणवणारा फरक म्हणजे हॉगवर्टस चक्क वेगळ दाखवलय तिसर्‍या भागात..(स्पेशली हॅग्रिडची हट, पहिल्या दोन भागात ती मेन फोर्ट्च्या जवळच दिसते तर तिसर्या भागात ती बर्‍यापैकी लांब आणि उतारावर दाखवलिये.

हाल्फ ब्लड प्रिंन्स वोल्डेमार्ट असेल असं वाटत होतं पण अंदाज चुकला.. <<<< स्नेपनं बहुतेक वेळा अंदाज चुकवलेत. अगदी पहिल्याभागापासून सातव्या भागापर्यंत. तरीही सातव्या भागातला प्रिन्से'स टेल चाप्टर रडवतो. Happy

मी तिसरा भाग कालपासून वाचायला घेतलाय.

Pages