हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना मस्त
मी पण amazon वरून सगळा set मागवला.
Friday la call मधे busy असल्यामुळे पार्सल परत गेले. माझा weekend वाया गेला.
आणि अजुन वेळ नाही काढू शकलो.
मला निवांत वाचायची आहेत.आणि त्यामुळेच या धाग्यावर येत नव्हतो चालू असलेली चर्चा टाळ्ण्यासाठी

वाचून येइनच इकडे....

पूनम >> मी झलक वाचली मराठी मधुन.. ई अस झाल मला तरी .. कैच्याकै भाषा वाटते वाचल्यावर .. साध्या सोप्या शब्दात सांगायच त पाणचट आणि पुळचट .. असो ..

चिमुरी >> नको वाचू मराठीत प्लीज .. अगदी जागांचा पण अनुवाद केलाय त्यात.. यक होत एकदम..

प्रशांत के >> द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया .. त्या मधली चार बोलावलीत .. मी मुव्ही पाहिलेत त्या प्रमाणे स्वतःच्या दिडशहाणेपना दाखवुन मारे धडाधड ऑर्डर दिली .. पहिल पुस्तक म्हणून द लायन्,द विच अ‍ॅन्ड द वॉर्डरोब हाती घेतल..मी पुस्तक कोळून पीते आपलं वाचते म्हणून समोर पकडल तर तिथ कव्हर पेज वर खाली लिहलेल दिसल BOOK 2 कॅपिटल मदी.. अशी धाकधूक झाली पण म्हटलं आल इझ वेल..आल इझ वेल.. आणि आत पाहते तर इटॅलिक्स मदी दिसल In the reading order recommended by C. S. Lewis खाली हे लिस्ट ७ पुस्तकांची ...
मेरा तो दिल ही टूट गया Sad .. अधामधातून पुस्तक वाचायला तर जाऊच द्या एखादी ओळ जरी सुटली तरी सैरभैर होणारी मी .. कसं करणार .. उरलेल्या ३ पुस्तकांची आत्ताच ऑर्डर देऊन आलेय ..

मराठी मधल्या हॅरी पॉटर अनुवादामध्ये फार मेजर गंडलंय. हॉरीबल आहे.

शिवाय अनुवादामध्ये ती जेकेची खास खुसखुशीत शैली येतही नाही.

हेडवीग घुबडीण अस वाचल्या वाचल्या डोक्यावर हात मारला मी .. ती फिमेल आहे आणि घुबड च फिमेल व्हर्जन घुबडीण असते तरीपन हेडवीग घुबडीण.. याक बाप्पा ..
परत ते लिकी कॉल्ड्रॉन ला कसली ती कढई .. Lol .. पूर्ण चिंधी करुन ठेवलीय ..
00020468.gif

प्लीजच.

इंग्रजी अगदी ५वीतल्या मुलांना समजे अशीच आहे रे बाबाहो. वाचा. जे शब्द समजणार नाहीत ते सरळ सोडून द्या. नेक्स्ट टाईम वाचाल तेव्हा नवा अर्थ कळायला त्यांची मदत होते.

आपल्यासारख्या इंग्रजी प्रथम भाषा नसलेल्यांच्या मुला/मुलींना इंग्रजीची गोडी लावायला अत्यंत उत्तम पुस्तके आहेत ही. प्लीज मूळ इंग्रजीतून आधी स्वतः वाचा अन मग आपल्या मुलामुलींना बेडटाईम रीडींग करा.

बिलिव्ह मी, इट्स रिअल मॅजिक.

आजही आय हॅव्ह लेजिलीमॅन्सी बिटवीन मी अँड माय डॉटर. 8.gif

इब्लिस अख्खी पोस्ट मस्त लिहिलिय... Happy मी इंग्लिशमधुन बर्‍याचदा वाचलेली आहे सिरिज..

मला आता बघायचं आहे की मराठी भाषांतर किती गंडलय ते.. जेकेआर ची सर कोणालाच येणार नाही.. तरिही एक पुस्तक तरी वाचुन बघणारच...

मस्त टीना
आता मी पण to be read लिस्ट मधे नार्निया अ‍ॅड करतो. जाउदे नार्निया ची चर्चा हॅपॉ च्या धाग्यावर नको

चिमुरी ऑल द बेस्ट
वरील प्रतीसादांवरून असे वाटतेय की मी इंग्लिश पुस्तके मागवली हा बेस्ट निर्णय होता

चिमुरी >> मराठी मधे PDF आहे का तुझ्याकडे ? कि पुस्तक आहे ?

प्रशांत के. >> आता मी पण to be read लिस्ट मधे नार्निया अ‍ॅड करतो>> छान छोटी छोटी पुस्तकं आहेत.. माझे उरलेले तीन बुक्स यायचे आहेत सो थांबलीय.. १ २ दिवसात करते वाचन सुरु.. Happy

हार्ड कॉपी आहे... हॅपॉ कधिही इंग्लिशमधुनच अन ओरिजिनल हार्ड बाउंड पुस्तकंच वाचावीत हे माझं मत.. नवी कोरी पुस्तकं वाचली की अजुनच मज्जा.. Happy मुलांना ११ व्या बड्डे ला गिफ्ट द्यायला बेस्ट आहे हे प्रकरण..

नार्नियाचा वेगळा धागा काढा.. मग तिथेही बोलु.. अख्खा सेट आहे माझ्याकडे..

इंग्रजी अगदी ५वीतल्या मुलांना समजे अशीच आहे रे बाबाहो. >>> किंबहुना ९७ की ९८ साली एका आतेभावानं हे इंग्रजी पुस्तक गिफ्ट म्हणून दिलं तेव्हा "तुला समजेल इतकंच इंग्लिश आहे" अशा वाक्यासकट दिलं. या पुस्तकानं इंग्रजी वाचनाची गोडी लावली.

मी हे पुस्तक वाचलं तेव्हा हॅरी पॉटर हा कल्ट झालेला नव्हता. मी ते पुस्तक अजून एका मित्राला वाचायला दिल्यावर "बकवास आहे! जादू शिकणार्‍या मुलांचं काय ते पोरकट पुस्तक" अशी टिप्पणी करून परत दिलं होतं (पूर्ण न वाचताच) सध्या हेच मित्र महाशय हॅरी फॅन आहेत हे सांगणे न लगे!!

(चिमुरी, काही संदर्भ लागला का? Proud )

Rofl

नंदे, फुल्ली फिल्मी स्टोरीच की गं Proud संदर्भ लागलाच... तु एकदा ट्राय कर की मराठी भाषांतर, किमान फॅन फिक्शन तरी...

नंदिनी >> नक्की ट्राय कर .. पण प्लीज त्या जागा आणि चार्म्स वगैरे चे अनुवाद नको करु .. बा़की तुझ लिखाण नेहमी वाचते आणि आवडत सुद्धा .. Happy

अग्निपंख >.> सेम हिअर.. मला बॅटल विथ ड्रगन पण गंडलेल वाटल. खुपच कमी जागेत निभावल्यासारख नै का वाटल ?

हा J.K. Rowling चा Oprah ने घेतलेला इंटरव्ह्यू मला जाम आवडला आहे! दोन अत्यंत यशस्वी आणि कठीण परिस्थितीतून वर आलेल्या स्त्रिया एकमेकींशी काय विचार शेअर करतात हे ऐकण्यासारखं आहे!
https://www.youtube.com/watch?v=Uv1O6JJMC5o

अग्निपंख >.> सेम हिअर.. मला बॅटल विथ ड्रगन पण गंडलेल वाटल. खुपच कमी जागेत निभावल्यासारख नै का वाटल ?.>>
हो, बहुतेक तो ड्रॅगन किती मोठा (अवाढव्य) आहे हे दाखवण्याच्या नादात गंडलेल वाटतय..

पहिला भाग वाचून झाला. मस्त.
मूव्ही पेक्षा पुस्तक वाचणे कधीही चागंले.

काही प्रश्न आहेत पण पुढील भागात खुलासा होतो का बघतो नाहितर इथेच विचारेन.

पुस्तकात खूप सविस्तर वर्णन केले आहे. सहिच

प्रशांत के >> टाळ्या ..

नंदिनी >> कालपरवा माझ्या एका मैत्रीणीने सुद्धा असचं म्हटलं..म्हणे काय लेकरांचे बुक्स वाचायचे.. फिफ्टी शेड्स वगैरे ओके म्हणे..हॅ पॉ काय ! .. अस्सा राग आला न तीचा . विचार केला कि जो व्यक्ती पुस्तकाच एक पानही न वाचता हि प्रतिक्रिया देतो त्याला कशाला त्यातला अर्क समजावून सांगायचा Lol .. मग मी पन म्हटल OK

फिफ्टी शेड्स वगैरे ओके म्हणे..हॅ पॉ काय !>>.
अस्तो एकेकाचा चॉइस.. Wink असच एकदा बर्‍याच लोक्सांनी चांगल म्हटलेलं 'लोलिता' वाचलं... अरारा काय ते विचार, सायको शब्द पण सोज्वळ वाटेल त्या माणसाला. सावत्र असली म्हणुन काय झालं शेवटी मुलगीच होती ती त्याची, असो अवांतराबद्द्ल क्षमस्व..
बॅक टु हॅरी पॉटर..
मी काल ३:३० पर्यंत जागुन 'गॉब्लेट ऑफ फायर' संपवल, आता उरलेले तिन टॅबवर वाचायचे आहेत Uhoh
बाकी ईबुक्स वर प्रत्येक चॅप्टरच्या आधी एक छोट चित्र दिलय त्यावरुन कथेत काय असेल ह्याचा अंदाज लावायला मजा येते.

काही प्रश्न आहेत पण पुढील भागात खुलासा होतो का बघतो नाहितर इथेच विचारेन.>>>>>> बिन्धास्त विचारा. स्पॉयलर असेल तर आम्ही उत्तर देणार नाही हां>>>>>>> +१.. पण तरिही एक विनंती.. सगळे भाग वाचा.. आणि परत एकदा हॅपॉ वाचा.. मग काय प्रश्न राहिले असतील तर ते विचारा.. परत परत वाचुन जवळपास बरेचसे प्रश्न लगेच सुटतात.. एकदाच वाचुन लगेच रेडीमेड उत्तरं बघु नका.. हॅपॉ ची मजा सारखं सारखं वाचुन स्वतःच्या प्रश्नांची स्वतःच उत्तरं मिळवण्यात जास्त आहे (काश हे अभ्यासाच्या वेळी सुचलं असतं तर) Happy

विचार केला कि जो व्यक्ती पुस्तकाच एक पानही न वाचता हि प्रतिक्रिया देतो त्याला कशाला त्यातला अर्क समजावून सांगायचा>>>>>>>> मी अश्यांना सुद्धा इतक्या वेळा हॅपॉ बद्दल उतु जाउन सांगते की किमान नंतर ते लोक माझ्यासमोर तरी हॅपॉ बद्दल काही बोलत नाहीत.. एकाने असच माझ्या भरभरुन बोलण्यामुळे हॅपॉ ७ बाजारात आल्यावर मुद्दाम कॉसवर्ड मधे जाउन फक्त शेवटचं पान वाचुन क्लायमॅक्स मला सांगितलेला.. अर्थात तोपर्यंत मी तो भाग वाचुन झालेला म्हणुन जगला तो, नाहीतर Proud

बापरे किती मेहेनत करतात हे लोक्स,
इथे marauder's map बनवायची प्रोसेस दिली आहे, वाचुनच थक्क झाल की लोक मजा करताना पण किती सिरियस्ली करतात Proud
आणि ह्या बाईंनी तर मुलाच्या वाढदिवसाचे इन्विटेशन्स marauder's map सारखे बनवलेत, शिवाय Owl post चं envelope आणि सोबत ९ ३/४ प्लॅटफॉर्मचं तिकिट पण ___/\___

Pages