हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हॅरी अन इतर तिथे आल्या आल्या बिल त्यांना सांगतो की आता कोणीच कामावर जात नाही आणि फिडेलस चार्म वापरलय >>
आल्या आल्या नाही सांगत. डॉबीचे अंत्यसंस्कार झाल्यावर सांगतो; तो हे पण म्हणतो की कधी ना कधी हे होणारच होतं (म्हणजे हॅरी कारणीभूत नाही या अर्थाने). फिडेलस चार्म आणि बाकी फॅमिलीला सेफ जागी हलविणे हे हॅरी ग्रेव खणतो तेवढ्या ड्युरेशन मध्ये होते.

बाय द वे, या वरून आठवलं की जर बिल शेल कॉटेजचा सिक्रेट्किपर होऊ शकतो तर लिली किंवा जेम्स स्वत:च्या घरासाठी का नाही होऊ शकले ? वर्मटेलने विश्वासघात करण्याचा प्रश्नच आला नसता..

लिली किंवा जेम्स स्वत:च्या घरासाठी का नाही होऊ शकले ? वर्मटेलने विश्वासघात करण्याचा प्रश्नच आला नसता..>>>>>>> असं जर बघत बसलो तर बर्‍याच शक्यता निर्माण होतील.. मग तर एकाच भागात सगळं नसतं का Proud

फिडेलस चार्म आणि बाकी फॅमिलीला सेफ जागी हलविणे हे हॅरी ग्रेव खणतो तेवढ्या ड्युरेशन मध्ये होते.>>>>> हं

५ व्या भागात जेम्स च्या पालकांचा उल्लेख आहे - सिरियस घर सोडून तिथे रहात होता असा, पण नंतर म्हणजे हॅरी लहान असताना किंवा जेम्स-लिली गेल्यावर ते नसतात का ?

ए तुमच्या सगळ्यामुळे मला पुस्तके परत वाचावी लागत आहेत. काम बाजूला पडलीत ह्याच पाप तुम्हा सगळ्यांना लागणार आहे. ह्यात माझा काहीही दोष नाहीये

दोन पानं सोडून चर्चा झाली आहे स्नेप आणि हॅरीबद्दलची. त्यात माझे दोन आणे.
स्नेपच्या मेमरीमध्ये शेवटची मेमरी आहे ज्यात तो आणि डम्बलडोअर बोलत असतात हॅरीला व्होल्डीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी. तेव्हा डम्बलडोअर त्याला विचारतो, now dont tell me Severus, after all these years. You have come to care about that boy? यानंतर स्नेप मेमरी बंदच करतो ती. मला वाटतं हे फार सुंदर आहे. स्नेपचं फक्त लिलीवर प्रेम आहे, तिचे डोळे हॅरी घेऊन आला आहे. जेम्सचा मुलगा म्हणून त्याचा तिरस्कार वाटत असताना लिलीचा मुलगा म्हणून त्याचं संरक्षण करत असताना त्याच्या मनात हॅरीविषयी प्रेम नक्कीच जागृत झालेलं आहे. आता तो त्याचं संरक्षण केवळ त्याचे डोळे लिलीसारखे आहेत म्हणून नाही करत, तर काळानुसार त्याला हॅरीबद्दल खरं प्रेम वाटायला लागलं आहे आणि व्होल्डीने त्याला मारू नये अशी त्याची आंतरिक इच्छा आहे. डम्बलडोअरने ते कधीच ओळखलं आहे, फक्त त्याचा उच्चार केल्यानंतर स्नेपला ते आवडत नाही. पण त्याचं पुत्रवत प्रेम असतं हॅरीवर - असं मला वाटलं त्या एका वाक्यातून Happy

बाकी, सिरियसली सांगू, मला ती सिरिज वाचताना लूपहोल्सच दिसत नाहीत किंवा काढावेसेही वाटत नाहीत. I am totally happy reading them as they are! Happy

पौर्णिमा पहिल्या पॅरा ला अनुमोदन..

सिरिज वाचताना लूपहोल्सच दिसत नाहीत किंवा काढावेसेही वाटत नाहीत.>>>>>> माझ्याबाबतीत, इतक्यांदा ती सिरीज आहे तशी वाचली.. आता मात्र वाचताना रिडींग बिटवीन द लाइन्स करावंसं वाटु लागलं, तर हे बाजुलाच राहिलं, अन छोट्या छोट्या गोष्टी ज्या वाचण्याच्या ओघात लाइटली घेतल्या जातात त्यांच्याकडे लक्ष जायला लागलं. मग त्याचा नक्की अर्थ काय हा की तो, असं व्हायला लागलं. हॅपॉ मधे अजुन अ‍ॅडिशनल काही येत नाहिये, सध्या बाकी काही वाचत नाहिये, म्हणुन आहे त्यातुनच अजुन जास्तीचं काही मिळतय का हे बघण्याच्या नादात लुप होल्स निघतायेत... Happy

पौर्णिमा, तुला खरचं असं वाटतं की स्नेपला हॅरी आवडायला लागतो ? त्याचं वागणं तरी कधीचं तसं नसतं. लिली वरच्या प्रेमापेक्षा जेम्स बद्द्लाचा तिरस्कार जास्त असतो असं मला नेहमी वाटतं.

मला शंका पडतायतं कारण न ठरवता उलट्या क्रमाने पुस्तकं वाचली जातायतं सध्या. आणि प्रोफेशन तसं आहे की पहीले चुका दिसतात Wink

मला शंका पडतायतं कारण न ठरवता उलट्या क्रमाने पुस्तकं वाचली जातायतं सध्या>>> माझ्या मते ते चुकीचं अहे कारण पहिल्यांदा वाचताना त्यामुळे कॅरेक्टर्सचा अंदाजच येणार नाही. पहिल्या भागापासून फुलवलेले कॅरेक्टर्स हेच तर हॅपॉची युएसपी आहे. जादूबिदू सब साईडमे. बेसिक मॅजिक इज दिस कॅरेक्टर्स.

पूनम तुझ्या पोस्टवर लिहिते थोड्यावेळानं.

मला शंका पडतायतं कारण न ठरवता उलट्या क्रमाने पुस्तकं वाचली जातायतं सध्या>>> माझ्या मते ते चुकीचं अहे कारण पहिल्यांदा वाचताना त्यामुळे कॅरेक्टर्सचा अंदाजच येणार नाही. पहिल्या भागापासून फुलवलेले कॅरेक्टर्स हेच तर हॅपॉची युएसपी आहे. जादूबिदू सब साईडमे. बेसिक मॅजिक इज दिस कॅरेक्टर्स.

पूनम तुझ्या पोस्टवर लिहिते थोड्यावेळानं.

now dont tell me Severus, after all these years. You have come to care about that boy? यानंतर स्नेप मेमरी बंदच करतो ती. >>> नॉय!!!त्यानंतर स्नेप पेट्रोनस चार्म वापरतो आणि सिल्व्हर डो येतो. स्नेपच्या डोळ्यांत पाणी येतं आणि मग डम्बलडोअर विचारतो.

“After all this time?”
“Always,” said Snape.

अगं नंदिनी , मी आधी पुस्तकं वाचली आहेत, पुन्हा वाचताना ७ वा भाग आधी हातात पडला, मग त्यातल्या लिंक्स शोधायला ६ वा घेतला मग आता ५ वा.

“After all this time?”
“Always,” said Snape. >> हे हॅरी आणि वाचकांना समजायला की स्नेपचं लिलीवर प्रेम होतं.

अजून एक लिंक लागली -

५ व्या भागात पेट्युनिआ जेव्हा डेमेंटर्स बद्दल ऐकते हॅरी च्या तोंडून तेव्हा ती म्हणते - I heard that awful boy telling her about it. - शब्द तेचं नाहीयेतं. तेव्हा ती स्नेपबद्दल बोलत असते, पण हॅरीला वाटतं की ती जेम्स आणि लिली बद्दल बोलत्ये.

मस्त आहे हॅरी पॉटर, पहिला भाग संपला, आता दुसरा सुरु, मस्त मजा येत आहे वाचायला. आता असं वाटतय की मी बराच उशीर केला वाचायला, आधी पुस्तकं पाहिली होती तेंव्हा बाकिच्या वेस्टर्न बुक्स सारखी ही पण ओव्हर हाइप्ड आहेत असं वाटलं आणि हात नव्ह्ता लावला. असो उशिरा क होइना चुक सुधारली.
हा बाफ स्पॉयलर अलर्ट बघुन सगळा वाचला नाहीये Wink काही पोष्टीच वाचल्यात..

अग्निपंख, बेटर लेट दॅन नेव्हर Happy एन्जॉय.. वाचुन झाल्यावर या इथेच Happy

जादूबिदू सब साईडमे. बेसिक मॅजिक इज दिस कॅरेक्टर्स. >>>>>>>> वाह.. मस्तच वाक्य..

५ व्या भागात पेट्युनिआ जेव्हा डेमेंटर्स बद्दल ऐकते हॅरी च्या तोंडून तेव्हा ती म्हणते - I heard that awful boy telling her about it. - शब्द तेचं नाहीयेतं. तेव्हा ती स्नेपबद्दल बोलत असते, पण हॅरीला वाटतं की ती जेम्स आणि लिली बद्दल बोलत्ये.
>>

येस.. असच अजून स्नेप आणि डंबलडोरचे भांडण. पुष्कळ उदाहरणे आहेत.
प्रसंग तोच पण बघायचं परस्पेक्टिव्ह बदलतं. एकदा सिरीज वाचून झाली की मग असं कुठल्याही क्रमाने, उलट्सुलट वाचा. रोलिंगने काही दुवे असे खूबीने पेरले आहेत ना ते शोधायला, आधी वाचलं असल तरी परत परत वाचायला जाम मजा येते.

अगं नंदिनी , मी आधी पुस्तकं वाचली आहेत,>> मग ठिके. Happy

हे हॅरी आणि वाचकांना समजायला की स्नेपचं लिलीवर प्रेम होतं.>>> नाही ते तर आधीच एस्टॅब्लिश झालेलं असतंय. हे यासठी की अजूनही स्नेपचं लिलीवरच प्रेम आहे, इतक्या वर्षांनीसुद्धा!

जेके बाईंनी स्नेपचं घडवलेलं कॅरेक्टर अद्भुतच आहे. हे असं आणि इतकं काँप्लेक्स कॅरेक्टर लिहायला काय ताकद लागली असेल.

अरे यार .. गाईज दॅट्स नॉट फेअर .. आता हे डिस्कशन वाचून मला परत सगळ वाचायचा मोह होतोय ..
फक्त आठवडा झालाय वाचून ...

अग्निपंख >> आता असं वाटतय की मी मी बराच उशीर केला वाचायला >> मला पन पहिल बुक संपल्यावर अगदि असचं वाटल होतं Wink

जेके बाईंनी स्नेपचं घडवलेलं कॅरेक्टर अद्भुतच आहे. हे असं आणि इतकं काँप्लेक्स कॅरेक्टर लिहायला काय ताकद लागली असेल. >> नंदिनी +१००००००००००००००००००००० अनुमोदन .. तो सरतेशेवटी इतका आवडून जातो कि सर्व काही त्याच्यामूळेच चांगल झाल असा विचार करावासा वाटतो ..

जादूबिदू सब साईडमे. बेसिक मॅजिक इज दिस कॅरेक्टर्स. >>>>>>>> खरंच आहे.. अगदी अनुमोदन..

जेके बाईंनी स्नेपचं घडवलेलं कॅरेक्टर अद्भुतच आहे. हे असं आणि इतकं काँप्लेक्स कॅरेक्टर लिहायला काय ताकद लागली असेल. >> नंदिनी +१००००००००००००००००००००० अनुमोदन .. तो सरतेशेवटी इतका आवडून जातो कि सर्व काही त्याच्यामूळेच चांगल झाल असा विचार करावासा वाटतो .. >> + 10000000

स्नेपसारख्या माणसाचं कॅरॅक्टर पण काय लिहीलय त्यांनी... आपल्याला अंदाज येत नाही कधीकधी पण किती सहन केलं असेल त्याने आयुष्यात. जिच्यावर प्रेम आहे तिने अशा माणसाशी लग्न केलयं ज्याचा तो अतिशय तिरस्कार करतो ( आधीपासूनच. फक्त लिलीच्या लग्नामुळे नाही)... ती तर मरण पावली आहे, पण आता तिच्या आणि तिच्या नव-याच्या मुलाचा जीवपण आपणच वाचवायचा आहे. व्हॉल्डीसारख्या अतिशय धूर्त, कसलेल्या आणि कपटी जादूगाराला फसवायचं, हेही काही खायचं काम नाहीये.. आणि हे सगळं करायचं कारण हॅरी लिलीचा मुलगा आहे (आणि विशेषत: त्याचे डोळे तिच्यासारखे आहेत.)
किती उलाघाल होत असेल स्नेपची यार.. शेवटच्या भागापर्यंत मात्र सगळे त्यालाच वाईट समजत असतात, त्यालाच दोष देतात.. Sad
एवढ वाईट वाटलं होत मला सातवा भाग वाचून... डंबलडोर उघडपणे हॅरीच्या बाजूने होते, पण स्नेपला नेहमीच उपेक्षा सहन करावी लागली. really sad..!

आयुष्यात इतके थ्रिलर्स वाचूनसुद्धा हॅरी पॉटरच्या पहिल्या भागापासून ते सातव्या भागामध्ये "प्रिन्से'स टेल" चाप्टर चालू होइपर्यंत स्नेपचं कॅरेक्टर काय आहे ते समजलं नाही. चुकूनसुद्धा वाटलं नव्हतं.

रच्याकने, हॅरी पॉटरचे सिनेमा थर्ड क्लास लेव्हलचे बनवले होते, पण काही अभिनेत्यांनी कॅरेक्टरला चांगला न्याय दिलेला. खासकरून अ‍ॅलन रिकमनचे काम मला खूप आवडलंय. पुस्तकातला स्नेप आणि पिक्च्रमधला स्नेप यात जराही फरक नाही. हे क्रेडिट त्या अभिनेत्याचं. जेकेने अ‍ॅलन रिकमनला खूप आधीच तो "केवळ मनुष्य आहे हे कायम लक्षात ठेव," असा सल्ला दिला होता. आठही पिक्चरमध्ये स्नेपची हेअरस्टाईल, ड्रेस आणि एक्स्प्रेशन काहीच बदलत नाही. Happy

शेवटच्या भागापर्यंत मात्र सगळे त्यालाच वाईट समजत असतात, त्यालाच दोष देतात..
एवढ वाईट वाटलं होत मला सातवा भाग वाचून... +१

खासकरून अ‍ॅलन रिकमनचे काम मला खूप आवडलंय. पुस्तकातला स्नेप आणि पिक्च्रमधला स्नेप यात जराही फरक नाही. हे क्रेडिट त्या अभिनेत्याचं. जेकेने अ‍ॅलन रिकमनला खूप आधीच तो "केवळ मनुष्य आहे हे कायम लक्षात ठेव," असा सल्ला दिला होता. आठही पिक्चरमध्ये स्नेपची हेअरस्टाईल, ड्रेस आणि एक्स्प्रेशन काहीच बदलत नाही. स्मित >>>

नंदिनी >> अगदी अगदी ... तो डिट्टो फिट बसलाय स्नेप म्हणून .. त्या कॅरॅक्टर ला अ‍ॅलन रिकमन ने पूर्ण न्याय दिलाय .. खर तर पुस्तक वाचल्यावर मनात मुव्ही आणि पुस्तकाची तुलना झालीच आणि फक्त अ‍ॅलन रिकमन ने स्नेप म्हणून समाधान केल माझं .. बाकी सगळे उन्नीस बीस .. काही काही तर उनतीस तीस पन आहे Proud

मस्त धागा आहे. मी नेहमीच वाचतो. मी सगळे पिक्चरस पहिले आहेत. पण सगळी बूक्स नाही वाचली अजून.
मी जास्त मराठी पुस्तके वाचतो आणि काही प्रमाणात इग्रन्जी. मी Harry Potter series मागवणार आहे.
कोणी मराठी translation वाचली आहेत का?
मी मराठी पुस्तके मागवणार आहे. काही फरक पडेल का? की English books मागवू?

मैत्रिणीने वाचली आहेत मराठी पुस्तकं.. चांगली आहेत. इंग्लिश वाचायचा अगदीच कंटाळा असेल तर नक्की मागवा मराठी.. पण इंग्लिश वाचताना मज्जा येते. सोप्पं आहे. शिवाय नंतर कितिदा वाचलं तरी दरवेळी काहितरी नव्याने लक्षात येतं (इंग्लिश खुप चांगलं नसल्याने काही शब्द, लाइन, पॅरा नुस्तेच वाचुन पुढे गेलेले असल्याने त्यातले काही पॉईंट्स नंतर कधितरी परत वाचताना लक्षात येतात.).

मी जास्त मराठी पुस्तके वाचतो आणि काही प्रमाणात इग्रन्जी >> प्रशांत के सेम हिअर ..
पण चिमुरी म्हणतात त्याप्रमाणे खरच भाषा खुप सोप्पी आहे ..

कुणीही त्याच्या भावना स्वतःच्या भाषेत मांडल्या तर त्या जास्त भिडतात तेच जर त्याच भाषांतर वाचल तर एखाद्याने ती गोष्ट आपल्याला सांगितली असा फिल येतो बरेच्दा... ती गोष्ट कळते खरी पण त्यात जगता येत नाही .. हॅ पॉ च्या मराठी पुस्तकात त्यातील काही काही गोष्टींचे भाषांतर फारच विचित्र वाटते . . म्हणून हे पुस्तकं इंग्लिशच वाचा .. जास्त मज्जा येईल ..

Pages