Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04
हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....
'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डंबलडोर रॉन ला जो
डंबलडोर रॉन ला जो डिल्युमिनेटर देतात त्याचा वापर त्यांनी स्वतः कधी केला असेल??? एनी गेस?
अगं पहिल्याच पुस्तकात
अगं पहिल्याच पुस्तकात पहिल्याच प्रकरणात नाही का? आणि मला वाटतं पाचव्या का सहाव्या पुस्तकात पण आहे एकदा...
ज्या कारणासाठी डंबलडोरने
ज्या कारणासाठी डंबलडोरने रॉनला दिला त्या कारणासाठी म्हणते आहेस का ?
डिल्युमिनेटर<< पण तिथं
डिल्युमिनेटर<< पण तिथं डील्युमिनिटर असा शब्द नाहीये हां. वेगळाच शब्द आहे.
पुट-आउटर
पुट-आउटर
ज्या कारणासाठी डंबलडोरने
ज्या कारणासाठी डंबलडोरने रॉनला दिला त्या कारणासाठी म्हणते आहेस का ?>>>>>>>>>> हो
पुट-आउटर>>>>>>> ओह.. पुट आउटर चं एक फंक्शन डिल्युमिनेटर आहे तर
ह्म्म... मी पण हा विचार केला
ह्म्म... मी पण हा विचार केला होत पूर्वी. माझा अंदाज असा आहे की जो कोणी डंबलडोरच नाव घेइल तर त्यांना ऐकू येत असेल त्यातून जस रॉनला हर्मायनीचा ऐकू आला. कारण जिथे जिथे डंबलडोरची गरज पडेल तिथे ते समहाऊ लगेच हजर झाले आहेत. उदाहरण द्यायच झालं तर प्रिझनर ऑफ अझकाबान मध्ये कोणीतरी 'समवन कॉल डंबलडोर' म्हणल्यावर लगेच येण...
पुट-आउटर>> बरोबर/
पुट-आउटर>> बरोबर/
प्लीज एक्सप्लेन We are
प्लीज एक्सप्लेन
We are talking
about a cloak that really and truly renders the wearer completely invisible, and
endures eternally, giving constant and impenetrable concealment, no matter
what spells are cast at it.
हे स्पेल्स फक्त कन्सीलमेंट करताचे ना? म्हणजे कितिही अन कोणतेही स्पेल्स वापरले तरी क्लोक ची इन्व्हिजिबिल करण्याची क्वालिटी कमी होत नाही असच ना?
हे स्पेल्स फक्त कन्सीलमेंट
हे स्पेल्स फक्त कन्सीलमेंट करताचे ना? म्हणजे कितिही अन कोणतेही स्पेल्स वापरले तरी क्लोक ची इन्व्हिजिबिल करण्याची क्वालिटी कमी होत नाही असच ना? >> बहुधा हो चिमुरी .
म्हणजे कोणताही स्पेल वापरला तरी तुम्ही दिसणार नाही पण किलिंग कर्स वापरला तर मराल अस माझ मत.
सध्या मी ७ ६ ५ ह्या क्रमाने
सध्या मी ७ ६ ५ ह्या क्रमाने पुस्तकं वाचत्ये.
६ मधे हॅरी वगैरे न बोलता स्पेल्स वापरायला शिकतात - शब्द आठवतं नाहीये. तर मग ५ व्या भागात अनेक ठिकाणी मोठी माणसं डे टू डे लाईफमधे बोलून स्पेल्स वापरताना का दाखवली आहेत ?
किलिंग कर्स, स्टनिंग कर्स ने
किलिंग कर्स, स्टनिंग कर्स ने आतील माणसावर इफेक्ट होतोच, जर कर्स डायरेक्टली तिकडे आला असेल तर. डंबलडोर हॅरीला इम्मोबिलाइज करतातच ना, कारण त्यांना माहित असतं हॅरी नक्की कुठे आहे ते..
काही स्पेल्स हे फक्त नॉन व्हर्बल असतात (हाफ ब्लड प्रींस चा एक कर्स होता, लेविरोकॉर्पस बहुदा).. काही स्पेल्स व्हर्बल अन नॉन व्हर्बल असेही वापरले जातात.. मला वाटतं अन्फर्गिव्हेबल कर्सेस हे नॉन व्हर्बल नसावेत..
अनेक ठिकाणी मोठी माणसं डे टू
अनेक ठिकाणी मोठी माणसं डे टू डे लाईफमधे बोलून स्पेल्स वापरताना का दाखवली आहेत >> आपल्याला कळावं म्हणून ..
चिमुरी म्हणते तसं काही कर्स नॉनव्हर्बल नसावेत.
मला वाटतं अन्फर्गिव्हेबल
मला वाटतं अन्फर्गिव्हेबल कर्सेस हे नॉन व्हर्बल नसावेत..<<< नसतातच आणि ते कर्स वापरताना केवळ शब्दांचा उच्चार करणंच अपेक्षित नाही. "यु हॅव टू मीन इट" किलिंग कर्स वापरताना तो खून करण्याची अतिशय प्रचंड इच्छा आणि ती नियत असली पाहिले अन्यथा कुणी सोम्यागोम्या उठून छडी घेईल आणि आवडाकेडावरा ओरडत फिरेल.
जादू हाच मुळात मानसिक शक्तीचा प्रकार असल्यानं मनामध्ये कर्स हे केवळ साधन आहेत, प्रत्यक्ष शक्ती मारणार्याच्याच मनामध्ये आहे. आणि म्हणून ते अनफर्गिवेबल आहेत. तुम्ही ते "चुकून" किंवा "रागाच्या भरात" वापरू शकत नाही. तो हेतू तुमच्या मनात स्पष्टपणं असला पाहिजे. दुसर्याला हानी पोचवण्ञाची अअथवा जीव घेण्याची वृत्ती असणं हे फारसं चांगलं नाही म्हणूनच असा जीव घेतला तरच तुमच्या आत्म्याचे तुकडे पडतात आणि हॉरक्रक्स तयार करू शकता येतो.
'पुट आउटर' हा शब्द अमेरिकन
'पुट आउटर' हा शब्द अमेरिकन आवृत्त्यांमध्ये नाहीये का? वाचल्याचं आठवत नाही. कायम 'डिल्युमिनेटर' म्हंटलय.
मृण्मयी, माझ्याकडच्या
मृण्मयी, माझ्याकडच्या आवृत्तीत पुट आऊटर आहे. माझ्याकडे सोर्सेसर स्टोन्स आहे. पहिल्याच पुस्तकाचय चौथ्यापानावर आहे. Twelve times he clicked put-outer असे वाक्य आहे. न्म्तर सातव्या भागात त्याचा उल्लेख डील्युमिनेटर म्हणून येतो.
To Ronald Bilius Weasley, I leave my Deluminator, in the hope that
he will remember me when he uses it. (पान क्रमांक ६७, डेथली हॅलोज)
तुमच्याकडे फिलॉसोफर्स स्टोन अशी आवृत्ती आहे ना? त्यात या वाक्यामध्ये काय उल्लेख आहे? (भलतीच उत्सुकता!!!)
माझ्याजवळचं पुस्तक सध्या मला
माझ्याजवळचं पुस्तक सध्या मला अॅक्सेसिबल नसल्यामुळे नेमकं काय लिहिलंय ते सांगता येत नाही.
ऑर्डर ऑफ फिनिक्स वाचत्ये,
ऑर्डर ऑफ फिनिक्स वाचत्ये, त्यात उल्लेख आहे की मॉली पहील्या ऑर्डर मधे नव्हती, खरतरं ती आणि आर्थर तसे वयाने मोठे असणार आणि ते नेहमीचं अँटी-प्युर ब्लड होते तर ते का नसतील ऑर्डर मधे ?
अजून एक -
हाफ-ब्लड प्रिंस मधे, विषय सिलेक्ट करताना मॅक्गूनागल म्हणते नेव्हीलला की तुझी आजी xxxxx विषयात नापास झाली / फार चांगली नव्हती म्हणून तो विषय तू घ्यायचा नाहीस असं नाही - तत्सम वाक्य आहे, तंतोतंत नाही आठवतं.
नेव्हीलची आजी शाळेत असताना मॅक्गूनागल टीचर कशी असेल ?
आज्जी शाळेत असताना ती लेक्चरर
आज्जी शाळेत असताना ती लेक्चरर असते.
हॅरीच्यावेळी ती एच ओ डी असते.
डंबल्डोर वॉल्डेमोर्टच्यावेळीही असतात आणि हॅरीच्यावेळीही. तसेच आहे हे.
मॉली पहील्या ऑर्डर मधे
मॉली पहील्या ऑर्डर मधे नव्हती, खरतरं ती आणि आर्थर तसे वयाने मोठे असणार आणि ते नेहमीचं अँटी-प्युर ब्लड होते तर ते का नसतील ऑर्डर मधे ?>>> कदाचित तेव्हा ते या सर्वांमध्ये नसतील. तसं पण आर्थर फार मोठ्या पोझिशनवर नव्हताच. रॉन आणि हॅरीच्या मैत्रीमुळं आर्थर आणि मॉली यामध्ये ओढले जातात.
नेव्हीलची आजी शाळेत असताना मॅक्गूनागल टीचर कशी असेल ?<<<< ती स्टुडंट असू शकते की तेव्हा.
स्पष्ट उल्लेख नाहीये पण
स्पष्ट उल्लेख नाहीये पण एकंदरीत संवादावरून त्या दोघी एकाच वेळी शिकायला असाव्यात / मैत्रिणी असाव्यात असे वाटते.
विकिपॉटर वर जाउन बघता येइल..
विकिपॉटर वर जाउन बघता येइल.. मॅकगोनॅगलची पुर्ण माहिती आहे त्यात. कोणाशी लग्न वगैरे केलय ते सगळं पण.
यॅस पॉटरमोअर वर मॅक्गूनागलची
यॅस पॉटरमोअर वर मॅक्गूनागलची माहीती वाचल्ये, त्यावरून ती मला एवढी मोठी नाही वाटली.
त्या दोघी शाळेत एकत्र असू शकतात, हे नव्हतं आलं लक्षात
मॉली पहील्या ऑर्डर मधे
मॉली पहील्या ऑर्डर मधे नव्हती, खरतरं ती आणि आर्थर तसे वयाने मोठे असणार आणि ते नेहमीचं अँटी-प्युर ब्लड होते तर ते का नसतील ऑर्डर मधे ?>>>
एक्झॅक्ट टाईमलाईन चेक करावी लागेल पण त्या सुमाराला त्यांची सगळी मुले लहान असणार (जिनी सोडून.. तिचा जन्म नंतरचा). मॉलीचे सक्खे भाऊ प्रिवेट बंधू ऑर्डरमध्ये होते आणि ते मारले गेल्याने तिला त्यातला धोका नक्कीच माहित होता. मुलांच्या संगोपनासाठी ती इन्व्हॉल्व्ह झाली नसावी.
बिल शेल कॉटेज चा सिक्रेट कीपर
बिल शेल कॉटेज चा सिक्रेट कीपर असतो, मग रॉनच्या सांगण्यावरुन डॉबी लुना, डीन अन ऑलिव्हन्डर ला तिथे कसा काय नेउन पोहचवतो (शेवटचा भाग)? नंतर हॅरी सुद्धा तिथे अॅपरेट होतो.. हे कसं काय? एनी आयडिया?
हॅरी आणि कंपनी तिथे
हॅरी आणि कंपनी तिथे आल्यानंतरच बिल शेल कॉटेजला सेक्युअर करतो आणि तिकडे बाकिच्यांना आर्थर.
हॅरी आणि कंपनी तिथे
हॅरी आणि कंपनी तिथे आल्यानंतरच बिल शेल कॉटेजला सेक्युअर करतो आणि तिकडे बाकिच्यांना आर्थर. >>
बरोबर..
हॅरी आणि कंपनी तिथे
हॅरी आणि कंपनी तिथे आल्यानंतरच बिल शेल कॉटेजला सेक्युअर करतो आणि तिकडे बाकिच्यांना आर्थर.>>>>>>> नाही.. हॅरी अन इतर तिथे आल्या आल्या बिल त्यांना सांगतो की आता कोणीच कामावर जात नाही आणि फिडेलस चार्म वापरलय म्हणुन..
चिमुरी >> तसपण एल्फ च्या
चिमुरी >> तसपण एल्फ च्या पावर्स वेगळ्या असतात नं ..
तसपण एल्फ च्या पावर्स वेगळ्या
तसपण एल्फ च्या पावर्स वेगळ्या असतात नं ..>>>>> येस्स.. हीच शंका होती...
Pages