हॅरी पॉटर

Submitted by चिमुरी on 2 August, 2011 - 23:04

हॅरी पॉटरवर बोलण्यासाठी हा धागा....

'स्पॉयलर अलर्ट' : ज्यांनी पुस्तके वाचली नाहियेत किंवा सगळे मूव्ही बघितले नाहियेत पण वाचायची किंवा बघायची इच्छा आहे आणि ज्यांना कोणतेही सस्पेन्स आधी कळायला नको आहेत त्यांच्यासाठी हा अलर्ट... वाचताना जरा जपुन वाचा.. कोणत्याही पोस्टला आता सस्पेन्स कळेल अशी अंधुकशीही शंका आली तर पुढे वाचु नका... ज्यांचे सगळी पुस्तके वाचुन झाली आहेत आणि मूव्हीज बघुन झाले आहेत अश्यांनी सगळ्या पोस्ट्स वाचायला हरकत नाही....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रिन्से'स टेल चाप्टर रडवतो. स्मित
>>
येस हा चाप्टर खुप छान लिहिलाय..एकंदरीत जेकेची स्टाइल खुप आवडली, फाफट पसारा खुप अभावाने आहे, आणि क्लायमॅक्स सुरु झाला की जो स्पीड आहे तो खुपच भन्नाट.. उगाच फुसकी उत्सुकता ताणुन धरणे नाही की काही नाही, जे काही होतं ते एकदम पटकण...
मी तिसरा भाग कालपासून वाचायला घेतलाय.>>
कितवी रिविजन? Proud

इथल्या सगळ्यांचे धन्यवाद!!!
इथे आलो नसतो तर कदाचित हॅरी पॉटर वाचायचा मोह झाला नसता. स्पेशली इथल्या काही लोकांच्या रिविजन्स्च्या कॉमेंटस वाचल्या (कोणीतरी २५-२६ केल्यात असं लिहिलय Uhoh ) नंतर विचार केला हे लोक्स जर एव्ह्ढ्या वेळा वाचु शकतात तर आपण एकदा वाचुन पाहु, काय हरकत आहे आवडलं नाही तर मध्येच थांबवता येइल Wink पण पहिल्या भागाच्या पहिल्या चॅप्टर नंतरच पुढे काय? हे सुरु झालं आणि सगळे भाग वाचल्यावरच मन की शांती लाभली. Proud
ओव्हर हाइपड पुस्तकांचा अनुभव असल्यामुळे (हु मुव्ह्डमाय चिज, रिच डॅड पुअर डॅड, मॉक सोल्ड फेरारी असली मॅनेजमेंटछाप पुस्तक हाइपच्या नादी लागुन वाचली आणि वेळ वाया घालवला होता) ह्या पुस्तकांच्या वाटेला गेलो नव्हतो..

२५-२६ केल्यात >>>>>>> कोण रे ते????? पावलांचा फोटो टाका.. इथे सा न घालेन मी Happy

लवकरच मला हॅपॉ एक ते सात भाग सलग वाचायला मिळणार आहेत.. येस्स. मज्जाच..

५-२६ केल्यात >>>>>>> कोण रे ते????? पावलांचा फोटो टाका.. इथे सा न घालेन मी>>>
इथे आहे.. आणि सॉरी २५-२६ एवजी १५-२० हवय..

२५-२६ केल्यात >>>>>>> कोण रे ते????? पावलांचा फोटो टाका.. इथे सा न घालेन मी >> चिमुरी Lol

तस या क्विलींग ज्वेलरी साठी नवा धागा काढणार आहे मी पण हा धागा राहून राहून वर आल्यान दाखवल्याबिगर राहावल नै मला .. अगदी त्यात कडी आणि चेन टाकण्याइतपत पण धीर नै राहीला मला Proud

हा माझा पराक्रम .. आवडता रंग काळा म्हणून प्रयोग पहिले त्याच रंगावर केला .. वरुन ट्रान्सपरन्ट नेलपेन्ट ने पॉलीश केल Wink .. आता हॅरी पॉटर लव्हर म्हणून मी हे सगळीकडे घालून मिरवणार ..

deathly hollows.jpg

आणि हो.. रिरिडींग ५ एप्रिल नंतर Happy

टीना,
मस्त जमलय डेथली हॉलोज चं चिन्ह. काहीतरी कंपॅरिजन ला ठेउन एक फोटो काढुन तो पण इथेच टाक जमलस तर...(१ रु कॉइन जवळ ठेवलास तर एक आयडिया येइल हे चिन्ह किती मोठं आहे ते Proud )

अग्निपंख एक रुपयाच्या जुन्या कॉइन पेक्षा थोड आणखी मोठ आहे ते.. Happy
धन्यवाद दोघांनाही Happy
नविन धाग्यावर पूर्ण तयार केलेल टाकेल मी नक्की .. आणि हो मोजमाप पन देईल Happy

मस्त आहे!!! टीना, मला आवडेल हे पेंडंट (पण मग मी झेनोफस लवगूड दिसेन का? Proud )

अग्निपंख, मी रीव्हीजन्स मोजल्याच नाहीत. माझ्या बेडच्या बाजूला कुठलंतरी एक हॅपॉ बूक कायम असतं. इतर काही वाचनाचा कंटाळा आला की मध्येच सापडेल ते पान उघडून वाचायचं. किंवा कधी अचानक आठवतं "अरे आता हा चाप्टर वाचायचा आहे" मग तो वाचायला घ्यायचा.

पण मग मी झेनोफस लवगूड दिसेन का? >> दिसेल कि .. केस लांब असणार च ना त्याच्यासारखे थोडेबहोत.. जमल त मग Wink .. एक क्रायटेरिया तो फिट है .. बाकी तो जरा विचित्र अस्तो ना तसेच आपण पन मगल्स आहोत सो वेगळे आहोत.. Lol

रॅडिश इयररिंग्ज्स >> हो करता येईल ना ते पन.. बरी आठवण करुन दिलीस चिमुरी Happy

अभिनंदन अग्निपंख
खूप दिवसांनी येतोय इकडे. सध्या ४ था भाग चालू आहे. मधे खूप बोअर झाला सो वाचन थांबवले होते.
क्विडिच कप मोस्टली.
आता परत मजा येतेय. पण का माहीत नाही हा भाग अजुन तसा क्लिक नाहि झाला.
मी ३ कर्सेस वर महिती शोधतोय. शेवटचे २ कळाले पण पहिला नाही कळाला.
क्रुपया कोणीतरी महिती द्या. हे कोणीच वापरू शकत नाही की फक्त विद्यार्थी नाही वापरू शकत?
असे असेल तर हॅरी ने ५ व्या भागात बेलाट्रीक्स वर वापरला होता ना? (संर्दभ- Movie)

हे कोणीच वापरू शकत नाही की फक्त विद्यार्थी नाही वापरू शकत?>>> कोणीच वापरू शकत नाही. कायद्यानं गुन्हा होतो.
१. इंपेरीयस कर्स" यानं संमोहन टाईप केलं जातं

२. क्रुशियाटस कर्सः यानं जबरदस्त वेदना जाणवतात. जखमा होत नाहीत पण टॉर्चर लेव्हल खूप हाय आहे

३. किलिंग कर्सः आवराकेडावरा. माणूस मरतो.

पण केवळ जादूची छडी आणि हे तीन शब्द म्हणणे यामुळे हे कर्स इन्फ्लिक्ट होत नाहीत. त्याला कर्स फेकणार्‍याची तितली मानसिक लेव्हल असावी लागते

असे असेल तर हॅरी ने ५ व्या भागात बेलाट्रीक्स वर वापरला होता ना?>>>> मुळात व्होल्डीच परत आलाय आणि मिनिस्ट्रीमध्ये काही घडलंच नाही या हशहशमध्ये हाही कर्स लपून गेला. Wink

प्रशांत के तुमच ४थ पुस्तक पूर्ण वाचून झाल नाही अस दिसतयं.. त्यात मिळून जाईल उत्तर .. आणि हो मुव्ही वरुन अंदाज लावायला जाल तर कदाचित कळणार नाही अथवा गोंधळून जाल .. पुस्तकात त्यामागची कारण खुप छान पद्धतीन समजावुन सांगितलेली आहे.. Happy

असे असेल तर हॅरी ने ५ व्या भागात बेलाट्रीक्स वर वापरला होता ना?>>>> मुळात व्होल्डीच परत आलाय आणि मिनिस्ट्रीमध्ये काही घडलंच नाही या हशहशमध्ये हाही कर्स लपून गेला. >> पण नंदिनी .. पुस्तकात लिहिलेल आहे ना कि आजुबाजुला जादुगार लोक नसतील तर नाबालिक जादुगार गुन्हेगार ठरतो .. तिथ तर हॅरी सोबत डम्बलडोर असतात आणि मुळात तिथ सर्वच लोक फाईट करताना सर्वच कर्स वापरतात ना..

>>>>पण नंदिनी .. पुस्तकात लिहिलेल आहे ना कि आजुबाजुला जादुगार लोक नसतील तर नाबालिक जादुगार गुन्हेगार ठरतो .. तिथ तर हॅरी सोबत डम्बलडोर असतात आणि मुळात तिथ सर्वच लोक फाईट करताना सर्वच कर्स वापरतात ना..>>>>>

वरील वाक्याने कन्फ्युज झालो आहे कारण मूव्ही इफेक्ट.

जाउ दे आधी पुस्तक वाचतो आणी मग कॉमेंट्स करतो.

नंदिनी- आभारी आहे ३ कर्सेस च्या माहिती बद्दल.

टीना- हो अजून पूर्ण नाही झाले ४ थे पुस्तक. आता लवकरच करेन.

इथे मणी वापरलेले आहेत. पण पुस्तकात बहुदा गार्डनमधलं काहीतरी कानात घातल्याचा उल्लेख आहे..

हं तिच्या घराच्या मेन डोअर च्या बाजुला झाड दाखवल आहे ना मुव्ही मधे ते असणार ..
अग्निपंख हो असच.. मण्यांच करता येईल मला .. क्विलींग ने पन ट्राय करेल म्हणते .. Happy

आजच कळालेल्या माहितीनुसार "mirror of Erised", "mirror of Desire" वरुन तयार केलेय. जेके रोलिंग बाईंनी एका मुलाखतीत सांगितलय.

अग्निपंख .. मराठी पुस्तकात तसच लिहिलयं ..
'चानेमका आरसा' = 'कामनेचा आरसा' ..
खुप आधीच सांगीतल असाव रोलींग बाईंनी Happy

खुप आधीच सांगीतल असाव रोलींग बाईंनी>>> दुसरा भाग आला त्याच्या आसपासच सांगितलंय की. खूप वर्षं झाली त्याला. बाईंनी नवनवीन तयार केलेले शब्द वाचून बघा. सॉलिड हिस्ट्री आहे प्रत्येक बाबतीत.

खुप आधीच सांगीतल असाव रोलींग बाईंनी>>> दुसरा भाग आला त्याच्या आसपासच सांगितलंय की. खूप वर्षं झाली त्याला>>
हो, पण मी त्या दिवशी वाचलं ते रोलिंगच्या वेबसाइटवर..
बाकी हॅरी पॉटरवर लॉर्ड ऑफ द रिंग चा प्रभाव वाटला का कोणाला? मी LOTR वाचलं नाहिये पण सिनेमे पाहिलेत.
पात्रात बरच साम्य जाणवत गँडॉल्फ आणि प्रोफ. डंबलडोर, हाउस एल्फ्स इ इ .
शिवाय JRR हा रोलिंगचा फेव्हरिट आहे असंही कुठेतरी वाचलय..

४ था भाग वाचत आहे. खूप मजा येतेय आणि त्याहीपेक्षा खूप अनूत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळत आहेत.
असे प्रश्न जे मूव्हीज बघुन पडले होते.

उदा. फर्स्ट टास्क ....
ड्रॅगन बरोबर बाकिचे कसे लढले (टास्क कशी कम्प्लीट केली) ही माहिती पुस्तकात मिळाली.

मी स्वत: पुस्तके विकत घेउन वाचायला सुरुवात करणे याला हा धागा देखील एक कारण आहे.

धन्यवाद.

Pages