होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली श्री च्या चेहऱ्यावर काय ग्लो आलाय. खरच तेजुकडे गोड बातमी असणार नाहीतर श्री ची दाढीचा भाग सोडून गाल आणि कपाळ एवढ उजळ दिसले नसते. Blush
Wink Wink Wink

इथे सगळे पकलेत ते माहित्ये... मी पण ही सिरीयल बघायची बंद केली होती स्म्रुतीभंश वगैरे सीन नंतर... पण आता पहाते. अतिरंजीत दाखवले आहे की जानु श्री ला सांगुच शकत नाहिये etc .. SMS पाहिला नसेल अजुन म्हणे??!! Whats app नाही वापरत का? Lol

पण तरी पण मी TP म्हणून बघते. इतर काही cheap नायिका/सिरिअल बघण्यापेक्शा थोडी बावळट आणि irritating जानी परवडली. Happy

बरं सहन होत नाही म्हणून बघू नये तर ते ही जमेना. घटस्फोट घेताना प्रेग्नन्सी बद्दल न सांगणे, हे कम्माल आहे. ते सासरे, काका सासरे , ज्यांचे संसार हिने जुळवून आणलेत त्यांनीही सिरीयल त्याग केलेला दिसतो. पण आम्ही बघणार. नावं ठेवणार, पण बघत राहणार.

आणि कुठले वडील मुलीचा घट्स्फोट होतोय तेव्हा असे मुग गिळुन घरात गप बसतात. कैच्यकै. जसे कॅरेक्टर दाखवले होते आधी ते सगळे फसलेत आता.

अजून ही मालिका पाहिली जाते अर्थात जान्हवीच्या चाहत्यांची सहनशक्ती अजून शिल्लक आहे हे पाहून मन भरून आले.

डीविनिता.. Happy मी खरंच येईन हा पार्टी घ्यायला.

बादवे माबोइतिहासात प्रथमच एक आयडी आपल्याच डुआयडीला पार्टी देतोय असं चित्र पाहायला मिळेल Biggrin

या मालिकेचा टीआरपी (?) तसाही आत्तापर्यंत पार रसातळाला गेला आहेच. लोकांच्या इतक्या शिव्या खाऊनसुध्दा तो मंदे हि मालिका बंद करत नाही. Sad
म्हणुन झीवाल्यांनी सुवर्णमध्य शोधुन काढला असेल. नविन मालिका दिल दोस्ती दुनियादारी ८ वाजता (किमान या नविन मालिकेचा तरी टीआरपी वाढेल!) दाखवुन जानुला रात्री ढकलूया. म्हणजे, किमान लाजेखातर तरी मंदे मालिका गुंडाळेल. Sad
पियू, तुझ्या तोंडात साखर पडो. Happy

२२ मार्च ला रात्री ८ वाजता 'दिल दोस्ती..' चा १ तासाचा एपी आहे. त्याची जाहीरत पाहिली.
ही एप्रिलची बातमी कुठे आलीये?

बरी आहे का दिल दोस्ती दुनियादारी? पहिला एपिसोड पाहिला तो फार fake आणि नाटकी वाटला म्हणून नंतर पाहिलीच नाही.

बरी आहे का दिल दोस्ती दुनियादारी? >>
(सद्ध्यातरी) मस्त आहे आता चालू असलेल्या इतर कोणत्याही मालिकेपेक्षा.:)

रीया, हाहा अगं पण पहिला एपिसोड खूप उगीच होता..ते अकोल्याचं घर black and white or sepia color मधे कशाला दाखवायचं? दुनियादारी त्या कलर मधे केला म्हणून सगळीकडे तोच कलर वापरायचा अट्टहास आणि अकोल्याची मुलगी लगेच साधीभोळी वगैरे. आजकाल सगळीकडे स्मार्ट मुली असतात! आणि सगळ्यांचे संवाद इतके नाटकी, ट्रेन मधला सीन तर टोटल बालिश आणि improvise केल्यासारखा होता. पहिला एपिसोड तरी छान क्रिस्प बनवा की! नंतर पाणी घालणार आहात हे ब्रह्मदेवाला देखिल माहिती आहे! जाऊ दे..जरा forgiving mood मधे असेल तेव्हा पाहीन पुन्हा..सध्या नो मराठी टीव्ही.

>>>> खास जान्हवीच्या चाहत्यांसाठी>>> तिचे चाहते आहेत??? <<<<
मी पण आहे! Happy
अन उगाच काय हो? तुमच्या आयुष्यात वा तुमच्या इम्याजिनेशनमधे घडत नाही, म्हणून मालिकेत घडूच नये का? उलटे जे तुमच्या आमच्या आयुष्यात "सर्रास" घडत नाही, तेच तर मालिकांमधे दाखवतात.
अहो त्यातिल नवराबायको,सासूसूनानणंदा, सासराजावई, बापपोरगा वगैरे अनेकानेक नात्यातील पात्रे एकमेकांशी जितके गोड बोलतात ना, अहो मला हेवा वाटतो हो त्यांचा! Proud आमच्या नशिबात सदैव खेकसाखेकसी शिवाय काही नस्तच. Sad

हो, मला उदाहरणे माहित आहेत की पोरिचा घटस्फोट होतोय, बिनसलय, अन तरीही पोरीचा बाप हातावर हात धरुन बसलाय... कारणे अनेक/वेगवेगळी असतील.. पण त्याला तस्सेच बसावे लागते.

आपल्याला बोवा मालिका आवडतात या झीमराठीच्या....
एक तर त्यातिल "भाषा", "संवादफेक", विषय हे सर्व सर्व कनिष्ठ/उच्च मध्यमवर्गियांचे असते. उगाच आम्ही कसे कुणाचे कैवारी किंवा कसे कुणाला तरी शिव्याशाप घालत कसा कुणाचा बौद्धिक उद्धार करू पहातो/पेटवू पहातो/क्रांती करू पहातो, वगैरे "थेरं" या झीच्या मालिकांत नाहीत. अन तसल्या मालिका बघुन/ऐकुन आपली भाषा/विचार बदलायचीही भिती नाही.

लक्षात घ्या, की झीला आत्ता नावे ठेवताय, पण विचार करा, की गेली चारपाच वर्षे मायबोलीवर जसे अनेक ड्यूआयडीज उत्पन्न होऊन ते एकच एक प्रकारचा उच्चवर्णिय/ब्राह्मण/हिंदुधर्मद्वेष्टेपणाचा एककलमी कार्यक्रम रेटून जिथेतिथे पचकत असतात, त्याच भाषेतल्या, त्याच आशयाच्या मालिका झीवर दाखवायला लागले तर काय होईल ?

मला बोवा ही व अशा मालिका बंद पडायला नकोय. अन झी पर्यंत माझे वरील मत पोहोचेल अशी आशा करतो. Happy

साती, काय आहे हो "इथेही"?

२३ मार्च पासून कलर्स मराठी सुरु होत आहे. थोडा बदल असेल मराठी मालिकांमध्ये अशी आशा करू शकतो.<< ईटीव्ही मराठीचे नवीन नाव. ईटीव्ही ग्रूप व्हायाकॉमने विकत घेतलाय.

ईटीव्ही मराठीचे नवीन नाव. ईटीव्ही ग्रूप व्हायाकॉमने विकत घेतलाय.

>> आभार नंदिनी.. मी बुचकळ्यात पडले होते.

ईटीव्ही मराठीचे नवीन नाव. ईटीव्ही ग्रूप व्हायाकॉमने विकत घेतलाय.

>> हो का? कल्पना नव्हती, बस थांब्यावर जाहिराती पाहिल्या त्यावरून असे वाटले की नवीन वाहिनी आहे. जुन्या मालिका बंद करून सगळ्या नवीन येणार का? कारण सगळ्या नवीन मालिकेची जाहिरात दिसत होती.

नाही जुन्या मालिका आहे त्याच ठेवणार आहेत आणि दोन नविन सुरु करणार.

ही प्रक्रिया गेले २-३ वर्षे सुरु आहे टिव्ही १८ ने ताब्यात घ्यायची. आता फायनल होणार, २२ तारखेला पुर्ण इ टिव्हीची सगळी चॅनेल्स ताब्यात जाणार. ह्याआधी आय बी एन ची सगळी चॅनेल्स घेतली.

रिलायन्स कडे मालकी आहे.

गेले काही वर्षे ही प्रक्रिया सुरु असल्यानेच कलर्स वरची उतरण मालिका 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' नावाने इ टीव्हीवर सुरु झाली.

गेले काही वर्षे ही प्रक्रिया सुरु असल्यानेच कलर्स वरची उतरण मालिका 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला' नावाने इ टीव्हीवर सुरु झाली.

>> ओह्ह Uhoh

Pages