होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिक्तामधला ऐरणीच्या देवा तुला या गाण्याचे चार ते पाच सेकंद पाहिले. ती नाचणारी, कोरीओग्राफर आनि इव्हेंट मॅनेजर सर्वांच्याच कानाखाली खचखचून दोन तीन ओढाव्याशा वाटल्या. रिमिक्स करायला ना नाही, पण गाणं काय शब्द काय नाचताय काय करताय काय. नुसते वरचे आणि खालचे पार्ट हालवले की वेस्टर्न ड्यान्स होत नाही.

मानसी नाईक तर अनबेअरेबल आहे एनी टाईम Sad
ती दिसायला वगैरे बरी असेल कदाचित पण ती समहाऊ मला चिपच वाटत आली आहे आजपर्यंत Sad

शीला केजवाणी वर नाचल्या.>>>>>.शीला केजवाणी वर कुठे नाचल्या?:अओ::फिदी:

अपर्णा काय धमाल चूक केलीस.:दिवा: ते शीला की जवानी आहे, मला आधी वाटले कोणी शीला केजवानी नावाची सिन्धी पोरगी नाचली की काय.:फिदी::दिवा:

अरे हो ते मिक्ता की मिफ्टा मध्ये एक सोज्वळ भूमिका करणारी सन्स्कृती बालगुडे चित्र विचीत्र कपडे घालुन काठी डान्स करत होती. ( या लोकाना आजकाल काठी, झाडु, लाटणे काही पण चालते) तिचा विग व डान्स पाहुन मला रडु यायला लागले, कसेबसे डोळे पुसत पुढला कार्यक्रम बघीतला.:अरेरे: सन्स्कृती बालगुडे म्हणजे तीच पिन्जरा सिरीयलमधली आनन्दी आणी विवाहबन्धन मधली मुक्ता.

अरे सूनेचे अपडेटस आले का म्हणून आले तर मिक्टाची चर्चा Wink

त्या जानीला एकदाही वाटू नये की श्री बाळाला पत्र मिळालं नसेल - काल जे काही २ मि. पाहीलं त्यावरून असं वाटलं की त्याचा फोन नाही म्हणून ही अश्रू ढाळत्ये

कालच एपिसोड पाहून उलटी यायला लागली.
गैरसमजांना सुपिक सिरियल आहे अगदी. हापामु गोष्टीत पण गैरसमज.
इतके सगळे शहाणे सुरते, वयाने धगुरडे असून, एक फोन करून अथवा भेटून प्रत्यक्ष सर्व गोष्टींची खातरजमा करावी असं एकालाही वाटू नये?
ती माठ आई, दिसेल ते पत्र फाडून टाकते? ऑफिसच्या टेबलावर महत्वाचं इतर काही पण असू शकतं ना? Uhoh इतका बेजबाबदार पणा गोखले गृह उद्योगाला साजेसा आहे? Uhoh
आणि पत्रातला मजकूर तोंडी सांगणं अवघड आहे, पण तुझ्यासाठी टेबलवर एक पत्र होतं ते तु वाचलास का? आणि वाचलंस तर फाडलंस का? असं तो त्या जानीचा मित्र श्री ला विचारू शकत नाही?
दिसले कचरापेटित कपटे, घेतला समज करून की श्री ने पत्र वाचून फाडून टाकलं.
कठिण आहे, मी तर मध्येच बंद करून झोपुन गेले. (रिपिट पहात होते)
खरतर रिपिट पहात नसलो तरी एखाद्याला ऐनवेळी झोपवण्याची ताकद आहे या सिरियल मध्ये Biggrin

एखाद्याला ऐनवेळी झोपवण्याची ताकद आहे या सिरियल मध्ये >>>>अग दक्षिणा माझे याबाबतीत उलटे आहे. असे का झाले किन्वा का केले गेले या विचाराने मला पछाडले जाते, माझी झोप उडते. मग मी स्वतःच डायरेक्टर बनुन नको ते सन्दर्भ जोडत बसते.:खोखो:

गैरसमजांना सुपिक सिरियल आहे अगदी. हापामु गोष्टीत पण गैरसमज.

>> अगदी अगदी..
मला मालिका सुरु झाल्या झाल्या सरसकट सगळ्यांच्या एक एक थोबाडीत ठेवुन द्यावीशी वाटते.

ती जानी आणि तिची मैत्रीण अख्खा दिवस काहीही कामधाम न करता श्रीच्या फोनची वाट पहात बसतात Angry ह्यांची बँक चालते कशी काय कोण जाणे. तो बॉसही तसाच भाज्या ऑफीसात चिरायला आणतो.

काय लावलंय आवरा आवरा Proud

गोखले गृह उद्योगाचा पसारा पहिलात का किती मोठा आहे? कसा आवरून होणार इतक्यात? Proud

>>> पण थोबाडीत वै एकदमच टु मच वाट्लं (वैम) <<<<
थोडासा सहमत, म्हणजे काये की थोबाडीत माराविशी वाटते तर अ‍ॅक्टिन्गच कौतुकच करा...
पण लेखक/दिग्दर्शकाला मात्र बदडूनच काढावसं वाटत... आहे का कुणी सहमत? Wink

हो एकदम सहमत! उरले सुरले पंखे नष्ट करण्याचा पण केला आहे त्यांनी. मला काल स्वताचाच राग आला की एवढी माठ सीरियल मी का बघते!!! Sad

सस्मित ती थोबाडीत ची पोस्ट येणार हे स्वप्न पडलं होतं का? कारण तुमचं आवरा त्याच्या आगोदरच येऊन ठेपलंय.

लिम्बोबा मी यू का काठी व घ्यून बदडायला Proud

पण मला मात्र त्या सगळ्याना अच्ची कुच्ची करुन अस्वलासारख्या गुदगुल्या कराव्यास्या वाटतात. आणी कुठुन तरी एखादी ऊ पकडुन आणुन त्या श्रीच्या दाढीत सोडणार आहे. म्हणजे तो चकाचक होईल.

रश्मी सही ग. पण मला मात्र त्या सगळ्याना अच्ची कुच्ची करुन अस्वलासारख्या गुदगुल्या कराव्यास्या वाटतात>>+१

आमच्या एका नातेवाईकांनी "ऑलमोस्ट मोडलंच आहे त्यांचं खरं लग्न" अशी त्यांच्या मते खात्रीची बातमी दिली परवा. शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट नेचरचा आहे म्हणून मोडलं वगैरे...
पण त्या मिक्ता अ‍ॅवॉर्ड मधे हे दोघं छान अ‍ॅंकरिंग करतानाचा प्रोमो बघितला होता मी. खखोदेजा.
बाकी सिरिअल म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे!!!!!!!!

Pages