होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे एका कानातील पडले म्हणुन किति तो गहजब करताय? गृहिणी आहे, कानातले पडू शकते, बांगडी फुटू शकते, त्यात विशेष ते काय ?
उलट दिग्दर्शकाचे कौतुक केले पाहिजे तुम्ही, मधेच कानातले पडलय अस दाखविल्याबद्दल... Happy

ते मनीष आणि गीता त्यांच्या घरी म्हणून कुठे उभे असतात ? कुठल काय शुटींग घेतात देवच जाणे >>> नॉन मराठी लोकाना वाटेल मराठी मध्यमवर्गीय लोक तुट्क्या फुट्क्या घरातच रहातात.

मधेच कानातले पडलय अस दाखविल्याबद्दल...>>>>>जानु व श्री बाळ कायमचे डोक्यावर पडलेले आहेत. कानातले पडले तर नवल काय्?:फिदी::दिवा:

ते मनीष आणि गीता त्यांच्या घरी म्हणून कुठे उभे असतात ? कुठल काय शुटींग घेतात देवच जाणे >>> नॉन मराठी लोकाना वाटेल मराठी मध्यमवर्गीय लोक तुट्क्या फुट्क्या घरातच रहातात.
रसना २ +१
ते मनीष आणि गीताच घर व्यवस्थित दाखवतच नाहीयेत .सेट च्या कुठल्या तरी एका कोपर्यात दोघांना उभ करतात आणि शुटींग घेतात. मनीष घरात आहे म्हणून फक्त घरातले कपडे घालताना दाखवलाय आणि कुठलंतरी एक दार घेतात वरती एक देवाचा फोटो लावतात कि झाल घर. ( निर्मिती खर्चात बचत ) गेल्या आठवड्यात पण ते दोघे घरात बोलताना दाखवलेत तर असच सेटच्या कुठल्यातरी कोपर्यात उभ करून शुटींग घेतलाय Happy

काल तुनळीवर काही जुने भाग बघितले .

ती जान्व्हवी खरचं डोक्यावर पडली आहे .
कुठल्या तरी योगा आणि मेडिटेशनच्या क्लासची चौकशी करत होती , तर म्हणते
" बाळासाठी जे जे काही हवयं ते मला करायचयं "
ही वाक्यरचनाच कळली नाही , ही बाळाबद्दल बोलतेय की कीचन मध्ये केक बनवण्याबद्दल .
बर आता त्या क्लास वाल्यानी बाळाच्या बाबांना घेउन या सान्गितलं , तशी गप्प झाली .
आणि वर सांगते " नाही म्हणजे ते बीझी असतात असं काही नाही .खरतरं आम्ही दोघंजण डिव्होर्स घेण्याच्या मार्गावर आहोत."
अगं बयो , तुला नवर्याशी नीट स्पष्ट बोलता येत नाही आणि बाकीच्या जगाशी बोलताना , राणी तारामती का बनतेस??

गीता ,जानुला आणि मनिश श्रीबाळाला ईतके समजावत असतात , पण मग दोघं एकदाही एकत्र प्लॅन करून त्या दोघांची भेट का घालून देत नाहीत. .

सगळ्या आया चर्चा करीत असतात " श्रीपेक्षा महत्वाचं कोणीतरी आहे असं जान्हवी म्हणाली "
कोणीतरी म्हणतं पिन्ट्या असेल . तिचा लाडका भाउ .
बेबी आत्या म्हणते " सारख काय भाउ भाउ . आम्हालाही भाउ आहे पण आम्ही नाही अस वागतं ( असच काहीतरी) "
ही बाई माहेरी येउन बसली आहे आणि जानीने बंधूप्रेम दाखवलं तर हीच्या पोटात काय दुखतं

अन्‌ माझी ना खात्री आहे, जेव्हा श्री नि जान्हवी एकत्र येतील तरीही पिंट्याची नोकरी, बाबांचे पाय, बेबीआत्याची मुक्ताफळे, अनिल आपटेचे कांगावे, सगळे तसेच चालू राहील. यावरचे उपाय हा मालिकेचा उद्देशच नाही.

आजकाल कुठल्याही टक्कल पडलेल्या माणसाला माझी मुलगी अनिल आपटे असे म्हणत असते.:अरेरे::फिदी:

अरे मिफ्टा बघितलं की नाही कोणी.. ह्या श्री-जानीचं सुत्रसंचालन होतं.. त्यात जानी म्हणतेय 'मला तुला काहितरी सांगायचयं (सेम आवाज नि रडका चेहरा).. माझं ना लग्नाआधी एका सोबत अफेअर होतं.. सॉरी मी तुला आधी सांगितल नाही'

श्री - कोण होता तो? माझ्यापेक्षा हँड्सम होता?

पब्लिक मधुन आवाज - अनिल आप्टे .. Wink Rofl

खरचं.. नंतर हीच उत्तर - सल्मान खान वर प्रेम होतं! .. प्ण तो सोडुन सगळे खान कुटुंबीय आले होते

खरच काल एक तास वाया घालवला....
आणि ती बेबी आत्या आता एकदम व्हिलन झाली आहे...
पत्र फाडायला काय सांगते ..काहीही...डोक्यात जाते आहे ही बाई....

मला वाटत कधीकधी की या सिरीअल चे दिग्दर्शक केकता कडुन धडे घेतात ..म्हणुन इतक्या वेळा संधी मिळुनही एक साधी गोष्ट जाव्हवी श्री ला सांगु नाही शकत....

रश्मी आणि चनस Rofl

माझ्या सिरियल किलर साबांनी मला आग्रहाचे आमंत्रण दिले होते. आज जानी श्रीला सांगणारच आहे. तू बघायला येच. मी पण सांगुन टाकलं... इतक्या वेळा ते दोघे प्रत्यक्ष भेटले. चॅटिंग करत होते तेव्हा नाही सांगू शकली ते आता पत्रातून काय सांगणार. ते काही तो वाचायचा नाही. तरीही तिने सांगितलंच आणि त्याला कळलं कि मला सांगा. Happy

सिरियल संपल्यावर तोंड पाडून सांगायला आल्या.... पत्र नंदनने चुकून फाडून टाकलं आणि श्री ने वाचलचं नाही.

मला अतिशय आनंद झाला.... मी एक तास वाया घालवला नाही त्याचा.
Happy

Proud

काल चुकुन झी लागलं तेव्हा रिपीट टेलिकास्ट असावं .. तेव्हा सगळ्या बायका एकत्र बसुन कै तरी यादी करत होत्या.. त्याचं लक्ष नसत.. जेवत नाही वगैरे.. श्रीच्या येडेपणाची लिस्ट काढत होत्या का?

पत्र!!? कोणाला?? जानीबाईला?
२०१५ मधे आहेत ना हे लोक? बरं मोठ्ठ्य उद्योगाचे मालक ना!!

येड्यांची जत्रा नि खुळ्यांचा बाजार!

ना.... ना..... त्या रडूबाइला नाही त्या श्री बाळाला आणि हो पत्राच्या शेवटी "we all love you" असे काहीसे पण !! Wink

मिक्ता <<< सगळी हिंदी गाणी नाचासाठी होती. रवींद्र महाज्नीचा मुलगा आवडला छान नाचतो. बाकी प्रोग्राम केवळ नाचासाठीच पाहिला. त्यामुळे डोक्याला शॉट नाही लागला. Wink

Pages