होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

येस पियू.

उलट आता ई टीव्हीचा आधीच उल्हास त्यात कलर्स मराठीचा फाल्गुन मास असं नाही झालं म्हणजे मिळवलं कारण तिथे उतरण, बालिका वधु, ससुराल सिमरका हि दळणे चालूच आहेत अजून Lol

>>>बहुतेक जानी श्री बाळाला सांगणार एकदाच तो बाबा होणार आहे ते.<<<

बाळाला बाळ होणार? काय दिवस आलेत!! (म्हणजे काय दिवस गेलेत!!)

काल कंटिन्यूटीची कसली बोंब होती. ५-१० मिनिटाचं चित्रिकरण झोपून किंवा भांग वगैरे पिऊन केलं बहुतेक. त्या जानीच्या डाव्या कानातलं गायब होतं ते कळलं नाही यांना? Uhoh
आणि दणकन एका सिन मध्ये ते आलं. Uhoh

>>जानीच्या डाव्या कानातलं गायब होतं
हाहा ... बरोबर पकडलत ! मी चुकून तेवढीच २ - ३ मिनिट सीरीयल पाहिली आणि तोंडसुख घेतले Happy

पियू अगं इतकं ढळढळित समोर दिसतंय की एका कानात आहे आणि एका कानात नाही. सायंकाळी झी मराठी लाव आणि पहा.
माझ्यावर इतकी वाईट्ट वेळ नाही आली अजून की मी त्या जानीचं इतकं निरिक्षण करीन Proud

दक्षिणा + १००.. मी पण पाहिले... पण मला वाटले आता ही श्री ला आमंत्रण द्यायला जाणार आणि त्याच्या लक्शात येणार Happy पण पुढ्च्या सीन मधे आले परत Happy

हो ते जानिच्या कानातल गायब झाल ते माझ्या पण लक्षात आलं. त्या संबंधात घरी आम्ही बोललोच Happy
निधी अग कानातल गायब झालेल्याचा फोटू टाकलाय . भारीच कि Happy
ते मनीष आणि गीता त्यांच्या घरी म्हणून कुठे उभे असतात ? कुठल काय शुटींग घेतात देवच जाणे Happy .

अरेच्चा! असं होय! Happy
फोटो बघितल्या बघितल्या ते नाटकी हसणं च डोक्यात गेलं एकदम. कानातल्याकडे कुठचं लक्ष जातयं.

Pages