होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेपर आणि पाकीटं फाडून पर्यावरणाला धोका निर्माण केलाय श्रीने (त्याचे ऑफिस तोच जबाबदार)......

अपर्णा मला सर्वात startingचं दिग्गज कलाकाराचं वादन आवडलं, राष्ट्रगीताचं.

बाकी काय मांजरेकर arrange करतात आणि स्वतःच्या मुविला १ले बक्षीस देतात नेहेमीच Lol

ते एक पंजाब मध्ये जन्मलेले जाधव कोण बरे ? काल मकरंद सर्वांना प्रश्न विचारत होते तेव्हा यांना विचरण्यात आले कि तुम्ही पिक्चर काढता मराठी पण त्याचे टायटल हिंदी, गाणी हिंदी अगदी सगळे चकचकीत वैगरे असे का? तर उत्तर माझ्या मराठीचा प्रोब्लेम आहे मी पंजाबमध्ये जन्मलो इत्यादी इत्यादी. काय म्हणावे यांना तरी बरे 'राज' साहेब उपस्थित होते तिकडे नाहीतर पेपरात छापून आले असते तर आग पाखडली असती.

तो संजय जाधव ' दुनियादारी' चित्रपट काढलेला. तो जास्त हिंदी विंग्रजीत बोलतो म्हणून त्याला tont मारला.

बाकी काय मांजरेकर arrange करतात आणि स्वतःच्या मुविला १ले बक्षीस देतात नेहेमीच हाहा
>>
कोणाल अमिळालं?
मला वाटलं लोकमान्यला असेल

म्हणून त्याला tont मारला.<<<मग तर मकरंद यांचे सगळेच tont छान होते Lol

काय त्याच त्याच हिरवीणीचे dance होते. माझं सर्फिंग चालू होतं.<<< डान्स आवडले. पण ती नेहा पेंडसे एवढ्या उड्या मारत होती कि स्टेज पडते कि काय वाटले. बाकी माझी ऑल टाईम फेवरीट मानसी नाईक.

त्या मानसी नाईकला तर मी बघूच शकत नाही <<< असे नका हो म्हणू .. किती छान नाचते. कायम वेग वेगळे प्रकार ट्राय करते नाचाचे. काल ती क्लिओपत्रा सुद्धा बनली होती. Happy

मानसी नाईकला एकदार बघितले होते. नाना येणार म्हणून चला हवा येऊ द्या बघत होते (एरवी कधीच पहात नाही) छान गप्पा चालल्या होत्या. मधे येऊन ही बया बदाबदा नाचायला लागली Angry

परत तिला बघायची हिम्मत नाही.

काल पाहिलेल्या एपिसोडात जानी पत्र वाचुन दाखवत होति बाबांना आणि पिंट्याला (बहुदा श्रि ला लिहिलेले) एक अख्ही ग्लिसरीनचि बाटली संपवली असेल तिघांनी मिळून.:D Lol Lol

काल पाहिलेल्या एपिसोडात जानी पत्र वाचुन दाखवत होति बाबांना आणि पिंट्याला (बहुदा श्रि ला लिहिलेले) एक अख्ही ग्लिसरीनचि बाटली संपवली असेल तिघांनी मिळून >>> खरच यडी आहे ही .
नवर्याला लिहिलेल पत्र , भाउ आणि वडिलांना वाचून दाखवायच ????
मला तो मराठीच्या पेपरमधला "पत्रलेखनाचा" प्रश्न आठवला .
कोणाला कुठला मायना आणि कुठला नमस्कार लिहायचा यावरून कित्ती गोन्धळ असायचा .

दक्षुताई , म्हणूनच मी एक्दमच १५ दिवसानी तुनळीवर धाड मारते .
रेशिमगाठी , सून , लेक , दूरावा .. पळवत , धाववत .. सगळे एकत्र बघून होतात .
रोजच दळण कोण बघणार ?

समूह वाचन चाललय आणखी काय ..... इकडे हि पिंट्या आणि बाबांना वाचून दाखवतेय आणि तिकडे त्या गोखलिनी एकत्रित पत्र लिहून वाचन करताहेत. सगळेच येडचाप !!!:राग:

Pages