विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेला ओब्रायन Happy

आज गरीब टीम, पाटा विकेट, बाउंड्री छोटी असे सगळे असल्याने रोहीत शर्मा बरोब्बर खेळेल.

बेफिकीर.. हलकेच घ्या,,.:)

वैद्यबुवा..दहावी बारावी कधी केली याची काहीच काळजी करु नकोस... बिनधास्त अरे तुरे म्हटले तरी हरकत नाही... फक्त एकच विनंती.. फक्त मुकुंद चालेल्..पण मुकुंदा,मुकुंदराव वगैरे नको..:)

आयर्लंडने चांगली सुरुवात वाया घालवली. ३०० शक्य होते.पण नक्कीच इंग्लंडपेक्षा मस्त खेळले.

कालच्या इंग्लंडच्या पराजयानंतर कोच पिटर मोर म्हणाला नक्की काय झाल त्यासाठी नंबर्स क्रंच करायला लागतील.. मी मनात म्हटल डोंबल त्या नंबर्स क्रंचिंगच! ते का हरत आहेत हे त्याला नंबर्स क्रंच केल्याशिवाय कळत नसेल तर तो त्यांचा कोच म्हणुन काम करायला एकदमच निकामी आहे.

अर्थात नुसत्या कोचला दोष देउनही काही उपयोग नाही. इंग्लंडकडे चांगले एकदिवसिय क्रिकेटिअर्सच नाहीत.. एक रुट सोडला व काही प्रमाणात बटलर व इयन मॉर्गन सोडले तर त्यांच्या टिममधल्या बाकीच्या एकालाही एकदिवसिय सामन्यात खेळायचे जे कौशल्य व टेंपरमेंट लागते ते अजिबात नाही हे कटु सत्य आहे. त्यांनी कोचसकट परत सगळी पाटी कोरी करुन पंचवार्षिक योजना आखली पाहीजे अस मला वाटत.

आजचा सामना डोक शांत ठेवुन बॅटींग केली तर जिंकायला कठीण जाउ नये..उगाच शायनिंग मारायला न जाता सरळ २ गुण मिळवुन घ्यावेत. उमेश यादवची आजची गोलंदाजी बघुन तो एक लायबिलिटी ठरु शकेल अश्या भितीने परत माझ्या मनात उचल खाल्ली,,:( जडेजा ज्या रितीने फ्लॉप मागे फ्लॉप जात आहे हे बघुन त्याच्याही बद्दल जरा भितीच वाटत आहे. आशा करुयात की ते दोघे कर्णधाराचा विश्वास बाद फेरीत सार्थ ठरवतील..नाही ठेवलाच पाहीजे.. जर का आपल्याला वर्ल्ड कप डिफेंड करायचा असेल तर.

मुकुंद अगदी अगदी. सकाळी सकाळी आपले लोक. विशेषतः उमेश यादव शॉर्टपिच बॉल टाकत होता ते बघुन वैताग आला. असो. नीट खेळुदे आता सगळे.

६ ओव्हर मध्ये २३ रन्स, स्लो स्टार्ट आहे.

लाईव्ह मॅच कोण बघतेय, काही अपडेट्स मिळतील का? बॉलिंग कशी करताहेत आयर्लंडचे बॉलर त्याबद्दल.

अझरउद्दीन कप्तान असेपर्यंतच्या संघातील टिच्चून अयशस्वी सिद्ध झालेले खेळाडू घाऊक प्रमाणात समालोचन, कोचिंग, चर्चासत्रे ह्यात यशस्वी झालेले दिसतात. रवी शास्त्री सर्वांचे वडील त्याबाबतीत! इतर नांवे म्हणजे अजय जडेजा, सिद्धू, अतुल वासन, शिवलाल यादव, एल शिवा, मांजरेकर, यशपाल शर्मा!

गांगुली कप्तान झाल्यावर 'आपण जिंकण्यासाठी खेळत आहोत' अशी एक नवीनच घातक भूमिका भारतीय संघाने घेतली जी आजतागायत चालूच आहे.

इतर नांवे म्हणजे अजय जडेजा, सिद्धू, अतुल वासन, शिवलाल यादव, एल शिवा, मांजरेकर, यशपाल शर्मा!>>>> आकाश चोपडा (२००३-२००४) कोणाच्या कारकिर्दीत खेळला??? छान समालोचन करतो.

त्याच्यामुळे आता फक्त ४७ रन हव्यात.. बुवांची झोप होईपर्यंत जिंकलीही असेल आपण मॅच.

रोहीतने मात्र याही संधीचा फायदा घेतला नाही.

Pages