विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चॅनेलवाले कालपासुन भारत पाक सेमीफायनल होणार असे दाखवायला लागले आहेत. त्यात पाकीस्तान म्हणे ऑसीजला हरवुन सेमीमधे येणार असे भाकीत आहे.

आज बांग्ला काय करते बघायचे.

सरकारची विकेट पडायला नको होती. आज बांग्ला जिंकायला हवे. पण आता अवघड दिसतेय.

- मोईन अली उपखंडातील सर्व बॅटसमनना पुरून उरतोय. खरे तर मोईन अली तेवढा ग्रेट स्पिनर नाहीये.

बांग्लादेशला २ पैकी एक तरी जिंकायची आहे तर इंग्लंडला दोन्ही जिंकुन पण न्युझीलंडने बांग्लादेशला हरवावे ही प्रार्थना करावी लागेल तरच ते आत येतील

बांग्लादेशाचे शॉट सिलेक्शन कसले अफलातून आहे. अनेकदा वा क्या बात है! असे निघाले. तो शॉर्टवरचा सिक्स आणि आत्ताचा शॉर्टवरचाच थर्डमॅन कडे मारलेला फोर !

NZ बांग्लाला सहज हरवेल पण त्यांनी आज हरू नये. गो बांग्ला.

बांग्ला जिंकायलाच पाहिजे आज.. इंग्लंडचा माज उतरेल सगळा.. फक्त तळातल्या टीमला हारवून ते आपल्या विरुद्ध क्वार्टर फायनलला येतील नाहीतर..

वाका वरची आपली मॅच याचि देही याचि डोळा पाहिली. मजा आली खुप. युएईची एकतर्फी मॅच पाहिल्यावर ही पण अशीच होते कि काय असे वाटत होते. पण खरचं इंटरेस्टींग होती. पर्थचे सगळे इंडीयन ओरिजिनचे पब्लिक झाडून आले होते मॅचला. ३२ च्यावर तापमान, नेमकी दुपारची मॅच असुनसुद्धा लोकांचा उत्साह खुप होता. वाकाच्या जवळपासच्या रोडवरुनच लोक ढोल वाजवत येत होते. १७,५०० प्रेक्षक होते. प्लेयर्स पॅव्हिलिऑनमधे बसल्याने सगळे वेस्ट इंडीजचे प्लेयर्स जवळून दिसले पण ९०% इंडीयन्सच मॅचला असल्याने त्यांना कोणी जास्त भाव देत नव्हते Wink
थोडे फार जे वेस्ट इंडीजचे प्रेक्षक होते, त्यांच्याशी मात्र ते आवर्जुन बोलत होते ते खुप आवडले. ख्रिस गेल आल्यावर मात्र सगळे गोळा व्हायचे त्यामुळे त्याला बिचार्‍याला इंडीयाच्या पॅव्हिलिऑन मधुन यावे लागले.:)

पेरु.. खरच भाग्यवान..पण मैदानावर आपल्या धडाधड विकेट्स जायला लागल्यावर फॅन्सचा धिर सुटला होता का? खरच तुम्ही ऑस्ट्रेलियात राहणार्‍या भारतिय वंशाच्या लोकांनी आपल्या टिमला खुप भक्कम सपोर्ट दाखवलात. सलाम!

अहो अप्पाकाका.. कालचा सामना बघताना हिंदी समालोचन ऐकत होतात का? तो सर्रास चांदीमल चांदीमल असच म्हणत होता हो.. मी याआधी त्याचे नाव समालोचनात कधीच ऐकले नव्हते .. म्हटले.. तो एवढ्या कॉन्फिडंसने चांदीमल म्हणतोय म्हणजे ते चांदीमलच असावे .. ख.खो.दे.जा.!:)

अरे तो मुश्फकिर रहिम म्हणजे मुर्ती लहान पण बॅटिंग महान यातला प्रकार आहे.. काय मस्त खेळतोय.. उगाच बांगला देश जिंकु देत असे म्हणु नका.. त्यांचा खेळ बघुन अस वाटतय की क्वार्टरफायनलमधे ते जड जातील इंग्लंडपेक्षा! असो.. फर्स्ट थिंग फर्स्ट.. आधी उद्या आयर्लंडला हरवले पाहीजे ..

विराटचे पाक विरुद्ध शतक झाल्यावर जसा रैनाला आनंद झाला, तसाच आज महमुद्दलाहचे शतक झाल्यावर मुशफिकरला झाला. तोच येस्स वगैरे करत होता.

महमुद्दलाह आणि सौम्याने जे फ्लॅटफॉर्म तयार केला त्याला महमुद्दलाह आणि मुशफिकर योग्य न्याय देतात. आपले २ बाद २४५ आणि २ बाद २४३ वरून ऑलमोस्ट ऑलाआउट ३००. आणि बांग्ला ४ बाद नंतर पण मस्त खेळत आहेत. गो बांग्ला.

आपल्याकडे रैना आणि जडेजाने भार उचलला पाहिजे. स्पेशली जडेजा तर नक्की काय करतोय कुणास ठावूक? तो युवीसारखा रोल प्ले करत नसेल तर आपण वल्डकप जिंकणे अवघड आहे.

काय मस्त खेळतोय.. उगाच बांगला देश जिंकु देत असे म्हणु नका >>. मी चार पाच दिवस आधी लिहिले होते. बांग्लाका कमी लेखू नका, ती टीम चांगली आहे. त्यामुळेच मी त्यांना सपोर्ट करतोय. ती लिंबू टींबू टीम नाही. (जे इथे काही जणांचे मत आहे).

सही, चांगला स्कोअर केला केला बांग्लादेशनी !
अता इंडीया- पाक मॅच अज्जिबात नको , पुरी हौस फिटली भयंकर टेन्शन अनुभवायची परवा विंडीज विरुध्द !
पाक ऑस्ट्रेल्याशी हारो आणि आपल्याला सेमि फायनालला ऑस्ट्रेलियाला त्यांच्या होमग्राउंडवर हरवायला मिळु दे !

आपल्याला नाही पाकड्यांना हरवावे लागेल. खरतर आपली मॅच पाकड्यानंतर असायला हवी होती. जर त्यांनी पाकड्यांना हरवले असते तर आपण फारच कमी मार्जिन ने जिंकण्याचा प्रयत्न करायचा जेणे करुन नेटरनरेट मुळे पाकडे बाहेर जातील

आपण हरलोच आयर्लंड बरोबर तर पाक नक्की बाहेर का ? आणि आपण तरीही टॉप वर रहाणार ना गृप मधे Happy ?
एकदा वाटतय पाकला बाहेर काढण्यासाठी आयर्लंड विरुध्द हरावं आणि शिवाय आयर्लंडने पकाला हरवावे :), पण प्रत्यक्षात आपली टिम हरताना पहायला नाहीच आवडणार आणि शेवटपर्यंत अजिंक्य राहिलो तर जास्तं अभिमान वाटेल टिमचा :).

India 4 - 4 - 0 - 0 0 - 8 -- +2.246 -- 896/158.0 685/200.0 >
South Africa 5- 3 - 2 - 0 0- 6 -- +1.462 -- 1537/247.0 1176/247.0 >
Pakistan 5 - 3 -2 - 0 0 - 6 -- -0.194 -- 1189/247.0 1237/247.0 >
Ireland 4 - 3 -1- 0 0- 6 -- -0.820 -- 1127/195.1 1319/200.0

आयर्लँड आणि पाकिस्तान मधे फारच कमी मार्जिन आहे

माबोवर इथे का बरं इतकं इंग्रजी ऊतु चाल्लंय आं?

श्रीलंका काय सहजतेनं ३०० च्या वर धावा करंतय, ते सुध्दा दुसरी बॅटिंग असताना. द. आफ्रिका १/४ फायनलच्या पुढे जाणं कठीण दिसतंय एकंदरीत. ऑसीजची बॉलिंग एकट्या स्टार्कमुळे अतिभेदक दिसतेय.

>> गेमच इंग्लंडमधला आहे ना.
हा हा यावर मला एका भारतीय माणसाचं वाक्य आठवलं (नाव विसरलोय त्याचं). त्याला बीबीसीच्या कॉमेंटरी बॉक्स मधे भारत इंग्लंड सामन्याच्या वेळेला बोलावलं होतं. तो म्हणाला क्रिकेट हा भारतीयांचाच खेळ आहे तो ब्रिटिशांना केवळ अपघाताने सापडला. Lol

आणि आप्ण थोडेच बाळ ज. पंडीत आहोत.. प्रत्येक वाक्य शुद्ध मराठीत लिहायला... शब्द सापडणार नाहीत पटकन.

>> प्रत्येक वाक्य शुद्ध मराठीत लिहायला
वाक्यात इंग्रजी शब्द चालतील रे. पण लागोपाठची वाक्यं इंग्रजीत?

आता कॅथेड्रलच्या बाजुने रोबेल हुसेन यांचा पुढचा चेंडु...आणी हा आखुड टप्प्याचा चेंडु रोबेल हुसेन यांनी टाकला होता.. आणी इंग्लंडचे कप्तान इयन मॉर्गन यांनी तो मध्य धावपट्टिच्या सिमारेषेकडे भिरकवलेला आहे.. पण तिथे क्षेत्ररक्षक धावत येत आहे व या उंचावरुन मारलेल्या फटक्याचा त्यांनी अगदि लिलया.. सिमारेषेच्या आत त्यांची पावले ठेवत ... मला वाटत शकिब अल हसन यांनी ..उत्कुर्ष्टरित्या झेल घेतला आहे . अश्या रितीने इंग्लंडचे कर्णधार इयन मॉर्गन एकही धाव न काढत तंबुत परत.. इयन मॉर्गन.. झेल शकिब अल हसन गोलंदाज रोबेल हुसेन....:) इंग्लंडची धावसंख्या.. ४ बाद १२१! (बाळ पंडित यांच्या आठ्वणी प्रित्यर्थ!):)

आता कॅथेड्रलच्या बाजुने रोबेल हुसेन यांचा पुढचा चेंडु...आणी हा आखुड टप्प्याचा चेंडु रोबेल हुसेन यांनी टाकला होता.. आणी इंग्लंडचे कप्तान इयन मॉर्गन यांनी तो मध्य धावपट्टिच्या(धावपट्टीच्या) सिमारेषेकडे(सीमारेषेकडे) भिरकवलेला आहे.. पण तिथे क्षेत्ररक्षक धावत येत आहे व या उंचावरुन मारलेल्या फटक्याचा त्यांनी अगदि(अगदी) लिलया.. सिमारेषेच्या(सीमारेषेच्या) आत त्यांची पावले ठेवत ... मला वाटत शकिब अल हसन यांनी ..उत्कुर्ष्टरित्या(उत्कृष्टरित्या) झेल घेतला आहे . अश्या रितीने इंग्लंडचे कर्णधार इयन मॉर्गन एकही धाव न काढत तंबुत परत.. इयन मॉर्गन.. झेल शकिब अल हसन गोलंदाज रोबेल हुसेन.... इंग्लंडची धावसंख्या.. ४ बाद १२१! (बाळ पंडित यांच्या आठ्वणी प्रित्यर्थ!

शुध्दलेखन करुन दिले Happy

Pages