ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला एक शंका आहे . Amazon.com वरुन यूएस ला मागवलेल्या वस्तुंची क्वालिटी व भारतात मागवलेल्याची क्वालिटी सेम असते का ? स्पेशली सौंदर्यप्रसाधन

२३ मिलियन $ च पुस्तक हवय का कोणाला???? (सध्या ते १५ $ ला मिळत आहे Happy )
प्राइस अल्गोरिदम ने काहीतरी गडबड केल्यामुळे ह्या पुस्तकाची किंमत $23,698,655.93 झाली होती (शिपिंग ३.९९$)

इथे आहे CNN ची बातमी आणि इथे ओरिजनल बातमी..

स्नॅपडिल वरुन फुलाफुलांची पँट मागवली. ८४० ची ३४० ला पडलीय. बघु कशी निघते.
$23,698,655.93 ?? नक्की जर्मन कॉमा आणि पॉईंट कव्हेंशन ची गडबड केली असणार प्रोग्रामर ने. (आपला १,०००० मधला स्वल्पविराम तो त्यांचा पॉईंट आणि आपला १.००००० म्हणजे त्यांचे एक लाख :))

मी DHgate.com वरुन एक गळ्यातलं मागवलंय. इथे झालं पेमेंट नीट. Proud बघु कसं निघतंय ते.. अमा, २७-२८ आहे ना स्नॅपडील सेल.??

aliexpress वर माझं पेमेंट झालं विथ नो इशुज. मी मास्टरकार्ड वापरलं.
चांगली वेबसाइट आहे. थँक्स

शॉपक्लूज कधीच वापरु नका. अतिशय भंगार. माझ्या नवर्‍याने एकदा स्क्रॅच गार्ड मागवले. भलत्याच फोनचे स्क्रॅच गार्ड आले. Angry नंतर रीटर्न घेतले नाहीत. आम्ही पण सोडून दिलं असं पण फार काही महाग नव्हतं म्हणून आणि त्यांच्या माणसांच्या वेळा आणि आमच्या वेळा जुळत नव्हत्या म्हणून पण.
त्यानंतर रिसेन्ट्ली टायरमध्ये हवा भरण्याचा एक पंप मागवला तर त्याजागी ३ एलईडी बल्ब्ज आले . Angry

मीही हल्ली ब-याच वेळा ऑनलाईन खरेदी केलीय आणि अनुभव खुप चांगला आहे.

तरीही एक अनुभव आला ज्यातुन मी एक धडा शिकले Happy

मी आजवर ऑनलाईन खरेदी छोटीमोटीच केलीय. मेजर असे काही केले नव्हते (लेकीने फ्लिपकार्टावरुन मोटोजी घेतला तीच एकमेव मोठी खरेदी. पण तो तिथेच मिळत होता म्हणुन, नाहीतर मी दुकानातच गेले असते)

मी फॅबफर्निशमधुन एक फोल्डींग डायनिंग टेबल घेतले. किंमत थोडी जास्त होती पण स्पेससेवर होते म्हणुन ते निवडले.

टेबल दिलेल्या वेळेस आले. तेव्हा घरात काम सुरू होते म्हणुन ते तसेच बंद करुन ठेवले. चार दिवसांनी त्यांचा माणुस फिटींग करायला आला तेव्हा लक्षात आले की त्यांचे मागचे एक पॅनेल प्लायवुडचे होते आणि त्याला भेगा गेलेल्या. बाकी पुर्ण टेबल आंब्याच्या लाकडाचे असताना फक्त हा एवढाच भाग प्लायचा का केला देवजाणे. बरे केला तो केला, निदान मजबुत तरी करावा.

टेबल विकत घेताना मी रिटर्न पॉलीसी वाचलेली. टेबल थर्ड पार्टीचे आहे, फॅब ते फक्त विकत आहे हेही वाचलेले. पण थर्ड पार्टीची रिटर्न पॉलीसी मात्र नजरेला पडली नाही. कारण रिटर्न पॉलीसी वाचताना फक्त पॉलीसी वाचली, त्याच्या बाजुचे आणि कोप-यातले टॅब्स पाहिले नाहीत. त्यामुळे थर्ड पार्टीसाठी वेगळी रिटर्न पोलीसी असेल हे लक्शात आले नाही. ही माझी मोठी चुक झाली. तसेही त्यांनी एक छोटा एस्टेरिस्क मारलेला रिटर्न पॉलिसीच्या खाली, पण तो खुपच लहान होता, लक्ष गेले नसावे तेव्हा.

टेबलाबद्दल रीतसरपणे तक्रार करुन झाली. आधी त्यांनी खराब झालेला भाग बदलुन द्यायची तयारी दाखवली. पण मला तसे नको होते. मी टेबल परत घ्या आणि पैसे द्या म्हटल्यावर मात्र त्यांनी मला रिटर्न पॉलिसी दाखवली आणि थर्ड पार्टीचे पैसे परत मिळत नाही ही आनंदाची बातमी दिली. मला आधी हे का सांगितले नाही म्हटल्यावर रिटर्न पॉलिसी वाचायची जबाबदारी तुमची आहे हे नम्रपणे सांगितले. Happy

टेबल ज्याचे होते त्या वेंडरने शेवटी पुर्ण टेबल बदलुन द्यायचे मान्य केले हे माझे नशिब. त्याने दिले नसते तर मी झगडत बसले असते पण मग उगीच वेळ गेला असता आणि मनस्ताप झाला असता.

या सर्व प्रकरणात फॅबफर्निशच्या लोकांनी वेळोवेळी फोन करुन अपडेट्स घेतले, दिले. दुस-या वेंडरने पण खुप वेळा फोन केला. मला रिपेअर केलेले टेबल नको म्हटल्यावर त्याने टेबल बदलुन द्यायची तयारी दाखवली. त्यामुळे मला त्या मंडळींबद्दल तसा काही आक्षेप नाही.

पण मुळात खरेदी करण्याआधी मी सर्व गोष्टी काळजीपुर्वक वाचल्या असत्या, खरेदीआधी त्यांना फोन करुन अजुन डिटेल्स विचारले असते तर माझा बराच मनस्ताप वाचला असता.

<<शॉपक्लूज कधीच वापरु नका. अतिशय भंगार. >>
१००% अनुमोदन.
एम आय ३ चे ओरिजीनल इअरफोन्स दाखऊन दुसरेच एक्दम चीप इअरफोन्स पाठवले होते. मी पण डिस्प्युट ओपन करून पैसे परत घेत्ले पण.

फ्लिप्कार्ट ची सर्विस खूपच छान.
आतापर्यंत ५०" एल.ई.डी माय्क्रोमॅक्स, मोटो जी- एम आय ३ मोबाईल, सोनी एक्क्ष एक्स्पेरिया अशा मोठया खरेदि सोबत पुस्तके आणी छोटी मोठी बरीच खरेदी केली आहे. छान सर्विस आणी डिस्काऊंट पण.

५०" एल.ई.डी माय्क्रोमॅक्स>>>
संदिप एस>> ह्या टिव्ही चा काय अनुभव आहे?? एल्जी, सोनी पेक्षा किंनत बर्यापैकी कमी आहे. पण क्वालिटीबद्द्ल थोडी शंका आहे..

म्या कॅमेरा घेतला होता Canon IXUS 145 फ्लिपकार्ट कडुन, फ्लिप्कार्ट बद्द्ल काहिच तक्रार नाही पण कॅमेरा खुपच बंडल निघाला, एकदम चिप मोबाइल कॅमेरा सारखे पिक्स येताहेत.
फ्लिपकार्ट ची सर्विस खुपच छान वाटली. पुस्तके आणि पेन्स पण मागवलेत तेव्हाही छान अनुभव आलाय फ्लिपकार्टचा.

एक प्रकर्ण नुकतेच निस्तरून मोकळा झालो.

फ्लिपकार्टावर 'ओरिजनल मेड' अ‍ॅपल बॅटरी चार्जर विकायला ठेवलेला दिसला. याची गरज पडणार होती, फ्लिपकार्टाचा आधीचा चांगला अनुभव होता, नेहमीप्रमाणे फ्लिपकार्टावरची किंमत बरी होती आणि दुकानात जाऊन घ्यायचा वेळ वाचत होता, म्हणून लगेचच घेतला.

माझ्या वाईट खोडीप्रमाणे घेऊन तो ठेवून दिला. आठ-पंधरा दिवसांनी वापरायला घेतला आणि अर्रर्र! फोनात पिन घालून चार्ज झाल्यावर फोनातून पिन काढायला गेलो आणि पिन फोनालाच राहिली आणि नुसरी वायरच उपसून हातात आली.

(मग थोडावेळ शांतपणे मनस्ताप, वैताग, चरफड करून घेतली.)

मग फ्लिपकार्टाला पत्र लिहिले.

त्यांचे असे उत्तर आले की खरेदी करून अमूक दिवस लोटले आहेत. तेंव्हा फ्लिपकार्ट सदर वस्तू बदलून देण्याबाबत काही करू शकत नाही. पण सोबत तुमच्या खरेदीची पावती जोडत आहोत ती घेऊन डीलराकडे जा. वस्तू अजून वॉरंटीत आहे. डीलरचे तपशील पाहिले तर तो राजस्थानात! मग म्हणाले तुम्ही अ‍ॅपलस्टोअर मध्ये जा. तिथे गेलो तर ते म्हणे ही वस्तू ओरिजिनली अ‍ॅपल मेड नाही.

(मग आणखी थोडावेळ शांतपणे बसून मनस्ताप, वैताग, चरफड करून घेतली.)

फ्लिपकार्टास तसे कळवले. ते म्हणाले, ही यादी घ्या आणि त्यातल्या कोणत्याही सेंटरात जा! त्यांना म्हटले, मी आधीही जाऊन आलो आहे; आताही जातो, पण मुळात ही वस्तू त्यांनी बनवली आहे, हेच त्यांना मान्य नाही यावर काय? तर म्हणे, सर्व्हीस सेंटरात जा आणि ते नाकारणार्‍या अधिकृत व्यक्तीचे नाव, नाकारण्याचे कारण, त्या सेंटराचा अधिकृत पत्ता आणि फोन नंबर इ. तपशील त्यांच्याकडून घ्या आणि आम्हाला कळवा. मग त्या यादीतले एक सेंटर गाठले. तिथे त्यांनी तेच सांगितले की ही वस्तू आमची नाहीच. बोगस आहे! मग मी त्यांना वही आणि पेन दिले आणि त्यावर तुमचे जे म्हणणे आहे ते लिहा आणि खाली सही शिक्का-मारा अशी विनंती केली. (यावर त्या माणसाने मजकडे फार विचित्र नजरेने पाहिले हो!) म्हणाला, हे तुम्हाला कशाला हवे आहे लिहून? त्याला फ्लिपकार्टाचे ते पत्र दाखवले. मग तो वही, पेन आणि त्या मोडक्या चार्जरसह त्याच्या वरिष्ठाकडे मला घेऊन गेला. शेवटी बर्‍याच वेळा खाली, वर, उजव्या, डाव्या बाजूने चार्जर न्याहाळून त्यांनी ते तपशील सहीसह लिहून दिले.

त्या पानाचा फोटो काढून फ्लिपकार्टाला पाठवला. फ्लिपकार्टाने 'चार्जर आम्ही परत घेऊ आणि तुमचे पैसे तुम्हाला परत करू' असे कळवले आणि पिक-अप साठी वेळ ठरवली.

पिकअप साठी मुलगा आला. त्याने ती वस्तू घेण्यास ठाम नकार दिला!

कारण काय, तर म्हणे ही वस्तू डॅमेज झाली आहे! डॅमेज वस्तूंचे पिकअप आम्ही करत नाही!

(मग मी आणखी थोडावेळ शांतपणे बसून ...... )

मग पुन्हा पत्रलेखन आले. यावेळी निब चांगली चमकेस्तोवर परजून घेतली आणि मग तिने पत्र लिहिले.

ते म्हणाले डॅमेजचे पिकअप वाले वेगळे असतात आणि धडश्यांचे वेगळे असतात!

शेवटी एकदाची त्या चार्जराची उचलबांगडी करण्यात आली आणि रीतसर माझ्या खात्यात त्याचे पैसे जमा झाले.

यात पाच महिने गेले.

पण एक गोष्ट: या सगळ्यात मी माझा मनस्ताप आणि त्रास फ्लिपकार्टाला प्रत्येक पत्रात कळवत होतो आणि त्याला ते तितक्याच नम्रतेने आणि दिलगिरी व्यक्त करून 'आता पुढे काय करायला लागेल' हे कळवत होते. एका पत्रात त्यांनी असेही म्हटले की, हे सर्व तुम्हाला फार त्रासदायक आणि मनस्तापाचे होते आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याबदल्यात आम्ही तुमच्यासाठी दुसरे काही करावे असे तुम्हास वाटत असेल तर तसे कळवा, आम्ही ते तुमच्यासाठी करू.

पण एक गोष्टः या सगळ्यात मी माझा मनस्ताप आणि त्रास फ्लिपकार्टाला प्रत्येक पत्रात कळवत होतो आणि त्याला ते तितक्याच नम्रतेने आणि दिलगीरी व्यक्त जरून 'आता पुढे काय करायला लागेल' हे कळवत होते. एका पत्रात त्यांनी असेही म्हटले की हे सर्व तुम्हाला फार त्रासदायक आणि मनस्तापाचे होते आहे, याची आम्हाला जाणीव आहे आणि त्याबदल्यात आम्ही तुमच्यासाठी दुसरे काही करावे असे तुम्हास वाटत असेल तर तसे कळवा, आम्ही ते तुमच्यासाठी करू.>> हा अ‍ॅप्रोच बेस्ट आहे.

स्नॅपडिल वरुन कासवासारखा दिसणारा आणि रात्री छतावर तारे प्रोजेक्ट करणारा नाईट लँप मागवला होता. तो कधी चाललाच नाही. पण रिव्ह्युज मध्य भरपूर लोकांनी 'आमचा दिवा चालत Happy (प्रकाशित होत) नाही' अशा तक्रारी केलेल्याच असल्याने मनाची तयारी होती. लगेच परत केला आणि पैसे जमा झाले.
होमशॉप१८ वरुन मोराच्या नक्शीचे सुंदर मंगळ सूत्र मागवले होते ते तीन महिन्यात खराब झाले.

aliexpress वरुन वस्तू मागवल्यास डिलिव्हरी घेतना पुन्हा काही पैसे द्यावे लागतात का? म्हंणजे कस्टम ड्युटी वैगेरे.

अग्निपंख,
छान आहे टीव्ही, घरात एक सोनी ३२" एल.सी.डी होता ऑलरेडी, मला तरी ५०" पॅनेल खूप आवडलं, फुल एच डी असल्याने एच डी मूव्हिज आणी चॅनेल्स पहायला मजा येते.
अर्थात ३२के च्या मानाने अपेक्शा जास्त नव्हत्याच म्हणा Happy

अली एक्स्प्रेस च्या डिलीव्हरी चा कोणाला काही अनुभव?
मी १२ फेब्रुआरी ला ड्युएल पेन ड्राईव्ह ची ऑर्डर दिली ९ डॉ. आणी त्यांनी दिलेला चायना पोस्ट चा ट्रॅकिंग नंबर काहीच ईन्फो देत नाहीये, शेवटी आज कंटाळून डिस्प्युट टाकलाय

कांदिवली स्टेशनवर pepperfry.com नावाच्या फर्नीचर वेबसाईट्सची जाहिरात पाहिली . घरी येऊन असेंबल करून देतात असे लिहिले होते. अनुभव नाही

२३/२/२०१५ ला २ गोष्टीची अ‍ॅमेझॉनला ऑर्डर दिली होती.एक वस्तू मिलाली .दुसरी अजून न मिळाल्यामुळे आज मेल पहाते तर काय' order was refused at the delivery address.' मला डिलिव्हरी मिळालीच नाही तर रिफ्यूज काय करणार? चला हा ही एक अनुभव!

अर्थात cash on delivery चाच ऑप्शन होता.पण त्यांच्या मेलमधे तुम्ही पैसे भरले असतील तर आम्ही परत करू वगैरे लिहिलंय.

कस्टमर केअरशी संपर्क करुन पहा. मला अ‍ॅमेझॉन कस्टमर केअरचा चांगला अनुभव आहे. एकदा डिलिवरी करणारा चुकून (डिलिवरी घरात काम करणार्‍या मुलीने घेतली.) ८०० रु. परत न करता निघुन गेला. तासाभाराने लक्षात आल्यावर कस्टमर केअरशी बोलले. संध्याकाळी डिलिवरी करणार्‍या माणसाने ८०० रुपये आणून दिले.

Pages