होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

साबण कसला, अख्खी एरियल आहे. वारा येईल तशी हालते ( म्हणजे अ‍ॅन्टेना) आणी असेल त्या पाण्यात विरघळते. जेव्हा बघावे तेव्हा डोळे मोठे करुन आणी तोन्डाचा आ करुन विश्वदर्शन दाखवते. श्री पण सामावेल त्यात.खो खो

रश्मी...अगदि खरय :))

नाही ग दक्षिणा. जानुची आई आणी पिन्ट्या गोखलेन्च्या घरी येतात. पण जानुच्या माहेरी रहाण्यावरुन बेबी वन्स वगैरे त्याना बरेच बोलतात. मग जानुची आई बेबीला विचारते की तुम्ही कशाला माहेरी रहाताय? ते ऐकुन बॉम्ब पडतो. जानु बाहेरुन येते, विचारते की काय झाले तर मीनाकुमारी उर्फ श्रीची आई जानुला, तिच्या आईला घेऊन जायला सान्गते. आणी इन्दुवहिनी तिला गेट आउट म्हणतात. तिघे घरी येतात तिथे पण गोन्धळ होऊन जानुला त्रास होतो.

इकडे बेबी वन्स आणी सरु मावशी सामानाची बान्धाबान्ध करतात. ( आपापल्या)

हे सगळे बघुन ( म्हणजे श्री घरी आल्यानन्तर ) तो विचारतो काय झाले, मग त्याला ते कळत तर तो म्हणतो आता काही तरी बोलायलाच पाहीजे, पाणी बरच डोक्यावरुन चाललय.( तसे प्रेक्षकान्च्या डोक्यावरुन ते आधीच गेले आहे)

मेरेकु बौत डौट आ रेहेला है, क्या जानु सच्ची मे आई/अम्मा/ मम्मी/ मम्मा बननेवाली है या सिरीयल चल रहेली है दालमे पानी घाल घाल के.

माझ्या मते जानीला वेगळ व्हायचय म्हणजे घरापासून वेगळ. श्रीरंग पासून नाही तिच्या सध्याच्या नाजूक बिजूक परिस्थितीत. तिला तिची नाजूक परिस्थिती आत्ता भांडा फोड करायची नाहीये पण तिला घरातल्या टेन्शन पासून वेगळ व्हायचय. म्हणजे त्या बेबी आत्त्याच्या तोंडाचा पट्टा ऐकायला नको. पिंट्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे .पिंट्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे :).

पिंट्याला शिक्षा व्हायलाच पाहिजे >>>>> काय केल त्या पिंट्याने???????? (खरच माहित नाही म्हणून विचारते आहे).

जेव्हा बघावे तेव्हा डोळे मोठे करुन आणी तोन्डाचा आ करुन विश्वदर्शन दाखवते. श्री पण सामावेल त्यात.>>>> हा हा हा

यंदाच्या विश्वचषकात सचिन-शोएब किंवा सचिन-ब्रेटली अशी काही जुगलबंदी नाहीय, ही कसर शशिकलाबाई-बेबी भरून काढतायत. काल हाणामारीच्या षटकात "लग्नानंतर सासर हेच मुलीचं सर्वस्व" असा फुलटॉस बेबीने टाकला आणि शशिकलाबाईनी तो मिडविकेटवरून प्रेक्षकांत भिरकावला. आज बघू काय होतय.

आरे त्या शशिकला बाई काय भन्नाट आहेत .
मागे-पुढे , चूक-बरोबर काही माहित नाही मला !
पण त्या आई-आजींना काय ऐकवलं त्यानी .

" आपला रूबाब बाहेर ठेउन यायला जमेल तुम्हाला ! "
फिदा , फिदा फिदा .. त्या साखरेत घोळलेल्या ,श्रीखंडाचे सारण भरलेल्या मलई सँडविच जानी पेक्शा सणसणीत तिखट पाणीपुरी बरी वाटली

काय जबराट लिहिले आहे अनिरुद्ध भातखंडे यांनी लोकसत्ता मध्ये.
एक सीन बघितला ती शशिकला त्या श्री च्या ऑफिसमध्ये चुगली करण्यासाठी आली असते आणि ती आपल्या फोन वरून जा$$$$नी ला फोन लावून देते तेव्हा श्री ज्या पद्धतीने तिच्यावर रागवत होता अगदी कहरच. आणि अश्या संवादावरून एखादीचा (खरोखर गरोदर असल्यास) मानसिक तोल जरूर ढळू शकतो. अर्थात एवढा ट्रेसपूर्ण सवांद बहुदा डिरेक्टरने एकतर्फीच शूट केला असेल कदाचित.

काय जबराट लिहिले आहे अनिरुद्ध भातखंडे यांनी लोकसत्ता मध्ये.>>>> निदान हा रिव्ह्यू वाचून मालिकेच्या निर्मात्यानी, दिग्दर्शकानी आणि वाहिनीने काळजी घेणे आता आवश्यक आहे. प्रेक्षकाना कमी लेखणे आणि गृहित धरणे सोडणे गरजेचे आहे.

केवळ प्रेग्नेण्ट असणे म्हणजे एवढ महाभारत घडायला कारण असू शकते हे या आधुनिक रामायणातच कळले. काय तर डॉक्टरांनी सांगितले कि मनःस्ताप नको म्हणून ती नाईलाजाने त्या शाशिकलेकडे गेलीय. यांना एकदा अनुभव येवून सुद्धा पुन्हा पुन्हा का विषाची परीक्षा घ्यावीशी वाटते. शीईईईइ $$$$$$ अगदीच तकलादू सिरियल. Angry Angry

कुठली संपवताहेत ते ही सिरीयल!! परवाच आयबीएन लोकमतवर सगळे निर्लज्जपणे १००० वा एपिसोड साजरा करत होते. अजून १००० करणार म्हणाले. रोहीणी बाईंनी नाव न घेता माझी सिरीयल १० की १२ वर्षे चालते असेही कौतुकाने सांगितले. तेव्हा आशा सोडाच ह्या सिरियलच्या बंद होण्याची....

त्या साखरेत घोळलेल्या ,श्रीखंडाचे सारण भरलेल्या मलई सँडविच जानी पेक्शा सणसणीत तिखट पाणीपुरी बरी वाटली>>

अगदी खरे आहे...शशिकला भन्नाट!

काय मस्त गैरसमज निर्माण केलेत श्री च्या मनात....... आता काय ही शिरेल लवकर संपत नै. Angry

नैतर गैरसमज अन् शिरेल दोन्ही एकदमच संपवा म्हणावं.

रोहीणी बाईंनी नाव न घेता माझी सिरीयल १० की १२ वर्षे चालते असेही कौतुकाने सांगितले. तेव्हा आशा सोडाच ह्या सिरियलच्या बंद होण्याची....>>>>म्याडम या सेरियल नंतर रिटायर होणार बहुदा Biggrin Biggrin Biggrin

न.वा. कठीण आहे मग.
आता या सिरीयल मध्ये "२० वर्षांनंतर" अशी पाटी लागणार. आणि श्री-जानीचा मुलगा/मुलगी शिरेलीचा हिरो/हिरविण बनुन शिरेल
(प्रेक्षकांवरील अत्याचार) पुढे अनंतकाळासाठी चालूच राहणार. Uhoh

मुलाचे चान्सेस कमी.......मुलगीच !!!!!!!! Happy Happy Happy आणि तीही जानी (डबल रोल- आधीची जानी फोटोत) नाव काहीस हिंदी नावांशी साधर्म्य असलेले. आणि हि मुलगी २० वर्षानंतर श्रीला भेटेल त्याच(ठसक्यात उच्चार) बस स्टोप वर. श्रीला अजून ४/५ वर्षानंतर(सेरियल) मधे साक्षात्कार होईल कि हि तर आपलीच मुलगी :अओ:(तोपर्यंत पाणी घालून घालून सेरियल ५००० एपिसोड पूर्ण करेल आणि माबो वरही चौथा नाहीतर पाचवा धागा सुरु होईल). मग त्याच्यातील गोखले रुपि 'कीर्तने' जागा होऊन , बाप - लेकीमध्ये तेढ वैगरे....... Sad Sad Sad
अजुन होणार अत्याचार.

'चार' दिवस सासूचे या नावाच्या 'अकरा वर्ष'(!) चाललेल्या सिरियलची कविता लाड-मेढेकर ही हिरॉईन होती. मालिका चालू असताना तिला ख-या आयुष्यात दोन मुलं झाली. ती चांगली मोठीही झाली. कविताची लोकप्रियता (!) जराही कमी झाली नाही. मध्ये मध्ये तिला पंधराएक दिवस रजा दिली असेल, तेवढंच.

या सिरियलीत जानीचं आता कुठे लग्न झालंय! पहिलं बाळंतपणही यथावकाश होईलच. आत्ताशी कुठे दीड वर्ष झालंय सिरियलीला. अजून साडेनऊ-दहा व्हायची आहेत! चालूद्या निवांत! Biggrin

पूनम Lol
माझं लग्न झालं तेव्हा साबा चार दिवस सासूचे ही महामालिका नियमित बघतात हे पाहून मी चक्रावले होते
ही मालिका मी नववीत असताना सुरू झाली अन् माझं एम. ए. पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांनंतर संपली.....

आमच्या पूज्य मातोश्री सर्वच सिरीयलच्या आश्रयदात्या आहेत. काही सिरीयल prime time मध्ये बघायच्या आणि उरलेल्या नेक्स्ट डे, रिपीट टेलिकास्ट.

११ वर्षे चार दिवस सासूचे बघितली तिने नित्यनेमाने.

११ वर्षे चार दिवस सासूचे बघितली तिने नित्यनेमाने.>> अन्जू माझ्या साबांनी पण.
आता होसूमीयाघ पण बघतात ब्रेक मध्ये ही चॅनेल बदलू देत नाहीत. Uhoh

Pages