निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगऱ्याचे रोपटे कडीपत्त्याच्या रोपाजवळ ठेवले होते. त्यातून नवे मोगऱ्याचे रोपटे उगवले. आता हे नवे रोपटे कसे जगवावे ह्यावर कोणी मार्गदर्शन करेल काय? धन्यवाद. 

मोगऱ्याचे रोपटे कडीपत्त्याच्या रोपाजवळ ठेवले होते. त्यातून नवे मोगऱ्याचे रोपटे उगवले. आता हे नवे रोपटे कसे जगवावे ह्यावर कोणी मार्गदर्शन करेल काय? धन्यवाद. >>>> भगवती, माझ्यामते ते मोगर्‍याचे रोप अलगद उकरुन दुसर्‍या कुंडीत लावावे .... (कढीपत्ता हे फार चिवट झाड असते - त्याची मुळे आसपासची रोपे टिकून देणे अवघड आहे .... )

तुम्ही बहुतेक अमेरिकेत असता - त्यामुळे तेथील हवामान, रोपे वाढविणे यांची मला तरी माहिती नाही - तेथील जाणकारांचे मत घ्यावे असे वाटते ...

काऊ...रानवारा अहमदनगरपासून १०/१२ किमि.वर आहे. आधी केडगाव लागते. या गावातून अकोळनेर या गावी जायला एक फाटा आहे. त्या रस्त्यावर हे रानवारा आहे.
मनीमोहोर...............मी तर म्हणतीये की सगळ्यांनी यायचं ठरवा की. इथेच करू गटग(इथेच टाका तंबू ....या चालीवर :फिदी:)
अजून १५ फेबपर्यंत चालू आहे.

सगळे फोटो आणि चर्चा आवडली.

मी पुण्यात होतो तर पाहिले की शेवंतीच्या विविध जाती इथे अभावानीच बघायला मिळतात. विदर्भात हिवाळा आला की वेगवेगळ्या रंगातील शेवंती सहज बघायला मिळतात.

स्वागत आहे भगवती तुमचे.

ते मोगर्‍याचे रोपटे अजून वाढू द्या थोडे. अजून साधारण २ इंच आणि त्याचे खोड थोडे जाड झाले की मग त्याला अगलगद मुळाला धक्का न लागता मातीसकट काढून दुसरीकडे लावा.

काऊ................ Happy

वर्षाला शिंप्याने काय पोझ दिलीय! आय पॅड घेऊन आमच्याकडच्या शिंप्याच्या गुपचुप मागे लागले, जाळीआडून, पण एक सेकंद स्थिर बसेल तर शपथ!
एके ठिकाणाहून टाकीच्या ओव्हरफ्लो पाण्याचे थेंब कढिलिंबावर ठिबकत असतात, तिथे अंघोळीला, बागडायला बरेच शिंपी येतात.
खूप चर्पराट (chirping) करतात.

गुर्जी........काय सुंदर जांभळा रंग आहे!
शशांक .....वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शशांक ,वाढ्दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

जिप्सी , रंग फार फार सुंदर आहे. एवढी गडद निळी फुलं फार कमी दिसतात. म्हणून जास्त आवडली.

शनीवारी फ्लेमिंगो पाहण्यासाठी उरणच्या पाणजे गावात गेले. पण ते प्लेमिंगो अजून तिथे पोहोचले नाहीत पण चित्रबलक मात्र छान पहायला मिळाले.

खाडी असल्याने खार्‍या पाण्यावरच्या काही वनस्पती दिसल्या. तिथे दुर्व्यासारख्या वनस्पतीला ही फुले आली होती. हा दुर्वाच आहे का?

हे एक सुंदर झुडुप.

हा डायला. ह्याच्या पानांची भाजी करतात. पाने खारट असतात. मी मागे एकदा ह्याची रेसिपी लिहीली आहे.

अरे वा. सर्वात आधी शशांक ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. Happy
नविन भागाबद्दल निगकरांचे अभिनंदन.
बी मस्त फोटो व वर्णन.

आणि हो सर्वाना नव नर्षाच्या शुभेच्छा.

जागू खरंच पेंटेड स्टॉर्क्ससुद्धा फ्लेमिंगोपेक्षा कमी सुंदर नाहीत दिसण्यात. कदाचित जास्तच सुंदर वाटतात.

सध्या माझ्या घराभोवती रातराणी तुफान फुलली आहे. छोट्या चांदण्याच जणू.

Pages