निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षा ,चतुरान्चे फोटॉ पाहुन दिल खुश झाला.लहानपणी यांच्या मागे भिरभिरण्यात माझा बराच वेळ जात असे .
आता माझ्या निसर्गकवितांमध्ये ते भिरभिरत असतात ...

काय निगकर्स कसे आहात?
शांकली Happy सध्या तुझ्याकडे मांजर आहे काय?
भुईकमळ धन्यवाद.
मी जिप्सीने वर नमूद केलेल्या प्रदर्शनाला जाऊन आले. बोन्साय आणि काही सुरेख पुष्परचना दिसल्या. पण बाकीची त्यांची मांडामांड व्हायची होती त्यामुळे किटकभक्षी वनस्पती वगैरे दिसल्या नाहीत. गेल्या दोन प्रदर्शनांच्या वेळेला असाच अनुभव आला. रोझ सोसायटीच्या या प्रदर्शनांच्या वर्तमानपत्रातील बातमीमध्ये वेळ सकाळी ८ किंवा ९ वाजून सर्वांसाठी खुले असं दिलेलं असतं. प्रत्यक्षात सर्व मांडामांड व्हायला अकरा-बारा सहज वाजतात. त्यामुळे नेक्स्ट टाईम व्यवस्थित उशीरा जायचं (दुपारीच) असंच ठरवलंय.

काल बीएनएचएसच्या तुंगारेश्वर ट्रेलला गेले होते. तिथे दिसलेले हे स्ट्राइप्ड टायगर फुलपाखरु.

वर्षा, मस्त फोटो...
सध्या आमच्याकडे एक माऊ आहे. तिचं नाव 'मखमली'. पण तिचा रंग कारळ्याच्या चटणीसारखा मिक्स आहे, म्हणून माझ्या मुली तिला 'कारळी' असं म्हणतात!!......(मी इथेच थांबते; कारण मांजराबद्दल मी एकदा बोलायला सुरुवात केली, की कुठे थांबायचं हेच मला समजत नाही असं 'काही' लोकं म्हणतात....) - (आता ही 'काही लोकं' कोण, हे सूज्ञास सांगायला नको!!! :डोमा:)

माणिक, छाने कविता.

वर्षाचे फुलपाखरु इतरांच्या मनात जास्त भिरभिरतेय असे वाटतेय. Happy

शांकली, आमच्याकडे अशा रंगाची एक कुत्री आहे. आम्ही तिला अग्ली म्हणतो. बिचारी मंदबुद्धी आहे थोडीशी. आधी एक पिल्लु झालेले, तिच्यासारखेच अग्ली. ते दोनेक महिने तिच्या पायात बागडले, नंतर एक दिवस गाडीखाली आले. ह्या पावसाळ्यात एका रिकाम्या बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावर तिने ५ पिल्ले घातली. कित्येक दिवस अग्ली आमच्या घरापाशी आणि त्या बिल्डींगमधुन पिल्लांचा कलकलाट असे चालले. ऐशु एकदा वर जाऊन बघुन आली त्यामुळे ५ पिल्ले आहेत हे कळले. अग्ली बहुतेक पिल्लांना पाजायलाच जायची वर. काही दिवसांनी तो कलकलाट बंदही झाला. एकही पिल्लू कधी खाली दिसले नाही. अग्ली आधीच्याच निर्विकारपणे आमच्या घराखाली बसुन राहायला लागली.

याउलट घरापासुन थोडे दुर एका कुत्रीने १५ पिल्ले घातली. काही दिवसांनी पाहतो तर दोनेक महिन्याच्या एका पिल्लाचे शव समोर ठेऊन ती आई दु:ख करत रस्त्यावर बसलेली. Sad दोन - तिन दिवस ती तशीच काही न खाता पिता बसलेली. नंतर हळूहळू परत नॉर्मल झाली.

प्राण्यांमध्येही अशा डिसऑर्डर्स असतात काय? ऐशुच्या कॉलेजात एक बोका होता त्याला ऐकु-बोलु येत नव्हते. आमच्याकडे एक कावळा येतो तो स्वतःच्या चोचीने काहीच उचलत नाही. इतर कावळ्यांच्या मागे धावतो, मला खायला घाला म्हणुन. ते अधुन मधुन त्याच्या तोंडात घालत राहतात काहीबाही.

प्राण्यांमध्येही अशा डिसऑर्डर्स असतात काय? ऐशुच्या कॉलेजात एक बोका होता त्याला ऐकु-बोलु येत नव्हते. आमच्याकडे एक कावळा येतो तो स्वतःच्या चोचीने काहीच उचलत नाही. इतर कावळ्यांच्या मागे धावतो, मला खायला घाला म्हणुन. ते अधुन मधुन त्याच्या तोंडात घालत राहतात काहीबाही.>>>> आईग्गं!

अय्यो साधना Uhoh
मी कधी असं नोटीस नाही केलं प्राण्यांना!

रच्याकने इथे भाज्यांमधले तज्ञ आहेत का कोणी?
काल मला कोबीवरच्या किड्याबद्दल एक धक्कादायक माहीती कळाली पण माझा विश्वास नसल्याने मला कन्फर्म करून घ्यायचंय.
नसेल कोणी तज्ञ तर ती माहीती शेअर करत नाही उगाच गैरसमज पसरायला नकोत.

शनीवारी फ्लेमिंगो पाहण्यासाठी उरणच्या पाणजे गावात गेले. पण ते प्लेमिंगो अजून तिथे पोहोचले नाहीत पण चित्रबलक मात्र छान पहायला मिळाले.>> सुरेख फोटो.

प्राण्यांमधेही अशा डिसऑर्डर्स असाव्यात. कारण मागच्या वर्षी आमच्याकडे एक केशरी-पांढर्‍या रंगाचं अगदी छोट्टुस्सं पिल्लू आलं होतं. तिचं नाव सोनाली ठेवलं होतं. ती काही दिवसांची असतानाच तिची आणि तिच्या आईची ताटातूट झाली होती. अगदी आर्त आवाजात मियू मियू अशी बारीक आवाजात ती बोलायची; आणि खूप भित्री पण होती. ती काही दिवसांनी मलाच तिची आई समजू लागली. तिला हातावर घेतलं की तिच्या आईला ती कसं चोखेल तशी ती माझ्या हाताला चोखायची. पण त्यानंतर दुसर्‍या मिनिटाला ती माझ्याकडे आयुष्यात पहिल्यांदाच बघतिये अशी बघायची. तिला डॉ. कडे नेलं, तेव्हा ते म्हणाले होते की तिची 'गजनी' झालीये. अगदी पिल्लू असताना तिने जो जगण्याचा संघर्ष केला, त्यात तिला अनसिक्युरिटी प्रचंड वाटली होती, त्यामुळे तिच्यामधे टेंपररी मेमरी लॉस ही डिसऑर्डर निर्माण झाली होती. तिचे काही फोटो ह्यांनी मा बो वर टाकले आहेत. फार क्यूट होती ती दिसायला. बघितली की पटकन उचलूनच घ्याविशी वाटायची. पण आमच्याकडे ऑलरेडी ही कारळी असल्यामुळे मग ह्या सोनालीला एकांकडे सोडलं. तिथे ती मजेत आणि आनंदात असणार. कारण ते मासेखाऊ आहेत.

जरूर देईन इथे फोटो. (भामटी, उलुकी, माणिक-मोती, बेरकी-ठिपकी, सुंदरी, मनी आणि ह्या दोघी - कारळी आणि सोनाली ह्या मेंबर्सचे फोटो आहेत ते सगळे देईन.)

कोबीवरचे किडे ... त्यांच्यामुळेच भाजी रुचकर होते ना ?

... शाकाहारी कौ

शांकली, तु लिहिलेले वाचताना मला तुम्ही टाकलेल्या तिच्या फोटोंचीच आठवण आली गं Happy

रिया, मलाही आधी किडे म्हणजे इइइइइइइइइइ वाटायचे. पण आता जमाना बदललाय. भाजीत किडे आहेत म्हणजे त्या भाजीवर किटकनाशके फवारुनही ते जिवंत आहेत हे नक्की. म्हणजे एकतर हे किडे लैच भारी आहेत, किटकनाशके पचवुनही ते जिवंत आहेत किंवा त्यावर फवारलेली किटकनाशके तितकी भारी नाहीत. जर किडे ती पचवुन जिवंत राहताहेत तर मग मीही ती किटकनाशके पचवु शकेन Happy या भाज्या माझ्यासाठी सेफ आहेत. मग अशा भाज्या मी शांतपणे किड्यांना बाजुला करुन खाते.

दु:खात नेहमी सुख शोधावे. सदासुखी असण्याची गुरुकिल्ली Happy Happy

बहुतेक उडतानाचा फोटो आहे. ओळखणे कठिण. डोक्याला असलेल्या मोरपंखी रंगावरुन शिंजीर - पर्पल रम्प्ड सनबर्ड - वाटतो पण त्याचा आकार इतका मोठा नसतो. कदाचित फोटोत मोठा दिसत असावा.

purple rumped sunbird असे गुगलुन बघ. कदाचित तु ओळखशिल.

नाहीतर हा पक्षी कोणता म्हणुन एक बाफ आहे तिथे टाक.

सध्या हिवाळा आणि उन्हाळा यांचा संधिकाल सुरू झालाय....
हिवाळा आता काही दिवसांचा पाहुणा आहे.
दुपारी गार वार्‍याबरोबर झाडावरची उरली सुरली पिकली वाळकी पानं गळून पडताहेत.
लवकरच सृजनाचा सोहळा सुरू होईल.
पळस, पांगारा, गिरिपुष्प, बहावा यांची रंगांची उधळण बघण्यासाठी डोळे आसुसलेत..............

शब्द संपले की मी सरळ दुर्गाबाईंचं ॠतुचक्र उघडते आणि त्यात हरवून जाते ! Happy

हो.. त किड्याबदल मी कोबीबाबत नै फ्लॉवरबद्दल ऐकले होते.

फ्लॉवरच्या भाजीवर त्या फुलांमध्ये किडे / अळ्या असतात म्हणे.

बरं मग आता ऐकाच -
महत्वाची आणि प्रायोरिटीवाली टिप :- ही ऐकीव माहीती आहे. त्यातील सत्यतेबद्दल मी अजिबातच खात्री देत नाहीये.

काल माझ्या काही उत्तरभारतीय + दिल्लीवाल्या मित्रांशी गप्पा चालू होत्या. त्यातील एकाने सांगितलं की कोबीवर म्हणे असा एक किडा असतो जो साध्या डोळ्यांना दिसत नाही. तो किडा मिठाचे/ हळदीचे पाणी, गरम पाणी या पैकी कशातही मरत नाही. शिवाय त्याची ग्रोथ गरम वातावरनात होते त्यामुळे शिजवलेल्या भाजीतही तो जिवंतच रहातो. हा किडा पोटात जाऊन रक्तावाटे डायरेक्ट आपल्या मेंदूवर अ‍ॅटॅक करतो आणि माणूस काही काळाने दगावतो कारण त्या रोगावर काहीही औषध निघाले नाहीये अजुन तरी Uhoh
माझ्या टिम लिडरच्या मुंबईतल्या एका मित्राला हा आजार झालेला Sad
मला ही गोष्ट सांगणार्‍या सगळ्यांच्या घरात या किड्याच्या भितीने ९ वर्ष कोबी येणं बंद झालंय आणि हे ऐकून मी आणि आईने पण कोबी न खाण्याचं ठरवलंय.
याबाबत कोणाला काही माहीत आहे का? ही बातमी खरी आहे का?
कॅबेज वर्म असं गूगलल्यावर पण काही ठिकाणी अशी माहीती दिसली Uhoh

नोट - मी ज्या बद्दत बोलतेय ते म्हणजे कॅबेज म्हणजे कोबीच. फ्लॉवरची भाजी नाही

साधना ,कवितेला छान म्हणालात .,खूप आनंद
झाला . लहानपणी पाचगणीत एका भडकू टिचरला सापडलेले फुलपंख दिल्यावर आनंदाने चमकलेले ते डोळेआठवले.....
तुमच्या शांकलीबरोबरच्या माऊगप्पा आवडल्या सोबत च्या निसर्गप्रेमींच्या गप्पा
वाचायलाही खूप मजा आली.
सोनालीचे फोटो कित्ती गोंडस आलेत .
सर्वाना शुभरात्री......,

माणसाच्या शरीरार अनेक प्रकारचे जंत राहु शकतात. आपल्याला पोटात रहाणारे जंत माहीत असतात.

पाण काहे जंत लिव्हर , मेंदु इथेही राहु शकतात.

तांची अंडी कोबी , कांद्याची पात , गाजर याद्वारे जाऊ शकतात.

पण म्हणुन कोबी खाउच नये , असे मी कुठे वाचले नाही.

रिया, एखादी किड असेलच तरीही ती भाजी शिजवल्यावर जिवंत राहिल असे मला तरी वाटत नाही. भाजी शिजताना तापमान कमीत कमी १०० डिग्री पर्यंत तरी पोहोचतेच ना.

आणि ह्या तापमानालाही जिवंत राहुन माणसावर हल्ले करण्याचे मनसुबे आखणारा विषाणू भाजीत असला असता तर तो फक्त व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत राहिला नसता. डॉक्टर्सनी लोकांना सावध केले असते. जसे आता इबोलाबद्दल केलेय तसे.

Pages