निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असंही कुठल्याही भाज्या, फळे हे कोमट पाण्यात काहीवेळ बुडवून ठेवून धुवूनच खावीत.

पण मला एक कळत नाही, वरुन अख्ख्या असलेल्या भाजी/फळाच्या आत कीड कशी असते? कुठून आत जाते ती किंवा तिचे अंडे? ऑक्सिजन मिळत नसताना ती जिवंत कशी राहते? उदा. भरीताचे वांगे, चिकू, पेरु वगैरे.

कोबीत किड मी कधी पाहिली नाही. मी कच्चा कोबी कितीतरी वेळा खाल्ला आहे. फ्लॉवरमध्ये मात्रं हिरव्यागार किडी असायच्या पुर्वी. हल्लीचा फ्लॉवर किडीविरहीत असतो. म्हणजेच तो किटकनाशक मारलेला असतो का?

काहीही करुन गट फ्लोरा व्यवस्थित राखा. तब्बेतीचे बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होतात.

भयानक Sad टेपवर्म फक्त वरवर अभ्यासाला होता.

Once the larva gets inside the blood circulation and spreads to various parts of the body including liver, muscles and brain, it gets calcified.>>> what is calcification of larvae? or is it calcification of liver, muscles and brain?

फळाच्या आत असलेली किड बहुतेक फुले असल्यापासुन असणार त्या झाडावर. आधी, फुलावर, तिथुन जन्म पावलेल्या फळावर आणि मग आत :). किडक्या फळांना कुठेतरी एखादे भोक असतेच असते. तिथुन त्यांना मिळत असणार जे हवे ते.

काही वर्षांपासुन मी बारिक काळे भोक असलेले चिकु पाहतेय. चिकु खुप छान असतात पण कुठेतरी एखादे छिद्र असते आणि मग असा चिकु कापला की आत किड असते.

त्यामानाने भरताच्या वांग्यावरच्या किडी जवळजवळ नाहिश्या झाल्यात. नाहीतर आधी ही वांगी खुपच इस्पेक्शन करुन घ्यावी लागत. आणि असे करुनही वांगे भाजुन झाल्यावर मला एकदा त्यात एक अळीही भाजलेली मिळालेली Sad

लार्वी कुठेतरी शरीरात सेटल होतो. कधीतरी तो मरतो. तो मेला की त्या भागात कॅल्शियमचे कण जमा होतात. त्याला कॅल्शिफिकेशन म्हणतात.

मसल लिव्हर इथे असा लहान फोकस झाला तरी तासदायक नसतो.

मेंदुत झाला तर मात्र त्रासदायक असतो

लार्वी कुठेतरी शरीरात सेटल होतो. कधीतरी तो मरतो. तो मेला की त्या भागात कॅल्शियमचे कण जमा होतात. त्याला कॅल्शिफिकेशन म्हणतात.>>> मेला की कॅल्शियम का जमा होते? मायक्रोब्जना (पॅथोजेन्स) जश्या लिंफनोड्स ट्रॅप करतात तसं ह्या किंवा तत्सम वर्म्सना ट्रॅप करणारी काही सिस्टिम नसते का आपल्या शरिरात?

कॅल्शियम डिपोझिशन होते.>>
ही प्रकिया किती काळ चालते शरीरात? स्पेशली मेंदुत?
म्हणजे ह्या डिपॉझिशनचे (वाईट्ट) रिझल्ट साधारण कधी मिळतात? १ वर्ष / ४-५ वर्ष ?

अन्य काही कारणांमुळेही ब्लडव्हेसल्समध्ये कॅल्सिफिकेशन होत असेल ना? माझ्या बाबांच्या मेंदूला मानेतील शिरांमधल्या कॅल्सिफिकेशनमुळे रक्तपुरवठा कमी होतो असं डॉक्टर म्हणाले आणि कायमसाठी गोळ्या सुरु आहेत.

अगदीच वेग प्रश्ण आहे ना?
मला म्हणायच आहे, जर आता पर्यंत मी असे रॉ फुड खात असेल तर ह्याचे नक्की परिणाम कधी दिसुन येतात? डे १ ला तर हे नक्की समजणार नाही. काही लक्षणे दिसणार नाही. बरे समजा मी असे चुकुन वर्म खाल्ला असेल तर अशी कोणती बॉडी क्लीनिंग मेथड आहे की मी हे वर्म सिस्टीम मधुन काढुन टाकु शकते?
अर्थात असे काही दिसणार नाही की बॉ तो पहा गेला ५-१० जणांच घोळका शरीराबाहेर. Uhoh मग काय उपाय आहे यावर? जेणे करुन शरीरात गेलेले / न गेलेले वर्म काढता येतील बाहेर? एरंडेल?????

कॅल्सिफिकेशनमुळे रक्तपुरवठा कमी होतो >>> हे सॉर्ट ऑफ ब्लॉकेज असावेसे वाटते. मग ह्यावर दुसरा काही उपाय नाही? हे काढता / हलवता येत नाहीत?

धन्स काऊ Happy

साधना, ही पोस्ट मला वॉट्सअपवरून आलेली नाही. चर्चा करताना कळाली. आणि तिकडे अनेक डॉक्टरांनी याला दुजोरा दिल्याचही ऐकलंय. खखोदेजा

नमस्कार!

माझ्याकडचे हे झुडूप काल रात्री उमलले. ह्याचे नाव कुणाला माहित आहे का?
हे रात्रीच उमलते आणि फुलांना मंद सुगंध असतो . सकाळी पाकळ्या गळून पडलेल्या असतात.
ह्याला ईण्डोनेशियन भाषेत बुंगा मालाम म्हणजेच रात्रीचे फुल म्हणतात. मी हे भारतात सुद्धा पाहिले आहे. पण ह्याचे नाव मात्र मला माहित नाहिये.
कुणाला इंग्लिश किंवा मराठीतले नाव माहित असल्यास जरूर शेयर करावे. B740EG4CMAIiU3I.jpg

In Indonesia it is called "bunga sedap malam", meaning night fragrant flower. Botanical Name- Polianthes tuberosa, Plant Family- Amaryllis.

ई-पूर्वाई - गुगलून ही माहिती मिळाली - हे फूल पहिल्यांदाच पहातो आहे - याच्या पाना/फुलाचे क्लोज अप्स टाकलेत तर बरे होईल .... Happy

वरील फोटोतील फुलं आपल्याकडच्या कुंती/कामिनी सारखी दिसताहेत नै! पानांची रचनापण कुंतीच्या पानांशी मिळतीजुळती आहे.

ही कुंतीच आहे. Kemuning हे इंडोनेशियन भाषेतलं हिचं नाव. आणि मुर्राया पॅनिक्युलाटा (Murraya paniculata) हे हिचं बोटॅनिकल नाव. Happy

@ शांकली , साधना, correct! कुंतीच आहे ती.

गुगलून फोटो पाहिला.

@अदिती, होय, मी ही कर्नाटकातच पाहिले होते हे झुडुप. बहुतेक बेळगाव कडे. महाराष्ट्रात पहिले नव्ह्ते.

खूपच सुंदर आणि मंद सुवास आहे ह्याचा. पण काल अख्ख झुडुप उमललं होतं . त्यामुळे घमघमाट पसरला होता . Happy

तुमच्या ह्या group मध्ये मला नियमित भाग घ्यायला खूप आवडेल. खूप मस्त चर्चा चालू असते तुम्हासर्वांची .

गणेश जयंती च्या हार्दिक शुभेच्छा माझ्याकडूनही …

आज सकाळीच उमलले … अगदी पर्फेक्ट दिवस Jaswanda.jpg

@वर्षा, सुवास थोडासा वेगळा आणि मंद असतो जाई-जुई पेक्षा.

@सायली कालही अख्खी उमलली होती कुंती . इथे सध्या पावसाळा चालू आहे. तसं हे वर्षभर उमलतं पण त्याचा बहर ह्या महिन्यांमध्येच पहिला आहे मी इथे.

एक गंमत सांगू? आपण देवाला जी फुलं वाहतो त्यातली, आणि आणखीही इतर बरीचशी फुलं ही बाहेरच्या देशातून आली आहेत. जास्वंदी - हवाई मधून, झेंडू - अमेरिकेतून, अनंत - चीन, कवठी चाफा - फ्लॉरिडा, देव चाफा -मध्य अमेरिका, हादगा (अगस्ता) - मलेशिया आणि उ.ऑस्ट्रेलिया, बूच - ब्रह्मदेश इ... पण ही इतकी आपल्याकडे समरसून गेली आहेत की ती 'परदेशी' आहेत असं आपल्याला वाटत नाहीत. निसर्गाला 'राजकीय' सीमा कळत नाहीत.जिथे जिथे मानवाने वनस्पती नेल्या आणि लावल्या तिथे तिथे त्या आनंदाने रुजल्या. जिथे जातील तिथे आनंदाची पखरणच केली. जगाच्या उपयोगी पडल्या. इतकं कृतार्थ जीवन खूप कमी सजीवांच्या वाट्याला येत असेल नै! Happy

Pages